आठवणींचा ठेवा ...आराम खुर्ची
मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर मैत्रिणीच्या पिकनिकचे फोटो बघत होते. लोकेशन सुंदर होतं. खोलीची छानशी गॅलरी आणि गॅलरीतून समोर दिसणारी हिरवीगार टेकडी, त्यावरून वहाणारे छोटे छोटे झरे, ढगांमधून सूर्य हळूच डोकावत असल्याने हिरवळीवर पडलेलं कोवळं सोनेरी ऊन ... फ्रेम अप्रतिम होती होती. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते गॅलरीतल्या आराम खुर्चीने, जिने मला कमीत कमी पन्नास वर्षे तरी मागे नेलं.
आमच्या लहानपणी घरात सोफे वैगेरे नसतंच. मोठया हाताच्या लाकडी खुर्च्या, घडवंच्या, लाकडी बाकं किंवा मग सरळ जमिनीवर सतरंजी घातलेली असे. जरा सधन घरात गादी लोड तक्क्यांची बैठक असे. आमच्या घरात मात्र वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे सहज हलवता येणाऱ्या, वजनाला हलक्या, आणि वेळ आली तर घडी करून ठेवता येणाऱ्या आणि तरी ही नाव सार्थ करून भरपूर आराम देणाऱ्या अश्या आराम खुर्च्याच होत्या बैठकीच्या खोलीत.
ह्या आराम खुर्च्या हल्ली फार पहायला मिळत नाहीत म्हणून सांगते. ह्यात लाकडाच्या अंदाजे दोन इंच रुंदीच्या दोन चौकटी एका स्क्रुने थोड्याश्या सैल अश्या फिक्स केलेल्या असतात ज्यामुळे त्या खुर्च्या फोल्ड होऊ शकतात. खुर्ची उघडली की खालची चौकट जमिनीवर राहते आणि वरच्या चौकटीत वर खाली लाकडी दांड्या च्या आधारे बसवलेल्या जाड कापडाच्या झोळी सारख्या आकारत आपल्याला मस्त बसता येतं. त्यांची कापडं अगदी टिपिकलच असत. किरमिजी,हिरवा रंग आणि त्यावर पांढरे पट्टे हेच असायचं डिझाईन.
कापडाच्या लांबीवर खुर्चीचा झोल अवलंबून असतो. लांबी कमी केली की खुर्चीत ताठ बसता येत जे मोठ्या माणसाना जास्त करून आवडतं. त्यामुळे आमच्याकडे तश्या ताठ बसता येईल अश्या खुर्च्याच जास्त होत्या. खूप झोळ असणारी खुर्ची एखाद दुसरीच असे त्यामुळे त्यात कोण बसणार ह्या वरून आम्हा भांवडात भांडणं ही होत असत.
दिवाळी, गणपती, किंवा कोणी पाव्हणे येणार असतील तर ती कापडं धुतली जात . त्या दिवशी आम्हाला खूपच संभाळून वागावं लागे कारण खुर्चीच्या दांड्या आईला सहज मिळतील अश्या असत. दुपारी टाइमपास म्हणून खुर्चीची दांडी हळूच कोणाला ही न समजेल अशी काढून ठेवणे आणि कोणी पोरगं बसायला गेलं की कसं आपटलं म्हणून टर उडवणे वैगेरे प्रकार ही आम्ही करत असू. अर्थात मुला ऐवजी कोणी मोठं बसलं तर मात्र आमची धडगत नसे. त्या लाकडी दांडीचा प्रसाद चुकवणं जवळ जवळ अशक्यच होत असे. आणि वरती " काय ही अघोरी चेष्टा , जरा नीट वागा " असं काहीतरी आईच बौद्धिक ही ऐकावं लागे ते निराळच.
माझ्या लहानपणीच्या अनेक रम्य आठवणी ह्या आराम खुर्चीशी निगडित आहेत. गोष्टींची पुस्तकं वाचणे, अभ्यास करणे, दुपारी रेडिओवर खुर्चीत झुलत झुलत गाणी ऐकणे, दाणे, चिवडा असा खाऊ खाणे , पावसाळ्यात गॅलरीतल्या खुर्चीत बसून आकाशातले ढग बघणे, पावसाच्या पाण्याचे तुषार अंगावर घेत , तल्लीन होऊन पाऊस, पागोळ्या बघणे अश्या अनेक गोष्टींसाठी आराम खुर्चीच लागत असे मला. आमच्या गॅलरीत एक खूप मोठा मोगऱ्याचा वेल होता. उन्हाळ्यातल्या संध्याकाळी खुर्चीत बसून संधीप्रकाशात फुलणाऱ्या कळ्यांकडे एक टक पहात बसणे आणि कळी उमलली की तो सुवास मनात साठवून घेणे ह्या आठवणीने तर आज ही मला उत्साहित वाटत.
काळ पुढे सरकत होता. उच्च शिक्षणासाठी आणि पुढे नोकरीच्या निमित्ताने आम्ही शहरात आलो. तिथे जागा मर्यादित म्हणून आराम खुर्च्या ठेवणं अडचणीचं आणि आउट डेटेड वाटू लागलं. आमच्या ही नकळत फोल्डींग च्या लोखंडी खुर्च्या, दिवाण, सोफे ह्यांनी दिवाणखान्यात कधी एन्ट्री घेतली आणि आमच्या आवडत्या आरामखुर्च्या अंग मोडून कधी माळ्यावर जाऊन बसल्या ते आम्हाला ही कळलं नाही.
कोकणात ही आमच्याकडे खळ्यात मांडव पडला की आजच्या प्लॅस्टिकच्या जमान्यात ही एका रांगेत अश्याच साताठ आरामखुर्च्याच ठेवलेल्या असतात बसण्यासाठी. मात्र त्या हाफ आराम खुर्च्या म्हणतात तश्या आहेत आणि त्यांना टेकण्यासाठी हात आहेत. गंमत म्हणजे कोणती खुर्ची कोणाची हे ही साधारण ठरलेलं असत. मला एकदम टोकाची , कमळाजवळची जागा आवडते. खुर्चीत बसलं की मंद वास येत राहतो कमळाचा.
आमची मनी ही कधीतरी अंगाचं मुटकुळं करून खुर्चीत देते ताणून मस्तपैकी. ती खुर्चीत झोपली की मोतीचं डोकं फिरत तीच का खुर्चीत झोपलीय म्हणून. बसल्या जागी गुरकावत रहातो तिच्यावर. अर्थात तिच्यावर ढिम्म परिणाम होत नाही. ती मस्त झोप काढते खुर्चीत. असो. मी जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा कोकणात गेले तेव्हा खळ्यातील आरामखुर्च्या बघून ज्या घरात आपल्या माहेर सारख्या आरामखुर्च्या आहेत त्या घरात आपलं नक्की जमेल ह्या विचाराने एकदम आश्वस्त वाटलं होतं मला.
आरामखुर्चीत बसून पुन्हा ते सुख अनुभवण्याच्या विचाराचं सध्या मनावर भलतंच गारुड आहे. त्यामुळे ती आरामखुर्ची आता लवकरच माळ्यावरून खाली येईल, तिची साफसफाई होऊन तिला नवीन कापड ही घातलं जाईल. आमच्या गॅलरीत ती विराजमान होईल. तिच्यात बसून कॉफी पिताना , बाहेरची झाडं पानं बघताना मी पुन्हा एकदा लहान होईन. तेव्हा दिसायचं तसं जग पुन्हा मला सुंदर दिसायला लागेल. जगण्याची नवी उमेद मिळेल...
ही आमची आरामखुर्ची , नवीन कापड घालून सजली आहे. पॉलिश करून आणायचा विचार करतेय.
ममो, त्या लिंकवरची आरामखुर्ची
ममो, त्या लिंकवरची आरामखुर्ची मस्त दिसतेय! पण आरामखुर्ची प्रत्यक्ष बघून घेणे चांगले असे वाटते. किंवा मग online return करता आली तर.
Srd, ऋतुराज, हीरा, हार्पेन
Srd, ऋतुराज, हीरा, हार्पेन धन्यवाद
अगदी साध्या आणि क्षुल्लक वस्तूंच्याही आठवणीने स्मरणरंजकता आणि स्मरणविव्हलता येते, त्यावर उत्तम लेखन होऊ शकते हे तुमच्या लिखाणातून नेहमी दिसते. >> थॅंक्यु हीरा. तुमचा किस्सा जबरदस्त आहे. हसू, ह्रदयात धडधड सगळंच एकदम झालं.
जि , बरोबर आहे. आणि online घ्यायला महाग ही आहेच. पूर्वी फर्निचरची छोटी दुकान असत तिथे मी पाहिली होती चौकट मस्त दणकट आणि सागाची वाटत होती . तेव्हा किंमत 600 च्या आसपास सांगितली होती. अर्थात हे वीसेक वर्षांपूर्वी. आता अशी छोटी , दोन चार कारागिरांनी एकत्र येऊन चालवलेली दुकान नामशेष ही झाली असतील.
>>>>>मोठ्यांनी हसू कसे बसे
>>>>>मोठ्यांनी हसू कसे बसे दाबले. बायका आत पळाल्या. लहान मुले मनसोक्त हसली.
आई ग्ग! अगदी डोळ्यासमोर दृष्य साकार झाले. बिचारे पाहुणे.
सामो आणि ममो, आभार.
सामो आणि ममो, आभार.
पण गोष्ट इथेच संपली नव्हती. एव्हढी मोठी जवळची नातेवाईक व्यक्ती पडली, तिला लागलं असेल, म्हणून आई आणि आजी आपापली पेटंट औषधं घेऊन धावल्या. एकीजवळ रक्तचंदनाचा लेप आणि दुसरीच्या हातात कैलास जीवन. इकडे हे गृहस्थ पडले होते ते त्रिकोणात. पडताना वरच्या बाजूने आधारामुळे ताठ असलेलं कापड त्यांच्या अंगाखाली आल्यामुळे त्यांची पाठ आणि डोकं हवेत राहिलं होतं. जमिनीला टेकलं नव्हतं. पायही खालच्या चौकटीच्या आधाराने वरच होते. आपटलं होतं ते बूड. ह्या बायका औषध लावायला सरसावल्यावर ते गृहस्थ पटकन उठून बसण्याची धडपड करू लागले. बाकीच्यांनी खुर्चीतून त्यांना उठवल्यावर त्यांनी पार्श्वभाग झटकत "नाही हो, काही लागलेलं नाही"चा धोशा लावला. टेंगळं बिंगळं काही दिसत नाहीयेत आणि असली तरी औषध लावता येण्याजोगं नाहीय हे कळल्यावर त्या दोघी आधी क्षणभर निराश आणि नंतर खजील झाल्या आणि पुढे अनंत काळपर्यंत आमच्या घरात किंवदंती बनून राहिल्या आहेत.
हीरा, उत्तरार्ध ही भारीच !
हीरा, उत्तरार्ध ही भारीच ! सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.
(No subject)
छान लेख!
छान लेख!
ऋन्मेष, सिद्धी खुर्च्या आणि त्यावर विराजमान झालेली बाळं ही गोड.
हिरा,
आमच्याकडे वाड्यात असल्या लाकडी घडीच्या दोन खुर्च्या सोप्यात मांडलेल्या असायच्या. आबा कायम त्यावरच बसायचे. हिरव्या आणि पांढऱ्या पट्ट्या असलेलं कापड होतं. जवळजवळ सगळ्यांना या खुर्च्या आवडतात पण मला स्वतःला ही खुर्ची आवडली नाही कधीच. कारण मी दोन वेळा पडलेय त्यातुन . लहान असताना कुणीतरी दांडी काढून ठेवलेली आणि नन्तर त्या बसायच्या घोळातून उतरताना एकदा . त्यामुळं मी परत त्याच्या वाटेला गेले नाही.
आधीच्या वाड्यात, जुन्या घरात
आधीच्या वाड्यात, जुन्या घरात अशी खुर्ची असलेल्या बैठकीच्या खोलीत मोठे तक्के, लोड असायचे, त्यांचे अभ्रे, खोळी पांढऱ्या शुभ्र असायच्या. आणि त्यावर सुंदर भरतकाम केलेलं असायचं. त्यात सुस्वागतम किंवा welcom असही लिहिलेलं असायचं, वरील वर्णन वाचून हे आठवलं
छान च लेख ममो. मला ह्या
छान च लेख ममो. मला ह्या मोठ्या आरामखुर्ची ची भिती वाटायची. आमच्या कडे दोन लहान आराम खुर्च्या होत्या. जिथे फोल्ड होतं तिथे पण एक दांडी होती कापड त्या दांडी खालून वर घ्यायचं अशी. आणि लेखात फोटो दिला आहेस तशी आजोबांकडे होती. पण मी क्वचितच ह्या मोठ्या आरामखुर्चीत बसलेय. मला चिमटून जायची भिती वाटायची.
मला चिमटून जायची भिती वाटायची
मला चिमटून जायची भिती वाटायची. ... +१.
वर्णिता, ऋतुराज, धनुडी
वर्णिता, ऋतुराज, धनुडी प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
मला चिमटून जायची भिती वाटायची >> ☺️
आमच्या आरामखुर्ची चा फोटो
आमच्या आरामखुर्ची चा फोटो अपलोड केलाय, खुर्ची पुसून वैगेरे स्वच्छ केली. नवीन कापड आणलं, अमेझॉन वर घरपोच मिळालं. जरा शोधाशोध करावी लागली पण मिळालं आणि छान आहे कॉटनच्. पॉलिश करून घ्यायचा ही विचार करतेय.
आज खुर्चीत बसून पाय हलवत चहा प्यायला, दुपारी एक डुलकी घेतली, मजा आली.
मस्त खुर्ची फोटो.
मस्त खुर्ची फोटो.
सासरी आहे अशी खुर्ची अजून. सासरे त्यातच डुलकी घेतात बसल्या बसल्या.
मस्त रंग मिळाला कापडा चा..
मस्त रंग मिळाला कापडा चा..
दुपारी टाइमपास म्हणून
दुपारी टाइमपास म्हणून खुर्चीची दांडी हळूच कोणाला ही न समजेल अशी काढून ठेवणे आणि कोणी पोरगं बसायला गेलं की कसं आपटलं म्हणून टर उडवणे वैगेरे प्रकार ही आम्ही करत असू.
>>आमच्याही घरी तेच व्हायचं.
छान आहे खुर्ची.. घरही फार
छान आहे खुर्ची.. घरही फार नीटनेटके दिसतेय
आमच्या आजोबांची अगदी मागच्या
आमच्या आजोबांची अगदी मागच्या वर्षी पर्यंत अशी आरामखुर्ची होती...कदाचित अर्ध्या पेक्षा जास्त आयुष्य त्यांनी त्यावर आराम केला सकाळचं कोवळं ऊन खायला..रात्री जेवणानंतर झोपेची वेळ होई पर्यंत आराम करायचा..आणि लास्ट इयर याच दिवसांत त्यांनी स्वतः जाऊन brand new नवीन design ची लाकडी आरामखुर्ची घेतली 15 दिवस पण त्यांना त्यावर आराम करता आला नाही...उद्या त्यांची पहिली पुण्यतिथी... नेमकी पोस्ट बघून त्यांची अजून आठवण आली.
छान लेख.
छान लेख.
आमच्या आत्याकडे एक नायलॉनची आरामखुर्ची होती. उन्हाळ्याच्या/दिवाळीच्या सुट्टीत तिकडे गेल्यावर आरामखुर्चीत बसण्यासाठी आम्हा भावंडांमध्ये भांडणे होत. मग आम्हाला खुर्चीत बसायच्या वेळा ठरवून दिल्या जात असत.
(त्यावेळी दूरदर्शनवर गोट्या, संघर्ष, निळा बुरखा (की कायश्या नावाची), आणि अर्थातच महाभारत वगैरे मालिका चालू होत्या. हे लक्षात राहण्याचं कारण म्हणजे त्या आठवणी या खुर्चीशी संलग्न झाल्या आहेत. )
अनु,
नीलकमलची खुर्ची <<< खरे आहे. एकदा मॉलमध्ये फिरताना ही खुर्ची अचानक दिसली आणि एकदम छान वाटले. टीव्ही पाहताना (तासन् तास ) आऊसाहेबांची बरी सोय होईल म्हणून घेऊन आलो. पण नव्याचे नऊ दिवस झाल्यावर एके दिवशी त्यांनी त्या खुर्चीला हळूच गॅलरीत ढकलून दिली ती अजून परत आत आली नाही (बिचारी).
हीरा खतरनाक किस्सा आहे.
हीरा खतरनाक किस्सा आहे.
---------------------
लेख आवडला. मन भूतकाळात गेले. आमच्याकडेही चट्ट्यापट्ट्याची आरामखुर्ची होती.
Pages