मांसाहार विक्री बंदी ! हुकुमशाहीचा विजय असो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 September, 2015 - 07:07

जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.

भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्‍या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.

एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.

सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.

लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..

___________________________

संदर्भासाठी लिंका

1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...

२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथे त्यांचं रक्षण करायला पवित्र देव आला नाही ते नवल म्हणायचं, नाहीका?
>>>
देव ही जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे, पण दुर्दैवाने तोच मानवाच्या श्रद्धेचा बेंचमार्क आहे.
जे ही अंधश्रद्धा जोपासायला नकार देतात, त्यांच्यासाठी नास्तिक हा नकारात्मक शब्द बनवून ठेवला आहे.

ऋन्मेष, वेड्पणा करु नकोस. तो नम्बर जर मुस्लिम लोक पवित्र मानत असतील तर त्याची खिल्ली कशाला उडवतोस? जर आपल्याला कोणाचा आदर करता येत नसेल तर त्याची निदान खिल्ली तरी उडवु नये.

सकुरा बाई, केदार नाथ काय किन्वा मक्का काय दोन्ही ठिकाणी निर्दोष जीवच गेले, त्याची तुलना करु नका. पण ते तुम्ही समजाल याची अपेक्षाच नाही कारण तुमचे प्रतीसाद कायम खवचट आणी उपहास करणारे असतात ते आत्ता पर्यन्तच्या सर्व पोस्टवरुन दिसले आहे.

गामा तुम्ही पण चुकीचेच बोलला आहात. इतर बोलतात ते बोलतात तुम्ही पण त्यात सामिल का?

सकुरा बाई, केदार नाथ काय किन्वा मक्का काय दोन्ही ठिकाणी निर्दोष जीवच गेले>>>

हो बरोबर आहे.
आणि या दोन्ही ला कारणीभुत अंधश्रद्धा.
वरून याचे समर्थन असे केले जाते की अशा ठीकाणी जिव गेला की जन्नत किंवा स्वर्ग मिळतो.

मागे उरलेल्यांची शोकांकीता कोण बघतोय.

बाकी रश्मी तुझ्या पोस्ट संतुलित असतात मला आवडतात.

मग या ठिकाणी जायचे की नाही सकुराताई?

अवांतर: भारतात अपघातात २ लाखांपेक्षा जास्त लोक मरतात! मग रस्त्यावरून पण नाही जायचे का?

अनिरुद्ध_वैद्य,
मला अश्या ठिकाणी जायची गरज वाटली नाही /वाटणार नाही.
माझा धर्म स्पष्ट आहे,राजमार्ग आहे.प्रत्येक पाऊल मंजिल की और.

आता दुसर्‍यांना मी काय सल्ला देणार.

अवांतर: भारतात अपघातात २ लाखांपेक्षा जास्त लोक मरतात! मग रस्त्यावरून पण नाही जायचे का?>>>नका जाऊ दुसर्‍या ग्रहावर जाऊन रहा.

भुकंपात हजारो मरतात.
पुरात हजारो मरतात.
आगित हजारो मरतात.

ही अंधश्रद्धा नव्हे.

मक्का, केदारनाथ, विमान प्रवास, क्रूझ, हिमालयन/सह्याद्री ट्रेक्स, खचाखच भरलेली क्रिकेट स्टेडियम्स, राजकारण्यांच्या खचाखच गर्दीच्या सभा वगैरे ठिकाणी जायचे की नाही?

सकुरा, गर्दी नीट मॅनेज केली तर दुर्घटना टळू शकते किंवा कमी प्रमाणात होवू शकते. तिथे अंधश्रद्धा/श्रद्धेचा प्रश्न नाही. हा फक्त निसर्गाच्या लहरी, आपण निसर्गावर केलेले अत्याचार, वाहनाच्या वेगाच्या/वजनाच्या/प्रकाराच्या मर्यादा उल्लंघन, निष्काळजीपणा ह्याचा प्रश्न आहे.

आपण नेहमी ऐकतो की शिर्डीला गेलेली ट्रॅक्स उलटून इतके इतके भाविक मृत्यू पावले. ते श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने मृत्यू पावलेले नसतात. त्यांनी त्या वाहनाच्या वेगाची, नेवू शकणार्‍या वजनाची, प्रवाश्यांच्या संख्येची, ड्रायव्हरच्या कॅपॅसिटीची मर्यादा उल्लंघन केलेली असते. 'मर्यादा' पुरुषार्थ हा आजच्या काळात खूप महत्वाचा आहे.

मक्का, केदारनाथ, विमान प्रवास, क्रूझ, हिमालयन/सह्याद्री ट्रेक्स, खचाखच भरलेली क्रिकेट स्टेडियम्स, राजकारण्यांच्या खचाखच गर्दीच्या सभा वगैरे ठिकाणी जायचे की नाही?>>>

तुमची श्रद्धा/अंधश्रद्धा. जे सांगते ते करा.किंवा पंडित ला विचारा.

मी विमान प्रवास क्रूझ, हिमालयन/सह्याद्री ट्रेक्स करते.

बाकी चे क्रिकेट आणि सभा नाही.

अ के, तुझ्या पोस्ट मधला 'निसर्गाच्या लहरी' हा शब्द आवडला पटला.
बाकी चे माझ्या उपयोगाचे नाही.

बाकी चे माझ्या उपयोगाचे नाही.>>> ह्म्म. जे बाकिच्या गोष्टींची काळजी घेत असतील त्यांच्यासाठी नाहीच ते Happy

सकुरा | 15 September, 2015 - 10:01
अनिरुद्ध_वैद्य,
मला अश्या ठिकाणी जायची गरज वाटली नाही /वाटणार नाही.
माझा धर्म स्पष्ट आहे,राजमार्ग आहे.प्रत्येक पाऊल मंजिल की और.

आता दुसर्‍यांना मी काय सल्ला देणार.

सकुरा | 15 September, 2015 - 10:05 नवीन
अवांतर: भारतात अपघातात २ लाखांपेक्षा जास्त लोक मरतात! मग रस्त्यावरून पण नाही जायचे का?>>>नका जाऊ दुसर्‍या ग्रहावर जाऊन रहा.

>>>

नक्की काय ते ठरवा ... एकदा म्हणतात सल्ला काय देणार? नंतर लगेच ५ मिनिटांनी ... सल्ला दुसऱ्या ग्रहावर जाऊन राहा? अरे काय हे?

एकीकडे लोक गेले, अपघात झाला तर म्हणायचं अंधश्रद्धा ... नंतर लोक तशाच घटनांमध्ये दुसरीकडे मेलेकी म्हणायचं अपघात! लयच कान्फुजन झालंय माझ!

तुमची श्रद्धा/अंधश्रद्धा. जे सांगते ते करा.किंवा पंडित ला विचारा.

मी विमान प्रवास क्रूझ, हिमालयन/सह्याद्री ट्रेक्स करते.

बाकी चे क्रिकेट आणि सभा नाही. >>>

माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की रिस्क सगळीकडे आहेच. तुम्ही तुम्हाला आवडेल त्यात रिस्क घेता. जे प्रचंड बेशिस्त गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या श्रद्धा/अंधश्रद्देच्या कारणाने, छंदाच्या कारणाने जातात ते त्यात रिस्क घेतात. त्यात मूळ कारण बेशिस्त गर्दी हे असते. श्रद्धा/अंधश्रद्धा नाही.

माझ्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की रिस्क सगळीकडे आहेच. तुम्ही तुम्हाला आवडेल त्यात रिस्क घेता. जे प्रचंड बेशिस्त गर्दीच्या ठिकाणी त्यांच्या श्रद्धा/अंधश्रद्देच्या कारणाने, छंदाच्या कारणाने जातात ते त्यात रिस्क घेतात. त्यात मूळ कारण बेशिस्त गर्दी हे असते. श्रद्धा/अंधश्रद्धा नाही.>>.

हे तुझे बरोबर आहे.

पण देवस्थानाला लोकं जेव्हा जातात ती छंद म्हणुन जात नाहित तर श्रद्धा/अंधश्रद्धा म्हणुन जातात हिच तर शोकांकिता आहे नवस फेडायला नवस मागायला देवाचा कोप होईल म्हणुन किंवा परंपरा म्हणुन.

छंद असेल तर माणुस प्रसंगानुसार निर्णय बदलतो पण अंधश्रद्धात नाही

दर्शनाला देवस्थानाला गेलं तर त्यात वाईट काहीच नाही.

नवस फेडायला जाऊन तिथे परिसर गलिच्छ केला, कोंबड्या/बकर्‍याचे बळी देवून रक्ता मांसाचा चिखल केला, परंपरा म्हणून दुसर्‍या कुणा व्यक्तीवर अन्याय/अत्याचार केला (देवदासी प्रथा, पंढरपूरला चालत असे तसे धार्मिक कार्यांच्या नावाने लुटणे वगैरे) तर ते वाईटच आहे. आणि ज्याला देव कळला आहे तो हे करणार नाही. देव भेटायला देवळातच गेलं पाहिजे असं खर्‍या श्रद्धावानाचं स्वतःवर कंपल्शनही नसतं.

बरं, १७ तारखेची मांसविक्री बंदी उठवली असं वाचलं आज ट्रेनमध्ये समोरचीच्या पेपराच्या माझ्यासमोर आलेल्या पानावर.

ज्याला देव कळला आहे तो हे करणार नाही. देव भेटायला देवळातच गेलं पाहिजे असं खर्‍या श्रद्धावानाचं स्वतःवर कंपल्शनही नसतं>>>

हे मला पटले सहमत.

मी स्वता:हा मांसाहार करत नाही कारण मला मनातुन तसे वाटले
कायदा करुन किंवा सक्ती करुन कोणाचेही मांसाहार बंद होत नाही त्यासाठी त्याचे स्वता:हा चे मनपरिवर्तन व्हायला हवे.

कायदा करुन किंवा सक्ती करुन कोणाचेही मांसाहार बंद होत नाही त्यासाठी त्याचे स्वता:हा चे मनपरिवर्तन व्हायला हवे.>>> +१

सकुरा,

>> निर्जीव खांबातून नृसिंह बाहेर येतो... आणी सजीव गाईतून कत्तलखान्यात नेली तरी 33 कोटी बाहेर येत नाहीत....
>> उभ्या जाळा त्या पंचागपोथ्या....!!!

मक्केत दुर्घटना घडली म्हणून मुस्लिम कुराण वाचणं बंद करतील काय? नाहीना? मग हिंदूंनी पंचांगं आणि पोथ्या कशाला जाळायला पाहिजेत? शिवाय पंचांगांचा संबंधच काय मुळातून? पंचांग कशाशी खातात ते तरी माहितीये का?

आ.न.,
-गा.पै.

रश्मी..,

>> गामा तुम्ही पण चुकीचेच बोलला आहात. इतर बोलतात ते बोलतात तुम्ही पण त्यात सामिल का?

वरपांगी चुकीचं वाटतंय हे तुमचं निरीक्षण बरोबर आहे. त्या संदेशात पार्श्वभूमी स्पष्ट करायला हवी होती.

सकुराताईंनी गाईच्या पोटातनं ३३ कोटी देव येत नाहीत म्हणून पंचागपोथ्या जाळायला सांगितल्या याचा प्रतिवाद करत होतो. त्यासाठी वेगळा संदेश टाकला आहे.

अर्थात मानवी कर्मे मानवी हस्तक्षेपाने थांबवायची असतात आणि मानवी प्रयत्न संपले की दैवी उपाय योजायचे असतात हे सकुराताईंना कोण समजवून सांगणार!

आ.न.,
-गा.पै.

>>>> >> उभ्या जाळा त्या पंचागपोथ्या....!!!
असे वाचल्याचे आठवते़ की

खूप पूर्वी युरोपमधे अशी जाळपोळ ज्योतिषाच्या व अनेकेश्वरवाद्यांच्या पुस्तकांची झाली होती....
भारतातही नालंदा इत्यादिक विद्यापीठातील पुस्तके जाळली गेली होती, मंदिरे वगैरे तर कायमच तोडली जात होती.
त्यानंतर रशिया व चिनमध्ये कम्युनिस्टांकडून धर्मसाहित्य जाळले गेले होते.....
हल्लीचे बुप्रा/अन्निसवाले "देवाला रिटायर" कराचा धोषा लावुन आहेतच....
व या सर्व पोथ्या पुराणांमागे "निव्वळ बामणे" आहेत असे भासवून त्यांनाही नाहिसे कराचा सूप्त/ गुप्त संदेश ब्रिगेडी पसरवू पहात आहेतच.
मला फक्त इतकाच प्रश्न पडला की सकुरा ही आयडी यातल्या कोणत्या प्रकारात मोडते? की या सर्व प्रकारांची/उद्देशांची भेसळ/मिसळ म्हणजे सकुरा आयडीचे लेखन?

आई एक गोष्ट सांगायचि.
एका गाईच्या मागे कसाई लागला होता.
गाय धावत पळत जीव वाचवित सुटली होती.
होता होता ती एका व्यक्तिच्या घरासमोर आली. व्यक्ति बाहेर बसली होती. व्यक्तिचे नेहेमी सत्य बोलण्याचे ब्रीद होते.
गायीने वाचविण्याची याचना त्या व्यक्तिपाशी केली.
पण ती व्यक्ति अहिंसावादीही होती.
तेव्हा गाय घरासमोरून दुसर्‍या बाजुस पळून गेली.
इकडे तो कसाईही गाईला शोधत शोधत त्या व्यक्तिसमोर येऊन पोहोचला व दरडावुन विचारू लागला कि गाय कुठे आहे, कुठे गेली, मला ती कापायची आहे.
अहिंसावादी व्यक्तिला गाय कापणे मान्य नव्हते.
त्याचबरोबर सत्यवचनी असल्याने गाय कुठे गेली हे तोंडून वदवून सांगून पापाचे धनीही व्हायचे नव्हते.
शिवाय तो स्वतःच अहिंसावादी असल्याने त्यास त्या कसायाचा प्रतिकारही करायचा नव्हता.
व जे जे होईल ते ते फक्त पहात रहायचे होते.
खोटे बोलण्याचे पाप लागू नये म्हणुन तसेच, गाय कुठे गेली हे तोंडाने सांगुन गायीच्या मृत्यूस कारणीभूत होऊन पापाचे धनी होऊ नये म्हणूनही, व काहीच न सांगितल्यास कसाई आपलाच जीव घेईल, त्यापासून वाचण्याचे दृष्टीनेही, तो सत्यवचनी, बुद्धिमान, विद्वान, अहिंसावादी प्राणि, तोंडाने काहीच न बोलता, तरीही मानेनेच खुणावुन गाय कोणत्या दिशेला गेली ते कसायास सांगतो.
पुढे कसाई त्या दिशेला जाऊन गायीस मारतो.
इथे गोष्ट संपायची!
[नंतरचे आमचे प्रश्न, व त्यास आईने दिलेली उत्तरे हे सर्व इथे सांगण्याची जागा नव्हे, व उभ्या आयुष्यात त्या सत्यवचनी अहिंसावादी प्राण्यासारखे/व्यक्तिसारखे कधीही वागू नका या शिकवणूकीकरता आईने उच्चारलेली वैखरी देखिल इथे कुणाला सांगून समजण्यासारखी नाहीच्च, सबब ती वजा केलीये.]

>>>>> ज्याला देव कळला आहे तो हे करणार नाही. देव भेटायला देवळातच गेलं पाहिजे असं खर्‍या श्रद्धावानाचं स्वतःवर कंपल्शनही नसतं. <<<<< या आधीचा थोडा संदर्भ सोडून, तरीही हे वाक्य घेतोय....

खर्‍या श्रद्धावानाला देव कळायला देवळात जायचि गरज नाही, कर्मकांडे, व्रतवैकल्ये, जपजाप्य करायची गरज नाही हे सर्व मला मान्य आहे, पण खरा श्रद्धावान कोण हे कसे ठरविणार?
शिवाय, भले कुणाला काहीही न करता घरबसल्या देव कळला तर कुणाचिच हरकत असणार नाही... मात्र.....
मला देव कळला म्हणुन......
रस्त्या रस्त्यात निर्माल्य गोळा करण्याच्या नावाखाली हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असे वरुणाच्या कलशाचे कचराकुम्डीत केलेले रुपांतर मला दिसूच नये, दिसले तर बोचूच नये इतके बधिरपण वा षंढत्व येणे हे तर नक्कीच "श्रद्धावानाचे" लक्षण नाही ना?
रस्त्यारस्त्यात नेमके अहिंसावादी धर्मांच्या सणांच्या दिवशीच त्यांना पवित्र असणार्‍या प्राण्यांची अन्य अन्न उपलब्ध असूनही निव्वळ मांस खाण्याकरता व जीभेच्या चोचल्याकरता व अहिंसावादी धर्मियांना खिजविण्यासाठी व त्यांना हतोत्साह /डॉमिनेट करण्यासाठी त्याच दिवशी त्या त्या प्राण्यांची हत्या करुन राजरोस मांस विक्री करणे हे देखिल बोचूच नये इतके बधिरपण वा षंढत्व येणे हे तर नक्कीच "श्रद्धावानाचे" लक्षण नाही ना?
अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
असो.

लिंबु भौ,
पुर्वी वैदिक काळात यज्ञात पशु बळी (गाय) दिला जात होता की नाही? याचे उत्तर द्या.

मग मी
<<<मला फक्त इतकाच प्रश्न पडला की सकुरा ही आयडी यातल्या कोणत्या प्रकारात मोडते? की या सर्व प्रकारांची/उद्देशांची भेसळ/मिसळ म्हणजे सकुरा आयडीचे लेखन?>>>>

.याचे उत्तर देते.

Pages