
[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]
सारस शुभेच्छा
शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.
खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.
म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!
आता थोडं सारस विषयी - हे सारस शुभेच्छा “व्रत” स्वतःसाठी करत नाहीत, इतरांसाठी असतं. जपानी लोकं १००० ओरिगामी सारस (क्रेन्स) करून एकमेकांना देतात. कुणी खूप आजारी असेल, मोठ्या परीक्षेला किंवा स्पर्धेला जाणार असेल इ तर देण्याची प्रथा आहे. “Senbazuru” सर्च इंजिन मध्ये पाहिलं तर अधिक माहिती सापडेल.
कार्पोरेट कल्चर मध्ये याचा ‘टीमवर्क’ साठी वापर केला जातो. एक व्यक्तीने केले तर अनेक वेळा हे “व्रत” पूर्ण ही होत नाही अशी धारणा आहे. म्हणून सहसा टीम्स मिळून अशा ऍक्टिव्हिटी करतात. ह्यात “कारण” जसे आजारपण, परीक्षा इ आवश्यक नाही. पेशन्स वाढणे, सामंजस्य वाढणे, सर्जनशीलता वाढणे, एकत्र काम करणे असा काहीसा उद्देश असतो.
असंबद्ध गप्पा या वाहत्या धाग्यावर सारस चित्रांची सुरुवात झाली. मी सुरुवात करायला निमित्त ठरले पण मला रोज जमतच असं नाही. १०० सारस दिवस पूर्ण करता करता मी जिथे कमी पडले तिथे तिथे इतर आयडीनीही स्वतः केलेली ओरिगामी, इतरांची ओरिगामी, ते सारस विमान रूपातील ‘सारस चित्रे’ आणली. टीमवर्कची हीच तर मजा असते. काहींना मजा आली, काहींना बोअर झालं पण चर्चेतून वाहत्यापेक्षा कायम स्वरूपी धागा असावा असे धाडस आले. आता इथे दिवस १०१ पासून पुढे सुरु… १००० दिवसापर्यंत प्रयत्न करूया.
धाग्याचे नियम काय -
शुभेच्छा द्या आणि घ्या. मी रोज एक ओरिगामी सारस चित्र टाकायचा प्रयत्न करेन. मी स्वतः ओरिगामी फार करत नाही पण उत्तम आर्टिस्टची ओरिगामी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तुम्हीही शुभेच्छा+चित्रे देऊ शकता. चित्र सारस/क्रेन या विषयाच्या अनुषंगाने असल्यास उत्तम. आज कॅमेरात क्रेन नसेल तरी ९०० दिवस आहेत, मंडळी. ९०० दिवस चालू राहणारा उपक्रम आहे.
शुभेच्छा स्वीकारल्या तर थँक्यू/धन्यवाद इ म्हणून जा. नाही स्वीकारल्या, नाही आवडल्या तर मुद्दामून सांगायची गरज नाही
(एखादी कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश आयुष्यात असेल नि तुमच्या मनातून अजिबात शुभेच्छा येत नसतील तर… होतं असं बॉस!! तसं सांगू शकता मला आणि आप की फर्माईश छाप मी तुमच्या वतीने शुभेच्छा पोस्ट करेन. #positivevibes)
दोन्ही सारस मस्तच
दोन्ही सारस मस्तच
शुभेच्छा के लिए थँक्यु
मस्तच सारस शुभेच्छा !
मस्तच सारस शुभेच्छा !
दिवस १०६ चित्र १६ (credit:
दिवस १०६ चित्र १६
(credit: Origami_madness) १०५ मधला डॉलर सारस अवघड. सामान्यपणे सारस चौकोनी कागदापासून करतात पण डॉलरची नोट आयताकृती असते. सुरूवात वेगळी असली तरी शेवट सारखाच असणे अपेक्षित... अवघड आहे! पण जमलं तर?? ... जमलं तर अभिनंदन!! १०६ सारस हा अभिनंदनार्थ (congratulations) साठी केला जातो. अभिनंदन सारस बनवण्याजोगा काही प्रसंग घडू दे यासाठी शुभेच्छा!!
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
(क्रेडिट : Collin Kasyan )
जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही राहत असाल. तुमचा फोन नंबर बदलला असेल, जुन्या हँडसेट मध्ये हवा असणारा एखादा कॉन्टॅक्त नंबर राहून गेला असेल, तुमच्याकडून डिलीट झाला असेल तर त्या नंबरवरून हाय/ हॅलो किंवा कुठल्यातरी शुभेच्छांच्या निमित्ताने तुम्हाला मेसेज येवो. तुम्हाला तो नंबर परत सापडो या शुभेच्छा.
सारस शुभेच्छा साठी धन्यवाद सी
सारस शुभेच्छा साठी धन्यवाद सी, वर्णिता.
हरवलेला एक नंबर मिळाला कि अभिनंदन सारस बनवून इथे टाकेन.
सुरेखच सारस !! शुभेच्छासाठी
सुरेखच सारस !! शुभेच्छासाठी धन्यवाद सी, वर्णिता. आजचा सारस कसा असेल ह्या उत्सूकतेने येते आता मी रोज.
हंस (रोहित) अकेला..
हंस (सारस) अकेला..
आपल्या आयुष्यात समूहाचं एक स्थान असतं, समूहाची एक शक्ती असते...
आणि एक शक्ती असते आपली स्वतःची..
जेवढं स्वतःला ओळखू, पारखू..
तेवढी जास्त जाणिव होते तिची...
पण त्यासाठी समूहातून बाहेर पडून ती तपासावी लागते.
आणि मग समूहालाही फायदा होतो तिचा..
ही स्वतःची शक्ती, स्वतःचं सामर्थ्य तुम्हाआम्हाला सापडावं, ह्या आजच्या सारस शुभेच्छा..
Pixabay साभार
Pixabay साभार
आयुष्यात रखरख संपून गार निळाई
आयुष्यात रखरख संपून गार निळाई येऊ देत
शीतलतेच्या चांदण्यात मन न्हाऊन निघू देत
ह्या शुभेच्छा
माझ्याकडून सारस
प्रथमच
_/\_ धन्यवाद सर्वांना. खासचं
_/\_ धन्यवाद सर्वांना. खासचं शुभेच्छा दिल्यात!
भारतात दिवस सुरू होईल त्या सुमारास मी सारस पोस्ट करते आणि नंतर मी ही इथे उत्सुकतेने येते. सुरेख चित्रे, शुभेच्छा असतात.
निरू सुंदर सारस शुभेच्छा.
निरू सुंदर सारस शुभेच्छा.
किल्ली क्युट सारस शुभेच्छा.
निरू सुंदर सारस शुभेच्छा.
निरू सुंदर सारस शुभेच्छा.
किल्ली क्युट सारस शुभेच्छा.>>++११११ मला कधी जमेल असा सारस करायला ? : विचारात पडलेली म्हातारी/बाहुली:
(credit: Sharon Gerald) हे
# बुद्धीबळाच्या खेळामधली
अतिशय साधे आणि रम्य, शांत, पांढरे-काळे सारस सुरेख आहेत.
निरू,किल्ली व श्रवु यांचे सारसही सुरेख.
हा इतका सुंदर कल्पक धागा आहे!
हा इतका सुंदर कल्पक धागा आहे! वाचताना मन प्रसन्न होतं!
सर्वांना या धाग्यावरच्या शुभेच्छा लाभू देत!
आकाशात विहरणाऱ्या सारसांनाही
आकाशात विहरणाऱ्या सारसांनाही या झूल्यावर विसावा घेण्याचा मोह टाळता आला नाही. रोज नव्या उत्साहाने या जगरहाटीत सामील होणाऱ्या तुमच्या आमच्या आयुष्यातही अशी विसाव्याची स्थानं असावीत आणि त्यावर निवांत विसावायला आपल्याला वेळ मिळावा ह्या आजच्या सारस शुभेच्छा..
हंस (सारस) ऑन झुला
हंस (सारस) ऑन झुला
चित्र आणि सारस शुभेच्छा दोन्ही सुरेख, सी ,निरू.
उंच माझा झोका / क्षणभर
उंच माझा झोका / क्षणभर विश्रांती.
सारस शुभेच्छा छान.
शुभ प्रभात
शुभ प्रभात

निरु मस्त टिपलाय क्षण.
निरु मस्त टिपलाय क्षण.
बाकी सारस शुभेच्छा ही छान.
मनिम्याऊ सारस मस्त केलाय.
कॅप्शन -- सारसझुला
कॅप्शन -- सारसझुला

आणि टापूर टुपूर चालेल असा वॉटरप्रूफ सारस
आनंदसरींचा शिडकावा लाभण्यासाठी शुभेच्छा;
मनाजोगते जगू न देणार्या संकटसरींना निष्प्रभ करण्यासाठी शुभेच्छा
अवांतर -- हा सारस बरोबर आहे का, हवा तसा? पहिल्यांदाच शोधलाय
त्यावर निवांत विसावायला
त्यावर निवांत विसावायला आपल्याला वेळ मिळावा ह्या आजच्या सारस शुभेच्छा..>>>. वा! धन्यवाद.
मनिम्याऊ,छान. कमळावरी डुलण्यासाठी माझा सारस आला.
सारस पक्षी - प्राणी संग्रहालय
खूप छान उपक्रमासाठी सर्वांस अनेक उत्तम शुभेच्छा. धन्यवाद सीमांतिनी
सारस पक्षी - प्राणी संग्रहालय - काली, कोलोंबिया
भ्रमर सारस,
भ्रमर सारस,
वॉटरप्रूफ सारस-शुभेच्छा आणि
तळ्याजवळचे सारस मस्तच.
काय सुरेख चित्रं आहेत! कारवी
काय सुरेख चित्रं आहेत! कारवी, हो वॉटरप्रूफ सारस मस्त आहे. मनिम्याऊ, असा कसा फुलावर अलगद बसला
मस्तच. विक्रमसिंह, धन्यवाद. सुंदर पक्षी आहेत. सर्वांना शुभेच्छांसाठी धन्यवाद.
मनिम्याऊ, असा कसा फुलावर अलगद
मनिम्याऊ, असा कसा फुलावर अलगद बसला >>>
या ओरिगामी सारसाचे वैशिष्ट्य सांगू.. कसाही फेकला तरी खाली बरोबर सरळच उतरतो.
(No subject)
मनिम्याऊ, श्रवु, विक्रमसिंह व
मनिम्याऊ, श्रवु, विक्रमसिंह व कारवी... सुरेख सारस आहेत.

-----
मी हे क्यूट कार्टून सारस काढले आहे. थोडं चक्रम वाटतं पण ठीक आहे. पुष्कळ दिवसांनी पेन्सिल हातात घेतली , मजा आली.
हे मूळ चित्र
https://www.123rf.com/photo_7955284_an-illustration-of-cute-crane-bird-c...
माझ्या शुभेच्छा :
आपल्या आयुष्यात सह्रदयी लोकांचे येणे हा एक चमत्कारच असतो. या आठवड्यात तुमच्याही आयुष्यात असा चमत्कार घडावा या शुभेच्छा.
(No subject)
मस्त.... अगदी गोडचं जमलयं!! आता पेन्सिल पुन्हा सुटू नये म्हणून शुभेच्छा...
दिवस १०८ चित्र २६ (credit:
दिवस १०८ चित्र २६
(credit: deadmanjones) आजीची मी लाडकी. तिने सकाळी पाच वाजता बंब पेटवला की रात्री दही विरजेपर्यंत मी तिच्या मागे मागे असायचे. सर्वांचा वाचून झाला की दहा वाजता ती पेपर वाचणे, केस विंचरणे इ करायची. ह्या तिच्या 'मी टाईम' मध्ये मला एकटीला परवानगी असायची. रेडिओवरची एक श्रुतिका नि शनिवारचा मराठी सिनेमा पलिकडे तिला "करमणूक" माहितीही नाही. बाकी इतर कुटूंबिय मात्र कुठ्ठे म्हणून कुठ्ठे नेण्याच्या लायकीचे नाहीत
तरी त्यांची आठवण येतेच. कारण एकत्र भेटतो तेव्हा भावातला करारीपणा, बहिणीतली शिस्त, तिच्या इतर नातवंडातील कर्मनिष्ठा, आणि पतवंडांच्या चोखंदळपणात ह्यात आजी एखाद्या पूर्ण जिग-सॉ पझल सारखी भेटून जाते... तुमचे ही असे एखादे पझल असेल तर ते पूर्ण होण्यासाठी, मायेची माणसे पुन्हा भेटण्यासाठी शुभेच्छा...
Pages