नुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला: < विषयाच्या संवेदनशीलतेमुळे व्हिडिओची लींक काढुन टाकते आहे. कुणालाही घाबरवण्याचा हेतु नव्हता. सॉरी !!! >
स्त्री काय किंवा पुरुष काय, कोणाचेही मन हेलावेल असा व्हिडिओ बघुन मनाचा थरकाप झाला. लहान मुलांवर कोणी असे अत्याचार करु शकेल असं मन मानायला तयारच नव्हतं.
त्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या. एखादी अनाथाश्रामतली घटना असेल, भारतातला व्हिडिओ नाहीये अशी काहीतरी मनाची समजुत घालुन कामावर लक्ष केंद्रीत केलं.
पण आज (थोड्या वेळापुर्वी) साम टिव्हीवर 'पुण्याची पुतना मावशी' या विशेष बातमीपत्रात पुन्हा तेच पाहिलं आणि राहावंलं नाही. पुण्यात ज्याला सांभाळण्यासाठी कामावर ठेवले त्या बाळाला (केवळ काही महिन्यांच्या/ वर्षाच्या) वाट्टेल तसे उचलुन आदळतांना/ त्या बाळाला मारझोड करतांना पाहिले. हाही प्रकार त्या घरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात शूट झाल्यामुळे त्या बाळाच्या आईला कळला.
खरंच आपण कुठे चाललो आहोत असं वाटलं. अश्या बातम्या बघुन कोणत्या आईला आपलं बाळ कोणाकडे सांभाळायला द्यायची हिंमत होईल? असे अजुनही कितीतरी अत्याचार होत असतील आणि केवळ सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने कोणाच्या लक्षातही येत नसेल.
जी गोष्ट बाळांबाबत तिच गोष्ट आजारी/ बेडरीडन ज्ये. नागरीकांसोबतही घडत असेल असं मनात येऊन गेलं.
कोणाशीतरी बोलावंसं वाटतंय म्हणुन इथे लिहिलंय. नाही आवडलं तर इग्नोर करा.
बाईक म्हण्जे मोटार साईकल
बाईक म्हण्जे मोटार साईकल वैगरे वर बसलल्ले मुल मी पण इथे पाहिलेल नाही.. इथे उसगावात सायकलिला बाईक म्हणतात त्याच्यावर बसुन न्यायचे असेल तर बाईक ला अॅटेच करायची वेगळि गाडि कि.न्वा सीट मिळते ति लहान मुला.न्च्या वयगोटाप्रमाणे वेगवेगळि अस्ते.. ती मो ठ्या.न्च्या सायकलिला लावुन मुला.ना नेता येत..अर्थात त्यालाही बेल्ट वैगरे असतोच..शिवाय मोथ्याप्रमाणे बाळालाही हेलमेट , नी आणी एलबो पॅड , जामानिमा करावा लाग्तो..
इथे मुल रा.न्गते किन्वा चालते
इथे मुल रा.न्गते किन्वा चालते झाले ़की सगळ्या गिळत्या येणासारक्या गोश्टि जस नाणी, बटन, खेळणि लेगो पिसेस, पॅक ब.न्द ठेवाव्या लागतात, फर्निचरला शार्प कॉर्नर असतिल तर गार्ड बसवणे, इलेक्टिक ऑउटलेट वापरात नसतिल ़किन्वा फार खाली असतिल तर त्यावर कॅप घालणे, हॉट वॉटर टेम्प अअॅड्जेस्ट करने, घारात जिना असेल तर बेबी गेट लावणे, डायनि.न्ग टॅबल च्या चेअर वर बसायच्या छोट्ञा चेअर बसवणे,
१२ वर्शाखालिल सगळि मुल गाडित( कार) बॅक सिटवर च बसतात..बेल्ट लावणे ग्रुहित आहेच..
पाळणा घाराच लायसि.न्ग घ्यायला परिक्षा अस्तात, ह्यात काम करणार्या कुणालाही early child care certification , Red Cross certification, CPR training compulsory असते. तुम्ही किति मुल केअर करु शकाता हे तुमच्या लयसन आनी जागेवर ठरते,
१५ मुलासाठी २ प्रशिक्षका आनी एक डेकर ओनर to guide and take care of all असावा लागतो..
( हा नियम राज्य आनी तालुका निहाय आहे)
डे केअर चे परिक्षण करुन , baby proof आहे हे बघुन लायसन्स मिळते..
( काही मुद्दे राहिले असतिलच ते बाकिच्या.न्नी अॅड करा)
दुसर्या धाग्यावर पोस्ट हलवले
दुसर्या धाग्यावर पोस्ट हलवले आहे.
शर्मिला अत्यंत चांगली पोस्ट.
शर्मिला अत्यंत चांगली पोस्ट. यात भर
लादी टाईल्सची गुळगुळीत नसावी आणि लादीवर सांडलेले पाणी, मुलाची शू लगेचच पुसून टाकावी. नुकतेच चालायला शिकणारे मूल पाय घसरून प्डण्याची शक्यता असते.
मुलाला खेळायला पेन, पेन्सील्स, स्केच पेन्स कधी देऊ नये. डोळ्याला लागणे, कानात नाकात घालणे किंवा तोंडात घालणे इत्यादी अपघात होऊ शकतात.
मूल एकटे झोपले असेल तर सरळ लादीवर सतरंजी अंथरूण घालून झोपवावे. बेडवर बाजूला सपोर्ट लावूनही पडण्याचा धोका असतो. प्ले पेन असेल तर प्रश्नच नाही.
काल मॉलमध्ये एक लहान मूल १
काल मॉलमध्ये एक लहान मूल १ वर्षाचे असेल रड रड करत होते, त्याच्या वडीलांनी त्याला बाबा गाडीत चक्क आदळले. सहसा निदान पब्लिकमध्ये असा राग इथे कोणी दाखवण्यास धजत नाही.
धस्स झाले.
ज्यांची मानसिक, शारीरीक क्षमता नसते त्यांनी खरच मुले होउ देउ नयेत पण ही क्षमता , खरी कळते ती मूल झाल्यानंतरच. कॅच २२ सिच्युएशन आहे.
बायकोवरचा राग त्या रांजणाने
बायकोवरचा राग त्या रांजणाने बाळावर काढला असेल.
(No subject)
घरात कॅमेरा बसवुन घ्यावेत.
घरात कॅमेरा बसवुन घ्यावेत. सध्या मी महिन्याला किमान २ घरांमधे असे कॅमेरा बसवतो. घरी वृद्ध्/आजारी व्यक्ती असल्यास देखिल कॅमेराचा उपयोग होतो.
तुम्ही स्वतः कॅमेरा बसवता का?
तुम्ही स्वतः कॅमेरा बसवता का? तुमच्याकडे स्मार्ट कॅमेरे आहेत का?
होय
होय
Pages