Vitrogreen अर्थात आमचा रोपांचा व्यवसाय

Submitted by प्रज्ञा९ on 16 June, 2021 - 12:32

नमस्कार, मला आमच्या बागकामाच्या व्यवसायाची माहिती द्यायची आहे. आमचा रोपांचा व्यवसाय आहे. शोभेची झाडं आम्ही विकतो. सविस्तर माहितीसाठी खाली लिंक देत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे काही अडचणी येत आहेत. एखाद्या नर्सरीला आवश्यक ती रोपे पुरवल्यावर त्या रोपांच्या रिकाम्या कुंड्या, आणि पॅकिंग करताना वजन जास्त होऊ नये म्हणून काढावी लागणारी माती/ कोकोपीट यांचा खूप साठा आमच्याकडे आहे जो आम्हाला विकत द्यायचा आहे. साधारण ४" मापाच्या कुंड्या आहेत आणि कोकोपीट, माती आहे. पुण्यात असतो. संपर्कासाठी नंबर देत आहे, इच्छुकांनी कृपया संपर्क करावा. कुठल्या ठिकाणी, कोणते सामान हवे आहे हे ठरल्यावर डिलिव्हरी देण्याचे पर्याय आपण शोधू शकतो. आम्ही सध्या रोपे पाठवण्याची परवानगी असलेल्या ट्रान्सपोर्टर्सची मदत घेऊन नर्सर्‍यांना रोपे देत आहोत. रोपेही अर्थात उपलब्ध आहेत.

६-७ वर्षांपूर्वी आम्ही फुलांशी निगडित व्यवसायाची सुरुवात केली. अनेक लोकांशी बोलून, नवीन गोष्टी शिकून सध्या हे काम चालू ठेवलं आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन, नोकरी, मुलीचा जन्म आणि इतर जबाबदार्या यामुळे माझा थेट सहभाग नव्हता, पण जमेल तसं काम करतेय. मला या कामाबद्दल इथे लिहीताना मात्र खूप आनंद होतो आहे.

चौकशीसाठी - विट्रोग्रीन टिश्यू कल्चर्स, ७५०७८८४०९७
https://vitrogreen.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या नर्सरीत इनडोर्स प्लांटसना खूप मागणी आहे. कारण सोसायट्या आणि ब्लॉक सिस्टममध्ये ही झाडे उपयोगी पडतात. घरी बसल्याने लोकं निरनिराळे छंद वाढवत आहेत.
तुमचा व्यवसाय नक्की वाढेल.

धन्यवाद.

पूर्वी स्वत: टिश्यू कल्चर करत होतो, पण टाळेबंदी झाल्यावर तिथलं काम थांबवावं लागलं. ते चालू असताना साईड बाय साईड इतरही रोपांचा व्यवसाय सुरू केला. आता तो हळूहळू वाढवतोय.