पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -४

Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41

पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाश वाल्याने गोडा म्हणता म्हणता त्यात तिखट पण मिक्स केलेय सवयीनुसार. >>> हा घेऊन बघायला हवा. माझी आई गोड्या मसाल्यात तिखट घालते, आम्हाला आवडतं, ती खमंग खरपूस भाजते त्यामुळे तसा भाजलेला विकतचा मिळत नाही. आईला आता होत नाही आणि तिच्याकडून मसाला शिकून घेतला नाही, तिला मदत करायचो फक्त पण फार लक्ष दिलं नाही ह्याची खंत वाटते. तिच्या आता लक्षात राहत नाही पण मागे तिने कृती लिहून दिलेली बहिणीला, ती बहिणीने जपून ठेवली असेल तर तसाच मसाला घरी करता येईल.

बाकी केप्र एक दोनदा आणि बेडेकर एकदोनदा खवट वाटलेला. बरेचदा बरा निघाला.

बाहेरचा कुठलाही गोडा मसाला मी फोडणीत घालून भाजते, मला तो नेहेमी कमी भाजलेला वाटतो Lol

हे लॉजिकल वाट्टॅ ना पेडणावरची वांगी म्हणजे फक्त स्टीम वर शिजवायची आहेत. पेडावणात ठेवुन किंवा झाक्णात ठेवून वाफवत असतील मसाल्याची भरलेली वांगी.

भेंडी ची बेसन चे पिठ घालुन जी भाजी करतात त्याची कृती काय?
माझं व्हर्जन,
भेंडी लांबसर पातळ कापुन घ्यायची. (बाजुला ठेवुन द्या पण जास्त कोरडी होता कामा नये)
प्रमाणात बेसन घेवुन त्यात चवीनुसार मीठ, हिंग, हळद, घरगुती मसाला (१६ चं मिश्रण)/मिरची पावडर टाकुन कोरडच नीट मिक्स करायच.
कढईत तेल तापवुन त्यात बारीक चेचलेला लसुण टाकुन नीट तळुन घ्यायचा (टाकत असल्यास जिरेही चालेल)
आता ह्या तापलेल्या तेलात नी तळलेल्या लसुणातच भेंडींची ज्युलियन्स त्या पीठाच्या मिश्रणात घोळवुन घेवुन कढईत टाकत परतत रहायचे.
सगळी भेंडी टाकुन झाली की थोडावेळच झाकण ठेवायचे. जास्त नको कारण वाफेचे जमा झालेले पाणी जर त्यात पडले तर चिकट होतात.
किंवा,
कढईत तेल तापवुन त्यात बारीक चेचलेला लसुण टाकुन नीट तळुन घ्यायचा (टाकत असल्यास जिरेही चालेल), त्यातच चवीनुसार मीठ, हिंग, हळद, घरगुती मसाला (१६ चं मिश्रण)/मिरची पावडर टाकुन नंतर त्यात भेंड्यांची ज्युलियन्स टाकुन मग वरुन थोडे थोडे बेसन टाकत परतत रहायचे.

पुर्वीच्या काळी पेडणावर म्हणजे पातेल्यात आधी खाली ऊसाची / ज्वारी / मका हिरवी पाने धुवून घालत व त्यावर भरलेली वांगी ठेऊन चुलीवर शिजवत असत.

जेम्स बॉण्ड भेंडी च्या पाककृती बरहुकुम करून पाहीली, फार यम्मी झाली होती, हेब्बार किचन ची सेम कॄती आहे Happy थॅक्स

मी केप्रचा गोडा मसालाच वापरते. उत्तम असतो.
अनेक वर्षं गोडा मसाला घरी केला. आता कंटाळा येतो. (तरी गेल्या वर्षी पहिल्या लॉकडाऊनदरम्यान एकदा संपला तेव्हा घरीच केला.)

ब्लॅककॅट यांनी केली असेल तर त्यांना विचार. त्यांनी त्या पेडणावरच्या मिर्च्याचा फोटो टाकला होता. जबरी दिसत होत्या मिर्च्या.

इथलि वांगी आणि जाड्या हिरव्या मिरचीची रेसिपी हवि आहे.>>>>> पण ही एकत्र असलेली रेसेपी आहे का? कुणी लिहीलीय? की वांगी आणी मिर्च्यांची वेगवेगळी आहे?

काल कीबोर्ड चा इश्यू येत होता म्हणून सविस्तर टाईप नाही करता आले. मला आठवत नाही पण कोणत्यातरी धाग्यावर वांगी आणि हिरव्या जाड्या मिरच्यांच्या (ज्या भरण्यासाठी वापरतात ) भाजीची रेसिपी आणि टेम्पटिंग फोटो होते . काल तश्याच हिरव्या मिरच्या आणि वांगी घेतली पण रेसिपी मिळतच नाही आहे .
रेसिपी वाचताना वाटलेले आरामात लक्षात राहील म्हणून बुकमार्क केली नाही आणि आता अजिबात आठवत नाही Happy

धन्यवाद भरत. हीच रेसिपी शोधत होते मी.
रश्मी तुलाही थॅन्क्स ग. तुझे पण प्रयन्त चालूच होते. Happy
शब्दखुणां मध्ये वांगी आणि मिरची टाकत होते. जाड मिरची , भावनगरी मिरची या शब्दखुणा आता वाचल्या.

घरी चॉकोलेट बनवायचे आहेत. कृती आणि काय सामान लागेल कोणी सांगेल का?
Bournville सारखे चॉकोलेट हवे आहे..
अमूल चा कोणता चॉकोलेट compound आणावा लागेल??

Bournville >>>> सोडुन मी बाकी सारे घेतले होते. ( म्हणजे खाल्ले होते ) अमूलचे डार्क आणी व्हाईट दोन्ही आहेत आणी मिक्स पण आहेत. मिक्स बरा पडतो. पटकन होतात.

चॉकोलेट ट्रे
( सिलीकॉन पण बेस्ट ) , मिक्स कंपाऊंड चॉकोलेट

ऊडूपी हॉटेलांत इडली दोस्यांबरोबर मिळते तशी नारळची पांढरी शुभ्र चटणी कशी करायची?

Pages