नमस्कार!
दिनांक एक जुलै २०२१ पासुन माझ्या मुळ गावी म्हणजे करडकवाडी अर्थात मुकिंदपुर, ता. नेवासा, जि , अहमदनगर येथे शेती संबंधित व्यवसाय सुरु केला आहे.
सर्व प्रकाराची शेती अर्थात भाजीपाला, फळबाग, ऊस, मत्स्यशेती तसेच गावाकडील शेती, कुंडीतील शेती, टेरेस गार्डन, किचन गार्डन, इत्यादी सर्व प्रकाराच्या शेतीला लागणारे जीवाणु समृद्ध बायोस्लरी आणि फॉस्फेट रिच ऑर्गनिक मॅन्युअर (प्रोम) तयार करणे आणि विक्री करणे हा मुख्य उद्योग आहे.
शेतीचा खर्च कमी करणे अन रासायनिक खतांचे प्रमाण कमी करुन विषमुक्त अन्न निर्माण करणे हे आमचे मुख्य उद्देश आहेत. त्यासाठी गाईच्या शेणापासुन बायोडायजेस्टर च्या माध्यमातुन दोन प्रकारची खते बनवली जातात. एक दाणेदार खत (प्रोम= अर्थात फॉस्फेट रिच ऑर्गनिक मॅन्युअर) (PROM = Phosphate Rich Organic Manure) जे डिएपी या रासायनिक खताला पर्याय आहे, आणि दुसरे जीवाणु समृद्ध बायोस्लरी (BioSlury) जे युरिया ला पर्याय म्हणुन वापरले जाते.
कोविड काळात चांगल्या दर्जाचे अन्न अन त्यासाठी लागणारी चांगली बिनविषारी शेती यबद्दल खुप चर्चा समाजात झाली. त्याला प्रतिसाद म्हणुन बिनविषारी शेती अन अन्न निर्मीती साठी हा व्यवसायिक उपक्रम सुरु केला आहे.
उपलब्ध खते:
जीवाणु समृद्ध बायोस्लरी : गोरस या ब्रँड नावाने : ५ लिटर (शहरी ग्राहक), २० लिटर ( ग्रामीण शेतकरी) ड्रम.
प्रोम : गोप्रोम या ब्रँड नावाने : ५ किलो (शहरी ग्राहक), ४० किलो ( ग्रामीण शेतकरी) बॅग.
त्यासोबतच,
मराठवाड्यातील नैसर्गिक ( रसायन मुक्त ) शेतीतील कडधान्ये तुरडाळ, चना, चनाडाळ, मुग, मुगडाळ, मटकी, उडीदडाळ, हे एक किलो पॅकिंग मध्ये उप्लब्ध आहे.
एस. टी पार्सल च्या माध्यमातुन शहरी ग्राहकांना एक /पाच किलो बँग कडधान्य/ खत गोप्रोम पाठवणे सुरु आहे.
जस्ट डायल वर उपल्ब्ध आहोतः https://www.justdial.com/Ahmednagar/Kardakwadi-Agro-Newasa-Fata/9999PX24...
फेसबुक वर अधिक माहिती: https://www.facebook.com/kardakwadiagro
या विषयाला समाजापर्यंत पोचवणे अन शेतकर्यांना गाईचे महत्व पटवुन देण्यासाठी श्री कामधेनु गोशाळा तथा शाश्वत सेंद्रिय शेती प्रकल्प, श्री क्षेत्र नेवासा येथे सुरु केला आहे.
फेसबुक वर अधिक माहिती: https://www.facebook.com/kamdhenunewasa
धन्यवाद!
***
उत्सुक नविन उद्योजकांना महाराष्ट्रात कुठेही शहरी किंवा ग्रामीण भागात या प्रकाराच्या खतांची विक्री करायची असल्यास फ्रँचाईजी दिली जाईल.
अभिनंदन चंपक. ही सारी माहिती
अभिनंदन चंपक. ही सारी माहिती माझ्या ओळखीतल्या कायप्पा व इतर गृप वर पाठवते. तुम्हाला भरघोस यश लाभो व तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो.
चंपक, अभिनंदन ! खूप छान
चंपक, अभिनंदन ! खूप छान उपक्रम! आम्ही अन्नधान्य, भाजीपाला व फळफळावळ फक्त नैसर्गिकच खातो त्यामुळे आणखीनच भावला हा उपक्रम!
उत्तम कार्य करत आहात. अभिनंदन
उत्तम कार्य करत आहात. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
अरे वा! छान
अरे वा! छान
ओळखीतल्या शेतकर्यांना सांगते.
अभिनंदन चंपक, आणि शुभेच्छा!
अभिनंदन चंपक, आणि शुभेच्छा!
कडधान्यांबाबत माहिती पुण्यातील घरच्यांना/ओळखीच्यांना देतो.
मस्तच.
मस्तच.
अभिनंदन आणि खूप शुभेछा
अभिनंदन आणि खूप शुभेछा
अभिनंदन आणि शुभेच्छा चंपक.
अभिनंदन आणि शुभेच्छा चंपक.
अभिनंदन डॉ भरत. आणि पुढील
अभिनंदन डॉ भरत. आणि पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.
माहिती ओळखीतल्या लोकांना पाठवली आहे.
तुम्ही आधी मायबोली वर लिहिलेले उद्योग विषयक लेख वाचले आहेत. मला आठवते त्याप्रमाणे एका ठिकाणी तुम्ही एका वेळी अनेक गोष्टी / व्यवसाय करण्याबाबत लिहिले होते. ते खरच उपयोगी होते.
छान माहिती! तुम्ही खूप चांगले
छान माहिती! तुम्ही खूप चांगले काम सुरू केले आहे. खूप सार्या शुभेच्छा!
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!