विषय तसा जुनाच आहे, अँगल मात्र नवा आहे.
एक किस्सा घडला गेल्या आठवड्यात, तो अनुभव चार लोकांशी शेअर करावासा वाटतोय.
मी स्वतः अट्टल मांसाहारी आहे. म्हणजे मांस बघून अगदी तुटून पडतो असे नाही. बेतानेच खातो. पण चांगलेचुंगले मिळाले तर रोज खाऊ शकतो. मांसाहाराबाबत सणवार पाळत नसल्याने वर्षाचे ३६५ दिवस खाऊ शकतो. लीपवर्ष असेल तर ३६६ दिवस खाऊ शकतो.
आपल्याकडे असे कुठल्याही दिवशी मांसमटण खाणारे लोकं तसे कमीच आढळतात. कारण का माहीत नाही पण आपण सणवाराच्या दिवशी, एखाद्या देवाच्या वारी, वा मंदीर, देवघर अश्या पवित्र स्थळी मांसाहाराला अपवित्र ठरवत वर्ज्य केले आहे. काही जण असे ठराविक वार पाळतात तर काही जण मांसाहाराला संपुर्णपणेच टाळतात.
अर्थात देवधर्माबाबत ज्याचे त्याचे विचार, सर्वांच्याच विचाराचा आदर करायला हवा.
जोपर्यंंत मी माझ्या घरात काय खातोय यात दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो आपल्या घरात काय खातोय वा काय खात नाही याच्याशी माझेही काही घेणेदेणे नाही.
तसेच जोपर्यंत मी माझे अन्न खात असताना कोणी माझ्या तोंडावर त्या अन्नाला नावे ठेवत नसेल तर त्याचे त्या अन्नाबद्दल काय विचार आहेत याच्याशी मला काही घेणेदेणे नाही.
हेच कोणी हिणवल्यासारखे बोलून दाखवले तर ते खटकते.
पण ते बोलणारे जर एखादी सात वर्षांची मुलगी असेल तर मात्र हसावे की रडावे कळत नाही
तर झाले असे, लेकीची एक मैत्रीण घरी आली होती. सोसायटीतलीच, तिच्याच वयाची. या वयाच्या जवळपास पंचवीस-तीस मित्रमैत्रीणी आहेत लेकीला. आलटून पालटून एका दोघांना पकडून घरात खेळायला घेऊन येतच राहते. नवीन मुलांशी गप्पा मारताना तितकाच आमचाही टाईमपास होतो. त्यांचा अभ्यास कम खेळ चालू होता. मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करता करता त्यांच्यात सहभागी होत होतो. असे कोणी मित्रमैत्रीण आले की आधी आम्ही लेकीसोबत त्यांनाही बिस्कीट, चॉकलेट वगैरे देतो. आणि मग भाजी-चपाती, पुरी, पराठा असे काहीतरी जेवणाचे खाणार असेल तर ते ही विचारतो, जेणेकरून आपली पोरगीही चार घास जास्त खाईल. तर त्या दिवशी आमच्याकडे मासे होते
जगातले सर्वात तीन सुंदर वास सांगायचे झाल्यास पहिला आईच्या पदराचा, दुसरा पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा, आणि तिसरा नव्याकोर्या पुस्तकांचा....
पण हेच जर खाद्यपदार्थांबाबत म्हणायचे झाले तर माझ्याबाबत तरी फिशफ्राय, फिशफ्राय आणि फक्त फिशफ्राय !!
म्हणजे मी पोटभर तुडुंब जेवलेलो का असेना, तव्यावर चरचर असा आवाज करत त्या तळलेल्या मच्छीचा वास नाकात शिरला तर पोटात खड्डा पडायलाच हवा.
म्हणजे ते पिक्चरमध्ये एखाद्या कॉमेडी सीनमध्ये तुम्ही पाहिले असेल की हिरो कुठूनतरी बाहेरून पार्टी करून येतो, पण हे बायकोला सांगायला विसरलेला असतो. तिने ईकडे स्वयंपाकाचा घाट घातला असतो. आणि मग तिचा ओरडा खायला लागू नये म्हणून तो भरल्या पोटी पुन्हा जेवतो.
विनोदाचा भाग सोडला तर हे तितकेसे सोपे नाही. पण मी मात्र प्रत्यक्षात असे कित्येकदा आवडीने केले आहे की बाहेरून चुकून खाऊन आलो आणि घरी आल्यावर कळले की आज जेवणात मस्त हलवा-सुरमई-रावस-पापलेट विथ कोलंबीचे सार आहे तर झोपायचा टाईम पुढे ढकलतो आणि पुन्हा दाबून जेवतो. अगदी आईने सांगावे लागते की जपून, आता पुरे, आणि शेवटी बायकोने हाताचा आधार देऊन ऊठवावे लागते ईतके तुडुंब जेवलेलो असतो.
हे सारे सांगायचा हेतू ईतकाच की मत्स्याहाराशी एक वेगळेच भावनिक नाते जुळले आहे. त्यात तो घरचा, आईचा हातचा असणे म्हणजे जगातले सर्वात मोठे सुख आहे. एरव्ही भाजी चपाती बाबत आनंदीआनंद असलेली माझी पोरेही या तळलेल्या माश्यांच्या वासाने टुण्णकन उडी मारून हातात ताटली घेऊन जेवणासाठी रांग लावतात. स्पेशली पोरगा. आणि या बाबतीत तो पक्का तुझ्यावर गेला आहे हे ऐकणेही एक दुसरे सुख असते.
तर बॅक टू किस्सा,
लेकीची मैत्रीण घरी आली. जेवणाची वेळ झाली. मासे तळायला तव्यावर आले. त्या वासाने घरात चैतन्याचे वातावरण पसरले. मुलं डोलायला लागली. तसे त्या मैत्रीणीलाही विचारले, काय ग्ग, फिश खातेस का तू? देऊ का थोडे चपातीसोबत...
तसे ती उडालीच. हा फिशचा वास आहे. सॉरी सॉरी काकी मला या वासानेच ऊलट्या होतात. मला कसेतरीच होतेय. मी जाते आता. नंतर खेळायला येते. आणि चक्क बघणार्यालाही कसेतरीच वाटावे अश्या पद्धतीने ती याक्क याक्क करत निघून गेली
म्हणजे थोड्यावेळापूर्वी जेव्हा घरभर माश्यांचा घमघमाट सुटलेला तेव्हा तिच्या हे गावीही नव्हते, ज्याक्षणी तिला हे सांगण्यात आले तसे लगेच सायकोलॉजी आपले काम करून गेली आणि तिला मळमळू लागले, किंबहुना हा वास फिशचा आहे तर आता आपल्याला मळमळले पाहिजे असे अंतर्मनाने तिला सांगितले. कदाचित हे घरूनच तिच्या डोक्यात ठसवले गेले असावे की मासे हे याक्क असतात. त्याच्या वासानेही आपल्याला मळमळायला होते. म्हणून आपण ते खात नाही.
आपण शाकाहारी आहोत, मांसाहार करत नाही तर आपल्या मुलांनीही तो करू नये. घरी तर आपण करून देणारच नाहीत, तर बाहेरही त्यांनी करू नये म्हणून कदाचित हे मनात ठसवले गेले असावे.
अर्थात यातही काही गैर नव्हते. आपल्या मुलांनी आपल्यासारखे शाकाहारी व्हावे असे वाटणे आणि तसे प्रयत्न करणे हे स्वाभाविकच आहे.
पण आता माझ्यासमोर प्रश्न होता की ती मुलगी अशी रिअॅक्ट करून गेल्यावर मी माझ्या मुलांना तिचे वागणे कसे एक्स्प्लेन करू? कारण मलाही माझ्या मुलांवर मांसाहाराचे संस्कार करायचे होते. तिची एखादी मैत्रीण शुद्ध शाकाहारी आहे आणि मांसाहाराला याक्क करते या प्रभावाखाली उद्या तिने मांसाहाराचा त्याग केला तर ते मलाही नको होते.
ती गेल्यावर मी माझ्या मुलीकडे हलकेच पाहिले, ती कूल होती. तिने कानाजवळ गोलाकार बोट फिरवत मला ईशार्यानेच विचारले, ही वेडी आहे का?
मी तिला म्हटले, ईट्स ओके. काही लोकांना नाही आवडत मांसाहार. त्याचा वासही सहन होत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे लेकीचेच आजोळ. माझ्या बायकोच्या घरचे सारेच शाकाहारी. लग्नाआधी बायको सुद्धा शाकाहारीच होती. पण त्यांनीच बायकोला सांगितले की लग्नानंतर तुला आवडले आणि जमले तर मांसाहार करायला सुरुवात कर. तिने केली आणि आता एक्स्पर्ट झाली. मुलांबाबतही ते आवर्जून सांगतात की आम्ही तर त्यांना आमच्याघरी देऊ शकत नाही, पण तुम्ही जरूर द्या. त्यामुळे लेकीला त्यांचेच उदाहरण देऊन समजावले की या जगात काही लोकं शाकाहारी असतात तर काही मांसाहारी. ज्याची त्याची आवड. यात कोणी चूक वा बरोबर नसते. कोणी योग्य वा अयोग्य नसते. जसे आपल्यातच एका घरातले सारे नॉनवेज खातात आणि एका घरातले वेजच खातात. पण दोन्हीकडची माणसे चांगलीच आहेत ना. तर यात भेद करण्यासारखे काही नसते. कोणाला पिंक कलर आवडतो, तर कोणाला ब्ल्यू कलर आवडतो, ईतके सिंपल आहे हे.
आता हे मुलीच्या मनावर कितपत ठसले याची कल्पना नाही. पण दुसर्या दिवशी विचार करून मुलगी मला म्हणाली, पप्पा नॉनवेज खाणारे फार लकी असतात.
मी विचारले, का?
तर म्हणाली, जे वेज खातात ते फक्त वेजच खातात, आणि जे नॉनवेज खातात ते वेज आणि नॉनवेज दोन्ही खाऊ शकतात
म्हटले वाह, मांसाहाराचे संस्कार करायला यापेक्षा छान कारण असू नये
- ऋन्मेष
आजच्या काळात मांसाहार
आजच्या काळात मांसाहार नैसर्गिक की अनैसर्गिक हा मुद्दा विचित्र नाही वाटत का? चालण्यास वाहन वापरणे नैसर्गिक की अनैसर्गिक? डोळ्यावर गॉगल लावणे नैसर्गिक की अनैसर्गिक? कपडे घालणे नैसर्गिक की अनैसर्गिक?
असा वाद सुद्धा घालता का?
रहाता राहिला प्रश्न मानव मूळ शाकाहारी, मग काही कारणामुळे मांसाहारा कडे वळला, की मूळ मिश्राहारी हा अकादमीक प्रश्न असू शकतो. तर आपली रचना मुख्यत्वे शाकाहारी पण मांस पण चालून जाईल अशी असावी.
आपण मुख्यत्वे मांसाहारी होतो आणि शेतीचा शोध लागल्यावर शाकाहारही करू लागलो हे पटत नाही.
आपल्याला मांसाहारा सोबत भरपूर शाकाहार करणे गरजेचे आहे. मांसाहार रोजचा असो की अधुन मधून असो.
लोक उगाच शाकाहारवादी / मांसाहारवादी बनतात, एकमेकांना कमी जास्त लेखण्यास आणि खिजवण्यास/ हिणवण्यास, त्यात त्यांना कसलासा आनंद मिळतो. ऋन्मेष यात मोडतो.
चोथा विषय आहे, कितीही चघळले तरी चोथ्या शिवाय काही निघणार नाही.
एवढे बोलून आज मेथी चिकन ऑर्डर करतो.
मेथी चिकन >>>>>>> इकडे
मेथी चिकन >>>>>>> इकडे कोरिएन्डर चिकन मस्त मिळते. मेथी चिकन कधी खाल्ले नाही.
बाकी तिकडे ग्लोबल वार्मिंग
बाकी तिकडे ग्लोबल वार्मिंग तज्ञ प्राण्यांचे मांस खाणे कमी करा असे ओरडून सांगत आहेत. ते शाकाहारवादी नाहीत, सी फूड, पोल्ट्री ठीक आहे पण प्राण्यांच्या पशुधनशेतीमुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या ~हासामुळे ते असे सांगतात. त्यात दुधासाठी पशुधन शेतीही मोडत असेल.
तेव्हा मांसाहाराचे संस्कार करताना हा मुद्दा सुद्धा शिकवा.
मानव, तुमची ९.२२ची पोस्ट मस्त
मानव, तुमची ९.२२ची पोस्ट मस्त आहे.
कृत्रिम मांस बनवणं स्वार्थी
कृत्रिम मांस बनवणं ज्यांचा उद्योग आहे त्या स्वार्थी लोकांची ती जाहिरात आहे .पशुधन मुळे कार्बन उस्तर्जन जास्त होते.विकत घेतलेले तज्ञ आहेत जे सांगत आहेत
ह्या पृथ्वी वर जे काही नैसर्गिक आहे मग प्राणी असतील किंवा वनस्पती त्यांनी निसर्गाला बिलकुल हानी पोचत नाही.
मिथेन उत्सर्जनासोबतच पशुधन
मिथेन उत्सर्जनासोबतच पशुधन शेतीसाठी, त्यांच्या खाद्यासाठी, जंगल तोड करुन व्यापली जाणारी जागा, लागणारे पाणी असे चक्र आहे ते.
एकूण शेत जमिनी पैकी 75% जमीन ही पशुधन शेतीसाठी वापरली जाते (पशु रहाण्याची आणि पशुखाद्य शेतीची जागा)
समजा सगळी मानवजात शाकाहाराकडे
समजा सगळी मानवजात शाकाहाराकडे वळली तर पुरेसे धान्य भाजीपाला उपलब्ध होईल का?
उद्या अचानक सगळ्यांनी
उद्या अचानक सगळ्यांनी शाकाहारी / मांसाहारी बनतो म्हटलं तर भाज्या / मांस पुरणार नाही. हळूहळू सगळे शाकाहारी बनतो म्हटलं तर तेवढी शेतजमीन आहे का? तर हो. आता ७५% पशुधनशेती जमीन आहे ती या कामात येईल आणि कदाचित उरेलही.
पण हे हायपोथेटिकल प्रश्न आहेत. शाकाहारवादी / मांसाहारवादी आपापले समर्थन करायला अशा पुड्या सोडत असतात.
कुणीही इतरांना भाज्या-धान्य कमी पडतील म्हणुन मांसाहार करत नाही की कुणी इतरांना मांस कमी पडू नये म्हणून शाकाहार करत नाही.
असे दुसऱ्यावर उपकार करण्याची भावना ठेवून आपला आहार ठरवुही नये.
पण सध्याची लोक संख्या आणि पर्यावरण लक्षात घेता कुणावर उपकार करण्यासाठी नव्हे तर स्वतःसाठीच (पृथ्वीवरही उपकार करण्यासाठी नव्हे तर आपण आणि आपल्या सख्ख्या पोरा बाळांसाठीच) बहुत करून आपल्याला प्राण्यांचे मांस कमी करावे लागू शकते.
आजच २ ड्रेस्सड चिकेन घेतले.
आजच २ ड्रेस्सड चिकेन घेतले. लॉकडाऊन मुळे मिळतही नाहीत अन पुढे १५ दिवस मिळतील याचीही शस्वती नाही.. म्हणुन दोन घेतले. मागिल महिन्यात ऑव्हन खरेदी केला होता त्यात घास-फुस भाजून खावं लागलं होतं... आज तंदूर चिकन पार्टि..!!!
उरलेलं एक चिकन मॅरिनेट करून फ्रीजात ठेवलं की उद्या-परवा लहर आली की बिर्याणी..!!
धागा कर्त्या बद्दल झालेले
धागा कर्त्या बद्दल झालेले काही गैरसमज दूर करू ईच्छितो
१) गैरसमज - धागाकर्ता मांसाहारी आहे
सत्य - धागाकर्ता मिश्राहारी आहे.
२) गैरसमज - धागाकर्ता शाकाहारी लोकांना हिणवतो वा हलके लेखतो.
सत्य - धागाकर्ता खा आणि खाऊ द्या. जगा आणि जगू द्या या तत्वाचे पालन करतो.
३) गैरसमज - धागाकर्ता रोज मांसाहार करतो.
सत्य - धागाकर्ता वर्षाचे ३६५ दिवस कुठलाही सणवार न बघता खाऊ शकतो याचा अर्थ ३६५ दिवस रोजच खात नाही. जेव्हा ईच्छा आणि ऊपलब्धता असेल तेव्हाच खातो.
४) गैरसमज - धागाकर्ता मजबूत मांसाहार करतो.
सत्य - धागाकर्ता मासे असल्यास मजबूत जेवण करतो. ते चपाती भात दाबून जेवतो. मात्र माश्याची एखाद दुसरी तुकडीच त्याला पुरते. धिस ईज द ब्यूटी ऑफ धागाकर्ताज मांसाहार
आरक्षणाबाबतच्या एका
वरील काही प्रतिसादांवरून आरक्षणाबाबतच्या एका मतप्रवाहाची म्हणजे त्यातल्या समांतर तर्क आणि मांडणीची आठवण झाली. ' तुम्ही राखीव क्षेत्रात आहात तर मुक्त जनरल प्रवर्गातून अर्ज करायचा नाही'
मांसाहार करीत असलात तर शाकाहार अजिबात करायचा नाही.
ऋन्मेष, दारू पिणे नैसर्गिक की
ऋन्मेष, दारू पिणे नैसर्गिक की अनैसर्गिक
Submitted by हर्पेन on 2 June, 2021 - 07:52
>>>>
हा प्रश्न त्यांना विचारा ज्यांनी मांसाहाराला अनैसर्गिक म्हटले.
मी नैसर्गिक अनैसर्गिक असे भेद न करता योग्य की अयोग्य, चांगले की वाईट, चूक की बरोबर ईतकेच बघतो.
मुळात मलाच अजून उत्तर मिळाले नाही की हे नैसर्गिक काय असते. जे आदिमानव वा माकडे करायची ते नैसर्गिक असा मजेशीर मतप्रवाह वर बघायला मिळाला. ते पाहता आपण कपडे न घालता नागडेच.. सॉरी नैसर्गिक अवस्थेतच फिरायला हवे ना
(No subject)
>>आपल्याला मांसाहारा सोबत
>>आपल्याला मांसाहारा सोबत भरपूर शाकाहार करणे गरजेचे आहे.
(अवाक झालेली एस्किमो बाहुली)
बरं मग ऋन्मेष, दारू पिणे
बरं मग ऋन्मेष, दारू पिणे नैसर्गिक की अनैसर्गिक असा भेद न करता सांगा,
दारु पिणे
योग्य की अयोग्य?
चांगले की वाईट ?
चूक की बरोबर?
सॉरी नैसर्गिक अवस्थेतच
सॉरी नैसर्गिक अवस्थेतच फिरायला हवे ना H
काही हरकत नाही चालू करा नैसर्गिक अवस्थेत नैसर्गिक जागेत फिरू शकता.जिथे माणसाचे अनैसर्गिक कायदे लागू नाहीत.
दारु पिणे
दारु पिणे
योग्य की अयोग्य?
चांगले की वाईट ?
चूक की बरोबर?
>>>
या प्रश्नाचे उत्तर खरेच अनुत्तरीत आहे का?
मी मांसाहार करतो. माझ्या मुलांनाही देतो.
दारूबाबत हेच आपल्याकडे होत नाही. म्हणजे दारू योग्य की अयोग्य याचे ऊत्तर दारू पिणारेच देतात.
मुळात हि तुलना का करावीशी वाटली? तुम्ही दारूच्या उदात्तीकरणाचे समर्थन करता? कि तुम्हाला मांसाहाराचा विरोध करायचा आहे?
या प्रश्नाचे उत्तर खरेच
या प्रश्नाचे उत्तर खरेच अनुत्तरीत आहे का? >>>
हो रे अजूनही अनुत्तरीत आहे.
वर अजून मलाच वाढीव प्रश्न विचारतोय्स
हो रे अजूनही अनुत्तरीत आहे.
हो रे अजूनही अनुत्तरीत आहे.
>>>
ओके मग नवीन धागा काढून शोधूया
मी माझे मत मांडतो लोकं आपले मांडतील
तसेही माझे दारूकडे बघायचा दृष्टीकोण थोडाफार बदलला आहे मधल्या काळात आणि विचारही पॉलिश झालेत.
ऋनमेश ला स्वतःच्या मतावर च
ऋनमेश ला स्वतःच्या मतावर च आत्म विश्वास नाही.
दोन वेळा हर्पेन ह्यांनी प्रश्न विचारला तरी उत्तर देत नाही
सिरीअसली! त्या माझ्या
सिरीअसली! त्या माझ्या पोस्टमधून माझ्या त्या प्रतिप्रश्नांमधून तुम्हाला नाझे ऊत्तर कळले नाही.
म्हणूनच स्वतंत्र धागा गरजेच आहे
राहिला प्रश्न आत्मविश्वासाचा
राहिला प्रश्न आत्मविश्वासाचा तर कधीच तो आपल्या विचारांवर, मतांवर असू नये. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. जर आपल्याच मतावर विचारांवर पुर्ण विश्वास ठेवला तर ते फार रिजिड होऊन जातात.
यावरही एक स्वतंत्र लेख लिहायला आवडेल.
यावरही एक स्वतंत्र लेख
यावरही एक स्वतंत्र लेख लिहायला आवडेल.
Submitted by ऋन्मेऽऽष on 2 June, 2021 - 22:43
ऋन्मेऽऽष भाऊ
आता तुम्ही एक छानसा लेख लिहाच
मांसाहाराचे संस्कार करायचे
मांसाहाराचे संस्कार करायचे आहेत म्हणजे काय करायचे आहे ?. तुझ्या मुलीने मांसाहाराचा त्याग करायला नकोय ना तुला ? मग नाही करणार ती . कारण मैत्रीण गेल्यानंतर तिने इशारे करून तुला सांगितले ना . " वेडी आहे का ती ? म्हणून. मग विषयच संपला . त्याच्या करता धागा ?
धिज पोस्ट ऑलमोस्ट किल्लड मी
धिज पोस्ट ऑलमोस्ट किल्लड मी
एक धागाकर्ता म्हणून माझेच अपयश समजतो हे...
प्रश्न माझ्या मुलीचा वा तेवढाच नाही. प्रश्न प्रत्येक त्या पाल्याचा आहे ज्यावर आपण आहाराबाबत, स्पेशली शाकाहार आणि मांसाहाराबाबत आपली मते लादतो.
मला त्या मुलीबद्दलही वाईट वाटले जे तिला स्वत:ला ठरवू देण्याअगोदर मांसाहार म्हणजे काहीतरी अधार्मिक, अपवित्र, अनैसर्गिक आहे असे तिच्या मनात बिंबवले गेले.
ज्याप्रमाणे जातीधर्माची कट्टरता मुलांच्या मनात बिंबवू नये तसेच आहाराबाबतही हे पाळायला हवे असे मला वाटते. आपलेही यावर विचार वाचायला आवडतील.
पण याच बरोबर स्वतःच्या
पण याच बरोबर स्वतःच्या मुलांवर काय बिंबवायचे हा प्रश्न त्या त्या पालकांचा नाही का ? Why are you judging ???
पण याच बरोबर स्वतःच्या
पण याच बरोबर स्वतःच्या मुलांवर काय बिंबवायचे हा प्रश्न त्या त्या पालकांचा नाही का?
>>>>
सर्व बाबतीत हे जनरलायझेशन नाही करू शकत.
उद्या कोणी आपल्या मुलाला कट्टर जातीयवादी वा अगदी ईतर धर्मांचा द्वेष करायला शिकवून दहशतवादी बनवत असेल तर तेव्हाही आपल्या मुलांचे काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणावे का?
जर कोणी पालक मुलामुलीमध्ये भेद करून त्यांना पार्शिअल वागणूक देत असतील तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न समजावे का?
काही गोष्टीत आपण हस्तक्षेप करू शकतो, काहीत नाही. पण योग्य अयोग्य काय यावर आपले मत जरूर व्यक्त करू शकतो.
जसे की त्या थ्री ईडियटसमध्ये दाखवल्याप्रमाणे एखादा बाप मुलांच्या मर्जीविरुद्ध त्याला ईंजिनीअरींग करायला लावत असेल तर आपला त्यात हस्तक्षेप करायचा अधिकार नसेल पण त्यालाही आपण अयोग्य आहे हे असे म्हणतोच ना..
काही वेळा आईबाप आपल्या मुलांचे भलेच बघत असतात आणि त्यानुसार आपले विचार त्यांच्यावर लादत असतात.
पण काही ठिकाणी भल्याबुरयाचा काही संबंध नसतो बस्स आपले विचार लादत असतात.
त्यामुळे कश्याचेच जनरलायझेशन नाही करता येणार. केसवाईज ते समजून ऊमजून घ्यायला हवे.
कट्टर शाकाहारी असलेल्या घरात
कट्टर शाकाहारी असलेल्या घरात कट्टर मांसाहार करणारी मुल असतात.
सज्जन आई वडील असतील तर त्यांची मुल अट्टल गुन्हेगारी वृत्ती ची असतात.
आई वडील शिकवतात तेच मुल शिकतात हे पहिले डोक्यातून काढून टाका.
आई वडील जे संस्कार करतात त्याचा प्रभाव वयाच्या आठ ,दहा वर्ष पर्यंत च टिकतो.त्या नंतर मित्र, समाज अशा घटकांचा प्रभाव चालू होतो आणि तो जास्त प्रभावी असतो.
मांसाहारी संस्कारात, शाकाहार
मांसाहारी संस्कारात, शाकाहार हा जास्त सस्टेनेबल, कार्बन फुटप्रिंट कमी असलेला आहे. मांसाहार हा ग्लोबल वॉर्मिग जास्त वाढवतो हे शिकवता का त्यात सोयीस्कर पळवाटा काढून बोलणे टाळता?
Global वॉर्मिग कशा मुळे होत
Global वॉर्मिग कशा मुळे होत आहे हे तर पाहिले कन्फर्म होवू ध्या .ह्या विषयात गृहितक च जास्त आहेत.
त्या पेक्षा वायू प्रदूषण हा विषय जास्त गंभीर आहे.
पृथ्वी चे वातावरण बदलत जाणे हि पण एक निरंतर चालत असलेली प्रक्रिया असावी .
मानवी हस्तक क्षेपामुळे ती वेगाने होत आहे का ?
आणि हा वेग किती जास्त आहे?
रवंथ करणारे प्राणी हे निसर्गाचा हिस्सा आहेत त्यांना जबाबदार धरता येणार नाही .
Pages