कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>
अशी नीच बाई जी देह विक्रि करुन जीवन जगते ती तिच्या मुलाला काय संस्कार देईल
> >>>
हे अगदीच खटकलं....
असा कुठचाही मुलगा आपल्या मुलीला चळवू शकलाच कसा याचं परीक्षण सुद्धा आईवडीलांनी करणे गरजेचे आहे

आपण उत्तम संस्कार दिलेले असताना सुद्धा आपली मुलगी वयामुळे चुकीच्या मार्गावर जाण्यासाठी आकर्षित होऊ शकते‌ - तर त्या मुलाच्या बाबतीतही असं काही असू शकेल ही शक्यता उरतेच - त्याच्या दोषांचा भार आई-वडिलांच्या डोक्यावर कशाला?

जर त्या मुलाचे इतके सगळे इंस्टाग्राम अकाउंट केवळ वेगवेगळ्या मुलींना फसवण्यासाठी काढलेले होते,‌‌आणि हे त्या मुलीला माहित असूनही ती केवळ शरीरसुखासाठी त्याच्याकडे जायला तयार होती - तर या मुलीच्या वैचारिक ताकदीविषयी संशय घ्यायला जागा आहे - यानंतर असा कोणताही इतर विचार तिच्या हातून होऊ नये यासाठी तिचं मन कोणत्या पॉझिटिव गोष्टीत गुंतवणे‌ /गरजेप्रमाणे समुपदेशन / तिला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन मग आतापर्यंत झालेल्या चुकांचे काही परिणाम तरी स्वतः भोगायला लावणे / मुळात एवढा अविचार तिने का केला याचा धांडोळा घेणे या गोष्टी तुम्ही केल्या असाल अशी आशा करते

लहान वयात झालेल्या चुकी तुन बाहेर येण्यासाठी तिने एक्झॅक्टली काय केलं हे लिहिलं तर दुर्दैवाने अशा इतर कोणी अडकलेल्या मुलांना त्याचा उपयोग होऊ शकेल

शुजिता,

१. बाळ जन्माला आले का? दत्तक दिले का मुलगी आणि तुमची मैत्रीण मिळून सांभाळत आहेत? त्याची जबाबदारी आतातरी मुलीला नीट समजली आहे का?

२. मुलीला मुलाविषयी वाटणारे आकर्षण कमी झाले/ संपले का? संपले असेल तर नक्की कश्याने मुलीच्या डोक्यात प्रकाश पडला?

<< त्याच्या एकून १०३ फेक इन्स्टाग्राम आयडी त्याने दाखवल्यात. >>
----- चौथी इयत्ता नापास पण १०३ instagram आयडी त्यांचे पासवर्ड कसे शक्य आहे?

<<<<
>>>
अशी नीच बाई जी देह विक्रि करुन जीवन जगते ती तिच्या मुलाला काय संस्कार देईल
> >>>
हे अगदीच खटकलं.... >>>

------ मलाही हे वाक्य खटकलं...

----- चौथी इयत्ता नापास पण १०३ instagram आयडी त्यांचे पासवर्ड कसे शक्य आहे?>>>>>>>. फक्त सातवी पास, शाळा आवडत नाही म्हणून सोडुन देणे, आणी कंप्युटर सिस्टीम विकायला आलेल्या माणसाला त्याची ऑफर नाकारुन वडलांना स्वतःच तो प्रोजेक्ट करुन दाखवणे हा चमत्कार याची देही याची डोळा पाहील्यावर माझा माझ्या डिग्रीवरचा विश्वास उडाला. टेक्निकल ज्ञान काही जणांना उपजत असते. माझ्या शेजारणीचा डिप्लोमा धारक पोरगा घरात साधा फ्युज बदलु शकत नाही, पण त्याची ८ वी मधली बहीण इलेक्ट्रीकचे छोटे बॉक्स बनवते, वायरींग वगैरे पर्फेक्ट. दहावीतला पोरगा गणितात नापास होतो, पण अशिक्षीत भाजीवाली धडाधड हिशेब करते. ग्रॅज्युएट पोरे भांडुन वेगळे होतात पण सातवी पास धिरुभाई हजारो कोटीचा बिजीनेस उभा करतात.

आजकाल याच बुद्धीचा गैरवापर करुन बँक अकाऊंट हॅक केले जातात.

उघडी मोकळी छाती पदर ढाळून उभी होती की एक बाई म्हणून मला लाज वाटत होती तिच्यापुढे. >>>> ईतरांप्रमाणेच मलाही हे जरा अतिरंजित वाटले (अन थोडेसे रचलेलेही) अन त्यामुळे आधीचा सगळा सॉफ्ट कॉर्नर खरच गेला....

अशी नीच बाई जी देह विक्रि करुन जीवन जगते ती तिच्या मुलाला काय संस्कार देईल आणि त्याची काय बाजू मांडेल. >>> तुमच्या सारखी जबाबदार व्यक्ती इतकी एकांगी विचार करत असेल असे पटतच नाही.... देहविक्रय हे कोणी स्वानंदासाठी करीत नसावे, पोटाची खळगी भरुन काढण्यासाठी करतात ! असो...

त्याला कारण तिचे कोवळे वय आणि त्या कोवळ्या वयात तिला त्या मुलाने शरिरसुखाची लावलेली चटक. तो मुलगा त्याचे आईबाबा घरात असताना हिला बोलवायचा आणि तिच्याशी गैर प्रकार करायचा. कुठले आईवडील मुलाचे हे थेर स्विकारतील. >>> मला खरच हे रचलेले वाटत आहे. माफ करा स्पष्ट बोलत आहे. पण जर त्या मुलीला चटकच लागली आहे, अन ती स्वतःहुनच जात आहे, तेही घरात ईतर लोक असताना (अन आधीची स्टोरी वाचता मोठा २ - ३ बी एच के फ्लॅट नसावा मुलाचा असं वाटत आहे) तर मला त्या मुलीची चुक मुलापेक्षा अनेक पटीने जास्त वाटत आहे... कुठेही जबरदस्ती नाही काही नाही... हे सगळे मला खोटे वाटत आहे .. ईतका वेळ खरच मला वाटत होते की असेल अशी लाखात एक केस ....

पण असो, एकंदरच माबोवर वाचकांना मूर्ख बनवण्याचा ट्रेंड आहे अलिकडले काही वर्ष... पण खरच लेख पहिल्यांदी वाचल्यावर मला त्या मुलीविषयी अन आई वडिलांविषयी वाईट वाटले होते. आता वेळ घालवल्याचे वाईट वाटत आहे अन प्रतिसाद लिहितानाही हाच विचार होता, पण म्हणलं ईतका वेळ गेलाच आहे तर राग बाहेर काढुन टाकावा प्रतिसाद देउन....

१०३ इंस्टाग्राम आयडी चालवणाऱ्या मुलाच्या आई वडिलांनी मुलाला वळण लावण्यात कमीपणा केला असेल कारण त्याचे फॅमिली ब्याकग्राऊंड पूर्णपणे वेगळे आहे पण या चांगल्या घरातल्या सुशिक्षित फक्त २० वर्षाची आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. मुलगी एवढी उथळ कशी वागू शकते जी केवळ शारीरिक सुखाला प्रिफरन्स देत होती . आडे निडे वय हे सोळावे असते २० वे वय जे आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला असेल तर ते नवीन जग एक्सप्लोर करायला निघते . घरातून आई वडील इतर नातेवाईक मोटिवेट करतात अश्या मुला-मुलींना।
स्वतः मुलंच आपल्या शाळा कॉलेजच्या ग्रुप बरोबर हल्ली नवीन काही तरी करायला बघतात। हे सगळे मिसिंग आहे या केस मध्ये। ती नादाला लागली बस पण का ???? घरी मुलांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ते या पद्धतीने चुकीच्या मार्गाला लागतात यात मुलांची शक्यता जास्त असते पण मुली ज्या मुळातच समजूतदार असतात पण कमालीची शांत आणि निरागस असणारी हि मुलगी हे असे कसे काय करू शकते ????

त्या मुलाने शरिरसुखाची लावलेली चटक. तो मुलगा त्याचे आईबाबा घरात असताना हिला बोलवायचा आणि तिच्याशी गैर प्रकार करायचा. >>>>>तुमची मुलगी काय करते ? कुठे जाते ? कोणासोबत असते ? असे प्रश्न जर इथे विचारले तर ते जाचक वाटू शकतात पण घरातील व्यक्ती नेमकी कुठे आहे हे माहित असणे जरुरी आहे। हि घटना जर लोकडाऊन मध्ये घडली असेल तर धन्यच सगळे इथे लोकांना घरातून बाहेर पडायला मुभा न्हवती तिथे हि मुलगी १०३ इंस्टाग्राम आयडी असणाऱ्या मुलाच्या घरी त्याचे प्यारेंट्स असताना कशी काय चाळे करायला जाऊ शकते ?

अशी नीच बाई जी देह विक्रि करुन जीवन जगते ती तिच्या मुलाला काय संस्कार देईल >>>

माझ्या मैत्रिणीच्या मुलीला हे सर्व खूप आधी माहिती होते पण तरीही त्याच्याकडे ओढली गेली. त्याला कारण तिचे कोवळे वय आणि त्या कोवळ्या वयात तिला त्या मुलाने शरिरसुखाची लावलेली चटक. तो मुलगा त्याचे आईबाबा घरात असताना हिला बोलवायचा आणि तिच्याशी गैर प्रकार करायचा. >>>>

त्या मुलीवर संस्कार कोणी केले ??

पण असो, एकंदरच माबोवर वाचकांना मूर्ख बनवण्याचा ट्रेंड आहे अलिकडले काही वर्ष... पण खरच लेख पहिल्यांदी वाचल्यावर मला त्या मुलीविषयी अन आई वडिलांविषयी वाईट वाटले होते. आता वेळ घालवल्याचे वाईट वाटत आहे अन प्रतिसाद लिहितानाही हाच विचार होता, >>>>>
हि कथा आणि कथालेखिकेचे प्रतिसाद वाचल्यावर कुठेही मुलीची बाजू पटलीच नाही उलट गोष्टीतील खलनायक एक एक नवीन कृत्य करतो आणि आपल्याला त्याचा राग येतो, तसाच या मुलीचा जास्तच राग येत जातो आणि तिच्या महान पालकांचा वेगळाच. मुलगी बाहेर जाऊन प्रेग्नेंट होऊन येते आणि याना साडे सहा महिन्यांनी त्याचा पत्ता लागतो। हे सर्व गोष्टीतच होऊ शकते रियल लाईफ मध्ये एखादी लग्न झालेली स्त्री जरा जरी वाकडी चालली तर जाणत्या बायका नजरेने ओळखतात कि नेमका काय लोच्या आहे आणि इथे जे काही लिहिले आहे त्यात मुलगी (फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी.) गोगलगाय नि पोटात पाय टाईपची वाटते .

तो मुलगा एलियन आणि ऑक्टोपस ह्यांची संकरित संतती असण्याचा हॉलीवूडी ट्विस्ट येण्याची आता मी वाट बघतो आहे.

त्याला कारण तिचे कोवळे वय आणि त्या कोवळ्या वयात तिला त्या मुलाने शरिरसुखाची लावलेली चटक. तो मुलगा त्याचे आईबाबा घरात असताना हिला बोलवायचा आणि तिच्याशी गैर प्रकार करायचा >>>>> नेमके कोवळे वय किती ते किती असते ?????

चला. नवीन विषय आला.
लोक कायच्या काय जजमेंटल ह्वायलेत.
अजनबी आयडी तर हे सगळं लिहायचं होतं म्हणुन पुढे काय झालं विचारत होता असं वाटतंय.

@भास्कराचार्य Lol

अजनबी आयडी तर हे सगळं लिहायचं होतं म्हणुन पुढे काय झालं विचारत होता असं वाटतंय.

@भास्कराचार्य Lol

नवीन Submitted by सस्मित on 22 April, 2022 - 02:44 नेमकं काय ????

मी अजून पुढे लिहित नाही कारण इथे बहुतेकांनी अशी परिस्थिती अनुभवलेली नाही. मलाही हे प्रकरण नवीन आहे. कदाचित मलाही तुमच्यासारखे वाटले असते जर मी ह्यातून गेले नसते तर. मला जेवढे शक्य आहे तेवढे लिहिले. परत परत तेचं तेचं लिहिते आहे असे वाटते आहे. नवीन वाचकांचे प्रतिसाद फार काही वेगळे नाहीत.

आत्ता ह्यातून आम्ही सर्व बाहेर पडलो आहेत. मुल दत्तक देऊन सहा महिने होत आहेत. सर्व गोष्टी मी कायदेशीररित्या केल्या आहेत. मुलीच्या आईवडीलांनी आणि मुलीने नवीन शहर नवीर राज्य अशा ठिकाणी आपले आयुष्य सुरु केले आहे. ज्याकडे मुल दत्तक गेले तिथे त्याला भरपूर प्रेम मिळो आणि आधार मिळो. त्याची कुठलीचं आबाळ होणार नाही ह्यासाठी मी देवापुढे रोज प्रार्थना करते.

मी कादंबरी लिहित नाही. मी मालिका लिहित नाही. मी जे लिहिले तो एक खराखूरा प्रसंग लिहिला. ज्यातून जाताना माझा तोल जात होता तरी मी स्वतःला सावरत होते. अंगात उसने बळ आणून एकेक काम पूर्ण करत राहिले. ह्यातून जाताना मी चूक करु नये ह्या भितीने मी माझे मत इथे मांडले. माझ्यामुळे कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी इथे हा विषय मांडला. अनेकांनी इथे एम्पथी दाखवून उत्तरे लिहिले. काहीनी टिंगल टवाळकी केली. काहींनी काठावर उभे राहून उपदेश केले. काहीनी माझी मते खोडून काढली. काहीही मला नवे मार्ग दाखवले. काहीनी मला नवीन ताकत दिली. काहींनी आपापले अनुमान काढलेत. सर्वांच्या प्रतिक्रियातून काहीना काहीतरी शोधायला मिळाले. सर्वांचे आभार. मनापासून.

पूर्णविराम इथे.

मलाही हे सगळं प्रकरण विचित्र वाटतंय , आणि एकीकडे म्हणताय ती बाई देहविक्रय करणारी आहे काय संस्कार देणार आणि दुसरीकडे तुम्हीच म्हणताय कुठले आई वडील मुलाचे हे थेर खपवून घेतील
आणि तुमच्या मैत्रीणीच्या सो कॉल्ड संस्कारी घरात काय संस्कार केलेत मुलीवर ? जर तुमच्या मैत्रीणीने मुलीवर संस्कार केले असते तर ही वेळच आले नसती

मुळात मला आधी हेच पटत नाहीये की मैत्रीणीच्या मुलीला संकटातून बाहेर काढायला कुणी स्वतः च घरदार ,नोकरी बाजूला ठेवून आठशे किलोमीटर दूर जाईल

मुळात मला आधी हेच पटत नाहीये की मैत्रीणीच्या मुलीला संकटातून बाहेर काढायला कुणी स्वतः च घरदार ,नोकरी बाजूला ठेवून आठशे किलोमीटर दूर जाईल>>> मदतीची भावना आपल्या प्रत्येकात असते. काहीजण थोडी मदत करतात काही संपूर्ण मदत करतात. मी संपूर्ण मदत केली. माझ्यासारखे अपवाद मी अनेक पाहिले आहेत. त्यामुळे मी अपवाद आहे असेही मला वाटत नाही. आपल्या मिति खूप ... खूप चाकोरिबद्ध असल्या की तुम्हाला जसे वाटते तसे अनेकांना वाटते.

मूल दत्तक गेले आहे, मुलीची नवीन ठिकाणी नवीन आयुष्याला सुरवात झाली आहे हे ऐकून हायसे वाटले...

आता त्या मुलाशी संपर्क येणार नाही, किंवा पूर्वीच्या संचितापासून मुलगी सुरक्षित राहू शकेल का ? तिने पुढील आयुष्याचा काय निर्णय घेतला आहे?

आता त्या मुलाशी संपर्क येणार नाही, किंवा पूर्वीच्या संचितापासून मुलगी सुरक्षित राहू शकेल का ? तिने पुढील आयुष्याचा काय निर्णय घेतला आहे?>>> संपर्क यायला नको ह्यासाठी मुलगी तिचे आईबाबा पार दूर गेलेत राहयला. मुलीला ह्यावर्षी पदवी मिळेल. पुढे नवीन विद्यापिठातून मास्टर्स करेन. किंवा नोकरीसाठी प्रयन्त करेन. आणखी तीन चार वर्षांनी तिच्या लग्नाचा विचार होईलच.

संपर्क यायला नको ह्यासाठी मुलगी तिचे आईबाबा पार दूर गेलेत राहयला.)))

हो , पण ती त्या मुलासोबतच राहण्याच्या भूमिकेवर ठाम होती ना...? तो निर्णय बदलायला ती आता तयार झाली आहे का ?कारण दूर राहायला गेले तरी फोन आणि सोमि च्या माध्यमातून संपर्कात राहणे कठीण नाही.

हो , पण ती त्या मुलासोबतच राहण्याच्या भूमिकेवर ठाम होती ना...? तो निर्णय बदलायला ती आता तयार झाली आहे का ?कारण दूर राहायला गेले तरी फोन आणि सोमि च्या माध्यमातून संपर्कात राहणे कठीण नाही.>>>> पूर्वी ठाम होती पण आता नाही. प्रसूतीच्या एक आठवड्या अगोदर तिला जाणवले की येणार्‍या बाळाला आपण कसे ठेवू. तिला अर्थात खूप खूप समजवून सांगावे लागले की तिची निवड अयोग्य आहे. तिला ते कुठे तरी पटले. अनेकांनी तिचे समुपदेशनाचे काम केले. त्या मुलाच्या विरुद्ध सुद्धा केस सुरु आहे. त्याला पोलिसांकडून वचक मिळाला आहे. संपर्क येऊ नये दोघांशी म्हणून आईबाबा आम्ही सतर्क आहोत. नवीन ठिकाणी बदल होतात. तिच्यातही होतील. तिचे वय बघता तिला अनेक गोष्टी समजतील. नवीन वाटा मिळतील. माझे लक्ष आहे तिच्याकडे. तिच्या आईबाबांचेही आहे.

नवीन वाटा मिळतील. ))) नवीन प्रवासाला आरंभ झाला ...खूप चांगले झाले..आता पुढील वाटा सुरक्षित व सुयोग्य राहो ही शुभेच्छा!

खरंच हायसे वाटले हे वाचून। तिच्या आईवडिलांना आणि तुम्हाला हि गुड लक हा विषय लवकर संपला मुलीला जाणीव झाली हे बरे झाले त्या मुलीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,

त्या मुलाने शरिरसुखाची लावलेली चटक. तो मुलगा त्याचे आईबाबा घरात असताना हिला बोलवायचा आणि तिच्याशी गैर प्रकार करायचा. ---------
त्याची आई वेश्या ( सॉरी मला दुसरा शब्द मिळाला नाही ) होती / आहे न????
मग आई बाबा घरात नसताना म्हणजे ????म्हणजे त्याची आई त्याच्या बाबांच्या अनुमती ने देहविक्रय करायची???

मी काही मिस करतेय का??? म्हणजे जितकं वाचलं त्यावरून विचारले.

शुजिता काकी चाकोरीबद्ध मिती कोणाचे म्हणताय?? स्वतःचे की इथल्या रिप्लाय देणार्यांचे??
इथल्या लोकांच्या मिती चाकोरीबद्ध असल्या असत्या तर तुम्ही लिहिलेल्या गोष्टीतले लूप होल्स त्यांनी दाखवून दिले नसते.... आणि तुम्हाला शुभेच्छा / सल्ले ही दिले नसते...

विचारांच्या कक्षा विस्तारल्या असत्यात तर कुठलीही बाई जी देहविक्रय करते ती स्वखुशीने करत नाही हा बेसिक मुद्दा ध्यानात ठेवला असतात.... तिला नीच बोलण्या आधी...

बाकी संस्काराची गोष्ट कराल तर त्या मुलीला संस्कार देण्यात तिचे ही आई वडील कमीच पडले म्हणायचे..

अनिश्का,
वैश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रिया वाईट नसतात. त्यांची ती मजबुरी असते हे मी समजू शकते. पण ती स्त्री नक्कीच नीच जी स्वतः असा व्यवसाय करते आणि इतर मुलीला अशा व्यवसायात ओढू पहाते. ह्या मुलाची आई आणि वडील दोघेही घरी असायचे जेंव्हा त्यांचा मुलगा दार ओढून ह्या मुलीशी असे प्रकार करायचा. मुलीला दिवस गेले हे माहिती असूनही त्यानी त्याबद्दल काहीचं केले नाही. उलट तिला प्रोत्साहन दिले की सहा महिने काढ मग आपण तुझे हे मुल बाहेर जाऊन जन्माला घालू. झालेले मुल माझी मुलगी वागवेल. हे असे वागणे त्या बाईचे नीच आहे म्हणून तिला नीच म्हंटले.

उरला प्रश्न संस्काराचा - ते दोन प्रकारचे असते. एक घरातून मिळणारे असते. एक समाजातून मिळणारे असते. आपले संगत गुण, आपल्यावर छाप पाडणार्‍या गोष्टी, भुरळ पाडणारी लोक ही घराच्या बाहेर भेटतात. आई वडीलांनी चांगले संस्कार दिलेले मुल चांगलेचं उपजेल असे संभर टक्के म्हणता येत नाही.

चाकोरिबद्ध मितीबद्दल मी जिला उत्तर लिहिले तिच्याबद्दल होते ते वाक्य. सर्वाबद्दल नाही.

Pages