सारस शुभेच्छा

Submitted by Barcelona on 23 June, 2021 - 17:22
सारस शुभेच्छा

[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]

सारस शुभेच्छा

शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.

खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.

म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!

आता थोडं सारस विषयी - हे सारस शुभेच्छा “व्रत” स्वतःसाठी करत नाहीत, इतरांसाठी असतं. जपानी लोकं १००० ओरिगामी सारस (क्रेन्स) करून एकमेकांना देतात. कुणी खूप आजारी असेल, मोठ्या परीक्षेला किंवा स्पर्धेला जाणार असेल इ तर देण्याची प्रथा आहे. “Senbazuru” सर्च इंजिन मध्ये पाहिलं तर अधिक माहिती सापडेल.

कार्पोरेट कल्चर मध्ये याचा ‘टीमवर्क’ साठी वापर केला जातो. एक व्यक्तीने केले तर अनेक वेळा हे “व्रत” पूर्ण ही होत नाही अशी धारणा आहे. म्हणून सहसा टीम्स मिळून अशा ऍक्टिव्हिटी करतात. ह्यात “कारण” जसे आजारपण, परीक्षा इ आवश्यक नाही. पेशन्स वाढणे, सामंजस्य वाढणे, सर्जनशीलता वाढणे, एकत्र काम करणे असा काहीसा उद्देश असतो.

असंबद्ध गप्पा या वाहत्या धाग्यावर सारस चित्रांची सुरुवात झाली. मी सुरुवात करायला निमित्त ठरले पण मला रोज जमतच असं नाही. १०० सारस दिवस पूर्ण करता करता मी जिथे कमी पडले तिथे तिथे इतर आयडीनीही स्वतः केलेली ओरिगामी, इतरांची ओरिगामी, ते सारस विमान रूपातील ‘सारस चित्रे’ आणली. टीमवर्कची हीच तर मजा असते. काहींना मजा आली, काहींना बोअर झालं पण चर्चेतून वाहत्यापेक्षा कायम स्वरूपी धागा असावा असे धाडस आले. आता इथे दिवस १०१ पासून पुढे सुरु… १००० दिवसापर्यंत प्रयत्न करूया.

धाग्याचे नियम काय -

शुभेच्छा द्या आणि घ्या. मी रोज एक ओरिगामी सारस चित्र टाकायचा प्रयत्न करेन. मी स्वतः ओरिगामी फार करत नाही पण उत्तम आर्टिस्टची ओरिगामी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीही शुभेच्छा+चित्रे देऊ शकता. चित्र सारस/क्रेन या विषयाच्या अनुषंगाने असल्यास उत्तम. आज कॅमेरात क्रेन नसेल तरी ९०० दिवस आहेत, मंडळी. ९०० दिवस चालू राहणारा उपक्रम आहे.

शुभेच्छा स्वीकारल्या तर थँक्यू/धन्यवाद इ म्हणून जा. नाही स्वीकारल्या, नाही आवडल्या तर मुद्दामून सांगायची गरज नाही Happy

(एखादी कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश आयुष्यात असेल नि तुमच्या मनातून अजिबात शुभेच्छा येत नसतील तर… होतं असं बॉस!! तसं सांगू शकता मला आणि आप की फर्माईश छाप मी तुमच्या वतीने शुभेच्छा पोस्ट करेन. #positivevibes)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद देवकी ताई.
काल शंभर पूर्ण झाले. Happy
Screenshot_20210816-090653.jpg
वरील फोटोतून काही गायब झालेत. Happy हे तसेही मी देणारच आहे हळूहळू.

धन्यवाद मृणाली. Happy
रच्याकने, तुम्हा सगळ्यांचे शुभेच्छांसाठी खूप आभार. _^_ माझ्या मेंटरची सर्जरी नीट पार पडली. मेसेजही आला. Happy
आजचे हे सारस तुम्हा सगळ्यांसाठी.
Screenshot_20210818-185852.jpg

वाह!!!!!!!!!!!!!!! छान झालं. उदंड आयुष्य लाभो! त्यांना, तुला, आणि इतर वाचणार्‍या मायबोलीकरांना.

किती सुरेख सारस आणि मांडणी सुद्धा.
माझ्या मेंटरची सर्जरी नीट पार पडली. मेसेजही आला. Happy>>>> हे वाचून तेवढे बरं वाटलं! त्यांची रिकव्हरी फास्ट होउदे.
सारसांसाठी धन्यवाद
ते तेवढं नाही केवढं बरं वाटलं ! ऑटो करेक्शनच्या नानाची टांग.

किती सुरेख सारस आणि मांडणी सुद्धा.
माझ्या मेंटरची सर्जरी नीट पार पडली. मेसेजही आला. Happy>>>> हे वाचून तेवढे बरं वाटलं! त्यांची रिकव्हरी फास्ट होउदे.
सारसांसाठी धन्यवाद °>>>>+1

दिवस १५० चित्र ७५ अनामिका सर्व चित्रांबद्दल खूप धन्यवाद
celiarichards.jpeg (credits: Celia Richards) खरं तर अनामिकाचे इतके सुरेख सारस की इथे हा धागा थांबवायला हवा. (रिटायर अ‍ॅट पीक!!) . पण तिरपागड्या डोक्याची माणसे भेटली की आपल्याला शुभेच्छा द्यायची लै गरज असं उगा वाटून जातं. कंडक्टर लोकं एक नंबर तिरपागडे - खूप कष्टाचे काम आणि वसवस किती घालतात. "सुट्टे नाय" "मावशे, असा कसा सुटला स्टॉप, उतर हिथं आता", "पास संपला ना भाऊ काल. उद्या नवा घेऊन ये नायतर उतरून दिल" असलं काय काय ओरडत कशी का होईना बस रूटवर धावत रहाते नि माणसं मुक्कामी जात रहातात. मुक्कामी गेल्यावर केलेले हे बसतिकीटांचे ९५८ सारस! (ह्या ताईची काय चिकाटी आहे!!) तुमचाही आजचा प्रवास सुखाचा होऊ दे....

अनामिका, सुबक सारस ,छान बातमी दिलीस.
तिकीट सारस एकदम फुलांचा ढीग वाटतोय. कल्पना छान यामागची.
धन्यवाद आणि शुभेच्छा.

मुलींन्नो.. तुम्हा सगळ्यांचे पुनश्च आभार. साॉरी खूप दिवसात आले नाही इकडे.. व्हायरल फिवर आणि पायाचा छोटा अपघात याने बेजार झाले होते. आता बरीये. मेंटर इन रिकव्हरी फेज. :))

अबब! 958??? कमाल चिकाटी आहे. माझे आत्ता २००+ झालेत फक्त. शुभेच्छांसाठी धन्यवाद. सगळ्यांचा प्रवास सुखकर होवो.

बापरे हात जोडले खरंच. बसच्या तिकिटाचे एवढूसं विमान करायचे मी, पण सारस बाबो किती किचकट काम. धन्य हो त्या ताईंची. आणि थोडे थोडके नाही 958?

हर्पेनजी.. चालेल ना. उखाण्यांच्या धाग्यावर उल्लेख केलाय मी आणि सी ताईने.

अनामिका - मी नाहीये काढलेला तो फोटो, स्पर्धेदरम्यान काढलेले माझे फोटो स्पोर्टोग्राफ नावाच्या कंपनीकडून विकत घेतलेत त्या सोबत हा मिळालाय.

अ‍ॅडमिन सर, कधी कधी ह्या धाग्यावर लिहायचे असते. पण ह्याची व्हिजिबिलीटी सेटींग ग्रूपपुरती करून एखाद्या कमी वहिवाटीच्या ग्रूप मध्ये टाकता येईल का? म्हणजे ज्यांना वाचायचे असेल/चित्र बघायची असतील ते ग्रूपचे सदस्यत्व घेतील.

अरे वा! आला का फोटो मेडलचा? भारीये हे मेडल.
थँक्यु सीताई, मी खरंतर हेच लिहायला आलेले की सीताई प्रश्न तुमच्यासाठी आहे. Lol शे दोनशे सारस काय केले, मला हा धागा आपलाच वाटू लागला. Happy Happy

@हर्पेनजी तुमचे पुनःश्च अभिनंदन. Happy

मेडल भारीच.
इटलीतले सारस फोटो पण सुंदर..

ते इतकं कष्टाचे मेडल इथे बघणेही टडोपा मोमेंट होती. धाग्याला धक्का स्टार्ट केल्याबद्दल थँक्यू. एक-दोन चित्रे नि टॉपिक्स आहेत डोक्यात. विकेंडला लिहीते. तोवर अ‍ॅडमिनने व्हिजिबिलीटी ग्रूपपुरती केली तर बरं होईल.

Pages