मायबोली धागे शोधाशोधीस मदत

Submitted by मामी on 18 March, 2020 - 01:31

मायबोलीवरील एखादा धागा आठवत असतो पण नक्की कोणाचा होता, कुठे शोधावा कळत नाही. कीवर्ड्स देऊनही सापडत नाही अश्यावेळी इतर मायबोलीकरांकडे विचारणा करण्यासाठी हा धागा. एकमेकां साह्य करू...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्राह्मण जेऊन झाल्यावर शेतात बैलाला बाजूला काढून स्वतः शेत नांगरतो >> हे नाही आठवत आहे. मी म्हणतोय त्या गोष्टीत त्याला जोरदार ठसका लागतो, तो घशात बोट घालून श्रीखंड बाहेर काढतो आणि त्या ठसक्यात अनेक शिंतोडे बाकीच्यांच्या अंगावर उडतात - असा काहीतरी शेवट होता.

हरचंद मग तुम्ही म्हणताय ती वेगळी गोष्ट मामी म्हणतेय ती वेगळी गोष्ट.
त्या गोष्टीत शेतातून तो मग घरी येतो आणि बायकोला म्हणतो "पोहे लाव जरा बरीच भूक लागलीय". ते ऐकून पैज लावणारे कपाळावर हात मारून घेतात, की घेरी येऊन पडतात असा काहीसा शेवट होता त्या कथेचा.

बरोबर मानव. पण हरचंद पालव म्हणताहेत ती गोष्टही आठवते. मी या दोन वेगळ्या गोष्टींची सरमिसळ केली बहुतेक.

ते श्रीखंडाचं बोट घशात घातलेलं आठवलं आता. ती दोन लोकांच्यातली स्पर्धा असेल कदाचित आणि केळी खाऊन शेती करणारा एकच कोणीतरी होता बहुतेक.

मानव आणि मामी तुम्ही म्हणताय ती गोष्ट किशोर मासिकात वाचली आहे. जेवणावळीत पैज लागते तेव्हा हा ब्राह्मण पूर्ण जेवण झाल्यावर
वेलची केळ्याचा पूर्ण घड खातो, तो बाधू नये म्हणून ताजं तूप कढवून देतात त्यात बुडवून खातो.मग पैजेचे पैसे घेऊन चालत आपल्या घरी जातो.आणि शेतात बैलाच्या जागी स्वतः राबतो . आणि मग बायकोला सांगतो की खायला कर भूक लागली आहे.हे ऐकून त्याच्या मागावर आलेले दोन गडी चक्कर येऊन पडतात. ( ज्या यजमानांनी पैज लावलेली असते ते दोन नोकरांना ह्यांच्या मागे पाठवतात कारण पैजेच्या मोहापायी हा ब्राह्मण अति खायचा आणि त्याला काही झाले तर फट म्हणता ब्रम्ह हत्येचं पाप यजमानांना लागायचं म्हणून.)
हि गोष्ट मी माझ्या लेकाला सांगायचे. तर त्याला ही अत्ता आठवली

त्या पैजेची गोष्ट कान्होजी आंग्रे यांच्या दरबारात घडली होती असं माझे बाबा सांगायचे. म्हणजे लक्ष ठेवायला पाठविलेले गडी कान्होजी आंग्रे यांनी पाठवले होते वगैरे. त्यांच्याच दरबारात ही मोठी पंगत उठली होती. पूर्ण जेवण झाल्यावर केळीचा घड संपवायची पैज होती.

नमस्कार, मला रजत आणि मेखलाची यांची गोष्ट असलेली मोह मोह के धागे नावाची कथा वाचायची आहे पण मिळत नाही. Plz मदत करा

एक माबो कर आपल्या ऑनलाईन भेटलेल्या मैत्रिणीला भेटायला ब्राझील ला गेला होता आणि त्यावर त्याने ६-७ भागांची मालिका लिहिली होती, ती सापडेल का?

मोह मोह के धागे
या गाण्यावर एक अतिशय सुन्दर लेख लिहिला होता.
मला वाटते आहे की नन्दिनी नावाच्या लेखिकेने .
वर्ष तर झाले असेल आठवतो आहे का कुणाला?

मला एक विचारायचं होतं मोबाईल वरून कोणत्या कथेची लिंक काॅपी केली तर त्या नोडमध्ये मायबोलीचं मुख्य पृष्ठं उघडतं कथा direct उघडत नाही.
कथा direct open करण्यासाठी कोणती लिंक काॅपी आणि कशी करायची कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती!

ऋन्मेष की अभिषेक चा एक धागा होता हिटलर आणि मुंग्या बध्दल... सापडला तर द्या...
>>>>>

आणि हिटलर हसला ... (५७५)
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 December, 2017 - 00:57
https://www.maayboli.com/node/64653

लिंक दिलीय, वरतीही काढा Happy

मला एक विचारायचं होतं मोबाईल वरून कोणत्या कथेची लिंक काॅपी केली तर त्या नोडमध्ये मायबोलीचं मुख्य पृष्ठं उघडतं कथा direct उघडत नाही >> मलाही हा प्रश्न अनेक दिवस छळतो आहे.

कमी क्षेत्राच्या भूखंडावर भविष्यात ब्रेड एन ब्रेकफास्ट करण्यासाठी कोणीतरी एक धागा काढला होता. त्याची लिंक मिळू शकेल का..?

निरू, तुमच्याच एका लेखा तल्या तुमच्याच प्रतिसादावरून मला तो धागा शोधता आला.
https://www.maayboli.com/node/63869

तुमचा धागा
https://www.maayboli.com/node/70783
यातल्या खालून पाचव्या प्रतिसादातले "जरी 16 गुंठेच जागा असली तरी" हे शब्द मायबोली सर्च मध्ये शोधले.

याच विषयावरचा आणखी एक धागा
https://www.maayboli.com/node/54544

मायबोली सर्च वापरण्यासाठी मायबोली एका वेळी दोन टॅबमध्ये उघडायची. एका टॅबमध्ये कोणताही धागा उघडून त्यात नवीन प्रतिसाद विंडो मध्ये आपल्याला हवे ते शब्द टाइप करून कॉपी (कंट्रोल सी) करायचे. दुसर्‍या टॅबमध्ये मायबोलीवर शोधा क्लिक करून सर्च विंडोमध्ये हे शब्द पेस्ट करायचे. - हे डेस्कटॉप वरून करताना.
मोबाइलवर सर्च विंडोमध्ये सरळ टाइप करता येतं. तुम्ही काय शब्द शोधता हे महत्त्वाचं आहे. अगदी गुगल सर्च करतानाही.

भरत, धागा शोधून दिल्याबद्दल धन्यवाद..
मी मायबोली बहुतांशी मोबाईलवर पहातो. सर्च फॅसिलीटीही वापरतो.
मला तुम्ही शोधून दिलेल्यापैकी प्रशांतमी यांचा धागा अभिप्रेत होता. पण तो इंग्रजी मधे असल्यामुळे माझे मराठी शब्दांचे सर्च कामी आले नाहीत.
तुम्ही अजून एक धागा शोधून दिला आहे. मात्र तो यापूर्वी कधी वाचला नव्हता. तो ही चांगला दिसतोय. आज वाचीन.
धागा शोधून दिल्याबद्दल पुन्हा एकदा _/\_

एक चिकन रेसिपीचा धागा होता ज्यात youtube link दिली होती.. प्रतिक्रियांमध्ये त्या युट्युब व्हिडीओचे खूप कौतुक झाले होते.. त्रोटक माहिती आहे, पण कुणाला सापडला तर please द्या

Pages