झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेच ना... साठलेल्या डबक्यातील पाण्याला वाट मिळाली एकदाची.
तायडा त्या महामाठ काकीला हाताला धरून साळव्यांना पुन्हा सळो-की-पळो करेल अशी दाट शंका येते आहे.

प्रोमो पाहिला..
ऐन लग्नात, गुरुजी नवऱ्याचे नाव विचारतात अवनी(स्वीटू) ला तर बिचारी विसरते..!(नाव घ्यायला लाजत नक्कीच नाही असं एकंदर चेहऱ्यावरून वाटतं)

मेधावि: एवढयात बरी सुटका होईल तुमची?
तायडाचा कट कारस्थानांचा आणि साळवी मंडळींचा बावळट, सॉरी, भाबडेपणाचा कोटा अजून संपला नाही काही Proud

ते दादा साळवींना नक्की काय झालंय म्हणावं? स्मृतीभ्रंश की वेडाचा झटका की एखादा अज्ञात आजार? प्रकारच कळत नाहीये तो. पुन्हा तो मोहित दिसला. Uhoh बघवत नाही त्याची ती खळी.

मग नली तिच्या पेटंट टरक्या नजरेने तायडाकडे बघत तिला ओपन चॅलेंज देत सांगते की तिची मुलगी याच व्हिल्यात येऊन तायडाचा माज कसा उतरवते ते बघ.!! >>>>>>>> म्हणजे सिरियल काही इतक्यात सम्पत नाही म्हणा. आणखी दोन वर्ष आरामात चालेल.

ऐन लग्नात, गुरुजी नवऱ्याचे नाव विचारतात अवनी(स्वीटू) ला तर बिचारी विसरते.. >>>>>>> आता काय स्विटूचा अपघात होऊन मेमरी लॉस झालाय अस दाखवणार की काय?

(नाव घ्यायला लाजत नक्कीच नाही असं एकंदर चेहऱ्यावरून वाटतं) >>>>>>>> तिच्या चेहर्यावरचे भाव तुम्हाला दिसले? अभिनयात ठोकळा आहे ही.

काल साखरपुडा झाला आहे....नलीच्या लग्नातला ( किमान २३-२५ वर्षे जुना ) पण तरी नवा कोरा दिसणारा शालु स्वीटु ने नेसला होता.आणि पहिल्यांदाच केसांची वेणी घातली होती.
सापु होताना एक छोटा अपघात होउन ओम्या च्या हाताला लागते नेमके जिथे अंगठी घालणार त्या बोटालाच...मग शकुबाइ ओम्या डावरा असल्याने डाव्या हातातच अंगठी चालेल असे म्हणातात आणी एकदाचा सापु पार पडतो.
इतके दिवस खायला अन्न नसणारे साळवी चांगले कपडे घालुन आणि नलु आणि सुमन नव्या साडीत कसे काय आले बुवा असं आपण विचारायचं नाही.
नली नी मेकअप दागिने नवी साडी हे सगळं सगळं केलं पण केस काही विंचरले नाहित...व्याहीभोजनाला तेवढा कंगवा द्या बुवा.
किंवा सूनमुखाच्या वेळी नवी सासु सुनेला मांडीवर बसवुन तिचे केस विंचरते असा काही एक विधी असतो ना तेव्हा सूने सोबत तिच्या आइचे पण केस विंचरुन द्यायचा विधी अ‍ॅड करा.

आता लग्नात काहितरी राडे आहेत असं प्रोमो वरुन कळतय...ओम ला गायब करणार आहेत का हा नुसताच काका काकु च्या स्वप्नातला प्रसंग आहे कळत नाही. पण आता इतक्या लांबवर येउन लग्न लावलं नाही तर प्रेक्षक मालिका बघायचे सोडुन देतील एवढं नक्की.
आता पुढची कट-कारस्थानं खानविलकर घरात होउदेत...

"येउ तशी कशी मी नांदायला " हे नाव सार्थ करण्यासाठी शेवटच्या एपिसोड पर्यंत लग्न लांबवणं हा शुद्ध मूर्खपणा आहे

इतके बोलुन मी माझे दोन शब्द संपवते Happy

@ स्मिता श्रीपाद : खोखो: Biggrin Biggrin भारी अपडेट्स लिहिलेत.....
नली नी मेकअप दागिने नवी साडी हे सगळं सगळं केलं पण केस काही विंचरले नाहित..>> Rofl

दादा साळव्यांना ठाण्याच्या वेड्यांच्या इस्पितळात का टाकत नैत थोडे दिवस..?
लग्नाच्या मंडपाचे बांबू नुसते उभे केले होते.. एक पड्ला तर सटासट सगळे पडले. कापड गुंडाळलेल्या बांबुंपैकी एक बांबु ष्विटूच्या टाळक्यात पडता पडता कडक्या ओम्याने पकडला तर त्याच्या बोटातून रक्त निघालं. कसलं शेमळु आहे ना ओम्या Uhoh
पडु द्यायचा होता की तो बांबु ष्विटुच्या टाळक्यात.. म्हणजे पुन्हा १० लाखांसाठी घर तायडकडे गहाण पडलं असतं.. अन त्या धक्क्याने दादा सा़ळवी माणसात आले असते.

या लग्नात महाजांबाज तायडा महामाठ काकूला घाबरवून विघ्न आणणार हे जवळ जवळ फिक्स झालंय असं वाटतंय.

किंवा सूनमुखाच्या वेळी नवी सासु सुनेला मांडीवर बसवुन तिचे केस विंचरते असा काही एक विधी असतो ना तेव्हा सूने सोबत तिच्या आइचे पण केस विंचरुन द्यायचा विधी अ‍ॅड करा. >>> Rofl Rofl Rofl

दळाभद्री साळव्यांच्या घरातील एक तरी माठ कह्यात घेण्यासाठी तायडाने खोटा गुर्जी आणुन त्याच्या तोंडी तायडाला हवं ते ष्विटूचं भविष्य वदवून घेतलेलं असतं. त्या भविष्याची आठवण येत नलीच्या हाती अंगठी सोपवताना महामाठ काकूच्या तोंडावर १२ वाजतात.

नलीकडे अंगठी देताना काकूच्या तोंडावर बारा का वाजलेत? >> ते तर रोजच वाजलेले असतात हो...फक्त साडी आणी मेकअप सकट चे १२ होते काल....
दिग्दर्शकाच्या अचानक लक्षात आलं की काकु आणि काका ला फार कमी फुटेज आहे...काकु ला फक्त धाप लागणे आणि २ - ९ - ९ - २०० मोजणे आणि काका ला कहितरी चुकीचे उलट सुलट शब्द बोलणे आणि रेडिओ रीपेअर करणे इतकेच काम दिलंय....
आणि आता नलु अचानक हुश्शार झाली आहे ......तिला तायडा चे कट कळायला लागलेत मग कोणाला बरं बकरा करावं...आणि दादा वेडा
मग काय धरलाय काका काकी ला.... आधीच चेहेर्‍यावर १२ वाजलेले असतात...आता अजुन जरा क्लोज उप मधे दिसत आहेत दोघे...

जाऊद्याहो. काय करेल बिचारा. महामाठ चिन्याचा वडिल साकारायचा असतो त्याला... असु द्या असु द्या.. साळव्यांकडे सगळे असेच आहेत. दळभद्रीपणामुळे असे वागतात ते. आपण एवढं बारकाईने लक्ष दिलं की आपल्याच डोक्याला ताप होतो. Proud

स्वीटूचा संगीत समारंभातली साडी आणि मेकप बघून , शाळेतल्या gathering मधल्या नाटकातली राणी आठवली. त्यामानाने पिवळ्या साडीत छान दिसतेयं.

कालचा महाएपिसोड हा नलीच्या महादळभद्रीपणाचा कळसाध्याय होता. नलीने काल त्यातल्या त्याल बरे केस विंचरले होते. अगदी थोडेच केस पिंजारलेले दिसले. तायडा मात्र भयंकर नटली होती. तिची साडी, ब्लाऊज अन गळाभर नेकलेस या संपुर्ण भारतीय पेहरावात तिचं एक वेगळंच सौंदर्य अन त्यामागे असलेला खुनशीपणा उठून दिसला. ष्विटू पण हिरव्या रंगाची साडी अन तिच्या आकाराला शोभणार्‍या सफेद खड्यांचा नेकलेस घालून मठ्ठपणे वावरत होती. माठ चिन्याला बरे कपडे देता आले असते पण ते राहिलं तर निदान अवतार तरी जरा बरा हवा असं वाटलं. महामाठ काका अन महामाठ काकी खरेच सुंदर दिसत होते. महामाठ काकीला थोडा मेकप अन चांगले कपडे घातले की ती खरेच चांगली दिसते असं वाटलं. कालच्या एपिसोड नंतर काकीला अजुन एखादी नवी शिरेल मिळेल असं वाटलं. ऑम्याची (नसलेली) तब्येत ढासळली आहे की केस वाढल्यामुळे सुका बोंबील दिसला ते काही कळालं नाही. दादा साळव्यांनी टायटल साँग मधलाच कुर्ता पायजमा घातला होता अन तोही मळवून ठेवला. या माणसाला घरात बंद करून का आले नाहीत ते कळालं नाही.

लेकीचं लग्न चालु असताना दादा साळवी तायडाच्या खेळीला बळी पडून आत्महत्या करायला जातात अन त्यांच्या मागे त्यांना वाचवायला ओम्या जातो. बाकी दळभद्री साळव्यांच्या असं काही घडलं असेल हे गावीही नसतं. ते लगेच स्वारगेट एस.टी. स्टँड वर असल्यासारखं ९ ची मुंबईला जाणारी बस आली नाही म्हणुन थोडी वाट बघण्या ऐवजी पलिकडल्या प्लॅटफॉर्म वर आलेली अन ९.०१ वाजता सुटणार्‍या सोलापूर बस मधे बसून सातारचं तिकिट काढु बघतात (अरे मुंबईला जायचं होतं ना तुम्हाला..? मग सोलापुरच्य एस.टीत बसून सातारचं तिकिट का काढताय माठांनो..? Angry ) लग्नाच्या कार्यक्रमाला खुद्द नवरदेव ओम्या दिसत नाही, दादा साळवी दिसत नाहीत तर कमित कमी पोलिसात तरी तक्रार करायची ना.. पण दळाभद्री नली सर्वांसमक्ष रडून गोंधळ घालते अन मोहितशी लग्न लावते... आय मीन ष्विटूचं..!

तिकडे ओम्या दादा साळवींना कड्यावरून उडी मारताना वाचवतो त्या शॉटमधे दादा साळव्यांच्या ओझ्याने ओम्याची पण म्युच्युअल आत्महत्त्या होते की काय ही भिती वाटत असतानाच तिथं ३-४ जण येऊन दादांना वर खेचतात. मग हॉस्पिटल मधे नेतात (वेड्याच्या हॉस्पिटलात नेलं असतं तर बरं असच आपणाला वाटुन जातं..!) अन तिथं नस्रा अन डॉक्टराच्या ताब्यात दिल्यावर ओम्याला त्याच्या साखरपुड्याची आठवण येत दादा साळव्यांन एकट्यालाच तिथं सोडून तो पळ काढतो.

इकडे ठोकळा अभिनयात हातखंडा असलेल्या ष्विटुला मोहितने कुंकू लावून मंगळसुत्र घातल्यावर ओम्या तिथं धापा टाकत पोचतो अन मग ष्विटू उठून सर्वांसमोर स्तेज समोर थिजून उभ्या असलेल्या ओम्याकडे हत्तीसारखी दमदार पावले टाकत जाते. मग अंधार बुडुक होऊन इतर सर्वजण दिसेनासे होतात अन फोकस लँप ओम्या अन श्विटूवर रोखला जातो. मग शिरेलीच्या पहिल्या भागापासून आता पर्यंतचा गोड-गुलाबी प्रवास दाखवला जाऊन एपिसोड संपतो. (शिरेल नाही संपत... जोपर्यंट ८-८३० टाईमस्लॉटच्या नवेन शिरेलीचा प्रोमो दिसत नाही तोवर उगीच कोणी गोड गैरसमजात राहु नये Proud )

शेवटचा भाग नसावा...

अर्थात 2 तासाच्या महा एपिसोड मध्ये काहीहीही चाललं होतं..

ओम च्या हातात ph असतो तरी त्याची आई,रॉकी कोणीही ph करून नीट खात्री करत नाहीत,की तो कुठे गेलाय, काय झालंय..?

आताच्या काळात पण,मांडवातून नवरा पळून गेला,मग बिचाऱ्या मुलीला दुसरं कोण स्वीकारणार, वगैरे...!!!

डीजे, धन्यवाद इतक्या डीटेल्स साठी...बरे झाले काल बघितले नाही...त्यापेक्षा भावंडांसोबत नारळीभात खाण्यात वेळ छान गेला Happy
आता झी५ वर पण बघायची गरज नाही इतका राडा...

झी च्या पेज वर लोक फार शिव्या घालत आहेत...तिथे फक्त मोहित शी लग्न झालं इतकचं कळलं होतं पण ते घडवुन आणण्यासाठी कायच्या काय लिहिलंय. मुलीचे वडील हा लग्नात इतका दुर्लक्षित घटक कसा काय असु शकतो ? कन्यादान वगैरे नसते का यांच्यात ? कन्यादान केल्याशिवाय मंगळसूत्र कसे काय बुवा घातले ? लेखकाचे बेसिक फारच कच्चे आहेत.
अजुनही "फक्त सही करुन, कागदपत्र एकमेकांना देउन" घर नावावर करण्याच्या ट्रॅक चा धक्का मला पचला नाहिये..त्यात आता हे नवीनच Wink

बाकी झी पेज वर काही भाबडे लोक अजुनही या आशेवर आहेत की काल दाखवलेलं सगळं काका काकींचं स्वप्न आहे आणि अजुन लग्न होणे बाकी आहे...देव त्यांचे भले करो Happy

Pages