मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रश्मी ओके, काळजी घेईन

तरी मला पर्सनली असे वाटते की यावरून तसा कोणाचा गैरसमज झालाच तरी माझ्या या विषयासंदर्भातील विचारांना पाहता तो दूरही होईल.
कारण मायबोली आधी मी जिथे बागडायचो तिथेही मी "अमन की आशा", "अल्लाह का नेक बंदा" अश्या नावांनी ओळखलो जायचो. Happy

कारण मायबोली आधी मी जिथे बागडायचो तिथेही मी "अमन की आशा", "अल्लाह का नेक बंदा" अश्या नावांनी ओळखलो जायचो. >> Rofl बळंच

हायला , जिथे जन्मलो फक्त तिथलेच दगडगोटे आणि गवत पाचोळेच मला माहीत असले पाहिजेत असा कायदा आहे का रे लिंब्या?

पंधराव्या शतकापुर्वी बटाटा म्हणजे काय हे हिंदुना माहीतही नव्हते.

पण आज हिंदू उपवासात बटाटा महत्वाचा आहे ना रे लिंब्या ?

Proud

कारण मायबोली आधी मी जिथे बागडायचो तिथेही मी "अमन की आशा", "अल्लाह का नेक बंदा" अश्या नावांनी ओळखलो जायचो>> याचा आणि ७८६ चा काय संबंध आहे????

फळ, कंद मुळे उपासात खातात, असे गुर्जीनी सांगितले होते … आता बटाटा त्यात बसत असेल म्हणून खातात Wink

बळंच >> नाही खरंच, गर्लफ्रेंड शप्पथ!
डिट्टेल कहाणी पुन्हा कधीतरी, एखाददुसर्‍या पोस्टचा विषय नाही तो.

याचा आणि ७८६ चा काय संबंध आहे???? >> याचा नाही, जरा त्या आधीची माझी आणि रश्मी यांची चर्चा वाचा. माझ्या +७८६ किंवा आणखी काही लिहिण्याचा चुकीचा अर्थ घेत एखाद्या समाजाच्या वा धर्माच्या भावना दुखावतील हे माझ्या बाबतीत शक्य नाही यासाठी होते ते.

राजकारणी धाग्यांवर डुआयडीने तावातावाने भांडणाऱ्या परंतु इतर धाग्यांवर ओरिजिनल आयडीने सहमत, +111, अनुमोदन असे प्रतिसाद देणाऱ्या सगळ्या फ्रेंडली आयडिना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Pages

Back to top