Submitted by आशुचँप on 2 August, 2021 - 15:48

भुभुच्या गंमती जमती धाग्यावर हा विषय चर्चेला आला आणि लिहायचा प्रयत्न केला. सगळ्यांना काही पोस्ट आवडल्या त्यामुळे मग वेगळा धागा काढून त्या इथे हलवत आहे.
आशा करतो आमच्या ओडीन ची डायरी तुम्हालाही वाचायला आवडेल.
ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी
ओडीन हे आमचे लाब्रॅडॉर भुभुचे नाव
तो आता दीड वर्षाचा आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच गोष्टी, ओडीन तर काय
मस्तच गोष्टी, ओडीन तर काय हिरोच आहे.तुम्ही व तुमची घरची मंडळी ओडीनमधे कशी गुंतत गेली हे वाचायलाही मजा येतेय. वाचायला येत जाईन.
कडेवर घेऊन फेर्या>> हे
कडेवर घेऊन फेर्या>>
हे क्लासिक आहे
आजोबा आजी फारच कूल दिसतायत!
मस्त किस्सा ! आजी आजोबा कूल
मस्त किस्सा ! आजी आजोबा कूल आहेत एकदम
खूप छान आहे ही डायरी.तशी मी
खूप छान आहे ही डायरी.तशी मी काही भुभुप्रेमी नाही.भुभु हेटर पण नाही.पण ही डायरी वाचते तेव्हा एकदा तरी रडते(ते लोक वेडिंग मध्ये रडतात तसं.)
ओडिन ला तुमची खेळती धावती फिरवती साथ पुढची अनेक वर्षं मिळो.
>>>>ओडिन ला तुमची खेळती धावती
>>>>ओडिन ला तुमची खेळती धावती फिरवती साथ पुढची अनेक वर्षं मिळो.
+१००१
हाय ओडीन, मी एल्सा. तुझे
हाय ओडीन, मी एल्सा. तुझे अनुभव ऐकताना अगदी माझीच कथा ऐकतीये असं वाटलं. माझ्याबरोबर पण सगळं कसं असच अगदी घडलं रे. एकच फक्त फरक म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे आई शुरवीर आणि बाबा घाबरट होता
. आता बाबा पण एकदम बिन्धास्त झाला आहे. हा बघ माझा आणि दादुचा फोटो. मी तेव्हा ३ महिन्याची होते बर का!
वा मस्त. गाऊनच्या गंमती काय
वा मस्त. गाऊनच्या गंमती काय बरोब्बर शब्दात पकडल्या आहेत.
चंद्राची सुचना खरंच मस्त होती ज्यामुळी डायरी सुरु झाली.
पुण्यात आलं की या मुलाला भेटावं लागणार आता.
एक माऊ -भुभू गटग करूयात
एक माऊ -भुभू गटग करूयात
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
आजी आजोबा पण सुरुवातीला विरोधात होते, पण ओडीन आल्यावर सगळ्यांचा लाडोबा झाला
अनु - खूप छान लिहिलं आहे, धन्यवाद
चौकट राजा - मस्तच, कसली गोंडस आहे एल्सा
दादू पण
सुनिधी - नक्की या, ओडीनलाही आवडेल भेटायला तुम्हाला
अंजली - भुभु गटग ठिके, माऊ आल्या तर मग हलकल्लोळ होईल.
ओड्याच्या शत्रुपक्षात नंबर 1 ला असतात सगळ्या माऊ
हा हा आय नो... सगळीच पळापळ
हा हा आय नो... सगळीच पळापळ
मजेदार आहेत किस्से...ही
मजेदार आहेत किस्से...ही चावाचावी एकदम वाचनीय... ह ह लो पो
वाह, खूप छान लिहिलंय
वाह, खूप छान लिहिलंय
आशुचँप,
आशुचँप,
तुम्ही लगेच मनावर घेऊन सुरवात केलीत म्हणून खरं तर कौतुक वाटलं. बरेच प्रसंग relate झाल्यामुळे खूप आनंद झाला.
नाही वाटली तरी सद्ध्या लिहिताय तेही छानच आहे!) लेखनाला आणि ओडीनलाही अनेकानेक शुभेच्छा !
अहो मला धन्यवाद कशाला ?
(अवांतर : ओडीनच्या नजरेतून वाचायला मजा वाटतेय. अधून मधून लेखात प्रसंगानुरूप तुमचेही italics मध्ये लिहिलेलं स्वगत बहार आणेल. उदा. तुम्ही तुमच्या या चिरंजीवांचा उल्लेख शेलक्या विशेषणाने ( अरे ढेकळ्या ) करता किंवा इतर मल्लिनाथी करता - आमची चौकशी करायला नाही कोण फिरकलं आजारपणात इ . इ . तेही मजेशीर वाटतं. ही आपली उगाच एक उपसूचना - अमलात आणावीशी वाटली तर
>> पुस्तक छापायचं पोटेन्शल असलेलं लिखाण आहे.
Submitted by भरत. on 3 August, 2021 - 00:09>> +१
माझ्या लेकाला देणार आहे मी हे
माझ्या लेकाला देणार आहे मी हे वाचायला. तो भुभू प्रेमी, मी माऊ प्रेमी. दुसऱ्या धाग्यावरच्या भुभू माऊ च्या पिल्लाच्या गमतीजमती वाचल्या आहेत त्याने, ओडिन ला ओळखतो तो. डायरी वाचून वेडा होणार नक्की. आमच्या नवीन घरी जाईपर्यंत भुभू घ्यायला थोपवून ठेवलय मी, अत्ता रेंटच्या घरात परवानगी नाही पेटस् ना
ओडिनच्या बालपणीचा व्हिडिओ बघतेय असं वाटतंय. मस्त मस्त.
मस्त लिखाण. फक्त विपूत सुचवलं
मस्त लिखाण. फक्त विपूत सुचवलं आहे त्याप्रमाणे एक लेखमालिका करून त्यात वेगवेगळे लेख टाकता आले तर 'सोनेपे सुहागा' होईल. कारण काही दिवस इथे येता आलं नाही तर सगळी पानं धुंडाळून मागच्या डायरी एन्ट्रीज वाचाव्या लागतील.
दादू आणि माझी गट्टी जमणार हे
दादू आणि माझी गट्टी जमणार हे मला पहिल्या दिवसापासूनच कळलं. मला नंतर हे कळलं की आमचा वाढदिवस पण एकाच दिवशी असतो. बाबा म्हणतो आम्ही भाऊच असणार गेल्या जन्मीचे.
दादूला बालदमा होता म्हणून मला आणायला खूप जणांचा विरोध होता पण दादू आणि बाबाने बऱ्याच खटपटी करून सगळ्यांना पटवल म्हणे.
पण त्यामुळे त्याने मला घेऊन गादीवर झोपायचं नाही, इतकंच काय बंदिस्त खोलीत पण नाही असे नियम लावले होते, त्यामुळे दादू आणि आई आतल्या खोलीत झोपत आणि मी व बाबा बाहेरच्या खोलीत.
पण म्हणून दादू आणि मी मस्ती करायचं काय सोडलं नाही. आमच्या दिवसभर मारामारी, कुस्त्या, लोळालोळी प्रकार चालायचे. तो मला अक्षरशः अवळी चिवळी करायचा पण मला ते आवडायचं आणि कधीच त्याला हरकत घेतली नाही. आजी ओरडली तरी आम्ही ऐकायचो नाही. तो अभ्यास करत असेल तर मी खुशाल त्याच्या मांडीवर झोपायचो आणि तो माझ्या अंगावर पुस्तक ठेऊन वाचायचा.
त्याचे मित्र आले तर मग अजूनच दंगा. आम्ही सगळे मिळून इतका धुडगूस घालायचो की घरचे वैतागून जायचे. अशातच एक दिवस तो प्रकार घडला.
दादू आणि मी बॉल खेळत होतो. तो बॉल टाकायची ऍक्शन करून अंगाखाली बॉल लपवून ठेवत होता आणि मी ओए असं नाही म्हणत त्याच्या अंगावर चालून जात होतो.
त्याला फसवायला म्हणून मी लक्ष नाही दाखवलं आणि त्याच्या मागे गेलो आणि तिकडून हल्ला चढवला. तो त्याच वेळी खाली वाकला आणि बॉल पकडण्याच्या नादात माझ्या दातात त्याचा कान आला.
माझे दात त्यावेळी अगदी शार्प होते आणि मला सारख काही ना काही चावावं असे वाटत असे. मी फर्निचर, फडकी, बाबाचे शूज, सॉक्स काय दिसेल ते चावत होतो.
तर दात लागताच दादू कळवळून ओरडला आणि मला झटकून उठला. त्याच्या कानाला चांगलीच जखम झाली होती आणि तो रडायला लागला.
घरी सगळे होते ते एकदम धावत आले. मला कळलं काहीतरी गडबड झाली आणि मी घाबरून कॉट खाली जाऊन लपलो. बाबा दादूचा कान तपासत होता आणि तो थयथया नाचत होता.
ते बघून आई चिडली एकदम. आणि तिने बाबाला ओरडायला सुरुवात केली. बघ मी म्हणलं होतं ना तो चावणार म्हणून, केवढ्याला पडलं हे. आजच्या आज त्याला देऊन या त्याला कुठेतरी मला चालणार नाही.
एरवी आई माझ्या विरोधात काही बोलली की बाबा माझी साईड घेऊन तिच्याशी भांडत असे पण तो आज दादूची काळजी करत होता आणि काहीच बोलला नाही.
त्यामुळे मी अजूनच घाबरलो. आणि दादू अजून मोठ्याने रडायला लागला. बाबा म्हणत होता इतकं पण नाही लागलं, शांत रहा जरा आपण जखम धुवु आणि डेटॉल लावू.
पण दादू रडायचा थांबत नव्हता आणि रडता रडता म्हणाला त्याची काही चुकी नाहीये, खेळताना लागला आहे. त्याला का देऊन टाकायच म्हणताय. त्याला नका देऊ.
हे ऐकून मलाही खूप वाईट वाटलं आणि दादुबद्दल खूप माया आली. मला त्याच्या जवळ जाऊन त्याला सॉरी म्हणयाच होत पण सगळे चिडले होते आणि मला काही सुचत नव्हतं.
बाबाने मग डॉक्टर ला फोन केला आणि बराच वेळ काहीतरी बोलला. त्यात लस, व्हाकसिनेशन नाही झालं, हो का रेबीज चे इंजेक्शन का असलं काय काय ऐकू येत होतं.
फोन झाल्यावर बाबा म्हणाला त्याला रेबीज चा कोर्स करावा लागेल, कारण ओडीन चा रेबीज चा कोर्स नाही पूर्ण झाला. गरज नाहीये पण डॉक्टर म्हणाले रिस्क घेऊ नका.
आणि मग बाबा त्याला घेऊन गेला डॉक्टर कडे. मी तसाच कॉट खाली थरथरत पडून राहिलो. माझ्याशी कोणी बोललं नाही. बाहेर आलो तर आपल्याला ओरडतील म्हणून मी तसाच थांबून राहिलो.
खूप वेळाने संध्याकाळी बाबा आणि दादू आले. दादू च्या कानाला पट्टी बांधली होती आणि हात दुखतोय म्हणत होता. बाबा म्हणाला रेबीज चे इंजेक्शन हेवी असते त्यांनी आम्हाला आधी खाऊन यायला सांगितले आणि मग ट्रायल डोस दिला आणि मग ते इंजेक्शन. खूप दुखलं दर्शन ला पण घेतलं त्याने धीराने.
अजुन 5 इंजेक्शन घ्यावी लागतील ठराविक दिवसांनी. मला खूप म्हणजे खूपच वाईट वाटत होते. पण मी काय आणि कसे सांगणार होतो.
मग आम्ही वरच्या खोलीत गेलो तेव्हा दादू बसला होता मी त्याच्या जवळ गेलो आणि हळूहळू त्याच्या पायाला, हाताला चाटले. मला वाटलं तो ओरडेल मला. पण तो अजिबात ओरडला नाहीच उलट जवळ घेतलं आणि माझ्या डोळयात बघत म्हणला मला नाही ना चावणार आता. मी लगेच नाही म्हणून त्याला परत चाटले. मला कळलं की आम्हला एकमेकांची भाषा नाही आली तरी चालतं. कदाचित तोच दिवस होता की जेव्हा मी खऱ्या अर्थाने या घरचा झालो कारण मला माझ्यावर माझ्या खऱ्या भावासारखा प्रेम करणारा दादू मिळाला होता. त्याला त्या इंजेक्शनने खुप दुखायचं आणि अशी त्याला खूप इंजेक्शन घ्यावी लागली पण कधीच त्याने मला त्यावरून बोल लावला नाही.
त्यांनतर मी कधीच आईच्या किंवा भावा बहिणीच्या आठवणीने रडलो नाही आणि त्यानंतर आजतागायत माझा दात कधी दादू ला लागला नाही. आता मी मोठा झालोय, पण दादू खुशाल माझा जबडा उघडून त्यात औषधाची गोळी ठेवतो किंवा कधी मस्तीत तोंडात हात देतो. मी त्याचा हात पकडतो तोंडात पण दात कधीच नाही लावू देत.
दादू माझा बेस्ट बडी आहे आणि आमच्यात बेस्ट बडी ला खूप मान असतो.
बाबा कधी दादू ला ओरडत असेल किंवा त्याला फटका देणार असे वाटलं तर मी बाबा ची पण गय करत नाही आणि खुशाल त्याच्या अंगावर धावून जात दादूला वाचवतो. आणि कधी माझ्या मस्ती मुळे बाबा मला शिक्षा करायला आला तर मी पळून जाऊन दादू च्या मागे लपतो. तो बाबाचा राग शांत होईपर्यंत मला प्रोटेक्शन देतो.
दादू आणि मी तेव्हाचे
आणि आत्ताचे, आमच्यात भाषेचा अडसर मुळीच नाही
वा, मस्त फोटो आणि डायरी.
वा, मस्त फोटो आणि डायरी.
फार भारी झालिये डायरी ! ओडीन
फार भारी झालिये डायरी ! ओडीन फार क्युट आहे आणी तुमची फॅमीली पण मस्त आहे.
पुढच्या भागाची वाट पाहतेय.
ऑ! दादुच्या कानाला चु़कून
ऑ! दादुच्या कानाला चु़कून चावल्यावर घाबरून कॉट खाली बसण्याचा किस्सा फार क्युट! ओडिन चे लहानपणीचे सगळे फोटो फारच गोंडस!
मस्तच आहे ओडीनची डायरी!
मस्तच आहे ओडीनची डायरी! आजोबांचे कडेवर घेवून फेर्या मारणे, दादूने कानाला जखम-इंजेक्षन सोसत दाखवलेला समजुतदार पणा हे सगळेच फार हृद्य आहे. लकी आहे ओडीन , त्याला इतके समजुतदार आणि प्रेमळ घर लाभले.
खरंच.सुंदर झालाय हा भाग पण.
खरंच.सुंदर झालाय हा भाग पण.
ओडिन आणि दादा चा लहानपणीचा फोटो पण मस्त.
तो आज दादूची काळजी करत होता
तो आज दादूची काळजी करत होता आणि काहीच बोलला नाही......... आवडलं
हा भाग फार सुरेख झालाय.
वा काय सुरेख बॉंड आहे
वा काय सुरेख बॉंड आहे दोघांच्यात. कानाला लागल्यानंतर आईची घालमेल समजू शकते, पण ओडिन चूक नाही हे सांगणारा दर्शन खुप भावला. खरंच बेस्ट बडीज आहेत. फोटो बोलके आहेत.
धनुडी + १
धनुडी + १
खरच मस्त पुस्तक होईल हे.
खरच मस्त पुस्तक होईल हे. तुमच्या पेपर मध्ये येऊ दे म्हणजे खूप जास्त लोकांपर्यत पोहोचेल.
मला दुसरा फोटो फार आवडला. .कसले समंजसपणे बसले आहेत दोघे...
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
तुमच्या प्रोत्साहनामुळे अजून लिहायला हुरूप येतोय
हा भाग अतिशय हृद्य आणि
हा भाग अतिशय हृद्य आणि चित्रदर्शी झाला आहे.
पुस्तक काढाल त्याचं मुद्रितशोधन मी फुकटात करून देईन. फक्त , मायबोलीवर प्रकाशित न केलेले काही भाग पुस्तकात हवेत.
छान लिहिताय आशुचँप..
छान लिहिताय आशुचँप..
खूपच आवडतय!!!
खूपच आवडतय!!!
मी आणि पाळीव प्राणी म्हणजे
मी आणि पाळीव प्राणी म्हणजे अगदी हाडवैरी. माझं कधी जमतच नाही त्यांच्यासोबत म्हणजे मी कधी जमवून घ्यायलाच जात नाही. भीती, त्यांच्या टाकणाऱ्या लाळेची किळस अशा मिश्र भावना येतात मला त्यांना पाहिल्यावर. त्यामुळे इथे पूर्ण माबोवर उंडरणारी मी त्या भुभू च्या गमतीजमती धाग्यावर कधी फिरकलेही नाही.
पण ओडीन ची डायरी त्याच्या नजरेतून वाचली आणि अगदी इमोशनल वैगरे झाली. लगेच त्या भुभूच्या धाग्यावर पण गेले. रात्री तीन वाजेपर्यंत तो धागा वाचत होते. तिथे ती श्वानद्वेष्टे ची कहाणी वाचली आणि अगदी भरून आलेलं. खूप छान काहीतरी मिस करतेय असे वाटत आहे. घरी नवऱ्याची आणि मुलांची भुभू आणण्यासाठी भुणभुण असतेच नेहमी पण माझा नकार ठाम असतो. इथल वाचून त्यांच्याबद्दलची भीती कमी नसली झाली तरी किळस मात्र नाही वाटत आता. बघू पुढे मागे माझा विचार बदलला तरी मी पण येईल आमच्या भुभुच्या गमतीजमती लिहायला.
आशूचॅम्प, तुमचा ओडीन खूप गोड आहे.
Pages