तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

Submitted by किल्ली on 28 May, 2019 - 03:32

आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!

येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्‍याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.

असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.

तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

चला तर मग करा सुरुवात!

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती शांत माणूस
पण या मॅचला अभिषेक नाईक नाही आला हे कश्याला मध्येच उगा घुसडले. या राजकीय. धार्मिक सामाजिक वगैरे अजेंडा राबवण्यासाठी ऑर्कुट वापरणाऱ्यांशी दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. मी तर यात लिंबूटिंबू होतो. मौजमजेसाठी ऑर्कूट वापरणारा होतो.

बाकी यातली बरीच नावे ओळखीची आहेत. अशी नावे एखाद्या पोस्टमध्ये वेगळ्याच साईटवर लिहिणे योग्य की नाही कल्पना नाही

धार्मिक सामाजिक वगैरे अजेंडा राबवण्यासाठी ऑर्कुट वापरणाऱ्यांशी दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. मी तर यात लिंबूटिंबू होतो. मौजमजेसाठी ऑर्कूट वापरणारा होतो. >>> कशाला पोस्टी वाढवताय ? मागेच तुम्हाला बास म्हणालो ना ? आता हे सांगतच आहात तर तुमचे सर्वच्या सर्व धागे हे हिंदुत्ववाद्यांना उकसवणारे होते म्हणूनच तुम्हाला ब्लॉक केले होते. तो परा सांगेल विचारले की. त्या वेळी तुम्ही हिंदुत्ववाद्यांवर टीका करायचा पण ती असंबद्ध असायची. मुद्देसूद टीका करणारे त्या मानाने बराच काळ टिकले. पण ते ही नंतर उडाले हे ही खरे.

ही माहिती एका आदरणिय आयडीने विचारल्यावरून दिली आहे. त्यामुळे नावे घ्यावी लागली आहेत. इथे ज्यांची नावे घेतली आहेत त्यांची बदनामी केलीय असे वाटतेय का ? नसेल तर मग कशाला विनाकारण शंका / कुशंका ? अशाने टीव्ही वर्तमानपत्रात कुणी मुख्यमंत्री झाला हे सांगणेही अवघड होईल.
तरीही नावे घेणं अयोग्य असेल तर प्रशासक ठरवतील ते योग्य असेल.

@ शांत माणूस, आता विषय काढलाच आहे तर ऐका

येस्स , मला तेव्हा "अमन की आशा" असे टोपणनाव होते. तुम्हाला हे माहीत असावे असे गृहीत धरतो. आता त्यामागची स्टोरी ऐका.

माझे बालपण दक्षिण मुंबईतल्या चाळीत गेले. हिंदू मुस्लिम दंगली मी कोवळ्या वयात अश्या अगदी डोळ्यासमोर पाहिल्या आहेत. दुकाने फोडताना, माणसं कापली जाताना, सोडावॉटरच्या बॉटल एखाद्या वस्तीवर फेकली जाताना, माझं गाव माझी वस्ती माझा मोहल्ला माझे शहर असं जळताना अगदी जवळून अनुभवलेय. त्या दंगलीत हिंदू वा मुसलमान नाही मेला, तर जो सामान्य माणूस होता तोच चिरडला गेला.
कडक कर्फ्यू लागलेला तेव्हा आमच्याईथे. घरात खायला अन्नाचा एक दाणा नव्हता. जे होते ते शिजवायला ना गॅस होता ना रॉकेल. मी घरात ऊपाशी. आईवडील जीवावर ऊदार होऊन मामाकडून काहीतरी खायला आणायला गेले माझ्यासाठी. तिथेही काय मिळेल याची खात्री नसताना. कारण पोरगा काल रात्रीपासून ऊपाशी होता. येताना थोडेसे तांदूळ, रॉकेल वगैरे घेऊन आले आणि आम्ही फोडणीचा भात करून खाल्ला. मी लहान होतो तेव्हा, पण आईवडील घरात सुखरूप येईपर्यंत माझ्या जीवाचे काय हाल झालेले ते आजही मला आठवतेय. ज्या पोरांचे आईवडील त्या दंगलीत मारले गेले असतील त्यांच्याबद्दल कल्पनाही करवत नाही.

असो, तर या आठवणी मनात घर करून होत्या. ऑर्कुट समूहांबद्दल जेव्हा कळले तेव्हा ज्या जातीत जन्म घेतला होता त्या जातीच्या नावाने असलेल्या समूहात मुकाटपणे सभासद घेतले. प्रत्यक्षात तिथे बरेच जातीधर्माचे लोकं आपसात वादावादी करत राहायचे. माझा त्याच्याशी काय संबंध, मी तर एक उनाड बॅचलर होतो आणि मित्रमैत्रीणींमध्ये बागडत होतो. आमचे धागे वेगळे चालायचे, पॅरलली त्यांचे धागे वेगळे चालायचे. पण सर्व प्रकारच्या धाग्यांवर बागडणार्‍या कॉमन सभासदांमुळे त्या धाग्यांवरच्या घडामोडीही समजू लागल्या. अचानक रस वाटू लागला. आपली जात, आपला धर्म यांच्याबद्दल मनात कधी नव्हे तो अचानक जास्तीचा अभिमान दाटून येऊ लागला. थोडक्यात मी बहकत होतो.

सुदैवाने वेळीच सावरलो. काय कसा ते आता ईथे सांगत नाही. स्वतंत्र धाग्याचा विषय बनेल. पण या जातपातधर्मभेदातील फोलपणा कळला. आपण अमुक जातीचे आहोत तर तमुक जातीला अलकेच लेखायला हवे. आपण अमुक धर्माचे आहोत तर तमुक धर्माचा द्वेषच करायला हवा. आपण अमुक देशाचे आहोत तर तमुक देशातील लोकांशी शत्रूत्वच करायला हवे. हे सारे गैरसमज गळून पडले. जातपातधर्मप्रांतप्रदेश यांच्या नावाचे माझ्यावर लागलेले सारे टॅग मी माझ्यापुरते काढून टाकले. त्यासोबत येणार्‍या अभिमान आणि अहंकारातून मुक्त झालो. थोडक्यात मी मानव पृथ्वीकर झालो. लोकांनीही तसे बनावे यासाठी प्रयत्न करू लागलो. अर्थात प्रयत्न म्हणजे धागे काढून लोकांना सर्वधर्मसमभाव, समता आणि बंधुभावाबद्दल सांगू लागलो. दॅट्स ईट !

अरे हो, तेव्हाच्या घडामोडी पाहता भारत पाक संबंध सुधारावेत आणि क्रिकेट सामने सुरु व्हावेत अशी माझी ईच्छा होती. बरेच जणांची असावी, फक्त मी बोलून दाखवायचो. काही लोकांना ते आवडायचे नाही. माझा राग केला जायचा.
शाहरूख खान हा माझ्या आवडीचा नट होता. आहे. आणि राहील. पण तो केवळ दुसर्‍या धर्माचा आहे म्हणून कोणाला तो आवडत नसेल, आणि या कारणास्तव मी त्याचे केलेले कौतुक कोणाला उकसवणारे वाटत असेल तर त्याचेही मी काही करू शकत नाही.

बाकी तुम्ही वर ज्या लोकांची नावे घेतली त्यातले काही माझ्या फेसबूक फ्रेंडलिस्टमध्ये आहेत तर काही व्हॉटसपग्रूपमध्ये. भले आमचे विचार जुळत नाही पण तरी सर्वांशी छान बोलणे होते. माझ्या मनात तसेही कोणाबद्दल काही नसते, त्यांच्याही मनात माझ्याबद्दल कधी काही आले नाही. त्यातला एक तर माझा जिगरी दोस्त आहे. व्हॉटसपग्रूपवर माझे रोजचे बोलणे होते. त्याला या धाग्याची लिंक पोस्ट करायला आवडेल Happy

वर दिलेली करूण कहाणी वाचून डोळ्यातून पाणी वाहू लागले आहे. आता दोन तीन दिवस जेवण गोड लागणार नाही.
सुपरहीरो असतात ते प्रत्यक्षात एक रूप आणि सुपरहीरो म्हणून दुसरे रूप घेऊन वावरतात. तसं एकीकडे बनियन आणि चड्डी नसलेले चित्र लावून ८७ प्रोफाईल्स आणि दुसरीकडे अमन की आशा द्वारे थोर कार्य करणारा हा मनुष्य कुठल्याही सुपरहीरो पेक्षा कमी नाही.

थोडक्यात मी मानव पृथ्वीकर झालो >>>> म्हणजे बॅटमॅन झालो अशा अर्थाने घ्यायचे आहे ना ?

Lol
जोक्स द अपार्ट, थोर वगैरे कार्य काही नाही. ती माझी पात्रता नाही. मला फक्त धागे काढणे जमतात. मी तेव्हाही तेच करायचो मी आजही तेच करतो. आणि हो. तुम्ही बरोबर ओळखले. मी उद्याही तेच करणार.

येनीवेज, कोणीतरी वर हिंदुत्ववादी विरुद्ध सेक्युलर क्रिकेट सामन्यात (जो मला माहीतही नाही त्यात) मी नव्हतो म्हणत मला त्या पंक्तीत टाकले. म्हणून फक्त क्लीअर केले की मी तर एक निरुपद्रवी धागा काढणारा टीआरपी खेचक सभासद होतो. अभ्यासू लेख, अभ्यासू चर्चा, अभ्यासू प्रतिसाद देणारया दिग्गजांच्या पंक्तीत मला बसवू नका Happy

>> गैरसमज गळून पडले. जातपातधर्मप्रांतप्रदेश यांच्या नावाचे माझ्यावर लागलेले सारे टॅग मी माझ्यापुरते काढून टाकले.
>> त्यासोबत येणार्‍या अभिमान आणि अहंकारातून मुक्त झालो. थोडक्यात मी मानव पृथ्वीकर झालो.
>> Submitted by ऋन्मेऽऽष on 20 June, 2021 - 02:32

?? म्हणजे 'मानव पृथ्वीकर' हा तुमचाच आयडी आहे? (कि माझ्या समजण्यात काही चूक होतेय?)

अरे देवा ! मारली कुर्हाड मी मानव पृथ्वीकर यांच्या पायावर. नाही ते वेगळे आहेत. गैरसमज नको. वर ऑर्कुटच्या मूडमध्ये असे बोलून गेलो. ते सुद्धा होते शेवटच्या काळात वर उल्लेखलेल्या मुक्तपीठ ऑर्कुट समूहावर.

अरे देवा ! मारली कुर्हाड मी मानव पृथ्वीकर यांच्या पायावर. >>>> थोडक्यात मी मानव पृथ्वीकर झालो >>>> म्हणजे बॅटमॅन झालो अशा अर्थाने घ्यायचे आहे ना ? >>>> हे मुद्दाम लिहीले आहे हे तेव्हांच समजले होते. स्वतःच्याच मतांवर उलट सुलट लिहीण्यासाठी घेतलेले विरोधाभासी आयडीज याबद्दल लिहीले असते तर बरं झालं असतं. आता ऋन्मेष हा आयडी खरा झालेला आहे. पण ज्यांना मायबोलीवर कुणीच भेटलेले नाही त्या माझ्यासहीत ब-याच आयडींच्या खरेपणाबाबत शंका आहेत. मी ड्युआयडी आहे.

धागा हिट होण्यासाठी गरजेचे असते ते. दोन्ही आयडींनी एकाच सूरात लिहीण्याची चूक या आधी पूर्वीचे दिग्गज करत होते. वेगवेगळ्या सूरात लिहीण्याची प्रथा पाडणारे महान व्यक्तीमत्व आपल्यात आहे याचा मायबोलीस प्रचंड अभिमान आहे.

ज्या आयडीची विकेट काढायची त्याची बाजू घेणे आणि ज्याला सहानुभूती मिळवून द्यायची आहे त्याच्यावर प्रचंड पण लक्षात येईल अशी भंपक टीका करणे या सेवाही आमच्याकडे मिळतील. Lol
महान व्यक्तिमत्वावर पण हे नुस्खे काहींनी वापरून पाहीले होते. पण मव्यनी त्यांना ड्युआयड्यांच्या जाळ्यात असे गुंगवले की त्यातून ते आयडी डिलीट करून पळाले.

मला मायबोलीकरांपैकी कुणीच भेटलेले नाही. कुणाकुणाला मायबोलीकर भेटले आहेत ?
तु.अ. ला तीन बसभरून मायबोलीकर भेटले आहेत. अजून कोण कोण खरे आहेत ?

मव्यनी त्यांना ड्युआयड्यांच्या जाळ्यात असे गुंगवले की त्यातून ते आयडी डिलीट करून पळाले.>> फारच रंजक दिसते. कधीची घटना आहे ही. काही संदर्भ मिळेल का?

Pages