कालवणाचे साहित्य :
१ ते २ वाटे बोंबील ( डोके व शेपटी कापुन, स्वच्छ करुन.)
लसूण - ८-१० पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
१ ते २ चमचे मसाला
चिंचेचा कोळ
चविपुरते मिठ
१ मिरची मोडून
थोडी कोथिंबीर
तेल.
तळण्यासाठी लागणारे साहित्य :
बोंबिल ५-६ साफ करुन
लसुण किंबा आल लसुण पेस्ट
हिंग, हळद,
२ चमचे मसाला
मिठ
तांदळाचे पिठ किंवा रवा
तेल.
कालवणाची कृती :
तेलावर लसणाची फोडणी द्यायची मग त्यावर हिंग, हळद, मसाला, चिंचेचा कोळ टाकुन बोंबील टाकायचे. गॅस बारिक ठेवायचा. गॅस मोठा केला की बोंबील तुटतात. मग उकळी आली की त्यात मिठ, मोडलेली मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घालायची. व २ ते ३ मिनीटांत गॅस बंद करायचा.
त़ळ्ण्याची कृती :
बोंबलाला आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला मिठ लावुन ठेवावे. मग रवा किंबा तांदळाच्या सुक्या पिठात हे घोळून मिडीयम गॅस वर तळावेत. जर आल लसूण पेस्ट नसेल तर तेल तव्यात टाकल्यावर लसूण टाकावा व मग तळावेत.
पावसाळ्यात भरपुर प्रमाणात आणि एकदम फ्रेश बोंबील येतात.
वरील कालवण फोडणी न देता करण्याचीही पद्धत आहे. म्हणजे सगळ एकत्र करायच त्यावरच तेल टाकायच आणि फक्त उकळवायच. हेही खुप छान लागत.
तळलेले बोंबील खुपच रुचकर लागतात. अगदी नुसते सुद्धा मटकावता येतात.
बोंबील घेताना छोटे, मिडीयम फोटॉत दाखवल्याप्रमाणे घ्यायचे. जाड्या बोंबलांना जास्त चव नसते.
काही जण पाट्याखाली ठेवतात बोंबील मग त्यातल सगळ पाणी निघुन गेल की ते तळतात. ह्या प्रकारचेही खुप खरपुस लागतात.
मासे म्हणजे पाण्यातली
मासे म्हणजे पाण्यातली पालेभाजी
आणि यावर तुमचा विश्वास आहे!!!!!!
मी कट्टर मासेहारी आहे.
मी कट्टर मासेहारी आहे. मांसाहारी नाही.. मासे सोडुन इतर मांसाहारी पदार्थांवर माझे विषेश प्रेम नाहीये...
आई मला मांजर म्हणायची.. पण आता खुप कमी झाले मासे खाणे. माझा गुण लेकीने उचललाय.. बोंबील आणि मांदेली तिच्या खास आवडीचे...... अख्खे वाटेच्या वाटे ती एकटी खाते.
साधना आता तुझ्या आईने केलेला
साधना आता तुझ्या आईने केलेला प्रयोग मी पण करेन.
बी तुला जर साथ हवी असेल तुझ्या बाजुने तर अश्विनीला हाक मार.
साधना आता ऐशा आली की ये ग.
साधना आता ऐशा आली की ये ग.
तांदळाचे ताजे रवाळ पिठ करुन
तांदळाचे ताजे रवाळ पिठ करुन ते बोंबिलांना लावुन तळले तर अजुन कुरकुरीत होतात >>>>>>>>>>>>>>>>>>> हो खर आहे हे, मी करते असे, त्या पिठा त थोडेसे मिठ , मसाला टाकावा म्हन्जे मग आणखिन छान चव येते
अरे बी, हे फोटो आहेत म्हणून
अरे बी, हे फोटो आहेत म्हणून मी बघू शकतेय. प्रत्यक्ष तर मासेवाली एका फुटपाथला दिसली तर मी पलिकडल्या फुटपाथवर जाते
<<<<हो खर आहे हे, मी करते
<<<<हो खर आहे हे, मी करते असे, त्या पिठा त थोडेसे मिठ , मसाला टाकावा म्हन्जे मग आणखिन छान चव येते>>>>> त्यात २-३ खडे गूळ आणि २ टीस्पून गोडामसाला पण टाकावा म्हणजे आणखिन पेक्षा आणखिन छान चव येते
अश्वे चालेल तु सांगितल तस
अश्वे चालेल तु सांगितल तस करते आणि तुला खायला घालते ,चालेल ना/
पण मी खातच नाही. पचका वडा !
पण मी खातच नाही. पचका वडा !
हो खर आहे हे, मी करते असे,
हो खर आहे हे, मी करते असे, त्या पिठा त थोडेसे मिठ , मसाला टाकावा म्हन्जे मग आणखिन छान चव येते>>>>>
अश्विनी, मी तुझी पोस्ट वाचायला लागले आणि पहिला मला धक्काच बसला मग अॅरो बघितले.
अश्वे अग बोंबिला एवजी कच्च्या
अश्वे अग बोंबिला एवजी कच्च्या केळिचे काप घेइन ना मी , शाकाहारि सुरमइ करुन देइन
कच्ची केळी? हा मग चालेल !
कच्ची केळी? हा मग चालेल !
थंड अग कच्ची केळी पेक्षा
थंड अग कच्ची केळी पेक्षा पिकलेली थोडे काळपट डाग सालांना पडलेली केळी घे. बोंबील तशेच असतात मऊ मऊ.
मांसाहारी नाही मासेहारी..
मांसाहारी नाही मासेहारी..
छान 
मग साधने तू इथे सिंगापुरात यायला हव.. असले चित्रविचित्र मासे मिळतात.. !
मांदेलीचे चित्र टाका ना कुणी..
जागु
जागु
प्रतिक्रीया खूप चमचमीत आहेत.
प्रतिक्रीया खूप चमचमीत आहेत.
मासे खाल्ल्याने बुद्धी शार्प होते असे म्हणतात उदा: सर्व बंगाली जन.
बी मांदेली येतात आता चांगली.
बी मांदेली येतात आता चांगली. मी टाकेन पुढच्या आठवड्यात.
टाक गं जागु.. मी उद्याच
टाक गं जागु.. मी उद्याच घेणार आहे मांदेली...
बी, माशांच्या बेटात राहुन मासे खात नाहीस तु??? काय म्हणावे या नशिबाला???? ते चित्रविचित्र चवीला बरे असतात का????
मासे खाल्ल्याने बुद्धी शार्प
मासे खाल्ल्याने बुद्धी शार्प होते असे म्हणतात उदा: सर्व बंगाली जन.
ह्म्म.. म्हणुन त्या बंगालीजनांच्या चेह-यावर मासा मेल्यावर त्याच्या डोळ्यात आणि चेह-यावर जसे थंडगार थिजल्यासारखे भाव असतात तसे भाव असतात बहुतेक.... अपवाद बिप्स,
बाकी माझ्या ओळखीचे सगळे बंगालीबाबु जाड फ्रेमचा, जाड काचेचा चश्मा लावतात, त्याच्यामागे त्यांचे हिल्सा माशासारखे बाहेर आलेले वाटोळे डोळे असतात आणि त्यांच्याशी काहीही बोलले की साधारण पाच मिनिटाने थंडगार थिजल्या चेह-याने उत्तरे देतात...
विदर्भात भरपूर तल्लख बुद्धीचे
विदर्भात भरपूर तल्लख बुद्धीचे लोक मी पाहिले आहेत. अकोल्यात देखील!!!!!!!! मासे न खाणारे!
बी कुठे जन्मला ते कळले
बी कुठे जन्मला ते कळले आम्हाला.......
आई मला मांजर म्हणायची.. पण
आई मला मांजर म्हणायची.. पण आता खुप कमी झाले मासे खाणे. माझा गुण लेकीने उचललाय.. बोंबील आणि मांदेली तिच्या खास आवडीचे...... अख्खे वाटेच्या वाटे ती एकटी खाते.
तुझ्या लेकीला माझे सेम पिंच. मी पण असेच बोंबिल खायचे. आता बोंबील फक्त बघते. अलर्जी येते मला
बाकी सगळे मासे खाते मी. पण बोंबील ते बोंबिल
मलाही लहानपणी माझे वडील (ते
मलाही लहानपणी माझे वडील (ते मासे आवडीने बनवतात. मासे आणले की आईला आराम असायचा) मला मस्त पाऊस पडत असताना तव्यावरचे गरम गरम तळलेले बोंबील खायला द्यायचे. आहाहा क्या वो दिन थे ?
मस्त पाऊस पडत असताना
मस्त पाऊस पडत असताना तव्यावरचे गरम गरम तळलेले बोंबील खायला द्यायचे. आहाहा क्या वो दिन थे ? >> जागू आम्ही पावसाळ्यात भज्यांवर ताव मारतो, तुम्ही बोंबिलांवर..

हा बीबी पण अर्धवट ठेवलास.. क्लेम नं २, फोटो टाकणे..
जागू तुमच्या पोस्टस
जागू तुमच्या पोस्टस एव्हरग्रीन आहेत.
योगायोग ! आजच ताजे, मस्त
योगायोग ! आजच ताजे, मस्त बोंबिल मिळाले !!
]
सर्वसाधारणपणे आमच्याकडे आलं, लसूण, किंचित कांदा, हिरवी मिरची , थोडंसं ओल्या नारळाचं खोबरं, थोडी कोथिंबीर व हळद हें सर्व मिक्सरमधून बारीक वाटून बोंबलांना लावतात. तेलांत लसणीची फोडणी देऊन त्यावर हे बोंबिल परतून घेऊन [ फक्त भांडं हलवून ]मग मीठ , चिंचेचा कोळ व पाणी घालतात. वर बारीक चिरून कोथिंबीर. अगदीं बारीक गॅस ठेवून शिजवून घेतात. अर्नाळा, वसई भागात [ जिथें मस्त व भरपूर बोंबिल मिळतात] तिथें हा 'बोंबलाचा रस्सा' विशेष लोकप्रिय आहे. माझाही खूप आवडता.
बोंबिल तळणें [पाट्याखाली न ठेवलेले] हें मात्र कसबच आहे. ताजे सुरेख तळलेले बोंबिल म्हणजे स्वर्गसुखच ! [ माझी बायको यांत भलतीच वाकबगार आहे हा आमच्या प्रदीर्घ संसाराचा पायाच आहे असं मीं मानतो !
जागूजी, आतां अर्थातच तुमच्या वरील पद्धतिने करून पहाणं आलंच ! धन्यवाद.
भाऊ खोबर्याच्या वाटणापेक्षा
भाऊ खोबर्याच्या वाटणापेक्षा मी वरील केलेला रस्सा नक्कीच करुन बघा. बोंबिलाची चव छान रश्यात उतरते.
आणि तळलेले बोंबीलाला कुठल्याच माशाची तोड नाही. खरच स्वर्गसुख. आम्ही नुसतेही खातो तळून.
विनिता धन्यवाद.
जागू, माझी आई पण असेच करते.
जागू, माझी आई पण असेच करते. फक्त यात चिंचेऐवजी कोकम वापरते. लसणाच्या फोडणी न घालता आले+लसुण्+कोथींबीर याचे वाटण वापरते. याला आम्ही तेलावरचे कालवण म्हणतो. करंदी, कोलंबी, घोळ, पापलेट, सुरमई ...अशाचेही या प्रकारे कालवण करतो.
भाउ, तुमची पण रेसिपी मस्त
भाउ, तुमची पण रेसिपी मस्त वाटते. तळलेले बोंबील म्हणजे माझे सर्वात आवडीचे.
जागूताई ही मासे सिरीज वाचतेय
जागूताई ही मासे सिरीज वाचतेय आणि फोटोही बघतेय. मी कधीच मासे खाल्ले नाहीयेत पण तुमच्या रेसिपीज वाचनीय आहेत.
तुम्हाला केवढी माहिती आहे हो ... ग्रेट.
Pages