मासे ६) बोंबिल

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 June, 2010 - 02:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कालवणाचे साहित्य :
१ ते २ वाटे बोंबील ( डोके व शेपटी कापुन, स्वच्छ करुन.)
लसूण - ८-१० पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
१ ते २ चमचे मसाला
चिंचेचा कोळ
चविपुरते मिठ
१ मिरची मोडून
थोडी कोथिंबीर
तेल.

तळण्यासाठी लागणारे साहित्य :
बोंबिल ५-६ साफ करुन
लसुण किंबा आल लसुण पेस्ट
हिंग, हळद,
२ चमचे मसाला
मिठ
तांदळाचे पिठ किंवा रवा
तेल.

क्रमवार पाककृती: 

कालवणाची कृती :
तेलावर लसणाची फोडणी द्यायची मग त्यावर हिंग, हळद, मसाला, चिंचेचा कोळ टाकुन बोंबील टाकायचे. गॅस बारिक ठेवायचा. गॅस मोठा केला की बोंबील तुटतात. मग उकळी आली की त्यात मिठ, मोडलेली मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालायची. व २ ते ३ मिनीटांत गॅस बंद करायचा.

त़ळ्ण्याची कृती :
बोंबलाला आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला मिठ लावुन ठेवावे. मग रवा किंबा तांदळाच्या सुक्या पिठात हे घोळून मिडीयम गॅस वर तळावेत. जर आल लसूण पेस्ट नसेल तर तेल तव्यात टाकल्यावर लसूण टाकावा व मग तळावेत.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी
अधिक टिपा: 

पावसाळ्यात भरपुर प्रमाणात आणि एकदम फ्रेश बोंबील येतात.

वरील कालवण फोडणी न देता करण्याचीही पद्धत आहे. म्हणजे सगळ एकत्र करायच त्यावरच तेल टाकायच आणि फक्त उकळवायच. हेही खुप छान लागत.

तळलेले बोंबील खुपच रुचकर लागतात. अगदी नुसते सुद्धा मटकावता येतात.
बोंबील घेताना छोटे, मिडीयम फोटॉत दाखवल्याप्रमाणे घ्यायचे. जाड्या बोंबलांना जास्त चव नसते.
काही जण पाट्याखाली ठेवतात बोंबील मग त्यातल सगळ पाणी निघुन गेल की ते तळतात. ह्या प्रकारचेही खुप खरपुस लागतात.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली तुम्ही मासे न खाता रेसिपी पाहता त्याबद्दल धन्यवाद.

विद्या माझ्या माहेरी पण इतर कालवणे खोबर न घालताच करतात. अस्सल टेस्ट येते त्यामुळे माश्याची.

जागू, खरंच खुप छान लागते असे कालवण. खरी माशाची चव आणि महत्वाचे म्हणजे आईच्या हाताची चव त्यात मिसळलेली असते. ईथे उसगावात मासे ही नाहीत आणि करायला आईही ईथे नाही.

एकदा टेस्ट करायचा आहे तर तुम्हीच सुचवा कोणता ट्राय करू, आयुष्यात पहिल्यांदाच खाणार मी Happy

अंजली आनंदाची गोष्ट आहे. Happy पहिलाच खाणार आहेस तर कोलंबीने सुरुवात कर कोलंबीत काटा नसतो शिवाय चवही चांगली असते. किंवा मग पापलेट ह्यातही एक मधला काटा असतो पण चव सौम्य असते.

झंपी आल-लसुण पेस्ट (ऑप्शनल), मसाला, हळद ह्याचीच ग्रेव्ही असते ती पाणी जास्त घालायचे नसते अशा कालवणात.

बोंबिल. आहाहा... काय तो मासा, यालाच विंग्रजित 'बाँबे डक' म्हणतात...
माझी आई आधी पाट्या खाली ठेवायची बोंबिल आता नुसता लिंबूरस आणि मिठ लाउन थोडा वेळ ठेवते सगळं पाणी निघुन जातं. बोंबिल हे फक्त कुरकुरीत तळावेत आणि हादडावेत..

जागु अग ही कालवणाची आमची पद्धत....आम्ही वाटणाचे कालवण खात नाही....चिंचेच्या कोळाचे कालवण करतो....मस्त......

अग जागु काल मी बोंबील आणले होते ... पण ते नेहमी सारखे नव्हते ग .. बोंबील चे मास लबलबीत असते न .. त्या माश्याचे मास जरा कडक होते .. त्याला खुप खवले पण होते .. व मधला काटा पण कडक होता .. नवरा म्हणत आहे की कदाचीत चोर बोंबील असावा ... असे पण काही असते का ??

गौरी एक अजुन बोंबील नावाचा मासा असतो तो एवढा प्रचलीत नाही. तो मोठा, काळपट आणि खवले असलेला असतो.

आपण नेहमी वापरतो ते बोंबील म्हणजे बॉम्बे ड्क हे पांढरे, लिबलिबीत असतात. पहिल्या पानावर प्रतिसादात फोटो आहे बघ.

जागू कसले मस्त गुलाबी गुलाबी फोटो बोंबलांचे.
कोळणीने मधला काटा काढून साफ करून दिले की मग तर काटे काढायचाही त्रास नाही.कुरकुरीत तळा अन खा.किंवा कळपुटी नावाचा हिरव्या वाटणाचा प्रकार.

साधना
मी कट्टर मासेहारी आहे. मांसाहारी नाही .
पटलं Happy .
बोंबिलांसाठी तळमळतात उसगावातली माणसं.इथलीच पाणशेती ही.

भारती बरीच जणं बोंबील काट्यासकट खातात. कारण ह्याला टोकेरी काटे नसतात.

मी, माझ्या मुली आणि माझ्या भाच्या मिळून आम्ही यूट्युब चॅनेल चालू केले आहे. त्यावर तुम्हाला सिजनल वेगवेगळ्या रेसिपी पहायला मिळतील. त्यातील बोंबिल फ्राय ची रेसिपि पहा

धोधो कोसळणारा पाऊस पडत असेल तेव्हा गरमागरम आणि कुरकुरीत असे तव्यावरुन काढलेले बोंबिल खाणे म्हणजे स्वर्गिय सुख. बोंबिल लिबलिबित असल्याने ते तळणे जरा अवघडच काम असते. पण ते योग्य पद्धतीने तळले तर न तुटता अखंड आणि कुरकुरीत तळले जातात. बोंबिल मोठे असतील तर मधून कापून दोन भाग करतात किंवा पाट्याखाली किंवा वजन ठेऊन त्यातील पाणी काढतात. पण जर बोंबिल थोडे छोटे असतील तर डायरेक्ट तळून पण छान कुरकुरीत होतात. खालील लिंक ओपन करुन चविष्ट चॅनेलवर पहा ही खास बोंबिल फ्राय रेसिपी.
https://youtu.be/MNaQIABvkSY

मस्त... तुम्ही पुन्हा माबोवर आलात आणि तुमचा रेसिपी चॅनल सुरू केलंय हे वाचून / बघून फार बरं वाटलं जागू. (काकी लिहीत नाही Bw )

माझ्या भाच्या रेसिपी बनवतात. मी गाईड करते, मराठी ट्रानस्लेट करते. पुढे बनवेनही.
नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी.
अमित आ‌‌‌ॅडिओने खुप मोठा होतो व्हिडिओ. हल्ली झडपट लागत सगळ्यांना.
DJ चालेल काकु पण. ताई पण Happy

चॅनलवर ऑडिओपण टाका ना +७८६ जे लिहिलेय तेच वाचून दाखवणे पुरेसे आहे. सोबत जी म्युजिक आहे ती राहीलच. बघत बघत वाचण्यापेक्षा ऐकणे जास्त परीणामकारक आणि जास्त सोयीचे आहे.
विडिओ बाकी खतरा आहे. सुरुवालीलाच नारळाची झाडे, पाऊस, तांदळाची भाकरी, कांद्यासोबत बोंबील बघून तोंडाला पाणी आणि पोटात खड्डा पडला Happy

मध्यंतरी बरेच मायबोलीकर आपल्या चॅनेलची माहिती देणारा धागा काढत होते, तुम्हीही या चॅनेलवर काही विडिओ जमले की ईथे एक नवीन धागा काढू शकता.

मस्त आहे channel
कांदा भजी चा video कमाल आहे
प्रतिक्रिया देऊन आले

सगळ्यांना खुप धन्यवाद.
ऋन्मेष आवाज देण्याची सुचना चांगली आहे बघते जमते का ते.
अस्मिता, किल्ली धन्यवाद.

मी अगदी परवाच नाव काढलं होतं त्या विमानतळाच्या धाग्यावर जागूकाकिंचं Bw .. कित्येक दिवसात त्यांनी माबोवर दर्शन दिलं नव्हतं. काल त्यांचे रेसिपी व्हिडिओ बघून खूप भूक लागली Bw

Pages