कुमारी मातृत्व आणि पुढील अवघड वाटा - कोणाशी तरी बोलायचंय

Submitted by शूजिता on 27 August, 2021 - 06:10

नमस्कार,
दीड महिन्यापुर्वी माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचा एक फोन आला आणि ती जी हुंदके देत देत मला सांगत होती ते ऐकून मी एकदम स्तंभित झाले. तिची मुलगी फक्त २० वर्षाची. आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला. दिसायला सावळी पण फारचं गोड कुणाच्याही नजरेत भरणारी. कमालीची शांत आणि अगदी निरागस वाटणारी. तिची आई म्हणजे माझी मैत्रिण तिला एकुलती एकचं कन्या. त्या मुलीला दिवस गेलेत आणि ती घरुन पळून गेली. साडेसहा महिन्याची गरोदर मुलगी आणि माझ्या मैत्रिणीच्या हे लक्षात आले नाही. मुलगी वाढत्या वयानुसार शारिरिक बदल तिच्यात होत आहेत असेचं तिला वाटले. त्यामुळे गरोदर पणात स्त्रिला जी गोलाई येते त्याकडे तिने कानाडोळा केले. कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.

पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. तो तिचा प्रियकर. एकदम सडकछाप मवाली मुलगी. चवथा वर्ग नापास. वय २२ वर्ष. मुली पटवायला एक नंबर आणि लफडेखोर. ह्या मुलाच्या तावडीत इतक्या चांगल्या घरची मुलगी फसली. तिचे त्याच्यावर प्रेम जडले पण त्याने फक्त तिचे शारिरिक शोषण केले.

संसार तसाचं सोडून माझी मैत्रिण दुसर्‍या शहरात गेली. तिथे एक बी एच के शोधले. गर्भपात व्हावा म्हणून वणवण भटकली पण इतक्या उशिरा आता ते शक्यचं नव्हते. आता तिची मुलगी ९ व्या महिन्यात प्रदार्पण करेल. इतक्या शांत मुलीच्या मनात केवढे काय काय साचून होते हे ती आता व्यक्त करते आहे. मी आत्ता तिच्याकडे एक दोन दिवस राहायला आले आहे. तिला आधार मिळावा म्हणून आणि काही मदत करता यावी म्हणून.

मुलीला हे मुल दत्तक द्यायचे नाही. किंबहूना मुल जन्माला घालून आपले आईवडील नाईलाजाने आपले लग्न ह्या मुलीशी लावून देतील ही तिची योजना होती. पण तिला माहिती नाही हे प्रकरण किती दाहक आहे.

मी इथे येऊन विचारणा केली. जिथे तिची प्रसूती ठरली आहे त्या डॉक्टरांना आमची फारचं किव आली आणि त्यांनी हमी दिली की त्या एका एन. जी. ओ. कडून हे मुल दत्तक देण्याची सोय करतील आणि ह्यात जिचे मुल आहे तिची सही लागणार नाही. तसेही अशी मुले बेवारस सापडतात. कचर्‍यात, गटार्‍यात, नदीच्या वाहत्या पाण्यात, देवळात, अनाथालयाच्या दारात, कुण्याच्या ओट्यावर, कुणाच्या अंगणात!! कुंतीनेही कर्णाला वाहत्या पाण्यात सोडलं होतं. आपण तर साधी माणसे. ह्या भावना जाऊ देत.. पण मुल दत्तक दिल्यावर ही मुलगी किती आकांत मांडेल? ती जगू देईल का तिच्या पालकांना? तिचे पुढील शिक्षण पुर्ण करु शकेल का? परत तिचे लग्न होईल का? वय फक्त २० आहे मुलीचे तर अजून १० वर्ष वेळ आहे तिला तोवर ही घटना पुसली जाईल. तिचे भले होऊ शकेल. पण मुलीने परत असेचं थेर केलेते? परत ती तेथून पळून परत त्या मुलाकडे गेली तर? मुलगा लग्न करायला तयार आहे म्हणाला पण नक्कीचं लायक पात्र नाही. मग अशा मुलाशी लग्न करुन काय उपयोग. शिवाय, अशी हार पत्करुन आपण समाजाला काय शिकवण देत आहोत? जर आपण हे मुल तिला दिले आणि तिला त्या मुलाशी लग्न करु नाही दिले तर चालेल का? असे एक नाही अनेक विचार आम्हि दोघीनी बोलताना मांडले.

मी इथे फार लिहित वा वाचत नाही. पण अचानक मला मायबोली आठवली आणि वाटलं इथे आपण मत मांडून बघावे.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या मुलाची आई आणि वडील दोघेही घरी असायचे जेंव्हा त्यांचा मुलगा दार ओढून ह्या मुलीशी असे प्रकार करायचा.
>> म्हणजे मुलाला सेपरेट रूम होती तर...

ह्या मुलाची आई आणि वडील दोघेही घरी असायचे जेंव्हा त्यांचा मुलगा दार ओढून ह्या मुलीशी असे प्रकार करायचा.
>> म्हणजे मुलाला सेपरेट रूम होती तर...

>> सेपेरेट रुम असेल नसेल. त्याची गरजही नाही. खच्चून भरलेल्या बसमधे पुरुष अंगाला असे काही बिलगतात की त्याचे वर्णन इथे नको. बस कशाला अगदी मंदिरात सुद्धा हेच प्रकार होतात. मी माहुरला गेले होते. तिथे पायर्‍या खूप उंच आहे. एक मुलगी अशीचं माणसांच्या मधे फसली. तिथे ती ओरडून बाहेर आलि. इतके तिला भर गर्दीत दाबले ह्या पुरुषांनी. रात्रीची ७ ची वेळ होती. जगात भारतीय पुरुषांइतके फ्रस्टेटेत पुरुष नसतील.

जगात भारतीय पुरुषांइतके फ्रस्टेटेत पुरुष नसतील. >>> यावर नवीन टॉपिक काढायला हवा. हे जर काही अंशीही खरे असेल तर तसे का याचा उहापोह व्हायला हवा.

जगात भारतीय पुरुषांइतके फ्रस्टेटेत पुरुष नसतील.>> टॉपिक काय, बोल्ता काय.>> लागलं का वाक्य? पुरुषांना नाहीचं आवडणार असे लिहिलेले.

पुरुषांना नाहीचं आवडणार असे लिहिलेले.>> घ्या. आधी त्या पोराला फटके,‌ आता भारतात्ले पुरुष. जगात्ल्या पुरुषांना का सोडता.

वरच्या वाक्यात खरे तर लागण्यासारखे काही नाही. कधी गर्लफ्रेंडला घेऊन बागेत जाऊन बसले तरी, गर्लफ्रेंडही सोडा, तुम्ही बायकोसोबत बागेत बसला तरी सभोवताली आठदहा माणसे ईतक्यासाठीच येऊन बसतात की आता हे काहीतरी करतील आणि आपल्याला काहीतरी बघायला मिळेल. त्यामुळे यात तथ्यही आहेच. प्रश्न आहे तसे का? म्हणून म्हटले वेगळा धागा हवा यावर...

पुरुषांना नाहीचं आवडणार असे लिहिलेले.>> घ्या. आधी त्या पोराला फटके,‌ आता भारतात्ले पुरुष. जगात्ल्या पुरुषांना का सोडता.>>

तुम्ही पुरुष जसे स्त्रियांबद्दल त्यांची बाजू लक्षात न घेता चुकीचे अनुमान काढता ना त्यावरुन असे लक्षात येते की बाईच्या जातीच्या आयुष्याचे तुम्हाला मोल नाही. तिला हवी तशी वापरुन घ्यायची. तिला नावे ठेवायचे. जर काही चुकले तर ती तशी होती म्हणून असे विधान करायचे. भर गर्दीत बस मधे असो वा देवळात बाईला वाईट नजरेने पहायचे. मी जे विधान केले ते कदाचित खरे असेल. हे मीचं नाही म्हणत पण अनेक स्त्रिया भारतीय पुरुषांना असे म्हणताना मी पाहिल्या ऐकल्या आहेत.

>>पाच दिवसानंतर खूप प्रयत्नानंतर शेवटी पोलिस जागे झाले आणि त्यांनी मदत केली. मुलगी परत मिळाली. एका छोट्याशा झोपडीत एका मुलाबरोबर होती. >> मुलगी छोट्याशा झोपडीत हे सर्व कराय्ला जायची? त्याचे पालक असताना?

तुम्ही पुरुष जसे स्त्रियांबद्दल त्यांची बाजू लक्षात न घेता चुकीचे अनुमान काढता ना त्यावरुन असे लक्षात येते की बाईच्या जातीच्या आयुष्याचे तुम्हाला मोल नाही.>> आणि तुम्ही काय लिहता? वाचा बर्र परत-
<<त्याला प्रेम काय माहिती नाही. त्याची आई एक वैश्या स्त्रि आहे. ती काय मत मांडेल तिच्या मुलाबद्दल. ती पोलिस चौकीत मला भेटली होती. पोलिसांसमोर तिला उभे करण्यात आले होते. बाईला अंग झाकणे काय म्हणतात तेही माहिती नव्हते. उघडी मोकळी छाती पदर ढाळून उभी होती की एक बाई म्हणून मला लाज वाटत होती तिच्यापुढे. अशी नीच बाई जी देह विक्रि करुन जीवन जगते ती तिच्या मुलाला काय संस्कार देईल आणि त्याची काय बाजू मांडेल.>>
हे भगवान क्या दिन आ गये रे बाबा.

सेपेरेट रुम असेल नसेल. त्याची गरजही नाही. खच्चून भरलेल्या बसमधे पुरुष अंगाला असे काही बिलगतात की त्याचे वर्णन इथे नको.
>>> असे कसे.. हा मुद्दा महत्वाचा आहे... मुलाला सेपरेट रूम होती हेच माहित नाही मग मुलगी आणि तो मुलगा आई वडील घरी असताना मजा करायचे ( शरीरसुखाची चटक ) हे तुम्ही कसे म्हणताय... का हे पण असेच ?

कुठल्याचं आईला आपल्या अविवाहित मुलीच्या अंगावरचे वाढलेले मास पाहून असे वाटणार नाही की ती गरोदर आहे. तिथे माझी मैत्रिण फसली बिचारी.>>तुमची मैतरीन बिचारी. आणि त्या पोराच्या मायबद्दल वरची भाषा.
वाह रे गुरु तेरी माया!
सोच बद्लो दुनिया बदलेगी.

वरचे बरेच मजकूर वाचून अशा घटनांना लोक चवीने वाचतात आणि बघतात हे दिसून येते. वर मुलाप्रति आणि त्याच्या पालकाप्रति सहानूभुती व्यक्त होते आहे. एक अविवाहीत मुलगी नऊ महिने ते मुल पोटात ठेवते. तिच्या शरिरात अनेक बदल होतात. तिची प्रसूती होती. आईवडील तिला दुसर्‍या शहरात राज्यात नेतात. मुल दत्तक देतात. बाळंतपणासाठी पैसे खर्च करतात. ह्यातून जाताना ते अनेक वेळा कोलकडून पडतात. मुलाला मात्र मजा करुन तो मोकळा होतो. त्या मुलाने शेवटचा जो मेसेज मुलीला केला होता तो असाच घृणास्पद होता. तो लिहितो - "मुझे जो देखना था औ मैने देख लिया. तुझे पुरा खोल दिया. एक बार नही कईबार तुझे चोदा. अब तेरे मे कुछ बाकी नही रहा. तू रांड हो गई है. तुझे मेरे पास अगर आना है तो तू आ वरना पछतायेगी तू. तुझे जो करना है वो कर" हा मेसेज वाचून मी चर्र झाले होते काळजात. तशीच एसी. पी. ओफीसात निघाले. तमाशा केला होता. त्याला पोलिसात बोलवून जेंव्हा त्याला रट्टे पडले तेंव्हा मी थोडी शांत झाले होते. पण अजूनही मी धुमसत आहे. तुम्हा लोकांना मी जे लिहिते आहे ते कदाचित कळणार नाही. तुम्ही तुमचे तर्क वितर्क काढत राहा.

माझे प्रतिसाद सेव्हच होत नाहीयेत..... इंटरनेटचा इश्श्यु दिसतोय. थोड्या वेळाने पुन्हा ट्राय करेन.

Submitted by व्यत्यय on 29 August, 2021 - 02:29
नाही मी ते उडवतोय.

Submitted by webmaster on 29 August, 2021 - 02:38 >>>>>>>>>>>>
जबरदस्त हसायला आले , मला हेराफेरीमधला एखादा सिन चालू आहे असे वाटले बाबुराव आणि श्याम मधला ! हा हा हा हा हा

वरचे बरेच मजकूर वाचून अशा घटनांना लोक चवीने वाचतात आणि बघतात हे दिसून येते. वर मुलाप्रति आणि त्याच्या पालकाप्रति सहानूभुती व्यक्त होते आहे>> तुमी इतरांबद्दल काहुन निष्कर्ष काढुन रायल्या? लोकाले दुसरी बाजु पण समजुन घेवाची हाये ना तै.

जो 103 आयडी ऑपरेट करतो तो असला मेसेज करणे शक्यच नाही... हा पॉईंट आधीच टाकला असता तुम्ही... आता इम्प्रोमटू टाकलाय... नो सहानुभूती... मुलीचा रिप्लाय पण टाका... थोडा वेळ घ्या कंस्ट्रकट करायला...

वर हे बंडल, चम्प्र वगैरे आयडी अगदी गॉन केसेस आहेत.>> मी काय वाईट लिवलं तै. सगळं तुमीच ठरवाले लागल्या आता.

जो 103 आयडी ऑपरेट करतो तो असला मेसेज करणे शक्यच नाही... हा पॉईंट आधीच टाकला असता तुम्ही... आता इम्प्रोमटू टाकलाय... नो सहानुभूती... मुलीचा रिप्लाय पण टाका... थोडा वेळ घ्या कंस्ट्रकट करायला...>> मुलीने रिप्याय टाकलाचं नाही. तिचे इतर रिप्यायसुद्धा वाचलेत मी. तिच्या चॅटमधे काहीचं नव्हते. हो नाही.. मोघम उत्तरे असायची. मी तिला दोष देत नाही असे नाही. पण ती ह्यात फसली. तिने फसायला नको होते. तिचे फसायचे कारण तिचे कोवळे वय असेल. तिचे खरे प्रेम असेल. तिला शरिर सुखाची लागलेली गोडी असेल. तिच्यात काहीतरी अजून दोष असतील जे मला सापडले नाहीत. पण जे सापडावे म्हणूने मी अनेक समुपदेशकांकडे तिला घेऊन गेले. अजूनही तिच्याप्रति मी खूप प्रयन्त करत आहे. कारण अवघे आयुष्य तिच्यापुढे आहे. मी जे लिहिले ते फक्त मुलीच्या बाजूने लिहिले नाही. त्यात मी मुलाचाही तेवढाच विचार केला. त्याच्या आणि तिच्या आईवडीलांचाही तेवढाच विचार केला.

तुम्ही तुमचे तर्क वितर्क काढत राहा.

नवीन Submitted by शूजिता on 22 April, 2022 - 08:31

शूजिता म्याडम,
तुम्ही हा धागा आता एडिट करू शकत नाही। पण दुसऱ्या एखाद्या आयडी ने टायटल बदलून रीतसर नवीन कथा स्वरूपात हि व्यथा मांडा पण यावेळी जे काही त्या मुलाबद्दल माहित आहे ते सर्व सविस्तर लिहा म्हणजे कथेची सुरुवातच ती मुलगी पंधरा वर्षाची होती तेव्हा पासून करा। आणि मुलीचे व तिच्या घरच्यांचे संबध त्यांचे नाते कोणत्या लेव्हलचे आहे त्यांचे स्वभाव हे सगळे विस्तृत लिहा शिवाय या धाग्यावरील उस्फुर्त आणि मोलाचे चांगले प्रतिसाद सुद्धा तुमच्या लेखनात मांडा। खरंच खूप उपयोग होऊ शकतो अश्या पालकांना जे नोकरीनिमित्त सकाळी बाहेर पडतात आणि संध्याकाळीच उगवतात आणि काही कारणांनी त्यांच्या घरी त्यांच्या मुलांवर कोणी लक्ष ठेवू शकत नाही, भल्याबुऱयांची ओळख पटवू शकत नाही। चांगले कोण वाईट कोण यातील अंतर समजावू शकत नाहि। आई वडिलांनी आपल्या मुलांना किती सूट द्यावी आणि किती नाही हे मात्र यातून शिकायला मिळेल।

अजनबी, नाही माझ्यासाठी ही कुठल्याच कलाकृतीची संधी नाही. मला माझी नोकरी आहे आणि मी आनंदी आहे त्यात. माझ्याकडे इतकी प्रतिभा नाही की माझे कुणा बॉलीवुड लोकांशी संपर्क नाहीत. मी एक साधी स्त्रि आहे. तुम्ही सावधान ईन्डिया बघा. कदाचित त्यातून तुम्हाला नवनवीन केसेस बद्दल माहिती मिळेल.

हो सावधान इंडियातून कथा नाही शिक्षण मिळते लोक सावधान इंडिया बघून एक व्यव्यस्थित क्राईम करू शकतात। तसे दाखले देखील आहेत। मी फक्त त्या मुलाबद्दल प्रत्येक पानांमागून नवीन माहिती मिळत जातेय आणि मुलगी तरीही कशी त्या मुलालाच चिकटून आहे व इथली लोक कसे नव नवे सल्ले देत आहेत हे वाचून मनात निर्माण झालेल्या चिडेपोटी लिहिले । बाकी मैत्रिणीच्या मुलींसाठी धडपडणाऱ्या तुम्ही आपल्याकडे प्रतिभा नाही असे म्हणून स्वतःला अंडरएस्टिमेट का बरे करताय ?

मला हे सगळं वाचून एक बेसिक शंका आलीय मनात

हे जे सगळे अति तपशील आहेत
म्हणजे मुलाची आई वेश्या असणे, आईवडील घरात असताना मुलाने तिच्यासोबत मजा करणे, त्याचे 103 अकाऊंट असणे, त्याचा हा लेटेस्ट मेसेज

इतके तपशील मुळात तुमच्याकडे का आहेत? जर आहेत त्या अर्थी तुम्ही या सगळ्या प्रकरणात एक महत्वाची व्यक्ती आहात नैतर पोलीस काय किंवा ती मुलगी काय इतके तपशील सांगणार नाही मग
हे इतकं असं तपशीलवार तुम्ही सोशल मीडियावर का टाकत आहात? तेही टप्या टप्प्याने??
मूळ लेखात नसलेल्या अनेक गोष्टी नंतर प्रतिसाद देताना सांगत आहात

मान्य आहे यात कुणाचे नाव नाही घेतलेला, पण मायबोली ओपन फोरम आहे, तुम्हाला माहिती नसतानाही तुमच्या ओळखीचे, मित्र मैत्रिणी मायबोली वर वाचनमात्र असू शकतात

तसेच हे प्रकरण पोलिसात गेले आहे म्हणजे उद्या जर काही भानगड झाली तर हे सगळे मुद्दे एव्हीडन्स म्हणून येणार आहेत
जरी तुम्ही म्हणताय की ते वेगळ्या शहरात गेलेत, मुलगी आता नव्या आयुष्य सुरू करणारे वगैरे पण पोलीस केस असं तुम्ही दुसरीकडे गेलाय म्हणून मिटत नसतात
त्याची नोंद राहते त्यांच्याकडे

आशुचॅप, मी इथे हा धागा उघडून माझा विषय मांडला तेंव्हा मला जेवढे पुरेसे वाटले तेवढे लिहिले. पण नंतर जे प्रतिसाद आलेत त्यानंतर मला जेवढे शक्य होते तेवढ्या प्रश्नांची उत्तरे मी दिलीत. एक वेळ मला असेही वाटले आपण इथे कुणाला उत्तर द्यायची नाहीत. पण आपण स्वार्थी आहोत हे डाचले. थोडेफार लिहिले. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे देणे मला स्वतःला सुरक्षित नाही वाटले. तरी थोडे फार लिहिले प्रत्येकाच्या प्रतिसादावर. पण इथे अनेक जण खोदून खोदून आणि बळजबरी करुन विचारतात ते फार त्रासदायक होते आहे. इतके सर्व तर पोलिसांनीही नाही विचारले. त्यांच्या लक्षात लगेचं केस आली. इथे बरेच वाचक डेली सोप बघून आपली मते व्यक्त करतात असे वाटत आहे. पण ही डेली सोप केस नाही आहे. ही खरीखुरी हकिकत आहे. मी एक सुशिक्षित व्यक्ती आहे. मला निर्णय घ्यायला जे जे गरजेचे वाटले ते ते मी केले. प्रेमाने केले संतापून केले. त्यातून मला बरीच माहिती मिळाली. त्यातली इथे काही लिहिले. इथे लोकांची अपेक्षा अशी आहे की नावासहीत लिहा आणि वर फोन नंबरही द्या. मग ते भेटीला जातिल त्या मुलीच्या घरी.

झोपडीत सेपरेट रूम>> भ्रमर तुम्हा पुरुषाना रुमची गरज नाही आहे. बस आणि देऊळाचे उदाहरण दिले मी वर. समोर मुलगी असेल तर उभ्या उभ्या सर्व काही जमत तुम्हाला. तुम्ही भारतीय पुरुष .. दंडवत!!!

Pages