Vaccinated

Submitted by चिन्नु on 27 June, 2021 - 05:41

Vaccinated

झालं बाई झालं
झालं बाई झालं
आमचं पण एकदाचं
टुचूक करून झालं

तुमच्या भाषेत vaccinated झालो
त्यांना सांगायचं तर jabbed होऊन आलो!

स्लीवलेस घातलं की
म्हणायचे दंडाधिकारी,
Vaccine च्या वेळी बघा
कशी किंमत कळली खरी!

ठणकावून सांगितले मी
लगेच कुठे मिळणार शिवून
नवा कोरा ड्रेस आणला यांनी
तेव्हा दुकानात जाऊन

किती drive आले गेले
कुणी किती केली घाई
सगळ्या जाहीराती पाहिल्या
पण कुण्णा बधले नाही

त्या बनीसारखी नाही बाई
फिल्डींग लावून बसायला
सेंटर जवळच होतं म्हणून
जाऊन वडापाव हाणायला!

निदान प्राॅप-बिप नको का
छान फोटो काढायला?
Just married च्या थाटात
Just vaccinated मिरवायला Wink

Just vaccinated- असा फोटो
काढून गृपवर टाकला नाही
तर खरंच म्हणे शरीरात antibodies च
तयार होत नाही! Happy

डोकेबाज मैतरीणींनी
मिळून टुचुक केलं
काय lockdown? कुठलं lockdown?
असं उलट विचारलं!

सेंटरच्या शिवारात
किती दिवसांनी गप्पा झाल्या
मास्कमधून का होईना
मुली खळखळून हसल्या

एकच डोस झालाय vaccine चा
आता दुसर्याची वाट पाहणं आलं बै,
खरं सांगा कोरोना काळात
असाही एक दिवस हवा असतो कीनै!

26 जून 2021

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. Happy

मस्तच. हो आमच्य ऑफिसात दोन दिवस होते. पहिल्या दिवशी मी लाइन लाउन उभी होते. सीनीअर सिटिझन म्हणून काही लवकर काम होते का म्हणून लाडीगोडी केली पण सिक्युरि टीने गप्प बसवले एका जागी. तरूण मध्यमवयीन कलीगज चे कुटुं बीय पण आले होते त्यामुळे एक मेळा टाइप फीलिन्ग आलेले. माझी मेडिकल फाइल घेउन गेले होते. तिथल्या बालिका डॉक्टरणीला चक्कर आली. पण मला टुचुक करू दिले . मग वॉच साठी जिथे बसवले होते तिथे गर्म कॉफी व प्रशांत कॉर्नर चा स्नॅक बॉक्स व फ्रूटी मिळाले. एक डोस झाल!!

बालिका डाॅक्टर बरी आहे ना?>> मला काय म्हाइत त्या दिवशी पाच मिनिटे पुरता संबंध आलेला. होप शी इज ओके! नाव पण माहीत नाही मला.

काहीही हं श्री!
मग vaccinated first dose complete आणि second dose complete असे दोन version लागतील काय? Proud

धन्यवाद Happy