मुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार

Submitted by पियू on 13 May, 2014 - 12:46

नुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला: < विषयाच्या संवेदनशीलतेमुळे व्हिडिओची लींक काढुन टाकते आहे. कुणालाही घाबरवण्याचा हेतु नव्हता. सॉरी !!! >

स्त्री काय किंवा पुरुष काय, कोणाचेही मन हेलावेल असा व्हिडिओ बघुन मनाचा थरकाप झाला. लहान मुलांवर कोणी असे अत्याचार करु शकेल असं मन मानायला तयारच नव्हतं.

त्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या. एखादी अनाथाश्रामतली घटना असेल, भारतातला व्हिडिओ नाहीये अशी काहीतरी मनाची समजुत घालुन कामावर लक्ष केंद्रीत केलं.

पण आज (थोड्या वेळापुर्वी) साम टिव्हीवर 'पुण्याची पुतना मावशी' या विशेष बातमीपत्रात पुन्हा तेच पाहिलं आणि राहावंलं नाही. पुण्यात ज्याला सांभाळण्यासाठी कामावर ठेवले त्या बाळाला (केवळ काही महिन्यांच्या/ वर्षाच्या) वाट्टेल तसे उचलुन आदळतांना/ त्या बाळाला मारझोड करतांना पाहिले. हाही प्रकार त्या घरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात शूट झाल्यामुळे त्या बाळाच्या आईला कळला.

खरंच आपण कुठे चाललो आहोत असं वाटलं. अश्या बातम्या बघुन कोणत्या आईला आपलं बाळ कोणाकडे सांभाळायला द्यायची हिंमत होईल? असे अजुनही कितीतरी अत्याचार होत असतील आणि केवळ सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने कोणाच्या लक्षातही येत नसेल.

जी गोष्ट बाळांबाबत तिच गोष्ट आजारी/ बेडरीडन ज्ये. नागरीकांसोबतही घडत असेल असं मनात येऊन गेलं.

कोणाशीतरी बोलावंसं वाटतंय म्हणुन इथे लिहिलंय. नाही आवडलं तर इग्नोर करा. Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>इथे मुद्दा मुलांच्या सुरक्षेचा आहे. आणि तिथे कोणतेही कॉम्पोमाईज होऊ शकत नाही. ती सुरक्षा सर्वसाधारण मानसिक आणि शारिरीकरित्या निरोगी कुटुंबिय जितक्या व्यवस्थित देऊ शकतात तितक्य व्यवस्थित कोणीही देऊ शकत नाही.

आणि स्वतःच जन्माला घतलेल्या मुलाच्या सुरक्षिततेपुढे स्त्री सक्षमीकरण, स्त्रीचा स्वाभिमान, स्त्रीसमोरचे दुष्टचक्र किंवा पुरुषाचा अहंकार पुरुषाच समाजातलं स्थान इत्यादी मुद्दे जास्त महत्त्वाचे खरच आहेत का ह्याचा प्रत्येकाने विचार करावा.>>
वेल,
पटले नाही.
मुद्दा स्रीसक्षमीकरण अणि तत्सम गोष्टींचा नाहीये, व्यवस्थेचा आहे. मुलांची सुरक्षा ही महत्वाची मग ती घरच्यांनी द्यावी किंवा पगारी व्यक्तीने. त्यासाठी नियम आणि कायद्यांचा पाठपुरावा हवा. घरचे जेवण चांगले हे गृहितक मान्य केले तरी प्रसंगी बाहेर जेवताना चांगल्या अन्नाची आपण अपेक्षा ठेवतोच ना? त्यासाठी कायदे, परवाने वगैरे लागतात ना? तसेच हेही. कुठलीही व्यवस्था वाईट असेल तर ती बदलण्यासाठी प्रयत्न हवेत. ते न करता वरवरचे उपाय करणे हे एकंदरीत समाजासाठीच घातक आहे. स्त्री साठी बाहेरचे जग सुरक्षित नाही म्हणून सातच्या आत घरात हे योग्य की टॅक्स पेयर म्हणून सर्व नागरीकांसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य असलेले शहर असावे म्हणून प्रयत्न करणे हे योग्य ? मुलाच्या संगोपनाचा आनंद घ्यायचाय म्हणून पालकांनी करीयर्/नोकरीत बदल करणे वगैरे वेगळे आणि सुरक्षित पर्याय नाही म्हणून भीतीपोटी / अगतिकतेतून असा निर्णय घेणे भाग पडणे या वेगळ्या गोष्टी आहेत.

जगामध्ये अतर्क्य आणि अप्रिय घटना प्रत्येक सेकंदाला कुठे ना कुठे (अगदी भारतात तुमच्या आमच्या पेठेत सुद्धा) घडत असतातच. अश्या दुर्मिळ घटनांचा दाखला देऊन सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार वाट्ला ह्या धाग्याचा ऊगम. चायना की फिलिपिन्स मध्ये मानसिक संतुलन ढळलेल्या बाईने केलेल्या अमानवीय कृत्याच्या विडीओवरुन बायकांची नोकरी ह्या घटनांना कारणीभूत ते त्यांची नोकरी म्हणजे चंगळवाद वगैरे असले टिपिकल सकाळी साताला घरातून कुकरची शिट्टी आणि डब्यातला भातावर तूप घालायला विसरली म्हणून फोनवरून विचारणा करणारी मानसिकता, जगाविषयी घोर अज्ञान आणि टोकाचा भिडस्तपणा छाप पोष्टींचा पूर. हाऊ जजमेंटल!!

'मुलांना त्रयस्थांच्या हाती सोपवतांना घ्यावयाची काळजी' ह्या शीर्षकाखाली हवी तेवढी कन्स्ट्रक्टिव चर्चा करता आली असती. (कदाचित झाली ही असावी आधीच). ईमोशनल फॅक्टर चर्चेत आला की चांगल्या,नाजूक आणि जिव्हाळ्याच्या विषयावरची चर्चा ही हमरीतुमरी येतेच ह्याचा आणखी एक पुरावा, आणि तशी ती यावी म्हणून प्रयत्न करणारे नेहमीचे यशस्वी आहेतच. राजसी, स्वाती आणि ईतर काही तुरळक पोष्टीच काही प्रमाणात ऊपयोगाच्या वाटल्या, बाकी सगळ्या 'नेवर टू बाऊ' पवित्र्यातून आलेल्या.

मागे ते नॉर्वे की स्वीडनमध्ये मुलांना हाताने भरवल्याबद्दल झालेल्या केसबद्दलची डझनावारी पानं भरवून झालेली चर्चा आठवली. चर्चासत्रात अडकलेल्या म्हातारीला मोक्ष मिळायचा नाहीच मुळी कधी.

चर्चासत्रात अडकलेल्या म्हातारीला मोक्ष मिळायचा नाहीच मुळी कधी.>>>>> Lol तिला मोक्ष मिळाला तर म्हातार्‍या मायबोलीवर पुढे मोक्ष मागायची वेळ येइल.

<<मुलांची सुरक्षा ही महत्वाची मग ती घरच्यांनी द्यावी किंवा पगारी व्यक्तीने. त्यासाठी नियम आणि कायद्यांचा पाठपुरावा हवा. घरचे जेवण चांगले हे गृहितक मान्य केले तरी प्रसंगी बाहेर जेवताना चांगल्या अन्नाची आपण अपेक्षा ठेवतोच ना? त्यासाठी कायदे, परवाने वगैरे लागतात ना? तसेच हेही. कुठलीही व्यवस्था वाईट असेल तर ती बदलण्यासाठी प्रयत्न हवेत. ते न करता वरवरचे उपाय करणे हे एकंदरीत समाजासाठीच घातक आहे. स्त्री साठी बाहेरचे जग सुरक्षित नाही म्हणून सातच्या आत घरात हे योग्य की टॅक्स पेयर म्हणून सर्व नागरीकांसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य असलेले शहर असावे म्हणून प्रयत्न करणे हे योग्य ? मुलाच्या संगोपनाचा आनंद घ्यायचाय म्हणून पालकांनी करीयर्/नोकरीत बदल करणे वगैरे वेगळे आणि सुरक्षित पर्याय नाही म्हणून भीतीपोटी / अगतिकतेतून असा निर्णय घेणे भाग पडणे या वेगळ्या गोष्टी आहेत.>>

हे पूर्णपणे मान्य. अमान्य असू शकतच नाही.

स्वाती२ --- तुमच्या सगळ्या पोस्टींना प्रचंड अनुमोदन. काश मला असा संयमित विचार करता येणं आणि तो उत्तम शब्दात मांडता येणं आयुष्यात कधी जमेल!! Happy

नीधप - तुलाही अनुमोदन. हा भरकटलेला धागा आपण सर्वजण मिळून योग्य दिशेला नेऊ शकतो. उत्तम सपोर्ट सिस्टिम तयार करण्यासाठी - भारतात आणि इतरत्रही - या वरच्या टीप्स उपयोगी पडतील.

जगामध्ये अतर्क्य आणि अप्रिय घटना प्रत्येक सेकंदाला कुठे ना कुठे (अगदी भारतात तुमच्या आमच्या पेठेत सुद्धा) घडत असतातच. अश्या दुर्मिळ घटनांचा दाखला देऊन सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार वाट्ला ह्या धाग्याचा ऊगम.

>> दुर्मिळ घटनांचा दाखला देऊन सुतावरुन स्वर्ग गाठायचा असता तर व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या इथे टाकला असता. एका आठवड्यात असे २-३ व्हिडिओ सलग पाहाण्यात आले आणि न राहावुन "कोतबो" मध्ये हा बाफ उघडला.

चायना की फिलिपिन्स मध्ये मानसिक संतुलन ढळलेल्या बाईने केलेल्या अमानवीय कृत्याच्या विडीओवरुन बायकांची नोकरी ह्या घटनांना कारणीभूत ते त्यांची नोकरी म्हणजे चंगळवाद वगैरे असले टिपिकल सकाळी साताला घरातून कुकरची शिट्टी आणि डब्यातला भातावर तूप घालायला विसरली म्हणून फोनवरून विचारणा करणारी मानसिकता, जगाविषयी घोर अज्ञान आणि टोकाचा भिडस्तपणा छाप पोष्टींचा पूर. हाऊ जजमेंटल!!

>> हे मुळ बाफवर/ लिखाणात कुठे दिसले? बायकांची नोकरी हा विषय कोणी काढला?

'मुलांना त्रयस्थांच्या हाती सोपवतांना घ्यावयाची काळजी' ह्या शीर्षकाखाली हवी तेवढी कन्स्ट्रक्टिव चर्चा करता आली असती.

>> तुम्ही उघडा तसा बाफ. मला त्या क्षणी जे वाटले ते मी केले. इतकं नक्की सांगु शकते कि मुद्दाम इथे वादावादी व्हावी म्हणुन नक्की हा बाफ उघडला नाही. पोस्टींमधुन जर काही वादावादी झाली असेल तर त्यावर माझा कंट्रोल नाही.

हा भरकटलेला धागा आपण सर्वजण मिळून योग्य दिशेला नेऊ शकतो. <<
मी फक्त सुचवलंय. धागा त्या दिशेने पुढे नेण्यासाठी अनुभव नाही गं माझ्याकडे.

बातमी वाचल्यापासून डोक्यात हेच विचार आहेत.
हे सर्व कसं सुधारता येईल?
१. कंपन्यांनी व्यवस्थित माणसे व जागा ठेवून कामाच्या जागी पाळणाघरे चालवणे.
यशस्वी उदा. टाटा मोटर्स, नीलसॉफ्ट, लॉरियल (मला इतकीच माहिती.)
आमच्या कंपनीने चालवायला घेतले होते पण वर्षभर फक्तएकाच लहान मुलगी सांभाळायला आली आणि एका बाळासाठी सर्व व्याप चालवणे परवडेनासे झाले त्यामुळे वर्षात बंद.
२. पाळणाघर आणि जवळ किंवा खाली चांगली शाळा हा चांगला पर्याय. यशस्वी उदा. पंपकीऩ पॅच-ब्लु रिज आणि इंदिरा शाळा-इंदिरा डे केअर. 'पाळणाघर चांगले पण मूल चांगल्या शाळेत घालायचे ती खूप लांब' म्हणून पाळणाघरावर काट मारुन घरी बाई ठेवली जाते.
३. लर्निंग कर्व्ह पाळणाघर आणि डे केअर मधे दिवसभराचे सीसीटिव्ही चित्रण लाइव्ह उपलब्ध असततेआणि पालकांना पाहता येते.
४. चांगली (अनुभव आणि चांगले मनुष्यबळ सहज मिळेल अशा भागातली) पाळणाघरे महाग पडली तरी निवडणे. ऐकलेले उदा. आजोळ.
५. मुल ७-८ वर्षाचे झाल्यावर नीट विश्वासात घेऊन घरी एकटे (थोडाच वेळ) ठेवणे. (बाप ७-४ आणि आई २-८ असे काही तरी करुन काम सांभाळणे.)
६. नोकरी सोडून ५-६ वर्षे घरी राहणे ऐकायला छान वाटले तरी झेपेबल वाटत नाही. बाकी क्षेत्राचे माहित नाही पण आयटी मधे ५ वर्षे नोकरीपासून ताटातूट झालेला माणूस गेलाबाजार होतो.
७. आईबाबा किंवा सासूसासरे तुमच्या शहरी असल्यास, प्रकृतीने चांगले आणि मुले बघण्यास इच्छुक असल्यास तो उत्तम पर्याय. पण त्याना फुकट राबत असल्याची भावना येउ नये म्हणून खूप जपावे लागते.
८.जो पर्याय निवडू त्याबद्दल चलबिचल होऊ न देता तोयशर्स्वी करण्याची काळजी घेणे.

चांगले कायदे, चांगल्या कंपनी पॉलीसीज आणि चांगल्या सोयी आज ना उद्या येतीलच असे स्वतःला समजावते आहे.

>> मुलाच्या संगोपनाचा आनंद घ्यायचाय म्हणून पालकांनी करीयर्/नोकरीत बदल करणे वगैरे वेगळे आणि सुरक्षित पर्याय नाही म्हणून भीतीपोटी / अगतिकतेतून असा निर्णय घेणे भाग पडणे या वेगळ्या गोष्टी आहेत
यू सेड इट!!

इथे अमेरिकेत बॅग्राउंड चेक केलेल्या आया बाबे मिळतात. आई वडिल दोघेही नोकरी करतात. ज्याला जास्त पगार मिळतो त्याच्यावर घरासाठी जास्तीत जास्त पैसे कमावण्याची जबाबदारी असते. दुसरा/दुसरी थोडा ईजी जॉब / प्रोजेक्ट अंगावर घेतात. तरीही आया/बाबे ठेवतात. १००-१०० पानी डीटेल्ड मुलांची माहिती, त्याना काय हवे-नको, काय-काय व्हायला पाहिजे(च), काय होता कामा नये, काय कधी झाले तर काय करायचे सर्व सर्व लिहून आया-बाबा ना देतात. २ आठवडे त्याना तयारी करायला देतात. २ दिवस आई किंवा बाबा सुटी काढतात आणि आया-बाबा बरोबर मुलाना सर्व ठिकाणी घेऊन जातात. नीट माहिती देतात. त्यापुढे मुलाना नीट समजावले जाते. काय करायचे, काय करायचे नाही. काहीही अठराविक झाले तर आई-वडलाना कसे सांगायचे हे सर्व समजावले जाते. मग मुल आया-बाबे यांच्या स्वाधीन केले जाते.

सर्वसाधारण पणे भारतीय भारतीयांकडेच सांभाळायला देतात आणि वरचे लिहिलेले फारच कमी फॉलो करतात. पोलिश, आयरीश पण त्यांच्या समाजातच पण वरचे फॉलो करतात.

हे सर्व करूनही अशा घटना घडतातच.

मत मांडलेले नाही. ऑब्जरवेशन मांडले आहे.

सुलु, खूप चांगली माहिती. त्या दुसर्‍या लिंकवर लिहाल का तिथे सगळे चांगले मुद्दे एकत्र वाचायला मिळतील.

सर्वसाधारणपणे भारतात स्वस्तात स्वस्त मिळणारी बाई शोधली जाते. तुम्ही लिहिलेले मुद्दे हार्डली कोणी पाळत असेल.

मी वर लिहिल्या प्रमाणे आपल्याकडे ज्या बाईला कामावर ठेवणार तिचे अ‍ॅड्रेस प्रूफ, आयडी प्रूफ, back ground check, मेडिकल चेकप कोणी करत नाही. बर्‍याचदा त्यआ बायकांना जुजबी लिहिता वाचता सुद्धा येत नसते.

आजकाल काही घरात कामाला, मुलांना सांभाळायला बायका ब्युरो मधून बोलवल्या जातात पण त्यांचे चार्जेस आठ तासाला आठ हजार (महिन्याभरासाठी) वगैरे असतात. त्यांचा जरा अनुभव बरा येतो. पण तिथे सुद्धा ब्युरोतून दोन किंवा तीन बायकाच बदलून मिळतात, त्या जर तुम्हाला पटल्या नाहीत तर पुन्हा तुमच्याकडे त्या ब्युरोतून बाई पाठवत नाहीत आणि रजिस्ट्रेशनचे पैसे ३००० - ४०००फुकट जातात

mi_anu - वर दिलेल्या http://www.maayboli.com/node/46301 बाफवर लिहाल का सगळे मुद्दे एके ठिकाणी मिलतील वाचायला.
स्वाती२ - तू म्हणतेस ती चर्चा आपण http://www.maayboli.com/node/46301 ह्य बाफवर करूया का? कन्स्ट्रक्टिव्ह चर्चा एके ठिकाणी एकत्र मिलेल.

मुलांना सांभाळायला बायका ब्युरो मधून बोलवल्या जातात पण त्यांचे चार्जेस आठ तासाला आठ हजार वगैरे असतात. >>>> काय? १०००रु /तास ?? बाप रे!! भयंकरच महाग दिसतंय हे प्रकरण!!

महिन्याचा पगार ८ हजार ओके आहे कि , कनसिडरिंग रिस्पॉन्सिबिलिटी , स्किल्स धिस जॉब नीड्स !
लहान मुलांच्या सुरक्षित -योग्य देखरेखीची खात्री असेल तर टोटली वर्थ इट !

माझे पंधरा पॉइण्टस ज्यांना मूर्खासारखे वाटत आहे त्यांनी जरा भारतात घटस्फोटाच्या केसेस घेणार्‍या वकिलांना आणि घटस्फोटित स्त्रियांना आणि हो सासूची नवर्‍याची इच्छा म्हणून स्वतःची इच्छा नसताना दुसर्‍या बाळाचा प्लान करणार्‍या आणि सासू नोकरी करायची नाही सांगते म्हणून घरात बसणार्‍या आणि खंत करत स्वतःचं आरोग्य बिघडवणार्‍या मुलींना भेटावं.

मग महत्त्व कळेल ह्या आणि इथे न मांडलेल्या पण लग्नाशी संबंधित अशा अनेक पॉइंट्सचं.

प्रेमाच्या गप्पा लग्न ठरल्यानंतरही करता येतात. लग्न ठरताना अख्ख्या आयुष्याचा विचार महत्त्वाचा असतो.

प्रेमासाठी लग्न एकदा आणि मग प्रेम ओसरलं की आणि व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू लग्नाआधी समोर न आल्याने घटस्फोट आणि मग अख्ख्या आयुष्याचा साथीदार मिळवण्यासाठी दुसर्‍यांदा लग्न हा मानसिकरित्या त्रासदायक विषय आहे.

वेल, अहो तुम्ही त्या पॉईंट्स मधे म्हण्ताय घर ऑफीस पाळणाघर यातलं अंतर वगैरे, पण त्यावेळचं ऑफीस सेमच असेल असं नाही ना, नवीन पाळणाघरेही निघत राहतात.

तो मधला बेफिकिरांचा पूर्ण एपिसोड सोडून दिला तरी, तुम्ही पहिल्या प्रतिसादात जे वाक्य टाकलेत तसा तुमचा इरादा नव्हता असे तुमच्या नंतरच्या पोस्ट्स वरुन वाटत आहे. किंवा तुम्ही नंतर शाम्तपणे विचार केल्यावर 'दोघे' पिक्चर मधे आले, असे झाले असेल तरी चांगलेच झाले.
स्वाती२, स्वाती_आंबोळे, वैद्यबुवा यांच्या पोस्ट्स आवडल्या.

>>सासूची नवर्‍याची इच्छा म्हणून स्वतःची इच्छा नसताना दुसर्‍या बाळाचा प्लान करणार्‍या आणि सासू नोकरी करायची नाही सांगते म्हणून घरात बसणार्‍या आणि खंत करत स्वतःचं आरोग्य बिघडवणार्‍या मुलींना भेटावं.

वेल, तुमच्या पोस्ट्स खूप वेल-इन्टेन्डेड आहेत पण कुठे कुठे भरकटताय! जे सासू आणि नवरा असे निर्णय लादणार्‍यांतले असतात ते तुम्ही म्हणता म्हणून चर्चा करतील का आणि केली तर ती फॉलो करतील का? मवा म्हणते तसं परिस्थिती बदलत नाही का? आपण बदलत नाही का? असो.

तुमचा दुसरा धागा बघते.

वेल, तुमच्या पोस्ट्स खूप वेल-इन्टेन्डेड आहेत पण कुठे कुठे भरकटताय!>> अनुमोदन.
नीधप आणि स्वाती२ यांचे प्रतिसाद पटले.

मला पण तसच वाटतय. वेल तुझा हेतू, विचार खूप छान आहेत. किंबहून इतर कुठल्या नाही पण तुझ्या सगळ्या पोस्ट्स वाचल्या. पण कुठतरी बाई, मुल. संगोपन, नोकरी या सगळ्यांमधे गल्लत होती आहे का तुझ्या मुद्द्यांची?
घटस्फोट वगैरे मुद्दे तर इथे काहीच संबध नाही . आपण आता ऑर्डीनरी कुटुंबात नोकरी करणार्‍या पालकांनी मुलांची सुर्क्षितता कशी बघावी हे बोलतोय ना. घटस्फोट वगैरे उपप्रॉब्लेम साठी वेगळा विचार करावा लागेल.
तुझा हेतू चांगला असूनही कारण नसताना त्यामूळ गैरसमज होतोय. किंबहूना आता त्याच धाग्यावर लिहुया.

पियु, धन्यवाद लिंक डिलीट केल्या बद्दल. Happy पण तुम्ही दोन तीन लिंक तशा बघितल्या म्हनताय तर आता नेक्स्ट टाईम अस काही आल तर नका क्लिक करु. हे थोडस अ‍ॅक्सिडेंट सारख आहे. १००० लोक गाडी चालवितात. एकाचा अ‍ॅक्सिडेंट होतो. त्याची बातमी होते. त्यातून आपण गाडी व्यवस्थित कशी चालवता येईल ते घ्यायच. गाडी चालविणे थोडीच थांबवून चालेल. आणि अ‍ॅकसिडेंट चा व्हिडिओ पाहूनही भितीशिवाय काही मिळणार नाही.

वेल, तुम्ही मागच्या पानावर दिलेल्या १५ पॉईंट्स मधले पहिले ५ किंवा ६ लग्नाआधी बोलण्यायोग्य, प्रॅक्टिकल वाटतायत आणि बरीच कपल्स बोलत असतील ही पण त्यापुढचे जरा फारफेच्ड वाटले. लग्नापूर्वी एकमेकांना प्रश्नपत्रिका देऊन उत्तरं भरून घेतली तरी त्याप्रमाणेच तुमचं वैवाहिक आयुष्य चालेल का? जर दोघांपैकी एक तिथे लिहिल्याप्रमाणे वागला नाही तर काय करणार? परिस्थिती, प्रायोरिटी आणि कित्येक गोष्टी बदलू शकतात. तेव्हा अती प्रॅक्टिकल होऊन सगळी मजा घालवू नका असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

वेल,
तुमच्या पोस्टी पटल्या नाहीत. फार गल्लत आणि सरमिसळ होते आहे मुद्यांची.
तुमची १५ कलमं ग्रेट आहेत, पण आयुष्याची प्रश्नपत्रिका अशी सोडवून ठेवता येते? ते इतके बोरिंग वाटले, की एका परिने हे प्रश्न माहित नव्ह्ते (तेव्हा) याचे बरे वाटले.

वैद्यबुवा +१, स्वाती२ +१

.

अन्यथा वेल ह्यांचा मूळ मुद्दा सहज वाचून पुढे जाणे कित्येकांना शक्य झाले असते........सहमत! वेलचा मुद्दा (अश्या का वागतात ह्या बायका') अगदी सहज/ स्पाँटनियस आहे.

रैना +१
पहिला सहज आणि स्पॉन्टेनियस मुद्दा मांडल्यामुळेच की काय नीट विचार करून करायच्या गोष्टींचे पंधरा कलमी स्पष्टीकरण द्यावं लागलं का?
तो मुद्दा आपण का नाही मांडला असं बेफिकीरना वाटतंय का? Light 1 (दोघांनाही)

Pages