झटपट नारळाच्या वड्या.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 August, 2021 - 00:19

नारळी पौर्णिमा स्पेशल झटपट, लज्जतदार चवीच्या नारळाच्या वड्या
https://youtu.be/NUFL1M6qoho
श्रावण महिना म्हणजे महाराष्ट्रातील घरा-घरात गोड-धोड, नैवेद्याची रेलचेल. त्यात बरेचसे गोडाचे प्रकार हे त्या त्या सणाला बहुतांशी ठरलेले असतात तसाच नारळी पौर्णिमेच्या नावातच नारळ समाविष्ट असून त्या दिवशी नारळाचे पदार्थ केले जातात. त्यातला नारळाची वडी हा एक चविष्ट पारंपारीक पदार्थ. आज पारंपारीक पद्धतीत वेळ, कष्ट वाचविण्यासाठी व अधिक लज्जतदार बनण्यासाठी थोडा बदल करुन झटपट व चविष्ट बनणा-या नारळाच्या वड्या वरील लिंक उघडून पहा.
त्यासाठी साहित्य लागणार आहे
२ वाट्या खवलेला/खरवडलेला नारळ
दीड वाटी साखर
१ वाटी किंवा मावेल तेवढी दूध पावडर
वेलची
साजूक तूप

IMG_20210820_140743.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर खुसखुशीत वड्या दिसतायत.
फोटो ही सुपरब .
मला जमत नाहीत त्यामुळं ऑप्शन ला टाकलेल्या आहेत. असा व्हिडीओ बघितला की करायची सुरसुरी येते.

वर्णिता या प्रकाराने पटकन होतात. एकदा का घट्ट झाल मिश्रण की सुकायच्या आत पटकन लाटून घ्यायचे म्हणजे सुटत नाही.

अमुपरी धन्यवाद.

मस्त व्हिडीओ .

माझा एक प्रश्न आहे: नारळी वडीत मिल्क पावडर घालणं गरजेचं आहे का?

जाई खोबर आणि साखरेला जे पाणी सुटत ते आटायला वेळ लागतो जर मिल्क पावडर घातली तर पटकन सुके होते मिश्रण शिवाय एक वेगळीच मिल्की चव येते वडीला. पारमपारिक पद्धतीत नाही घालत मिल्क पावडर.

पुणेकर यावेळी जरा लिंक उघडून पहा पुढच्या रेसिपी कृतीसह देईन.

ब्लॅक कॅट , अनुमोदन. दुधाने वडी छान मऊ होते. पण काही जणांना कुडुककन तुटणाऱ्या खडखडीत खुटखुटीत वड्या आवडतात. दुधाच्या पावडरीने कशा होतील माहीत नाही.