[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]
सारस शुभेच्छा
शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.
खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.
म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!
आता थोडं सारस विषयी - हे सारस शुभेच्छा “व्रत” स्वतःसाठी करत नाहीत, इतरांसाठी असतं. जपानी लोकं १००० ओरिगामी सारस (क्रेन्स) करून एकमेकांना देतात. कुणी खूप आजारी असेल, मोठ्या परीक्षेला किंवा स्पर्धेला जाणार असेल इ तर देण्याची प्रथा आहे. “Senbazuru” सर्च इंजिन मध्ये पाहिलं तर अधिक माहिती सापडेल.
कार्पोरेट कल्चर मध्ये याचा ‘टीमवर्क’ साठी वापर केला जातो. एक व्यक्तीने केले तर अनेक वेळा हे “व्रत” पूर्ण ही होत नाही अशी धारणा आहे. म्हणून सहसा टीम्स मिळून अशा ऍक्टिव्हिटी करतात. ह्यात “कारण” जसे आजारपण, परीक्षा इ आवश्यक नाही. पेशन्स वाढणे, सामंजस्य वाढणे, सर्जनशीलता वाढणे, एकत्र काम करणे असा काहीसा उद्देश असतो.
असंबद्ध गप्पा या वाहत्या धाग्यावर सारस चित्रांची सुरुवात झाली. मी सुरुवात करायला निमित्त ठरले पण मला रोज जमतच असं नाही. १०० सारस दिवस पूर्ण करता करता मी जिथे कमी पडले तिथे तिथे इतर आयडीनीही स्वतः केलेली ओरिगामी, इतरांची ओरिगामी, ते सारस विमान रूपातील ‘सारस चित्रे’ आणली. टीमवर्कची हीच तर मजा असते. काहींना मजा आली, काहींना बोअर झालं पण चर्चेतून वाहत्यापेक्षा कायम स्वरूपी धागा असावा असे धाडस आले. आता इथे दिवस १०१ पासून पुढे सुरु… १००० दिवसापर्यंत प्रयत्न करूया.
धाग्याचे नियम काय -
शुभेच्छा द्या आणि घ्या. मी रोज एक ओरिगामी सारस चित्र टाकायचा प्रयत्न करेन. मी स्वतः ओरिगामी फार करत नाही पण उत्तम आर्टिस्टची ओरिगामी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीही शुभेच्छा+चित्रे देऊ शकता. चित्र सारस/क्रेन या विषयाच्या अनुषंगाने असल्यास उत्तम. आज कॅमेरात क्रेन नसेल तरी ९०० दिवस आहेत, मंडळी. ९०० दिवस चालू राहणारा उपक्रम आहे.
शुभेच्छा स्वीकारल्या तर थँक्यू/धन्यवाद इ म्हणून जा. नाही स्वीकारल्या, नाही आवडल्या तर मुद्दामून सांगायची गरज नाही
(एखादी कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश आयुष्यात असेल नि तुमच्या मनातून अजिबात शुभेच्छा येत नसतील तर… होतं असं बॉस!! तसं सांगू शकता मला आणि आप की फर्माईश छाप मी तुमच्या वतीने शुभेच्छा पोस्ट करेन. #positivevibes)
सर्जरी नीट पार पडू दे आणि
सर्जरी नीट पार पडू दे आणि लवकर बरे होऊ देत तुझे मेंटर अनामिका. तुझे 1000 सारस पूर्ण होवोत ही शुभेच्छा. वरचे 11 पांढरे सारस छान.!
धनुडीला मम!
धनुडीला मम!
सीमंतिनी ताई, धनुडी आणि
सीमंतिनी ताई, धनुडी आणि मंजूताई तुमच्या शुभेच्छांसाठी अनेक आभार ! हो, झालेच १००० सारस तर नक्की टाकेन फोटो.
(No subject)
श्रावण सुरु झालाय..
श्रावण सुरु झालाय.. व्रतवैकल्यांचा महिना. हल्ली अनेक स्त्रियांना साग्रसंगित नैवैद्य, पुजा व सणांमधून मिळणारा आनंद , वेळेचा अभाव / अॉफिस / करीयर ह्यामुळे घेता येत नाही. अनेक आॅफिसेस अजूनही घरुन काम / फ्लेग्झिबल वर्किंग अवर्स या मोडमध्ये आहेत. तर अशा अनेक उत्साही स्रियांना आॅफिसचे काम मॅनेज करुन श्रावण साजरा करण्याची संधी मिळो ह्या शुभेच्छा!
मस्तच अनामिका आणि सी
मस्तच अनामिका आणि सी
माझ्याकडून धन्यवाद व शुभेच्छा व हे सारस , अतिशय मेझ्मरायजिंग फोटो आहे.
वाह अनामिका नि अस्मिता. मस्तच
वाह अनामिका नि अस्मिता. मस्तच!!! धन्यवाद. तुम्हालाही खूप शुभेच्छा.
अस्मिता काय मस्त फोटो आहे गं.
अस्मिता काय मस्त फोटो आहे गं.
धन्यवाद अस्मिता. सुंदर फोटो.
धन्यवाद अस्मिता. सुंदर फोटो.
आजचे सारस.
आजचे सारस.
ह्या एकत्र राहणार्या सारसांच्या कळपासारखेच, टीम व कुटुंबियांसोबतचे आपले बंध दृढ होवोत ह्या शुभेच्छा!
ए किती सुरेख अनामिका! बघतच
ए किती सुरेख अनामिका! बघतच राहावंसं वाटतय
थँक्स धनुडी. मजा येतेय.
थँक्स धनुडी. मजा येतेय. सीमंतिनी ताईचे अधिक आभार. त्यांच्यामुळे कन्सेप्ट कळाली.
सुंदर सारस अनामिका.
सुंदर सारस अनामिका.
अस्मिता मस्त सारस फोटो
बाप रे, काय मस्त सारस. नुसते
बाप रे, काय मस्त सारस. नुसते सारस नाही तर फोटो सुद्धा सुरेख. एकदम कलाकार आहेस!!!!! खूप शुभेच्छा.
आजचे सारस.
आजचे सारस.
खूप सुरेख अनामिका. रंगसंगती
खूप सुरेख अनामिका. रंगसंगती आवडली.
धन्यवाद मृणाली व सी ताई.
कालच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद मृणाली व सी ताई.
थँक्यु अस्मिता.
थँक्यु अस्मिता.
बापरे अनामिका, शुभेच्छा काय
बापरे अनामिका, शुभेच्छा काय तुला दंडवतच घे माझा. सुरेख करतेस!
हा सारस माझ्याकडे मदतीला
हा सारस माझ्याकडे मदतीला येणार्या मुलीने केलाय. माझं नवं छंदवेड बघून तिलाही उत्सुकता वाटली. तिला शिकवलं कसा करायचा कागदी सारस ते.
असंच नवं काही शिकण्यासाठी व शिकता शिकता शिकवण्याचा आनंद मिळवण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा!
सी ताई... खूप थँक्यु. तुमचेच
सी ताई... खूप थँक्यु. तुमचेच खूप आभार, तुमच्यामुळे शिकले नवं काहीतरी.
आता १०० सारस पूर्ण करुन थोडा ब्रेक घेईन. १:१० ह्या प्रमाणात १५ ता.च्या आत करायचे ठरवलेलं. परवा सर्जरी ना मेंटरची माझ्या.
अनामिका,दंडवत ग बाई तुला आणि
अनामिका,दंडवत ग बाई तुला आणि तुझे 1000 सारस नक्की पूर्ण होवोत अशी देवाला प्रार्थना _/\_ किती सुरेख . तुझ्या कडे येणाऱ्या मुलीने सुद्धा किती नीटपणे केलाय सारस
धन्यवाद आणि शुभेच्छा!
धन्यवाद आणि शुभेच्छा!
अनामिका, लवकर बरे होऊदेत तुझे मेंटर. सारस अगदी सुबक केले आहेस.
अनामिका, लवकर बरे होऊदेत तुझे
अनामिका, लवकर बरे होऊदेत तुझे मेंटर. सारस अगदी सुबक केले आहेस.>>>>>+१००
अनामिका, लवकर बरे होऊदेत तुझे
अनामिका, लवकर बरे होऊदेत तुझे मेंटर. सारस अगदी सुबक केले आहेस.>>>>>+१००
अनामिका, लवकर बरे होऊदेत तुझे
अनामिका, लवकर बरे होऊदेत तुझे मेंटर. सारस अगदी सुबक केले आहेस.>>>>>+१००
अनामिका, लवकर बरे होऊदेत तुझे
अनामिका, लवकर बरे होऊदेत तुझे मेंटर. सारस अगदी सुबक केले आहेस.>>>>>+१००
मदतनीस ताईला पण छान दिवसासाठी शुभेच्छा!
खूप धन्यवाद धनुडी. मृणाली,
खूप धन्यवाद धनुडी. मृणाली, वर्णिता, मंजुताई आणि सीमंतिनीताई! You all are encouraging me to do better and happy that positive vibes are generated for my mentor.
आपल्या छोट्याशा कृतीतून /
आपल्या छोट्याशा कृतीतून / सदिच्छांंमधून अशीच सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा!
अनामिका, लवकर बरे होऊदेत तुझे
अनामिका, लवकर बरे होऊदेत तुझे मेंटर. सारस अगदी सुबक केले आहेस.>>>>>+1000000
Pages