खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद Happy पण बाहुले नाहीयेत ते...
वो मै हू.. वो मेरी बेटी है.. वो मेरा बेटा है.. और हमारे यहा.. पार्टी हो रही हैsss

PSX_20210813_153648.jpg

डावीकडून दाण्याचा कुट आणि ओलं खोबरं घातलेली काकडी टोमॅटो कोशिंबीर, शेवया खीर, श्रावण घेवाड्याची रस्सा भजी, भात आणि साधं वरण आणि पोळी
मला जे चार पदार्थ करायला आवडतात, सोपे जातात आणि ज्यात मी कमीत कमी दमते असे पदार्थ केले आहेत त्यामुळे उगाच "आमच्यात किनयी अमूक अमूक न करता तमुक तमूक करतात "आणि मग तेच कसं बरोबर वगैरे टाईप्स कमेंट्स करू नयेत.

अरे वाह, नागपंचमीचा नैवेद्य Happy
लहान असताना आमच्याकडे नागाची मुर्ती आणायचे. आता व्हॉटसपवरच कळले तर कळते नागपंचमी

आमच्याकडे नागपंचमीला नैवेद्यासाठी सांजा म्हणजे शिऱ्याची पोळी असते,जी पुरणपोळी प्रमाणे तूप,दूधासोबत खातात.

रेस्पी टाकणार होतो पण बघतो. कसं जमतंय ते.
सध्या फोटो पाहून घ्या.
photo_2021-08-14_21-47-47.jpgphoto_2021-08-14_21-47-46.jpgphoto_2021-08-14_21-47-41.jpg

चिकन सलामी (ऑप्शनल.) शिमला, कुलु, मनाली, हे ते.

पालक आहे. कांदा आहे.

हल्यापिनो नव्हती. मग घरातली कमी तिखट मिर्ची चकत्या करून 'पिकल' केली. अर्थात व्हिनेगर्+पाणी+मीठ भिजवून ठेवली.

दिसायलादिसतंय तसंच चवीलाही झक्कास होतं.

चीज मोझरेल्ला + चेडार्/शेडार आहे. वर चौकोनि फोडी घरात सापडलेल्या अमूल चीजच्या आहेत, संपवण्यासाठी.

अन हो.

थिन क्रस्ट, होल व्हीट, पॅन फ्राईड. Wink

हा धागा किती नेत्रसुखद आहे. सर्वांचे फोटो व पदार्थ खूप खूप मस्त ! बघून आपल्यालाही करायची स्फूर्ती येते पण आता उत्साह नाही राहिला एवढा खरा

अईगं जीवच घेतलात आ.रा.रा.
पातोळ्या पण मस्त आहेत आणि बाकी सगळ्यांची ताटं पण लै भारी.
रून्म्या तुझी बायको केक 1नंबर करते रे. सहीच.

मूगलेट भारी दिसतेय... याची रेसिपी आहे का कुठे? बघूनच खावेसे वाटतेय

धनुडी धन्यवाद....... बायकोतर्फे

आरारा, लय भारी. कधी जमतय बघू. बेस घरीच केला होता का?.
मी परवा सुपरभारी कोथिंबीर वड्या केल्या होत्या. एकदम सुपरहीट. सगळ्या तज्ञ मंडळींनी कौतुक केले. फोटो काढायच्या आधीच पब्लिकने ताव मारला. Happy

Pages