लंडनहून जॉन काय म्हणतो बघा -
जॉन - आधी मला स्वप्निल जोशी आवडायचा नाही. तो स्वत:ला मराठीचा शाहरूख खान समजायचा आणि चॉकलेट बॉय बनायचा प्रयत्न करायचा. पण मला तो ओवरॲक्टींग करतोय असे वाटायचा... आणि मग माझ्या एका मित्राने मला "समांतर" ही वेब सिरीज बघायचा सल्ला दिला.
........ आणि आता मला स्वप्निल जोशी फार्र फार आवडू लागला आहे. एक सीजनचे आठनऊ एपिसोड मी एका रात्रीत एका दमात बघून संपवले आहेत. आणि आता पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.
तुम्हीही खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारून MX Player वर समांतर बघू शकता.
Fantastic videos from MXPlayer
[Samantar (Marathi)] https://www.mxplayer.in/show/watch-samantar-series-online-f706cad4e65256...
समांतर का बघावी -
१) स्वप्निल जोशीचा वर्णनापलीकडचा अभिनय आणि अदाकारी
२) ऊत्क्ंठावर्धक कथा आणि तितक्याच ताकदीची मांडणी
३) सतीश राजवाडे यांचे खिळवून टाकणारे दिग्दर्शन
४) तांत्रिकदृष्ट्या सरस असलेली एक मराठी कलाकृती
आता का बघू नये?
१) नवाझुद्दीन सिद्दीकीला लाजवेल अश्या स्वप्निलने हासडलेल्या शिव्या आणि त्याचे तेजस्विनी पंडितसोबत हाशमीच्या थोबाडात मारतील असे दोनतीन कडक किसिंग सीन
२) बघून सांगा, आणखी काही नाव ठेवायला सापडतेय का?
स्वप्निल जोशी आणि नितीश भारद्वाज या दोन कृष्णांची कहाणी. जो एकाचा भूतकाळ तोच दुसरयाचा भविष्यकाळ. जवळपास तीसेक वर्षांच्या अंतराने समांतर चाललेली दोन आयुष्ये. बघायला चुकवू नका.
धन्यवाद,
ऋन्मेष
जिओ स्वप्निल !!
समांतर कादंबरी मधे शेवटी एक
समांतर कादंबरी मधे शेवटी एक जण पत्ता शोधत येतो.
सुहास शिरवळकर या नावाची जादू असताना वाचलेल्या कादंब-या आहेत सर्व. समांतर, समथिंग, जाता येता, दुनियादारी, पहाटवारा, धुकं धुकं अशा अनेक कादंब-या हावरटासारख्या वाचून काढल्या आहेत.
शामा, अगदी अगदी
शामा, अगदी अगदी
बऱ्याच प्रयत्नाने मी आता जाता येता आणि झूम च्या कॉपी परत मिळवल्या आहेत.दुनियादारी होतीच.त्यांची जाई म्हणून अगदी जुनी आहे ती बाबांकडे असलेली कॉपी मला मिळालीय.
जाता येता अजूनही एव्हरग्रीन आहे पुस्तक.
बाकीच्या धुकं धुकं समथिंग वगैरे किंडल कॉपी मागेच घेतल्या आहेत.
दुनियादारी पुस्तक वाचले नाही,
दुनियादारी पुस्तक वाचले नाही, पण पिक्चर तीन वेळा पाहिला आहे आणि तिन्ही वेळा थिएटरात तीन वेगवेगळ्या ग्रूपच्या मित्रांसोबत. अफाट आवडलेला. तुझी माझी यारी तर भोकात गेली दुनियादारी. बॉक्स ऑफिस यश आणि तरुणांमधील या चित्रपटाची क्रेझ पाहता, हा मराठी चित्रपटसृष्टीच्या ईतिहासातील एक मैलाचा दगड चित्रपट होता. आमच्यासोबत कैक हिंदीभाषिक मित्रही हा चित्रपट बघायला होते, आमच्यासोबतच नाही तर थिएटरमध्येही बरेच होते.
त्यानंतर आता मराठी वेबसिरीज म्हणून समांतर एक नवा अध्याय सुरू करतेय.
लेखक कलाकार म्हणून सुहास शिरवळकर, स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर हे त्रिकूट हिट आहे
दुनियादारी कादंबरी वाचलेली
दुनियादारी कादंबरी वाचलेली आठवत नाहीये, पिक्चर उगाच बघितला, आवडला नाही. गाणी चांगली आहेत. मी खरंतर उर्मिला कानेटकरसाठी बघितला, ती आवडते मला.
दुनियादारी हिंदीतल्या शोले
दुनियादारी हिंदीतल्या शोले डीडीएलजे टक्करचा आहे.
गेल्या काही वर्षात मराठीमध्ये एक सैराटचा अपवाद वगळता कुठल्या पिक्चरचे कॅरेक्टर ईतके ठसठशीतपणे चित्रीत होत फेमस झाल्याचे आठवत नाही.
काहीही ऋन्मेष.
काहीही ऋन्मेष.
कुठे शोले, ddlj आणि कुठे दुनियादारी.
जाऊदे तुला आवडला ना, ok ना. मला नाही आवडला, बास इतकंच.
शोले आणि डीडीएलजे न आवडणारी
शोले आणि डीडीएलजे न आवडणाराही एक गट आहे
त्या गटाच्या मताचाही आदर आहे
दुनियादारी न आवडणार्या गटाच्याही मताचा आदर आहे.
पण दुनियादारीचे बॉक्स ऑफिस यश हे फॅक्ट आहे.
हा काही सलमानचा चित्रपट नाही जे त्याचा फॅन क्लब कसाही चित्रपट असला तरी बघायला जाईल.
किंवा हा कुठलाही बिग बॅनर बॉलीवूड चित्रपट नव्हता जो एकाच वेळी हजारो स्क्रीनवर झळकून पहिल्या दुसर्या आठवड्यातच लोकांना सिनेमा बंडल आहे हे कळेपर्यंत गल्ला कमवावा.
मी तिसर्यांदा दोनेक महिन्यांनी चित्रपट बघायला गेलेलो तेव्हाही तो हाऊसफुल्ल होता
बाकी त्यातली पात्रे आणि पात्रांच्या तोंडी असलेले संवाद आजही कित्येक मीम्स मध्ये दिसतात. कारण त्यातले कॅरेक्टर लोकांच्या मनावर ठसले आहेत.
चित्रपटाच्या दर्ज्याबद्दल मतमतांतरे असतील. पण लोकाश्रय लाभला, लोकांनी डोक्यावर ऊचलून धरला हे मात्र फॅक्ट आहे ते नाकारता येत नाही
सचिन भारी फलंदाज कि कोहली यावर वाद होऊ शकतो. पण दोघांनीही चिक्कार धावा कुटल्या आहेत हे कोणी नाकारू शकत नाही कारण त्याची नोंद रेकॉर्ड बूकात आहे
दुसरा कुठला धागा आहे का
दुसरा कुठला धागा आहे का समांतर साठी ?
शांत माणूस धन्यवाद,
शांत माणूस धन्यवाद, स्वप्निलच्य धाग्यावर स्वप्निलच अवांतर झाला
वरील अवांतर चर्चेसाठी हा खालील धागा वापरू शकता.
तसेही ८००-९०० पोस्ट झाल्याने अॅडमिनने हा वाहता केलेला. कोणीही यात हात धुवून घेऊ शकता
https://www.maayboli.com/node/52037
या धाग्याच्या शीर्षकाला मात्र स्वप्निल जागला
सहमत आहे
सहमत आहे
या माणसाचा आवाज दिला आहे का
या माणसाचा आवाज दिला आहे का जयंत सावरकरांना हिंदी व्हर्जन करिता?
दुनियादारी चित्रपट म्हणजे
दुनियादारी चित्रपट म्हणजे प्रौढ साक्षरता वर्ग
या माणसाचा आवाज दिला आहे का
या माणसाचा आवाज दिला आहे का जयंत सावरकरांना हिंदी व्हर्जन करिता?
>>>>>
हिंदी वर्जन आहे हे विसरूनच गेलो. पाहिलेही नाही. स्वप्निल सई यांना तिथे स्वतःचाच आवाज आहे का?
अर्थात असायला हरकत नाही, हिंदीतही चमकलेले चेहरे आहेत
मी आधी हिंदीत पाहिला पण
मी आधी हिंदीत पाहिला पण निराशा झाली...
दोन कारणे-
1.सुंदरा ची बेकार डबिंग
2. शिव्या फार मोजक्या आहेत.
कलाकार मराठी असताना. मालिका
कलाकार मराठी असताना. मालिका मराठी असताना, हिंदीत का बघायला गेला पण च्रप्स?
मला पण हिंदीतच मिळाली.
मला पण हिंदीतच मिळाली. लॅपटॉपवर भाषा बदलता येते पण टीवीवर भाषा बदलता येत नाही. बाय डिफॉल्ट हिंदीतच ऐकावी लागते. स्वप्नील आणि नितीशचाच आवाज ओरिजिनल वाटला. बाकीचे वेगळेच असावेत.
मी मोबाईलवर एम एक्स प्लेअर
मी मोबाईलवर एम एक्स प्लेअर ॲपवर पाहिले. तिथे मराठी हिंदी दोन्ही वेगवेगळे आहेत.
आपण सारे भारताबाहेर बघत आहात का? जिथे एम एक्स प्लेअरवर दिसत नाही.
मी भारतात टीव्हीवर पहिला सिझन
मी भारतात टीव्हीवर पहिला सिझन हिंदीत पाहिला. कारण तेव्हा तिथे मराठीत पण आहे हे माहीत नव्हतं. मग काही एपिसोड मराठीत परत बघितके.
दुसरा सिझन आला तेव्हाही टीव्हीवर आधी हिंदी व्हर्जन पुढे आले. मग मराठी शोधून बघितले.
फॅमिली मॅन २ सिरीज पहिला भाग
फॅमिली मॅन २ सिरीज पहिला भाग पाहिला होता म्हणून बघितली परंतु समांतर-1 इनमीन दीड भाग बघितला तरीही समांतर २ बघू शकते का म्हणजे रिलेट होईल का ?
आरामत रिलेट होईल हो
आरामत रिलेट होईल हो
सिझन २ च्या पहिल्या भागात अतिशय मोठा रिकॅप आहे. शिवाय पहिल्या सिझन चा शेवट एका वाक्यावर दुसर्या सिझन चा एक एपिसोड बनला आहे.
डायरेक्ट सिझन २ बघायला घ्या.
पहिला सीझन म्हणजे नुसतंच
पहिला सीझन म्हणजे नुसतंच दुकानाचं उद्घाटन केल्या सारखं आहे. खर्या करामती सीझन दोन मध्येच आहेत.
छे छे.. बरेच लोकांना पहिला
छे छे.. बरेच लोकांना पहिला सीजन जास्त वेगवान जास्त घडामोडींचा वाटला आहे आणि जास्त आवडला आहे. तोच काय स्किप करायला सांगत आहात.
भले सीजन दोन थेट बघू शकता. सगळे संदर्भ माहीत नसले तरी चालतील कारण सीजन दोनला कहाणी वेगळा टर्न घेते. पण म्हणून सीजन वन बघण्याची मजा घालवू नका. नंतर मजा येणार नाही. शक्य असेल तर पहिला सीजन बघा निवांत मग दुसरा बघा.
इथे यूके मध्ये हिंदीच मिळाला.
इथे यूके मध्ये हिंदीच मिळाला.. फारच भिकार डबिंग आहे हिंदीत.
ऋन्मेऽऽष, तुम्ही म्हणता ते जर
ऋन्मेऽऽष, तुम्ही म्हणता ते जर बरोबर असेल तर आता फार उशीर झालाय कारण पहिला सीजन mx वाल्यांनी गायबवलाय दुसराच दिसतोय (खेद व्यक्त करणारी बाहुली ).
दुसरा सिझन होपलेस आहे
दुसरा सिझन होपलेस आहे
सगळ्यांनी मिळून सीरिअल
सगळ्यांनी मिळून सीरिअल/पुस्तकाची वाट लावली आहे.
बायकांना शिव्या देणे, आणि आरडाओरड करत संवाद बोलणे म्हणजे अक्टिंग नव्हे. जी संस्कृती रोज आपण टी वी बातम्या वर बघतो आणि ज्या प्रदेशाचा आपल्याला तिटकारा आहे तिथून हा हिरो आला आहे काय?
एकंदरीत आता मला दुसरा सिझन
एकंदरीत आता मला दुसरा सिझन बघावासा वाटत नाहीये. एवढे एपिसोड्स बघून वेळ घालवण्यापेक्षा, जर कोणी youtube स्टोरी सांगितली असेल तर तो व्हिडीओ बघेन. अर्ध्या तास द्यायला हरकत नाही त्यासाठी.
बरेच जण सांगतात.पण त्यातले 80
बरेच जण सांगतात.पण त्यातले 80% जण आपल्या एकसुरी आवाजामुळे प्रचंड बोअर करतात.एक युट्युबर आहे जो बरेवच बरी स्टोरी सांगून चांगला रिव्ह्यू टाकतो.पण याने समांतर2 बद्दल सांगितलं आहे का माहीत नाही.आश्रम बद्दल लिहिलं होतं.(शोधून इथे देते समांतर 2 चं मिळालं तर)
ज्या प्रदेशाचा आपल्याला
ज्या प्रदेशाचा आपल्याला तिटकारा आहे तिथून हा हिरो आला आहे काय?
>>जनरलायझेशन नको...
बरेच जण सांगतात.पण त्यातले 80
बरेच जण सांगतात.पण त्यातले 80% जण आपल्या एकसुरी आवाजामुळे प्रचंड बोअर करतात.>>>>> अगदी अगदी. मी हल्लीच मराठी सिरीअलस चे update ऐकायला सुरवात केली आहे. पण ते एकसुरी ऐकून कंटाळा येतो. आपणही ह्याच्यापेक्षा बरे बोलू शकू असे वाटते.
Pages