मुले सांभाळणार्‍या आयाकडून बाळावर अत्याचार

Submitted by पियू on 13 May, 2014 - 12:46

नुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ पाहिला: < विषयाच्या संवेदनशीलतेमुळे व्हिडिओची लींक काढुन टाकते आहे. कुणालाही घाबरवण्याचा हेतु नव्हता. सॉरी !!! >

स्त्री काय किंवा पुरुष काय, कोणाचेही मन हेलावेल असा व्हिडिओ बघुन मनाचा थरकाप झाला. लहान मुलांवर कोणी असे अत्याचार करु शकेल असं मन मानायला तयारच नव्हतं.

त्या व्हिडिओच्या कमेंट्स पाहिल्या. एखादी अनाथाश्रामतली घटना असेल, भारतातला व्हिडिओ नाहीये अशी काहीतरी मनाची समजुत घालुन कामावर लक्ष केंद्रीत केलं.

पण आज (थोड्या वेळापुर्वी) साम टिव्हीवर 'पुण्याची पुतना मावशी' या विशेष बातमीपत्रात पुन्हा तेच पाहिलं आणि राहावंलं नाही. पुण्यात ज्याला सांभाळण्यासाठी कामावर ठेवले त्या बाळाला (केवळ काही महिन्यांच्या/ वर्षाच्या) वाट्टेल तसे उचलुन आदळतांना/ त्या बाळाला मारझोड करतांना पाहिले. हाही प्रकार त्या घरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात शूट झाल्यामुळे त्या बाळाच्या आईला कळला.

खरंच आपण कुठे चाललो आहोत असं वाटलं. अश्या बातम्या बघुन कोणत्या आईला आपलं बाळ कोणाकडे सांभाळायला द्यायची हिंमत होईल? असे अजुनही कितीतरी अत्याचार होत असतील आणि केवळ सीसीटिव्ही कॅमेरा नसल्याने कोणाच्या लक्षातही येत नसेल.

जी गोष्ट बाळांबाबत तिच गोष्ट आजारी/ बेडरीडन ज्ये. नागरीकांसोबतही घडत असेल असं मनात येऊन गेलं.

कोणाशीतरी बोलावंसं वाटतंय म्हणुन इथे लिहिलंय. नाही आवडलं तर इग्नोर करा. Sad

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हीडीओ बघितला नाही. पण तो खरा आहे का? त्या बाईला शिक्षा झाली किन्वा बाकी काही डीटेल्स आहेत का?

रच्याकने, मुलांची सुरक्षितता हा खूपच व्यापक विषय आहे. त्यासाठी एकुलती एक आई (२४ तास घरी असली तरी) , बाबा इतकेच काय तर कुटूम्बातले ४-५ लोकही पुरे पडू शकत नाहीत. संपूर्ण समाजच याविषयी संवेदनशील झाला तरच मुले अधिक सुरक्षित होऊ शकतील.

अमेरिकेतल्या इतक्या वर्षांच्या वास्तव्यानंतर लहान मुलांच्या सुरक्षिततेविषयी भारतीय समाजच पुर्णपणे उदासीन आहे असे माझे मत झाले आहे. अमेरिकेत मुलाची सुरक्षितता ही फक्त त्याच्या आई वडीलांची जबाबदारी नसून त्या मुलाच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक मोठ्या व्यक्तीची आहे , हे आपल्याला पदोपदी जाणवत रहाते. मुलांच्या सुरक्षिततेसाठी नियम, कायदे आहेत. पाळणाघरासाठी लायसन्स असणे जरूरी आहे. स्कूल बसचे वेगळे नियम आहेत. लहान मुलाला गाडीतून न्यायल असल्यास कार सीट असणे कम्पलसरी आहे. प्रत्येक मूल हे महत्वाचे आहे असे समजून त्याच्यासाठी कष्ट घेणारी माणसे तुम्हाला जागोजागी भेटतात.

भारतात पाळणाघरे, शाळा, मुले संभाळणार्‍या आया यांना काही नियम , कायदे , कमीत कमी पात्रता निकष दिसत नाहीत. या सेवा देणार्‍या लोकांचे / संस्थांचे मुल्यामापन होताना दिसत नाही. पाळणाघरासाठी लायसन्स , आया बनण्यासाठी लायसन्स असेही काही नाहीये. सरकार याबबत कोणतेही कायदे करताना दिसत नाही.

नुकतेच द.कोरीया मधे घडलेल्या शालेय मुलांच्या अपघातानंतर त्यांच्या राष्ट्राध्यक्षाने पदत्याग केला. आपल्याकडे असे काही घडू शकते का? शाळेत लहान मुलांवर अत्याचार झाले तरी मुख्याध्यापिका सुद्धा जबाबदारी स्वीकारत नाही. शिक्षकांना शिक्षा होत नाही. शालेय मुलांच्या वाहतुकीचा प्रश्न गंभीर होता आणि अजुनच गंभीर होत चाललेला आहे. गर्दीच्या रस्त्यावर आई, वडीलांच्या मागे दुचाकीवर बसून जाणारी मुले , बाळे पाहून देखिल भीती वाटते. कार असली तरी त्यात मुलांसाठी कारसीट अभावानेच दिसते. कायदा, सरकार हे देखिल मुलांच्या सुरक्षिततेबाबत विचार करताना देखिल दिसत नाहीत. मुलांच्या वाहतुकीबाबत कोणतेही नियम मला तरी अजुन दिसलेले नाहीत.

एकंदरीत भारतीय समाजच मुलांच्या सुरक्षिततेबाबत आग्रही , संवेदनशील नाही. एखादी मोठी दुर्घटना घडली की फक्त सोयीस्करपणे त्याचे खापर आईवर वा कुटुम्बावर फोडून सगळे मोकळे. समस्येच्या मुळापर्यंत जायची आमची तयारीच नाही.

मला वाटतं शाळा हा एक चांगला पर्याय होऊ शकेल मूलांना अतिरिक्त वेळ घालवण्यासाठी.
त्यात त्यांचा पाळणाघर ते शाळा आणि शाळा ते पाळणाघर या प्रवासाचा त्रासही वाचेल आणि वेळही.
शाळेतील सोयी ( वाचनालये, क्रिडांगण ) वापरता येतीलच. शिवाय सोबतीही असतील. काहि शिकलेच पाहिजे असे नाही. जमल्यास मुले गृहपाठही करू शकतील ( शिक्षक उपलब्ध असतीलच ) म्हणजे घरी आल्यावर मूल मोकळा वेळ पालकांबरोबर घालवू शकते. मी बघितलेल्या शाळेत वेळेच्या आधीदेखील मुले जाऊ शकत असत. उलट शाळेत जाण्यासाठी मूले उत्सुकच असत.

असे किस्से जगात कुठेही घडू शकता.
अगदी अमेरीकेत सुद्धा असे किस्से वाचलेत झालेले अलीकडे. पण फरक हाच की तिथे कायदा तुरंत पाळला जावून लायसन्स काढून शिक्षा होते. भारतात काय, आव जाव , कोणीही पाळणाघर चालवत्ते.

कोणीही मुले सोडायची चर, रीक्षा घेवून सोडतो.

डेलियाच्या प्रत्येक शब्दाला अनुमोदन.

जबाबदारी प्रत्येक व्यकीची आहे. प्रत्येक व्यक्तीची. पण आपण भारतीय फक्त सिस्टीमच्या बाहेर राहून सर्वांना दोष देतो. स्वतःवर जबाबदारी घेत नाही. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी जाणवत राहातं. साधी गोष्ट रस्त्यात लहान मूल कोणी खूप रडत असेल तर आपण थांबून विचारतो का? कोणी मुलाला रागावत असेल मारत असेल तर आपण त्यांना थांबवतो का? हे एवढं जरी केलं तरी सिस्टीम मध्ये जाण्याची प्रक्रिया आणि सिस्टीम सुधारण्याची प्रक्रिया सुरु होईल.

त्यासाठी एकुलती एक आई (२४ तास घरी असली तरी) , बाबा इतकेच काय तर कुटूम्बातले ४-५ लोकही पुरे पडू शकत नाहीत. संपूर्ण समाजच याविषयी संवेदनशील झाला तरच मुले अधिक सुरक्षित होऊ शकतील.>> अनुमोदन.

अमेरिकेतल्या इतक्या वर्षांच्या वास्तव्यानंतर लहान मुलांच्या सुरक्षिततेविषयी भारतीय समाजच पुर्णपणे उदासीन आहे असे माझे मत झाले आहे. >>> तरिही अमेरिकेत Law & Order: Special Victims Unit सारख्या मालिकांचे पंधरा सिझन होतात आणि त्यांना तेवढ्या कथा मिळतात?

आपली लोकसंख्या भयंकर असल्याने, आपल्याकडे माणसं सोडून इतर सर्व गोष्टींचे दुर्भिक्ष आहे. Survival of the fittest ह्या न्यायाने प्रत्येकाने आपापली काळजी घेणे ह्याला पर्याय नाही.

अजुन एक पर्याय सुचवावासा वाटतो. २-३ फैमिलीज़ मिळून एक प्रशिक्षित nanny ठेवू शकतील. समजा तीन मुलांसाठी एक nanny असेल तर मुलांना एकमेकांची सोबत होइल आणि nany चा पगार तीन मुलांमध्ये विभागला जाईल.शिवाय तीन मुलांचे आई वडील, आजी आजोबा असे बरेच लोक लक्ष ठेवायला असतील.
ही तीन मुले एकाच बिल्डिंग / सोसाइटी मधली असावीत. एक एक दिवस एका एका घरी रहायचे. मुलांनाही सोपे आणि आई वडीलानाही पालनाघरात नेण्या आणण्याचा वेळ वाचेल.

वत्सला ह्यांनी सुचवलेला पर्याय फार आवडला.

(अवांतर - मुलांच्या प्रती प्रेमळ व माणूसकीयुक्त वर्तन हे मात्र दुर्दैवाने आयाच्या चार्जेसशी संबंधीत नाही आहे हे वाईट आहे).

nanny एका पगारात तीन मुलं सांभाळणार नाही. कोणाची कमी-जास्त काळजी हे मुद्दे असतीलच.

>>मुलांच्या प्रती प्रेमळ व माणूसकीयुक्त वर्तन हे मात्र दुर्दैवाने आयाच्या चार्जेसशी संबंधीत नाही आहे हे वाईट आहे<<
आणि त्याबद्दल इथे काही बोलुहि नका. ती अपेक्षाही चुकीची आहे कारण मग अश्या लिमिटेड ममतेबद्दलचे लेख आले की काहींना त्रास होतो. Wink

इथे बघा, पाळणाघरांसाठी भारतात असे काही कायदे नाहीत त्यामुळे आपणचं बघून, पारख करून पाळणाघर निवडावे (ही जाहीरात नाही).

अमेरिकेतल्या इतक्या वर्षांच्या वास्तव्यानंतर लहान मुलांच्या सुरक्षिततेविषयी भारतीय समाजच पुर्णपणे उदासीन आहे असे माझे मत झाले आहे. >>>

भारतात पाळणाघरे, शाळा, मुले संभाळणार्‍या आया यांना काही नियम , कायदे , कमीत कमी पात्रता निकष दिसत नाहीत. या सेवा देणार्‍या लोकांचे / संस्थांचे मुल्यामापन होताना दिसत नाही. पाळणाघरासाठी लायसन्स , आया बनण्यासाठी लायसन्स असेही काही नाहीये. सरकार याबबत कोणतेही कायदे करताना दिसत नाही. >>>

दोन्ही मुद्दे फारसे पटले नाहीत. भारतीय समाज लहान मुलांच्या सुरक्षिततेविषयी उदासीन आजीबातच नाही. अशी अनेक पाळणाघरे आहेत की तेथे प्रशिक्षीत आया नसतील पण संचालीका (खरे तर मावशी / आजी ) ह्या स्वतःच्या मुला - नातवंडाप्रमाणे ह्या मुलांना सांभाळतात. वेळच्यावेळी शी-शू, बाकी स्वछता इत्यादी पहातात. जेवताना गरम अन्न वाढतात. ह्या सर्वाला नियम, कायदे, प्रशिक्षण ह्याची गरज नसते.

मला तर हेही सुचवायचे होते की शिकवण्या किंवा इतर काही बिझनेस पेक्षा तुमच्याकडे एखादी किंवा दोन खोल्या जर जास्त असतील तर पाळणाघर सुरू करावे आणि आपल्याला पाळणाघरात ज्या सोयी सुविधांची अपेक्षा आहे त्या आपणच इतरांना द्याव्यात.>>> Uhoh हा असा सल्ला तू सरसकट कसा देऊ शकतेस ? मुलांना पूर्णवेळ सांभाळण्याचा पेशन्स, आवड नसेल तरी केवळ अर्थार्जनासाठी किंवा मला चांगल्या सुविधांची अपेक्षा आहे म्हणून मीच त्या पुरवाव्या हे कुठलं लॉजिक ? उलट केवळ करायचंय म्हणून काहीतरी केलं तर मुलांसाठी अजून गंभीर ठरेल ते.
अजिबातच पटलं नाही.

तुझ्या बाकीच्या पोस्ट्सही पटल्या नाहीत. मुद्द्यांची सरमिसळ होतेय. स्वाती२ ह्यांनी पान ४ वर दिलेले उदाहरण फार चपखल आहे पण तुझे त्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. इन फॅक्ट बर्‍याच जणांचे दुर्लक्ष झालेले दिसतेय त्या पोस्टकडे.
रस्त्यात थांबून मदत करणे, एकंदर समाज असंवेदनशील असणे आणि एखादी गोष्ट व्यवसाय म्हणून स्वखुशीने* कमिटमेंट घेणे ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पाळणाघर चालवणे किंवा मुलाला सांभाळायचं काम स्वीकारणे ही ठराविक वेळासाठी दिलेली एक सेवा आहे. त्याबद्दल मोबदला घेतला जातो त्यामुळे त्या वेळात मुलाचे पालक करियर करत आहेत की मॉलमध्ये भटकायला गेले आहेत की घरी झोपा काढत आहेत ह्यावर बोलण्याची खरं तर आवश्यकताच नाही. चर्चा व्हायला हवी ती सेवा जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने कशी मिळू शकेल ह्याबद्दल !

( * स्वखुशीने अशासाठी की एखाद्या सज्ञान व्यक्तीने जर म्हटलं तर मला मुळात हे करायचंच नव्हतं. पैशाची गरज होती किंवा नवर्‍याने सक्ती केली म्हणून मी हे काम घेतलं त्यामुळे माझ्याहातून असं कृत्य घडलं तर त्याला काहीच अर्थ नाही. काम म्हणून स्वीकारलं आहे ना ? मग माझ्या प्रॉब्लेम्सचा परिणाम माझ्या कामावर होऊ द्यायचा नाही, मुलांची सुरक्षितता धोक्यात येऊ द्यायची नाही, कामाच्या ठिकाणची स्वच्छता ही व्यावसायिकता जपता यायलाच हवी. हे मिळणे हा ग्राहकाचा हक्क ! त्यापुढे जाऊन एखाद्या पाळणाघरात घरगुती नाती तयार होतील तर एखाद्या ठिकाणी 'लिमिटेड ममता' मिळेल. तो आपल्या नशिबाचा भाग Happy त्याचं प्रमाणीकरण होऊ शकत नाही )

सुचवणं आणि सल्ला एकच अर्थ आहे का?

की आता त्यावरून हि लोकं वाद घालणार आहेत. तिथे 'पालक होताना...' वर हि एकीने सुचवले की सुशिक्षित लोकांना करियर म्हणून हा पर्याय होवु शकतो. तिथे वाद होइल का?

२००

*

> पेशन्स, आवड नसेल तरी केवळ अर्थार्जनासाठी ...<

फाऽर आवड आहे, अन पेशन्सही आहे म्हणून मी (उदा.) मंत्रालयात क्लार्कची नोकरी करू इच्छितो / करतो, किंवा पिठाची गिरणी चालवितो, वगैरे म्हणणारे किती लोक जगात आहेत?

तुमचे वाक्य नॉट पटेश.

*

ता.क.
>> त्याबद्दल मोबदला घेतला जातो त्यामुळे त्या वेळात मुलाचे पालक करियर करत आहेत की मॉलमध्ये भटकायला गेले आहेत की घरी झोपा काढत आहेत ह्यावर बोलण्याची खरं तर आवश्यकताच नाही. चर्चा व्हायला हवी ती सेवा जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने कशी मिळू शकेल ह्याबद्दल
<<

वॉव!!
अन अशी सेवा मिळवायला किती दमड्या फेकून माराव्या लागतील ह्याबद्दल चर्चा व्हायलाच हवी. हो क्की नै?

मी मोबदला देतो आहे ना? मग मी जन्माला घातलेली मुलं सांभाळायला मला उत्कृष्ट सेवा सुविधा मिळायलाच हव्यात! ही विचारप्रणाली अत्यंत भावली. त्याबद्दल माझ्याकडून अभिनंदन. Happy

वेल, तुमची 'वेळ' खराब आहे. तुमच्या प्रत्येक शब्दावर काहींना झोडपायचे आहे. तुम्ही आता ज्योतिष बघूनच लिहा नाहितर अस करा, ह्या लोकांना विचारूनच लिहा. हा मी सल्ला(advise) देतेय. सुचवत (suggestion) नाहीये. Proud

वेल, ह. घ्या.

>>>फाऽर आवड आहे, अन पेशन्सही आहे म्हणून मी (उदा.) मंत्रालयात क्लार्कची नोकरी करू इच्छितो / करतो, किंवा पिठाची गिरणी चालवितो, वगैरे म्हणणारे किती लोक जगात आहेत?<<

पैसा चांगला मिळतो (असे त्यांचेच समज, माझे नाही) म्हणून डॉक सुद्धा आयटीत आलेत.

इब्लिस, तुमचा काय विचार आहे आयटीबाबत्/पाळणाघर चालवण्याबाबत? (मी सल्ले/सुचवत नाहीये, प्रश्ण विचारतेय लक्षात घ्या)
तुम्हाला आवड आणि पेंशन्स आहे ना तुमच्या सध्याच्या विषयात मग? तसे असेल तर तुम्ही जगातले पहिले असाल इथे भेटणारे. (ह. घ्या.)

पाळणाघर चालवणे किंवा मुलाला सांभाळायचं काम स्वीकारणे ही ठराविक वेळासाठी दिलेली एक सेवा आहे. त्याबद्दल मोबदला घेतला जातो त्यामुळे त्या वेळात मुलाचे पालक करियर करत आहेत की मॉलमध्ये भटकायला गेले आहेत की घरी झोपा काढत आहेत ह्यावर बोलण्याची खरं तर आवश्यकताच नाही. चर्चा व्हायला हवी ती सेवा जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने कशी मिळू शकेल ह्याबद्दल !

>> हे एकदम पटेश.
कारण या न्यायाने आपण हॉटेलमध्ये गेल्यावर "हि आळशी बाई आहे. हिला सगळं येतं पण आयतं खायचंय" म्हणुन कोणी पैसे घेऊनही बकवास अन्न दिलं तर आपल्याला चालेल का? मी पैसे दिले म्हणजे मला चांगल्या प्रतिचं अन्न हवंय. मग मला आज आयतं का खायचं आहे याच्याशी हॉटेलवाल्याला घेणंदेणं नसावं.

मी मोबदला देतो आहे ना? मग मी जन्माला घातलेली मुलं सांभाळायला मला उत्कृष्ट सेवा सुविधा मिळायलाच हव्यात! ही विचारप्रणाली अत्यंत भावली. त्याबद्दल माझ्याकडून अभिनंदन<<< Lol

झंपी, इब्लिस आणि तुम्ही एकच बोलत आहात असे मला (तरी) वाटत आहे. Proud

इथे अनुभव असा आहे की करीअर न करता घरी रहाणारी सून अन आता वय झाल्याने घरीच असलेली सासू यान्च्यातही "बेबी सिटिन्ग"च्या सास्वासुनेच्या पद्धतीवरुन बेबनाव होताना दिसतो!
सून " अत्याधुनिक" विचारान्ची, तर सासू बहुधा "जुन्या" वळणाची....
सून प्रत्येक गोष्ट बाळाच्या हगल्यापादल्या एक्स्पर्ट डॉक्टरक डे जाऊन त्याचे ओपिनिअन घेऊन त्याप्रमाणे वागणारी.....
तर सासू आजवर स्वतःच्या व दुसर्‍या च्या वाढविलेल्या पोराबाळान्चा अनुभव घेतलेली.... बहुधा आजीचा बटवा माहित असलेली......
सूनेवरती बर्‍याचदा अमेरिकन विचारान्चा पगडा, त्यातुन पोराला विन्ग्रजी यायलाच पाहिजे नैतर त्याचे पुढील जगात कसे होणार या काळजीने बाळ पोटात अस्तानापासून ते येता जाता सर्व वेळ फाडफाड विन्ग्रजीत पोराशी बोलणार, ....
तर सासू मागल्या पिढीतील, आपली बाळा बाळा करत बसणार तेव्हा सून नाके मुरडणार!
सासू बाळाला पायावर उलथेपालथे घालुन आन्घोळ घालणार तर सून त्यास टबात बसवायचा हट्ट करणार
सासू बाळाची ताळू भरणार, नाकाकानात तेलाचे थेम्ब सोडणार, मधाचे बोट चाटविणार तर सून त्यासग्ळ्या तेलामधाच्या बाटल्या डस्टबीन मधे टाकणार अन जॉन्सन अयाण्ड जॉन्सनचे सेफ प्रॉडक्ट्स वापरणार!
अशा कैक म्हणजे पावलापावलावर कैक बाबी घडणार......
मग कसले ते व्हीडीओ बघुन एकट्या त्या बिच्चार्‍या वन्चित वगैरे असलेल्या "कामवाल्या" बायान्नाच नावे का ठेवायची असे म्हणतो मी! Proud

अन बर्का इब्लिसा अन बेफिकीरा, बायकान्च्या या प्रश्नात पुरुषान्नी नाक खुपसावेच कशाला असेही म्हण्तो ना मी! Wink
कामवाल्या त्या बायाच, सासवा त्याही बायाच, अन सुना त्यादेखिल बायाच, फार फार तर अत्याधुनिक सुशिक्षीत ललना हव तर त्या कसल्याश्या कन्या म्हणूयात. मग त्यान्च्या वादात आपण का पडाव? नै का?

मग मला आज आयतं का खायचं आहे याच्याशी हॉटेलवाल्याला घेणंदेणं नसावं.<<<

'मला आज आयतं का खायचं आहे' ह्याच्याशी आयतं खाणार्‍याला घेणंदेणं असावं असा वेल ह्यांच मूळ मुद्दा आहे.

वेल ह्यांनी 'आपणच पाळणाघराच्या सुविधा पुरवाव्यात' हे 'मी तर असेसुद्धा सुचवणार होते' असे लिहून मग पुढे लिहिलेले आहे. त्यांचा तो 'फक्त, निव्वळ, एकच' वगैरे मुद्दा नाही की 'अश्या बायकांनी स्वतःच पाळणाघर काढावे' येथे सिलेक्टिव्ह रीडिंग करून 'तुझ्या मुद्यांची सरमिसळ होतीय' वगैरे सल्ले दिले की काम झाले असा एक समज पसरलेला दिसतो.

सून प्रत्येक गोष्ट बाळाच्या हगल्यापादल्या एक्स्पर्ट डॉक्टरक डे जाऊन त्याचे ओपिनिअन घेऊन त्याप्रमाणे वागणारी.....
तर सासू आजवर स्वतःच्या व दुसर्‍या च्या वाढविलेल्या पोराबाळान्चा अनुभव घेतलेली.... बहुधा आजीचा बटवा माहित असलेली......>> आमच्याकडे उल्टी केस आहे लिम्बूदा. Proud पण तो अवांतरच मुद्दा आहे.

अन बर्का इब्लिसा अन बेफिकीरा, बायकान्च्या या प्रश्नात पुरुषान्नी नाक खुपसावेच कशाला असेही म्हण्तो ना मी<<<

अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो लिंबूभाऊ, माझा पहिला प्रतिसाद निव्वळ उत्स्फुर्त व लिंक बघू न शकल्यामुळे लिहिला गेलेला होता. दुसरा प्रतिसाद लिहून झाल्याक्षणापासून 'ह्या प्रामुख्याने स्त्रियांशी संबंधित विषयात' आपण बोलायला नको हे खरेच मनात आले. पण ते मनातून गेलेही, त्याची दोन कारणे खालीलप्रमाणे:

१. हा निव्वळ कामवाल्या बायका, पाळणाघर, स्त्रियांचे करिअर, बाळांचे संगोपन वगैरेबाबतचा धागा मुळीच नाही. येथे एक अमानुष घटना घडली आहे आणि त्यावर कोणीही बोलू शकेल असा हा विषय आहे. (लक्षात घ्या, केसांचे आरोग्य, त्वचेचे सौंदर्य असला हा धागा नव्हे).

२. मायबोलीवरील काहींची एक अदृष्य फळी मायबोलीवर कार्यरत असते. ह्या फळीतील सदस्य वैयक्तीक आयुष्यात कसे का असेनात, ह्या व्यासपीठावर मात्र अतोनात पुरोगामी, समानतावादी आणि वैचारीकदृष्ट्या अत्यंत प्रगत असल्याच्या थाटात वावरतात. त्यांना जेथेतेथे त्यांच्यानुसार त्यांच्यापेक्षा कमी वकूबाच्या लोकांकडून काहीतरी प्रतिगामी व पारंपारीक लिहिले जाईल असे उगीचच वाटत असते आणि वर हेही वाटत असते की त्यावर त्यांनी विरोध प्रकट केला नाही तर अख्ख्या समाजाचे घोर नुकसान होईल. ह्या लोकांचा आत्मविश्वास इतका पराकोटीचा असतो की एक झोपला तरी दुसरा पृथ्वीतलावर कुठे असेल तिथे जागा राहून आपल्या बाजूने लढत राहील हे त्यांना माहीत असते. ह्या सर्व ज्ञानकणांपासून वेल ह्यांच्यासारखे सुशिक्षित, आंतरजालीयदृष्ट्या सुसंस्कृत पण तुलनेने नवे आय डी दूर असतात. त्यांना ही टोळधाड का आली हेही समजत नाही. त्यांना जागे करणे वगैरे महान किंवा उदात्त हेतू मनात ठेवून नव्हे तर 'दुसर्‍यांनाही काही मत असू शकते आणि ते अयोग्य आहे असे म्हणण्यास तुम्ही कोणी न्यायाधीश लागून गेला नाहीत' हे सांगण्याच्या हेतूने मी ह्यात पडलो.

भाषण समाप्त!

'मला आज आयतं का खायचं आहे' ह्याच्याशी आयतं खाणार्‍याला घेणंदेणं असावं असा वेल ह्यांच मूळ मुद्दा आहे.

>> त्यांचा मुळ मुद्दा काहीही असला तरी लहान मुलांना सांभाळायला उत्तम सपोर्ट सिस्टिम घरात/ घराबाहेर आणि समाजात नसावी असं वेल यांनी कुठेही म्हटलेलं नाहीये. ती असायलाच हवी असं तुम्हाला वाटत नाही का?
आता त्यासाठी कोणी बॅकसीट घ्यावी, कोणाला सासुसासर्‍यांचा सपोर्ट आहे, कोणी पाळणाघरात ठेवावे, कोणी घरी आया ठेवावी हे सगळे व्यक्तीसापेक्ष आहे.

Pages