नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.
पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.
संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.
मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.
मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्यात, गटार्यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.
मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.
धन्यवाद.
कायद्याखाली अटक टाळता यावी
..
काही लोक काही विचार न करता
काही लोक काही विचार न करता प्रतिसाद लिहतात.>> मी जे लिहिले ते अतिशय विचारपुर्वक लिहिले आहे. या घटनेबद्दल मी या क्षेत्रातील काहींशी चर्चाही केली. त्यांनी मी वर मागितली तितकी जरी माहिती दिली तरी शोध घेता येईल असेच सांगितले.
काही लोक काही विचार न करता
काही लोक काही विचार न करता प्रतिसाद लिहतात.>> मी जे लिहिले ते अतिशय विचारपुर्वक लिहिले आहे. या घटनेबद्दल मी या क्षेत्रातील काहींशी चर्चाही केली. त्यांनी मी वर मागितली तितकी जरी माहिती दिली तरी शोध घेता येईल असेच सांगितले.
मी स्वत: जाणार आहे पोलिसांकडे हेचं अगदि बोलायला. तुमची गरज भासली तर सांगते मेसेज करुन. मी तुम्हाला माहिती दिली असती पण इथे आपली फार ओ़ळखी नाही. तरीपण मी मानते तुमच्या कनसर्नला आणि त्याचा आदरही करते. अनुकंपा दाखवल्याबद्दल मनापासून आभार.
मुलगी थंड डोक्याने प्लॅन करुन
मुलगी थंड डोक्याने प्लॅन करुन उद्योग करणारी आहे, मुलाविरुद्ध त्याच्या अटकेसाठी पुरावे जवळ बाळगते आहे, गेल्या ५ वर्षापासुन मुलासोबत संबंध आहेत पण आताच मूल होउ घातले आहे ते पण आइ बापाला ब्लॅकमेल करण्यासाठी, आयफोन सोन्याची अंगठी पैसे इतकं सगळं वेळोवेळी मुलाला देते आहे...
इतकं सगळं असुनही .....
मुलगी अजुन लहान आहे , तिला काही कळत नाही असा तिच्याबाबतीत विचार करणे खरच चूक आहे.
नक्कीच ती स्वत: सुद्धा मुलासोबत कुठल्या तरी गुन्ह्यात सामिल आहे असे वाटते. ती इनोसंट किंवा बावळट असेल असे वाटत नाहिये.
ही परिस्थिती शांतपणे हाताळणार्या आई वडीलांची खरच कमाल आहे.
वरती दिलेला वकीलाची मदत घ्या हा सल्ला अगदी अगदी पटला.
मला कायदा etc बाबतीत जास्त
मला कायदा etc बाबतीत जास्त माहिती नाही आहे. पण त्या लोकानी
राज्य बदलले आहे. आणी महिला आयोग , न्यायपालिका, पोलिस स्टेशन या सगळ्या च्या चकरा मारणे कसे शक्य होइल त्या आई वडिलांना,.वर आणी मुलगी 9 महिन्याची गरोदर आहे तिच्या कडे लक्ष द्यायला हवे. खर्चा चे नियोजन करयला हवे. कसे जमणार सगळे.
आजचा ट्विस्ट :- प्रकरणात
आजचा ट्विस्ट :- प्रकरणात मोठ्या पदाचे पोलीस अधिकारी कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपाने involve होते.
माझं तर म्हणणं आहे मुलगा आणि मुलगी पेक्षा त्या एरियातल्या पोलिसांवरच कारवाई केली गेली पाहिजे कारण इतका भयानक गुन्हा मुलगा करतोय तरी त्याला सोडून दिलंय, मुलीकडे बक्कळ पुरावा आहे तरी तिच्याकडून तो धमकावून काढून घेता येत नाहीये. काय उपयोग अशा पोलिसांचा?
राज कुंद्रा प्रकरण गरम आहे तेंव्हा मीडिया ची मदत घेतली तरी लगेच हालचाल होईल. कोणाचे मीडिया मध्ये मित्र असतील तर या धाग्याची लिंक द्यायला हवी. पोलीस इंटरनल माहिती घेऊन मुलाला अडकवू शकतील आणि असे कीड असलेले पोलीस डीपार्टमेंट बदलले जाईल म्हणजे आणखी कोणती मुलगी यात फसणार नाही
रिया आपण मामूली लोक आहोत
रिया आपण मामूली लोक आहोत सेलेब्रेटी नाहीत. मुलगी मिळाली हेचं पोलिसांचे केवढे उपकार झालेत. मुलाला अटक करणे कायद्यात बसत नाही. कारण दोघे सज्ञान आहे आणि मुलीचा त्याला सपोर्ट आहे. मुलगी इतर कुठल्याच गोष्टीत पडलेली नाही. फक्त तिचे प्रेम आहे त्याच्यावर आणि तो कसाही असला तरी त्याच्यासोबत तिला लग्न करायचे आहे. मुलगी स्वतःहून घरातून पळून गेली. पण पोलिस वारंवार म्हणत आही तिने फक्त एका वाक्यात सांगावे मला ह्या मुलानी त्रास दिला. बस त्याला लगेच आम्ही अटक करु. पण तिला ते नको आहे. आपलच नाण खोट असेल तर आपला नाईलाज असतो.
आजचा ट्विस्ट :- प्रकरणात मोठ्या पदाचे पोलीस अधिकारी कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपाने involve होते.>> प्लीज हे असे शेरे नकोत. नॉरमल लिहा. अधिकारी ह्यात होते ह्याचा अर्थ खूप होतो. त्यांनी फक्त कारवाई नाही केली. पण नसेल केली त्यामागचे कारण त्यांना कायद्याविरुद्ध जाणारा एकही पुरावा मिळाला नसेल. हे असेल.
मुलगी कुठल्या गुन्ह्यातही
मुलगी कुठल्या गुन्ह्यातही सामील असेल अशी शक्यता गृहीत धरून बाळ झाल्यावर तिला त्याच्याबरोबर कधीच एकटं सोडू नका. 'कुमाता न जायते' वगैरे बोलायला ठीक आहे. दत्तक जाईपर्यंत त्याच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. (वाईटात वाईट घडू शकतं आणि आपण त्यात ओढले जाऊ शकतो, जबाबदार धरले जाऊ शकतो हेही विचारात घेऊन) सोनोग्राफी रिपोर्टवर भलत्याच मुलाचं नाव असणं आणि मुलीला हे मान्य असणं वगैरे डिटेल्स गंभीर आहेत.. वकिलांचा सल्ला खरंच घ्या. त्यांना अशा केसेसचा अनुभव असू शकतो. आपलं अनुभवविश्व तोकडं असतं.
माझा आपल्या सिस्टमवर विश्वास
माझा आपल्या सिस्टमवर विश्वास नाही >>
एक डॉक बाळाच्या आईच्या परवानगीविना, सहीविना बाळ परस्पर दत्तक देऊन टाकण्याची व्यवस्था करतात हे वाचून माझाही राहिला नाही.
वावे हो हे सर्व मी करणार
वावे हो हे सर्व मी करणार आहेचं. तो रिपोर्ट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी जे करेन ते वि. वि. करुनचं करणार आहे. एकदा नाही १०० वेळा.
माझा आपल्या सिस्टमवर विश्वास
माझा आपल्या सिस्टमवर विश्वास नाही >>
एक डॉक बाळाच्या आईच्या परवानगीविना, सहीविना बाळ परस्पर दत्तक देऊन टाकण्याची व्यवस्था करतात हे वाचून माझाही राहिला नाही.
नाही असे नाही. अशा केसेस स्पेशल केसेस म्हणून हाताळल्या जातात आणि सोफोश सारख्या संस्था ह्या केसेस कायद्याच्या पाठिंब्याशिवाय नाही करत. माझी मीटींग आहे त्यांच्याशी ह्या आठवड्यात तेंव्हा मला नीट सांगता येईल.
शुजिता तुमची खुपच मदत होत आहे
शुजिता तुमची खुपच मदत होत आहे मुलीच्या आई वडीलांना.
नाहितर आज काल कोणी कुणाची मदत करत नाही.अशा प्रकरणात तर नाही च नाही. सगळे दुरुन डोंगर साजरे असतात.
तुमची गरज भासली तर सांगते
तुमची गरज भासली तर सांगते मेसेज करुन. >> नक्की सांगा. आणि विश्वास उडावा इतकी निदान इथलीतरी सगळीच यंत्रणा बरबटलेली नाही हेही सांगु इच्छितो.
या घटनेने चांगलेच हादरायला
या घटनेने चांगलेच हादरायला झाले आहे आणि विचारात पाडले आहे.
सगळ्यांचीच खूप काळजी वाटते आहे.
मुलाने मुलगी पटवली आणि मग त्याला सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच मिळाली. तो आता ती सोडायला तयार नाही.
कदाचित त्यासाठीच मुलीला pregnancy साठी भरीला घातलं असेल.
आत्ता खरं मुलीवर मुलाचा पगडा जास्त आहे. ती अत्यंत थंड डोक्याने planning करून आई-वडिलांना नाचवत आहे.
खूप pessimistic मत आहे पण आई-वडिलांनी वकिलांच्या सल्ल्याने will करून सगळी मालमत्ता मुलीकडे जाणार नाही अशी सोय करावी.
लग्न लावून देत नाहीत, पैसे देत नाहीत म्हणून त्या दोघांनी आई-वडिलांचे काही बरे-वाईट करू नये. मुलाकडे already गुन्हेगारी background आहे.
मुलगा मुलीला सहज सोडणार नाही हे नक्की. एकमेकांच्या ओढीने ते सुधारले तर सगळ्यांत ideal स्वप्नरंजन.
तोपर्यंत आई-वडिलांनी स्वतःला सुरक्षित करावे.
बाळाला चांगले घर मिळो ही सदिच्छा.
शूजिता , ज्या संयमाने तुम्ही
शूजिता , ज्या संयमाने तुम्ही हा धागा आणि उलटे सुटले प्रतिसाद हाताळता आहात त्याबद्दल तुमचेही कौतुक वाटते.
आई वडिलांच्या मनस्थितीची कल्पना करू शकते. त्याना हे हाताळण्याची शक्ती मिळो. .
काही वेळा अशा मुली अक्कल गहाण टाकून आई वडिलांवरच केस करू शकतात. त्यामुळे वरील सल्ल्याप्रमाणे वकील नक्की तयार ठेवा.
जन्माला येणारे मुल, मुलगी
जन्माला येणारे मुल, मुलगी यांची चिंता आई बापांनी सोडावी,
आणि स्वतःच्या सुरक्षिततेची करावी.
Extream विचार वाटत असतील तर आधीच सॉरी, पण मुलीची थंड डोक्याने काम करायची पद्धत भयस्पद आहे.
१) यदाकदाचित एकाचा व दोघांचा अचानक/संशयास्पद मृत्यू झाल्यास BF वर संशय घ्यावा या अर्थाचे डॉक्युमेंट वकीलाकडे देऊन ठेवावे.
2) दोघांचा मृत्यू झाल्यास मालमत्ता मुलीला मिळणार नाही याची तजवीज करावी.
3) जर भविष्यात बाळाला आई वडिलांकडे सोडून मुलगी गायब झाली (पळून गेली) तर त्या बाळाचे भवितव्य ठरवायला आजी आजोबा फ्री असतील अश्या अर्थाचे समतीपत्रक मुलीकडून घ्या. (अर्थात वकिलाच्या सल्ल्याने)
वरील तिन्ही गोष्टी खूप ओपनली कराव्यात आणि मुली+BF ला हे कळू द्यावे.
फॉरेन्सिक फाईल्स मध्ये मुलगी + bf ने पालकांची हत्या केल्याच्या खूप केसेस असतात. पालक मेल्याने आपल्याला काही आर्थिक फायदा होणार नाही हा विचार त्यांना थोडे फार थांबवू शकतो.
कायच्या काय आहे
कायच्या काय आहे
मुलगी एकुलती एक आहे, म्हटल्यावर तिच वारस असणार
मुलगी एकुलती एक आहे,
मुलगी एकुलती एक आहे, म्हटल्यावर तिच वारस असणार>>> फक्त वडिलोपार्जित संपत्ती बद्दल आहे असं, स्वर्जित संपत्ती चि विल्हेवाट स्वतः च्या मर्जीने करु शकतो
Kunala denar
Kunala denar
घटनेने चांगलेच हादरायला झाले
घटनेने चांगलेच हादरायला झाले आहे आणि विचारात पाडले आहे. + १२३४
शूजिता , ज्या संयमाने तुम्ही हा धागा आणि उलटे सुटले प्रतिसाद हाताळता आहात त्याबद्दल तुमचेही कौतुक वाटते. + १२३४५६ आणि प्रत्येक बाजू पडताळणी करून बघत आहात ईथले वाचून.
अश्या प्रकारे काही घटना घडतात.. अगदी काही वर्षांपूर्वी घडलेल्या पण ऐकल्या आहेत..तेव्हा खोटं नक्कीच नाही हे.. अगदीच होऊ शकतं असं.
पण ज्यांना वाटतं असेल हे कालपनिक त्यांना धागा ignore करायचा option आहे.. पण त्या विचारत आहेत , अपडेट देत आहेत आणि लोकं मनापासून उपाय / सल्ला/ मतं देत आहेत तर उगाच ट्विस्ट/ बातमी ई. म्हणू नये ही विनंती.
सिम्बा ++++++
सिम्बा ++++++
BLACKCAT: कुणाही व्यक्ती अथवा ट्रस्टला, स्व अर्जित संपत्तीचा आपण योग्य दस्तऐवज आणि वकील/ सीए यांच्या सल्ल्याने आपल्याला हवा तसा विनियोग करू शकतो. हा मुद्दा वेगळा की पोटची मुलगी कशीही असली तरी आईवडील दुसऱ्या कोणाला आपली संपत्ती देतील की नाही.
विषयांतर केल्याबद्दल क्षमस्व
प्लीज हे असे शेरे नकोत. नॉरमल
प्लीज हे असे शेरे नकोत. नॉरमल लिहा. अधिकारी ह्यात होते ह्याचा अर्थ खूप होतो. त्यांनी फक्त कारवाई नाही केली. पण नसेल केली त्यामागचे कारण त्यांना कायद्याविरुद्ध जाणारा एकही पुरावा मिळाला नसेल. हे असेल.
>>>>
प्लिज असले आरोप नकोत. काय चुकीचं लिहिलंय मी त्या वाक्यात ते दाखवून द्या बरं. असो! मुलीकडे बरेच पुरावे आहेत ना? सध्या सध्या पोलिसांना पण घाबरून मुली धडाधड सत्य बोलून टाकतात. एवढ्या मोठ्या पदावरच्या अधिकार्यांना मुलीकडून पुरावे काढून घेणं जमलं नाही? काय राव फेकताय. किती ते पण.
माफ करा ताई पण अविवाहित माता आणि टीनेजर मुला मुलींची होणारी फसवणूक ही फार मोठी आणि सेन्सेटीव्ह गोष्ट आहे. तिचा जर वापर तुम्ही वेळ जात नाही म्हणून टाईमपास करायला म्हणून करत असाल तर हर नैतिक दृष्ट्या फार वाईट आहे.
माझा या धाग्यावरचा हा शेवटचा प्रतिसाद.
धागा वाचून हादरायला झाले.
धागा वाचून हादरायला झाले. स्वाती २ प्रतिसाद पटले.
धागाकर्ती मदती च्या हेतूने धागा काढते, सल्ला विचारते, तर काही लोक तिलाच आरोपी च्या पिंजर्यात उभे करून मॉरल पोलिस बनत आहेत. हि घटना कुणाही बाबत घडू शकते, त्यात पुन्हा आईलाच दोष द्यायचा ह्यातून तसे प्रतिसाद देणार्याची कीव आली. मुलगी नासमज आहे, अल्लड किंवा अट्टल आहे, तिला अक्कल नाही, तिच्याकडुन वेळोवेळी मिळालेली माहिती धागाकर्ती जशी मिळेल तशी देत आहेत, तर लोक तिलाच ट्रोल करत धाग्यात आधिच पुरेशी माहिती दिली नाहित म्हणजे धागा खोटा असणार अशी इमॅचुअर विधाने ठोकताना पाहून आश्चर्य वाटले नाही. मायबोली वर हे कॉमन आहे.
मुलीला देव सद-बुद्धी देवो, आई वडलांवर जी परीस्थिती आलेली आहे, त्यातून त्यांनी खंबीर पणे मार्ग काढलाय, त्यांना देव बळ देवो. मुली चा स्वभाव लक्षात घेऊन भविष्यात तिला तिच्या नकळत कायमसाठी मॉनिटर करायला हवे (डोळ्यात तेल घालून लक्ष वगैरे..)
शुजीता, तुमच्या मदत्शीर स्वभावाचे करावे तितके कौतूक कमी आहे.
या धाग्यावरचे पहिल्यांदाच कु. ऋन्मेश चे प्रतिसाद पटले..
मुलिच्या कलाने घेण्याची वेळ कधिचीच निघून गेलिये, तिला कडक शब्दात आर्थिक जबाबदारी वगैरेंची समज देण्याची वेळ आहे ही.
शुभेच्छा!
शुजीता, प्रत्येक उलट सुलट
शुजीता, प्रत्येक उलट सुलट लिहिणार्या/री ला उत्तर द्यायला, समजाऊन सांगायला जाऊ नका. लेट देम बी.
मानसिक त्रासातून जाणार्या
मानसिक त्रासातून जाणार्या व्यक्तीस टोमणे मारून, तिचा त्रास कसा खोटा आहे हे शाबीत करण्याचा प्रयत्न करून, मीडिया ट्रायल. असल्या सारखे त्रास सोसणाऱ्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखे प्रतिसाद लिहून, आपल्या स्वतःच्या biases अंतर्गत त्रासातून जाणार्या व्यक्तीलाच जज करणारा मायबोलीचा एक अतिशय ओंगळवाणा चेहरा ह्या धाग्याच्या निमित्ताने समोर आलेला दिसला. तसा तो यापूर्वी अनेकदा तुकड्या तुकड्यात दिसला होता पण ह्या धाग्यावर फारच लख्खपणे. फार निराश वाटत आहे हे सगळे लिहिताना.
वरती सिम्बा यांनी लिहिले आहे
वरती सिम्बा यांनी लिहिले आहे अशी पावले खरेच उचलावीत. चांगले वकील आणि जोडीला एखादे सेवानिवृत्त वरीष्ठ पोलीस अधिकारी असे दोन्हींचे मार्गदर्शन घ्यावे. वेळ प्रसंगी बाळाची आई - पालक म्हणून मुलीचे अधिकार टर्मिनेट करण्यासाठी काय पावले उचलावी लागतील याचीही चौकशी करावी.
मुलीकडे बरेच पुरावे आहेत ना? सध्या सध्या पोलिसांना पण घाबरून मुली धडाधड सत्य बोलून टाकतात. एवढ्या मोठ्या पदावरच्या अधिकार्यांना मुलीकडून पुरावे काढून घेणं जमलं नाही? काय राव फेकताय. किती ते पण.>>
माझ्याकडे पुरावे आहेत असा मुलीने घरी बोलताना केलेला क्लेम आहे. मात्र तिच्या फोनमधे तसे काही आक्षेपार्ह नसावे. मुलगी सज्ञान आहे. आपणहून मुलासोबत रहाण्यासाठी पळून गेलेय, गरोदर आहे अशावेळी पोलीस तिला दमदाटी करु शकत नाहीत. प्रियकरासोबत रहाण्यासाठी सज्ञान मुलीने पालकांचे घर सोडणे, लग्नाशिवाय गरोदर असणे हे काही गुन्हे नाहीत. पोलीसांनी त्यांच्या बाजूने बरेच सहकार्य केले आहे. इनफॅक्ट सध्या मुलीला पालकांनी दुसर्या राज्यात नेले आहे, तिथे तिच्यावर सतत पाळत यावरुन मुलगीच माझ्या मर्जीविरुद्ध मला कोंडून घातले म्हणून पालकांच्या विरोधात तक्रार करु शकते. आपल्याला कितीही वाटले की अवघ्या २० वर्षांची मुलगी तरी कायद्याच्या दृष्टीने ती स्वतंत्र आहे. पालक तिला त्यांच्या सोबत रहायची जबरदस्ती करु शकत नाहीत.
परत एकदा सर्वांचे आभार.
परत एकदा सर्वांचे आभार.
आम्ही आत्ता घरी असाही एक विचार केला की जर समजा मुल दत्तक देता आले नाही आणि आपण मुलीचे कायदेशीर रित्या मन मारुन लग्न लावून दिले तर कदाचित काही महिन्यात मुलीला आपणहून धडे मिळतील. तिची लग्न करायची ईच्छा पुर्ण करुन जर तिला चैन पडत असेल तर तसे करु द्यावे. पण असा विचार करतानाही शहारे येत होते अंगावर. कारण आता मुलगी निदान नजरेसमोर आहे. पण ही कल्पनाही करवत नाही अशा मुलासोबत तिचे लग्न करुन देणे. तरीही असा एक विचार केला.
मुलीला आईवडीलांचा सदैव आधार असणारचं आहे. अगदी ते कितीही रागावले, दु:खी झाले तरी ते मदत करतीलचं तिला.
मुलीला आईवडीलांचा सदैव आधार
मुलीला आईवडीलांचा सदैव आधार असणारचं आहे. अगदी ते कितीही रागावले, दु:खी झाले तरी ते मदत करतीलचं तिला---- हे पालकांनी मनात ठेवावे, मुलीला सांगायची गरज नाही,
लग्न करुन दिल्यास आटे दाल का भाव कळल्याने बरोबर जागेवर येईल तेव्हा मात्र लगेच हालचाल करुन मुलीला त्या मुलापासून वेगळे होण्यास मदत करावी.
कितीही क्रुर वाटला प्रतिसाद तरि मुलगी मनाने त्या मुलामध्ये गुंतलेल्या मुळे हाच उपाय योग्य वाटतोय.
मूल जन्माला घालणे ही मस्करी नाही हे या पिढीला कळु दे
शुजिता मावशींनी त्या चांगल्या
शुजिता मावशींनी त्या चांगल्या घरच्या मुलीच्या आई-वडिलांना या कठिण प्रसंगात जो मदतीचा हात दिला त्याला खरे तर माणुसकीचा हात असंच संबोधायला हवं. अशी माणसं समाजात खूप कमी असतात. शूजिता मावशींनी प्रसंगी त्यांच्या मिस्टरांचे मित्र असणार्या बड्या अधिकार्यांची मदत घेतली, मुलीच्या आई-वडिलांसोबत नवव्या महिन्यातील अवघडलेल्या मुलीला घेऊन साताठशे किलोमीटरवरील शहरात स्वतः जातीने रहाण्यास गेल्या. वेळोवेळी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चासत्र सुरु ठेऊन योग्य तो मार्ग शोधला. मायबोलीवर धागा काढुन इथल्या आयडींचे म्हणणे ऐकुन घेतले प्रसंगी टोमणे देखील या कानाने ऐकुन त्या कानाने सोडून दिले. अशा या मितभाषी, मदतीस सदैव तत्पर, ठामपणे मर्गक्रमण करणार्या शूजिता मावशींचे मी कौतुक करतो. त्यांना पुढिल आयुष्यात सुख-समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो.
धन्यवाद..!
शिल्पा हो तिला अजून कुणि कटू
शिल्पा हो तिला अजून कुणि कटू बोलले नाही आणि सपोर्ट नाही देणार असेही म्हंटले नाही. फक्त शक्य तेवढे समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. तिच्यासाठी खास घरपोच समुपदेशक ठेवले. पण काही परिवर्तन नाही झाले. समुपदेशकसुद्धा अगदी आपण इथे जसे बोलत आहोत त्याच प्रकार तिला समजवत होते. मला काही खास वेगळे नाही वाटले.
Pages