निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसे आहात सगळे? खुप महिन्यांनी आलेय. मोबाईलवरुन नीट जमत नव्हत मायबोलीवर यायला आणि आ‌‌ॅफिसमध्ये माबो बॅन आहे त्यामुळे यायलाच होत नाही. पण आज प्रकर्षाने आठवण आली मायबोलीची आणि हा लाडका पेज उघडला.

jagu tai u r back after a long time. (What a pleasant birthday gift for me) Happy

हे घे खास तुला
IMG_20210323_181159.JPG

अरे वाह जागू ताई, आता नियमित येत जा. तू नाहीस तर निसर्ग गप्पांचा धागा शांत शांत असतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मनिम्याऊ.

हो रचना येईन.
मनीम्याऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मनिम्याऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जागुताई, वेलकम बॅक.
मनीम्याऊ, वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आमच्या सोसायटीत मी बिया पेरून उगवलेले पपईचे रोप सगळीकडे लावले होते. आता ते वाढले आहेत. फुलं येऊ लागली आहेत. पण सगळ्या वॉचमन लोकांनी मिळून फुलं आलेल्या झाडांच्या बुंध्यात लाकडाची एक वीत दीड वीत लांबीची ढलपी पाचरीसारखी आर पार ठोकण्याचं काम चालवलं आहे. त्यांच्या मते पपईला फुलं येऊ लागली की हे असं करावंच लागतं. नाहीतर फळं धरत नाहीत.
हे खरं आहे का?

फुलं आलेल्या झाडांच्या बुंध्यात लाकडाची एक वीत दीड वीत लांबीची ढलपी पाचरीसारखी आर पार ठोकण्याचं काम चालवलं आहे. त्यांच्या मते पपईला फुलं येऊ लागली की हे असं करावंच लागतं. नाहीतर फळं धरत नाहीत.
हे खरं आहे का?>>
हा प्रकार मी तरी नवीनच ऐकते आहे. ( आमची पपईची बाग आहे. व्यावसायिक उत्पादन)

नाहीतर फळं धरत नाहीत.
हे खरं आहे का?....... अजिबात नाही.आईकडच्या झाडाला भल्यामोठ्या पपया आल्या.

हिरा, ssj धन्यवाद. मी ही मिस केले.
किट्टू फणस छानच.

पपयी च्या झाडाच हे मी नचिनच ऐकतेय. अस कधी ऐकीवात आल नाही.

आमच्याकडे मोगऱ्यातल्या (जस्मिन, jasmine) एका प्रकाराचे अतिशय सुगंधित फुले येणारे झाड आहे. त्याचे नाव मला आठवत नाही. शुभ्र अशी चांदणीसारखी पाच रुंदट पाकळ्यांची फुले संध्याकाळी उमलतात. गोडसर सुगंधाचा घमघमाट सुटतो. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मलूल होतात.IMG-20210526-WA0026.jpgIMG-20210526-WA0027.jpgIMG-20210526-WA0028.jpg

रूपाली , जागुताई धन्यवाद.
पण वादळात बरेच फणस पडून गेले. काप्या फणसाला पण खूप लागलेले यंदा, ते पण पडले. हा फोटो आदल्याच दिवशी काढला होता.
@ हिरा , ती कामिनीची फुलं लिंबाच्या कुळातली वाटतात.

फॅमिली rutaceae ही एक खूप मोठी फॅमिली आहे. त्यात Citrus अर्थात् लिंबूवर्गीय species प्रमुख आहेत पण murraaya ही देखील species महत्त्वाची आहे. एकाच फॅमिलीतले असल्यामुळे दोन्ही स्पेशीजमध्ये थोडे फार साम्य जाणवते. murraaya मध्ये बहुधा संयुक्त पाने असतात. लिंबूवर्गीय वनस्पतीत काही वेळा काटे असतात आणि पर्णदलांचे देठ winged असतात.
किट्टू, फणसाचे झाड मस्तच. केवढे ते फणस लगडलेत!

Rutaceae कुळातील वनस्पतींच्या पानांवर तैल ग्रंथी असतात. तसेच फुलाच्या देठाजवळ एक disc असते. पाकळ्या ४ते ५ असतात व शक्यतो पांढऱ्या रंगाच्या.

छान माहिती ऋतुराज व हीरा.
हा धागा स्ट्रेस बस्टर आहे, फोटो बघून व माहिती वाचून निवांत वाटतं. Happy

कमळ
IMG_20210630_081518.JPG

हे उंचीच्या अंदाजा साठी
IMG_20210630_081004_0.JPG
थंबलिना
IMG_20210630_081159.JPG

मनिम्याऊ असे जमिनीच्यावर इतका उंच देठ असलेले कमळ प्रथमच पाहिले. पाण्याच्या कुंडात लावले आहे का ते? आणि ती थंबलिना, फुलपाखरू आणि लेक सारेच गोड.

कमळ लावण्यासाठी खास टाके बनवून घेतले आहे. जे 6 * 6 *6 फूट आकाराचे आहे. फोटोतल्या फुलाचा दान्डा पाण्याखाली 6 फूट आणि पाण्यावर 4 फूट आहे. उन्हाळ्यात यापेक्षाही उंच फुले येतात

Pages