सारस शुभेच्छा

Submitted by Barcelona on 23 June, 2021 - 17:22
सारस शुभेच्छा

[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]

सारस शुभेच्छा

शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.

खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.

म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!

आता थोडं सारस विषयी - हे सारस शुभेच्छा “व्रत” स्वतःसाठी करत नाहीत, इतरांसाठी असतं. जपानी लोकं १००० ओरिगामी सारस (क्रेन्स) करून एकमेकांना देतात. कुणी खूप आजारी असेल, मोठ्या परीक्षेला किंवा स्पर्धेला जाणार असेल इ तर देण्याची प्रथा आहे. “Senbazuru” सर्च इंजिन मध्ये पाहिलं तर अधिक माहिती सापडेल.

कार्पोरेट कल्चर मध्ये याचा ‘टीमवर्क’ साठी वापर केला जातो. एक व्यक्तीने केले तर अनेक वेळा हे “व्रत” पूर्ण ही होत नाही अशी धारणा आहे. म्हणून सहसा टीम्स मिळून अशा ऍक्टिव्हिटी करतात. ह्यात “कारण” जसे आजारपण, परीक्षा इ आवश्यक नाही. पेशन्स वाढणे, सामंजस्य वाढणे, सर्जनशीलता वाढणे, एकत्र काम करणे असा काहीसा उद्देश असतो.

असंबद्ध गप्पा या वाहत्या धाग्यावर सारस चित्रांची सुरुवात झाली. मी सुरुवात करायला निमित्त ठरले पण मला रोज जमतच असं नाही. १०० सारस दिवस पूर्ण करता करता मी जिथे कमी पडले तिथे तिथे इतर आयडीनीही स्वतः केलेली ओरिगामी, इतरांची ओरिगामी, ते सारस विमान रूपातील ‘सारस चित्रे’ आणली. टीमवर्कची हीच तर मजा असते. काहींना मजा आली, काहींना बोअर झालं पण चर्चेतून वाहत्यापेक्षा कायम स्वरूपी धागा असावा असे धाडस आले. आता इथे दिवस १०१ पासून पुढे सुरु… १००० दिवसापर्यंत प्रयत्न करूया.

धाग्याचे नियम काय -

शुभेच्छा द्या आणि घ्या. मी रोज एक ओरिगामी सारस चित्र टाकायचा प्रयत्न करेन. मी स्वतः ओरिगामी फार करत नाही पण उत्तम आर्टिस्टची ओरिगामी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीही शुभेच्छा+चित्रे देऊ शकता. चित्र सारस/क्रेन या विषयाच्या अनुषंगाने असल्यास उत्तम. आज कॅमेरात क्रेन नसेल तरी ९०० दिवस आहेत, मंडळी. ९०० दिवस चालू राहणारा उपक्रम आहे.

शुभेच्छा स्वीकारल्या तर थँक्यू/धन्यवाद इ म्हणून जा. नाही स्वीकारल्या, नाही आवडल्या तर मुद्दामून सांगायची गरज नाही Happy

(एखादी कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश आयुष्यात असेल नि तुमच्या मनातून अजिबात शुभेच्छा येत नसतील तर… होतं असं बॉस!! तसं सांगू शकता मला आणि आप की फर्माईश छाप मी तुमच्या वतीने शुभेच्छा पोस्ट करेन. #positivevibes)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारस शुभेच्छांसाठी शुभेच्छा. शुभेच्छा दिल्यानंतर थँक्यु, धन्यवाद म्हणायचे हा नियम आवडला. नियम सर्वांसाठीच असतील आणि ते पाळतील ही अपेक्षा.

two cranes.jpeg (credit: pixabay)
माझ्या आयुष्यात "कटकटेश्वरी" हा एक क्लायंटचा प्रकार आहे. हे असे क्लायंटस फार सूक्ष्मपणे कटकट करत असतात आणि अनेक वेळा ते ओळखणं ही अवघड असतं. आपण उगीचच दमत जातो. तुमच्या आयुष्यात ही कुणी कटकटेश्वरी असेल तर तिला ओळखण्यासाठी आज शुभेच्छा!!

सहजराव, धन्यवाद!!

धाग्याला शुभेच्छा !
शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते. >> असहमत. रोजच्या व्यवहारात गुड मॉर्निंग, गुटन टॅग, रामराम, शुभ सकाळ, सुप्रभात, खुदा हाफिज (?), सत श्री अकाल या शुभेच्छा लोक एकमेकांना देतच असतात.

सुंदर फोटो!
धन्यवाद. तुम्हालाही खूऽऽऽप साऱ्या शुभेच्छा!

अवांतर- मला ‘सारस शूभेच्छा’ असे पटकन बोलता नाही आले. सारस मधला दूसरा ‘स’ सायलेंट होतो.

सारस शुभेच्छा!

.[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]>>>> खूप देखणे आहे.
अवांतरः अगच्या धाग्यावर उशीरा गेल्याने मलाही सारस प्रयोजन महित नव्हते.विनाकारण सारसाचा राग यायचा.अर्थात हा माबुदो.नंतर मीच माझ्या नकळत त्याची वाट पाहू लागले.

निरु,सुंदर फोटो.

ओह, मी विचारणारच होते अस्मीला. ये सारस क्या माजरा है?
सी चा डिपी ही मला खुप दिवस खुणावतोय. माझ्या माहेरी ओरिगामीचं वेड आहे सगळ्यांनाच.
वरचे फोटो छान .
सारस शुभेच्छा

भारीच.
सीतै फोटो चोर सकते है क्या ?

जेम्स बाँड, फोटो पिक्साबे इ प्रताधिकारमुक्त असतील तर वापरू शकता. मी सहसा असेच फोटो टाकते. बोअर्ड पांडा इ वेबसाईट्ससाठी क्रेडीट देऊन नॉन-कमर्शियल एक्टीव्हिटीज साठी वापरू शकता. येथील (मी डकवलेले) फोटो मायबोलीचे प्रताधिकार नियमानुसार आहेत. इतर आयडींनी वापराची परवानगी दिली असेल तर वापरू शकता. मनाजोगते फोटो सापडण्यासाठी शुभेच्छा!!

(अर्थात वेमांनी कधी प्रताधिकार भंग झाल्याचे निदर्शनास आणले तर काढून टाकेन. कारण सर्वच नियमांचे सर्वच बारकावे माहिती असतात असे नाही.)

मस्तच सी ,येऊ देत. फोटो सुरेख व अभिनव असतात. Happy
वटपौर्णिमा स्पेशल 'पारंबीचा सारस' आण. कायप्पाने डोके खाल्ले. हमको उतारा चाहिये.. ! Wink

निरू , फोटो जबरदस्त !
श्रवु , मस्तच फोटो !

पारंबीच्या सारसाला नवर्याने उलट्या प्रदक्षिणा घातल्या कि सकाळी वडाला घातलेल्या प्रदक्षिणांचा प्रभाव कमी होतो.

सरस सारस शुभेच्छा धागा. मी अ ग वर येऊन वाहून नसलं गेलं तर नेहमी वाचायचे. यामागची कल्पना ही छान आहे.
निरु नेहमीप्रमाणे अप्रतिम फोटो.
श्रवु छान फोटो.

उत्तम धागा. सॉरी मी उशीरा पाहीला अन्यथा वटपोर्णिमेच्या शुभेच्छा इथेच पोस्ट केल्या असत्या.

छान वेगळा धागा. धाग्याचा हेतू सफल व्हावा यासाठी सारस शुभेच्छा!!
नेचर सिरीजच्या बर्ड बुकमधल्या जॅपनीज क्रेनचे माझे एक जुने कलर्ड पेन्सिल चित्र.
Japanese cranes 48k.jpg

दिवस १०२: फोटो, चित्रे, आणि शुभेच्छा बद्द्ल खूप धन्यवाद.
flickr_cheeksiej.jpg (credit: Cheeksiej ) जगाच्या ज्या भागात तुम्ही राहत असाल त्याप्रमाणे तुमची वटपौर्णिमा झाली असेल, किंवा चालू आहे. भन्साळीची नजर ह्या सणावर पडो नि एखादे मस्त बॉलिवूडीय गाणे ह्या सणाला मिळो ह्या साठी शुभेच्छा. वडाभोवती रणबीर-साराने 'अकेले अकेले कहां जा रहे हो' रिमिक्स करत प्रदक्षिणा घातल्या तर आमची काही ना नाही... तोवर हा एक "कुछ ना कहो, कुछ भी ना कहो" छाप लग्नाचा सारस मंडप!

ओह ओके.

धन्यवाद सीमंतिनी आणि वर्षा.

वर्षा, तुझं स्केच काय सुंदर आहे ग. तुझी सर्वच स्केचेस अतिशय सुंदर असतात.

Pages