Submitted by आशुचँप on 2 August, 2021 - 15:48

भुभुच्या गंमती जमती धाग्यावर हा विषय चर्चेला आला आणि लिहायचा प्रयत्न केला. सगळ्यांना काही पोस्ट आवडल्या त्यामुळे मग वेगळा धागा काढून त्या इथे हलवत आहे.
आशा करतो आमच्या ओडीन ची डायरी तुम्हालाही वाचायला आवडेल.
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी
ओडीन हे आमचे लाब्रॅडॉर भुभुचे नाव
तो आता दीड वर्षाचा आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निल्सन - अहो कसलं।सुंदर
निल्सन - अहो कसलं।सुंदर लिहिलं आहे तुम्ही. मला अक्षरशः माझ्या लिखाणाचे सार्थक झालं असे वाटलं. खूप खूप धन्यवाद आणि लवकर भुभु पालक व्हायला शुभेच्छा
भरतजी - तुमच्या प्रतिसदामुळे मी खरोखरच यावर विचार करू लागलो आहे. भुभु च्या धाग्यावर सुधा मूर्ती यांचे पुस्तक सुचवले आहे तेही मागवतोय आता. मी नक्कीच कळविन तुम्हाला त्याबद्दल
जी लावलं तर यापुढे प्रतिसाद
जी लावलं तर यापुढे प्रतिसाद देणार नाही.
बरं बरं नाही म्हणत
बरं बरं नाही म्हणत
खरच लिहा पुस्तक आशुचॅम्प!
खरच लिहा पुस्तक आशुचॅम्प! तुमची शैली छान आहे.
आशू पहिल्या पुस्तकासोबत हे
आशू पहिल्या पुस्तकासोबत हे पण मागवा.
पुढील प्रवास लिहिला आहे
हो पाहिले ऍमेझॉन वर
हो पाहिले ऍमेझॉन वर
एकूण 3 पुस्तकांचा संच आहे तो
बरोबर
बरोबर
फार सुंदर लिहिताय ओडीनच्या
फार सुंदर लिहिताय ओडीनच्या नजरेतून रोजनिशी. मध्येच हसू मध्येच आसू येतायत वाचताना. फोटोही मस्त. पुस्तकाचं मनावर घ्याचं. मराठीतून अशी पुस्तके फार नसतील. भरपूर किस्से लिहा.
ओडीन डायरी 6
ओडीन डायरी 6
आता मला घरात येऊन काही महिने झाले होते आणि मी नव्या घरात मस्त रुळलो होतो. घराचा कानाकोपरा मला पाठ झाला होता. घरात कोण येतं जातं हेही कळू लागले होतं. पाहुणे तर येत जात असत पण घरच्या व्यक्ती सोडून नेहमी येणाऱ्यात होती शोभामावशी.
त्या आमच्याकडे धुणे भांडी करायला येत. मी लहान होतो तेव्हा बाबा खाली आणेल तेव्हाच यायचो आणि आम्ही येईपर्यंत त्या काम उरकून गेलेल्या असत. पण नंतर मला हळू हळू जिने चढता उतरता येऊ लागले आणि माझं घरभर फिरणेही.
अशात मी एकदा असाच खेळत असताना त्या आल्या कामाला. मला त्यावेळी लोकांची फारशी माहिती नव्हती आणि मी हे कोण नवीन म्हणून तिच्यावर चालून गेलो. पण तिने दखल पण घेतली नाही. मग मी खूप चिडलो आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा तिच्या अंगावर भुंकत जायचा सपाटा लावला. असे तीन चार वेळेला झाल्यावर तिचा पेशन्स संपला आणि जवळच झाडू होता तो उलटा करून माझ्या ढुंबीवर एक फटका दिला.
मी त्या अनपेक्षित धक्क्याने कोलमडलोच. मला लागलं नाही जास्त पण मानसिक धक्का सॉलिड होता. मला घरात आल्यापासून नुसते लाड करून घ्यायची सवय होती. कितीही कसेही वागलो तरी चालतंय हे आपलेच आहेत असं मी समजत होतो.त्यामुळे आपल्याला कोण दणका देईल याची अजिबात कल्पना केली नव्हती. आणि विशेष म्हणजे, बाबा या घटनेवर अजिबात काही बोलला नाही, भांडला नाही, उलट हसायला लागला आणि म्हणाला बरं झालं, याला जरा दणका द्यायलाच हवा होता कोणीतरी.
मी मग लगेच कॉट खाली जाऊन घडलेल्या गोष्टीवर विचार करू लागलो की आता काय करता येईल. परत शोभा मावशीच्या नादी लागायचं नाही हे मी त्याच वेळी पक्के ठरवून टाकले. असल्या डेंजर लोकांपासून लांब राहायचं हे मला अगदी लहानपणापासून कळत होतं.
पण मला स्टॅण्ड वर खालच्या बाजूला वाळत घातलेले कपडे, मौजे उडी मारून पकडायला आवडत आणि मी ते पळवून चावत बसे. बाबाने पाहिले तर तो फक्त माझ्याकडुन घेऊन परत धुवून वरती वाळत घालत असे.
पण हे जर आता मला शोभा मावशी ने पाहिलं करताना तर ती मला बाकी कपड्यासकट धुवून वाळत घालेल याची खात्री होती. त्यामुळे मी जरा उद्योग कमी केले, पूर्णपणे बंद नाही केले.
असेही वाढत्या वयासोबत माझी मस्तीपण वाढत चालली होती. आणि त्यातून अनेक चमत्कारीक प्रसंग घडून येत.
आमचं देवघर खाली होतं आणि तिकडे मी एकदा देवांची टेस्ट घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर मला फटका देऊन समजावण्यात आले की हे चालणार नाही. त्यामुळे मी देव सोडले पण देवासमोरचा नैवेद्य मला अस्वस्थ करत असे, विशेषत लाडू ठेवला असेल तर माझा मोह आवरता येणे अवघड व्हायचे. कुणाचे लक्ष नाही असे बघून मी एक दोन वेळा लाडू पळवला. आणि गंमत म्हणजे माझी चोरी पकडली गेली नाही कारण माझ्याइतकाच दादूला लाडू आवडत असल्याने त्याने खाल्ला असावा असे आजीला वाटत असे. पण एकदा तिने नैवेद्य ठेवला आणि बाहेर येऊन दादूला सांगू लागली की प्रसाद थोडा थोडा बाकीच्यांना देऊन मग तू वाटल्यास संपव, एकट्याने लाडू खायचा नाही. त्यावर दादू म्हणला मी तर खातच नाहीये, कारण नसतोच देवापुढे आजकाल. आजी म्हणे काहीही काय, मी ठेवते की अधून मधून. त्यांचे हे बोलणे सुरु असताना किचन मध्ये कोणी नाहीये हे बघून मी लाडू पळवला आणि बाहेर येत असतानाच दादू आणि आजी माझ्या समोर आल्या.
माझे तोंड लाडवाने भरलेले, आणि तो पटकन खाताही येईना आणि समोरच हे दोघे असल्याने पळून पण जाता येईना. मी तसाच गरीब डोळे करून त्यांच्याकडे बघत बसलो, आपण बेक्कार रेड हँड पकडलो गेलोय हे मला कळलं. नशिबाने ते प्रकरण जास्त शेकले नाही, कारण त्यांनी मला सोडून दिले पण बाबाला सांगितलेच. बाबा बाकी कितीही लाड करत असला तरी असले प्रकार त्याला मान्य होणे शक्यच नव्हते. त्याने शिक्षा केली नाही पण किचनच्या दारात पपी गेट बसवले. त्यामुळे आता माझ्या मुक्क मुक्त वावरावर खूपच मर्यादा आल्या. त्यांना पाहिजे तेव्हा ते मला गेटच्या पलिकडे बसवून ठेवत. घरात पाहुणे आले आणि ते घाबरत असतील तर मला उलट्या बाजूने अडकवत. मग मी त्यातून पलिकडे कोण येतंय जातंय याकडे लक्ष ठेवत असे.
ते गेट सतत जाण्यायेण्याच्या वाटेवर असल्याने घरच्यांना जाम व्याप झाला पण माझ्या मस्तीपुढे ते परवडले म्हणत त्यांनी अॅडजस्ट करून घेतले आणि आजही ते गेट भक्कमपणे मला रोखून उभे असते आणि आजही मी उड्या मारल्या तर त्याच्या पलिकडे जाऊ शकत नाही. बाबाने जामच कडक बंदोबस्त केला माझ्यासाठी.
तसाच प्रकार वरच्या खोलीत मी बेडरूममध्ये शिरून आईला घाबरवू नये म्हणून केला. तिकडे तर त्याने चक्क कॉटचे प्लायवुड आडवे टाकले. तिकडून तो माझ्यावर तर लक्ष ठेऊ शकत होता आणि स्वत आरामात ढांग टाकून पलिकडे येत जात असे. या सर्व स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या गोष्टींचा मी भुंकून मी खूप निषेघ केला पण काही उपयोग झाला नाही. आमच्या घरचे खूप प्रेमळ असले तरी शिस्तीच्या बाबतीत हयगय करत नाहीत हा एक नवा धडा मला या निमित्ताने मिळाला.
माझं एैका, मला वाटलं तो लाडू माझ्याच साठी ठेवलाय.
काय जगणे आले हे नशिबी, या दडपशाहीचा विरोध असो
हाहाहा फारच मस्त!!! छान
हाहाहा फारच मस्त!!! छान होतायत भाग. अधिकाधिक खुलत चाललेत.
एक सुचवू का? बर्याच
एक सुचवू का? बर्याच मनुष्यजगातल्या गोष्टी, कॉन्सेप्ट्स ओडिन ला माहितच नसणार. जसं देव, नैवेद्य , प्रसाद इ.
त्या त्याच्या नजरेतून - तो त्यांना काय म्हणेल किंवा त्या गोष्टीचा कसा उल्लेख करेल अशा पद्धतीने लिहिलं तर अजून मजेशीर वाटेल.
बाकी किस्से आणि फोटो मस्त.
तोही विचार केला होता मी पण मग
तोही विचार केला होता मी पण मग त्यांना काहीच माहिती नसतं
आपली नाती, आजी आजोबा, दादू किंवा पाहुणे सगळंच त्यांचा लेखी काय तरी अजबच असू शकेल आणि एवढे सखोल लिहिण्याची माझी क्षमता नाही. म्हणून मी साधं सरळ सोप्प केलय
तरी प्रयत्न करतो, नंतर मग त्याला बाकी भुभु सोबत सोशलाईज कसं केलं, आई सोबत कसे सूर जुळले, पोहणे शिकणे असे बरेच आहे
बघतो कसं जमतंय ते
खूप क्युट आहे
खूप क्युट आहे
देवांची टेस्ट
काही आपल्या जगातले शब्द तसेच राहू दे, नाहीतर डिकोड करून वाचायला कठीण पडेल.
छान चालू आहे डायरी.
छान चालू आहे डायरी.
ओड्या आलाच डोळ्यासमोर
मी तसाच गरीब डोळे करून त्यांच्याकडे बघत बसलो>>>>> हे इमॅजिन केलं
खूप खूप मस्त आहे. . Please
खूप खूप मस्त आहे. . Please पुस्तकाचे मनावर घ्या. . Ebook पण चालेल. .
मज्जा येतेय ओडिन डायरी
मज्जा येतेय ओडिन डायरी वाचायला.. लाडू किस्सा
मज्जा येतेय ओडिन डायरी
मज्जा येतेय ओडिन डायरी वाचायला.. लाडू किस्सा
देवाची टेस्ट व शोभाबाईंचा मार
देवाची टेस्ट व शोभाबाईंचा मार वाचुन फार हसू आले. मार खाल्यावर त्याने नक्की काय केले होते? व लाडू पण.
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
सुनिधी - हाच किस्सा झालेला सेम
शोभा मावशी ने फटका दिल्यावर तो कॉट खाली जाऊन लपला
आणि परत त्यांच्या वाटेला गेला नाही
नंतर त्यांना बदली म्हणून एक आलेल्या त्यानाही आम्ही ही ट्रिक सांगितली, म्हणलं मस्ती करायला लागला तर फक्त झाडू उचलून दाखवा
आणि हे वर्क झालं
लाडूचा किस्सा असाच सेम, आई दर्शन ला ओरडत होती की लाडू खूप खातोय म्हणून आणि तो म्हणला मी नाहीच खात
आणि तेवढ्यात ओडीन सापडला
आपण काहीतरी चुकीचं केलं आहे हे कळलं होतं पण लाडू चा मोह पण सुटत नव्हता, आणि असला अजब चेहरा केला होता त्याने त्यावेळी
मजा येतेय
मजा येतेय
ओडिन डायरी with मस्त ,समर्पक
ओडिन डायरी with मस्त ,समर्पक चित्रं/फोटो-फार छान पुस्तक होईल.
मस्त झालेत सगळे भाग.. पुढच्या
मस्त झालेत सगळे भाग.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..
छानच लिहीत आहात रोजनिशी..
छानच लिहीत आहात रोजनिशी...ओडीनच्या गंमती वाचायला मजा येतेय..ओडीन क्यूट आहे..
पुढील लेखनास शुभेच्छा.
हा ही किस्सा छानच
हा ही किस्सा छानच
>>>>नंतर त्यांना बदली म्हणून
>>>>नंतर त्यांना बदली म्हणून एक आलेल्या त्यानाही आम्ही ही ट्रिक सांगितली, म्हणलं मस्ती करायला लागला तर फक्त झाडू उचलून दाखवा
आणि हे वर्क झालं
आई ग!! ओडीन बिचारं गरीबडं दिसतय. नाही तर एखादा चवताळला असता. हे काय सारखं सारखं लावलय म्हणुन.
फार छान लिहिताय ashu champ ..
फार छान लिहिताय ashu champ ... श्वान haters हळू हळू fan club member व्ह्यायला लागलेत
काही moments एकदम ट डो पा वाटल्या...माबो करांच गटग नक्की करूयात एकदा..खास ओडिन ला भेटण्यासाठी.. खरंच पुस्तकाचं मनावर घ्या..शैली छान आहे तुमची लिहिण्याची.
आशूचॅंप, धम्माल डायरी!
आशूचॅंप, धम्माल डायरी!
म्हणलं मस्ती करायला लागला तर
म्हणलं मस्ती करायला लागला तर फक्त झाडू उचलून दाखवा >>
खूप आवडली ओडीनची डायरी ...
खूप आवडली ओडीनची डायरी ... धम्माल आहे. बेबी ओडीन एकदम cutie pie आहे.
हे प्रत्येक पान वरतीच अॅड करता येईल का ? सलग वाचायला जास्त आवडेल.
पु. पा. प्रा.
छान चालू आहे डायरी. वाचते मी
छान चालू आहे डायरी. वाचते मी नेहमी.
आता पुढील पाउल म्हणजे स्वतंत्र फेसबुक चॅनेल, युट्युब चॅनेल. व टीशर्ट बनवऊन विकणे. कॅलेंडर बनवणे. हर प्रकारचे एपिसोड बनवणे. क्रुसो,
मुन पाय स्टार ब बॉक्स बघा. त्याला वेग वेगळे कॉस्टुमस घालून बारके बारके अर्धा एक मिनिटाचे व्हिडीओ बनवणे. ह्याला जाम व्ह्यु वर शिप आहे. दादाचा आवाज त्याला देउन ओडिनची मते व्यक्त करणे. फेसबुक वर व ट्विटर वर बोलके कुत्रे खूपच आहेत. अगदी २४ सेकंद चे व्हिडीओ असतात. पण बिग स्ट्रेस बस्ट र फॉर पब्लिक.
ट्विटर वर अकाउंट काढ णे.
Pages