2 महिन्याखाली माझ्या वडिलांचे आणि सासूबाईचें करोनाने निधन झाले.एकाच वेळी दोन जवळच्या व्यक्तींच्या मायेला आम्ही पारखे झालो.असं माझ्यासोबत का झालं, एकदाच दोन मोठे आधार जाण्यासारखं मी काय पाप केलं? असे अनेक प्रश्न डोळ्यातल्या पाण्यासोबत येऊ लागले. सांत्वनाचे बरेच फोन आले. बऱ्याच नातेवाईकांनी चौकशी वजा सांत्वन करत त्यांच्याही नकळत नवीन शंका व्यक्त केली .उदा. काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाची मुंज झाली होती तर काहीजणांनाच म्हणणं होतं मुंजीला दृष्ट लागली असेल किंवा मुहूर्त चांगला नसेल, हॉस्पिटल बदलायला हवं होत किंवा योगायोग असं अजून काही काही…..
एकामागून एक जवाबदारी आमच्या दोघांवर पडत गेली, दुःख करत बसण्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्वीकारणे भाग पडले.पण काही प्रश्न तसेच आहेत, खूपदा वाटत बाबांना माझी आठवण येत असेल का? की देह सोडल्यावर सगळ्या भावना नष्ट होतात? ते मला रोज सकाळी फोन करायचे आता त्यांना सकाळी माझ्याशी बोलावंसं वाटत असेल का ? दुसरा जन्म लगेच मिळतो का? का असं काही नसतं?
माझ्या सासूबाईचा घरात, माझ्या मुलांमध्ये खूप जीव होता, आता आम्ही गावाकडच्या घरी आहोत तर सासूबाईंना आमच्यात यावं वाटत असेल का? मी मुलांना रागावलेलं त्यांना आवडत नसे, आताही मी मुलांना रागावल्यावर त्यांना त्रास होत असेल का? की हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात?
असं म्हणतात आपले आधार गळून पडू लागले की समजायचं आपण दुसर्यांचा आधार व्हायची वेळ आली आहे,खरंच आहे. किती कमाल असते नियतीची,बघता बघता डोळ्यासमोरचा माणूस निर्जीव होतो, किती तरी गोष्टी नंतर बोलायच्या सांगायच्या राहून जातात ज्या त्याच व्यक्तीसाठी असतात. खरंतर खूप जण म्हणतात आम्ही आहेत तू एकटं नको वाटून घेऊ पण त्या गेलेल्या व्यक्तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अगदी आता आई सुद्धा बाबांची जागा घेऊ शकत नाही.
जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हे माझ्यासाठी नवीन असलं तरी जगासाठी जुनंच आहे, दर मिनिटाला कितीतरी लोक मरत असतात जन्म मृत्यू हा तर नियमच आहे. आपण मात्र जाणाऱ्याच कारण शोधत बसतो हॉस्पिटल बदललं असत तर वाचले असते का? दुसऱ्या मोठ्या शहरांत शिफ्ट केलं असत तर? कोणामुळे झाला असेल करोना? अगदी मी तर माझ्या सासूबाई माझी मुलगी जेवत नव्हती तेव्हा सहज म्हणाल्या होत्या तिला की , “अवनी तू फार त्रास देत आहेस आता तू पुढच्या वेळी आली ना की तुला मी घरात दिसणार नाही मी पिशवी घेऊन कुठंतरी दूर जाणार आहे, “आणि लगेच माझी मुलगी जेवू लागली पण वास्तूपुरुष तथास्तु म्हणतो म्हणतात त्या प्रमाणे आम्ही परत आलो तेव्हा त्या घरात नव्हत्या फार दूर देवाकडे निघून गेल्या होत्या आता वाटत त्या असं बोलल्या नसत्या तर…असे बरेच विचार मनात येऊन जातात पण या सगळ्याचा काहीच फायदा नसतो जे व्हायचं असत ते कशानेच थांबत नाही. या मनस्थितीत खूप जण चौकशी करत होते की आम्ही पुढे आता काय करणार, कुठे आहात अजून गावाकडेच का? घर भाड्यानी देणार की विकून टाकणार? असे अनेक प्रश्न आमच्या आधी त्यांना पडलेले होते. काही मात्र खूप आपुलकीनी बोलत होते. करोना मुळे कोणीही घरी येऊ शकत नव्हते.
आम्ही दोघे नवरा बायको 15 दिवस नुसतं एकमेकांकडे बघत होतो कारण बोलण्यासाठी शब्दच नव्हते माझे वडील गेलेले आणि त्यांची आई, आम्ही सारख्याच मनस्थितीतुन जात होतो, आम्हाला ही करोना होऊन गेल्यामुळे प्रचंड शारीरिक ताण,12 तास प्रवास केल्यामुळे शीण , अनपेक्षित पणे वडिलांच्या आणि सासूबाईंच्या जाण्यामुळे आलेला मानसिक ताण दोघांमध्ये सारखाच होता. पण थकून रडून चालणार नव्हतं, दोन लहान मुलं करोनातून नुकतेच नीट झालेले सासरे यांची काळजी आम्हाला घ्यायची होती. सासूबाईंचे सर्व विधी पार पडायचे होते, जसं जमेल तस आम्ही दोघे सर्व करू लागलो.
माहेरी ही असच काहीस चालू होत वडील गेले त्या दिवशी आईचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला वडिलांना अग्नी देऊन भाऊ तासाभरातच आईसाठी बेड मिळतो का हे बघत हॉस्पिटल मध्ये विचारू लागला तेव्हा आमच्या गावात करोना वाढल्यामुळे बेड मिळण कठीण झालं होतं . आई घरात नसताना भावाने एकट्याने 93 वर्षाच्या आजी ला सांभाळत सगळे विधी केले. मी माझे पती आणि भाऊ रडणं, वाईट वाटणया सगळ्याच्या किती तरी पली कडे गेलो होतो. सजीव रोबोट सारखं आम्ही सगळं करत होतो डोकं तेवढं सुन्न झालं होत. गोडजेवणाच्या दिवशी माहेरी जाताना गाडी जेव्हा कॉलनीकडे वळली तेव्हा मन खूप जड झालं होतं. घर तसंच होतं पण गेटवर मी आले म्हणून आई ला लवकर ये लवकर ये म्हणून हाका मारणारे बाबा नव्हते. माझी माय आली म्हणायला कोणी नव्हतं भकास जीव घेणी शांतता होती.
आता आम्ही सावरलो आहोत हळूहळू जमत आहे सगळं हाताळायला. आपल्या आधीच्या पिढ्यानीही असच गिळून टाकलं असेल दुःख…..हेच चालू राहणार…,…… पिठ्यामागून पिठ्या बदलत जाणार. काळ कोणासाठीच थांबत नाही show must go on सारखं होऊन जात आयुष्य, आपल्या आधीच्या पिढी सारखं आपणही पचवतो सगळं आणि चालू लागतो पुढे………..
_/\_
_/\_
भावना अगदी पोचल्या! खूप वाईट
भावना अगदी पोचल्या! खूप वाईट वाटलं.
Big hug
Big hug
एवढं मोठं दुःख तुम्ही मोठ्या
एवढं मोठं दुःख तुम्ही मोठ्या धीराने घेतलं आहे हे जाणवतं आहे. तुमचं हे बळ कायम राहो!
बाकी आपल्याला कोणत्याही तर्काने जस्टिफाय करता येत नाहीत या गोष्टी तरीही मन तर्क करीत राहतं मरणकल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा! तुमच्या वडिलांना आणि सासुबाईंना श्रद्धांजली __/\__
कठीण काळ. लिहून थोडंफार
कठीण काळ. लिहून थोडंफार मोकळ्या झालात हे उत्तम. अचानक अंगावर आलेलं दु:ख कमी होण्यास वेळ लागेल. तुम्हाला एकमेकांच्या आधारानं यातून तरून जाण्याचे बळ लाभो.
कठीण काळ. लिहून थोडंफार
कठीण काळ. लिहून थोडंफार मोकळ्या झालात हे उत्तम. अचानक अंगावर आलेलं दु:ख कमी होण्यास वेळ लागेल. तुम्हाला एकमेकांच्या आधारानं यातून तरून जाण्याचे बळ लाभो.>>>>>+१११ स्वतःची आणी कुटुंबाची पण काळजी घ्या.
Kashvi, तुमच्या भावना
Kashvi, तुमच्या भावना पोहोचल्या. लेख वाचून सुन्न झाले. तुम्हाला किती धक्का बसला असेल याची कल्पना करणे कठीण. यातून तुम्हाला सावरायचे बळ मिळो. इथे लिहिले ते बरे झाले. थोडे तरी मोकळे वाटेल.
कठीण काळ. लिहून थोडंफार
कठीण काळ. लिहून थोडंफार मोकळ्या झालात हे उत्तम. अचानक अंगावर आलेलं दु:ख कमी होण्यास वेळ लागेल. तुम्हाला एकमेकांच्या आधारानं यातून तरून जाण्याचे बळ लाभो. >>>>+१०८
इथे लिहिलंत ते बरं केलंत.
इथे लिहिलंत ते बरं केलंत. साचलेल्या भावनांचा प्रवाह मोकळा झाला. काळ कुणासाठी थांबत नाही. नित्याची कामे करावीच लागतात आणि सक्तीने का होईना दुःखाला दूर पिटाळावे लागते. थोडा वेळ लागेल पण एकमेकांच्या साथीने ह्यातून तरून जाण्याचे बळ तुम्हांला मिळेल, ते मिळो हे प्रार्थना
Hmm.. Must be difficult for u
Hmm.. Must be difficult for u !!! Take care!
परमेश्वर तुम्हाला ह्यातून
परमेश्वर तुम्हाला ह्यातून सावरायला बळ देवो ही प्रार्थना.
(No subject)
कठीण काळ. लिहून थोडंफार
कठीण काळ. लिहून थोडंफार मोकळ्या झालात हे उत्तम.>> +1
तुम्हा सर्वांना लवकर सावरायचं बळ मिळो !!
वाईट वाटलं वाचून. मी सुद्धा
वाईट वाटलं वाचून. मी सुद्धा नुसती कल्पनाच करु शकते.माझी धाकटी बहीण ह्या परिस्थितीतून जातेय. १८ एप्रिलला तिचा नवरा गेला. मला हे लिहीतानाही इतकं विचीत्र , क्रूर वाटतंय. त्या सगळ्यांना करोना झाला. आम्ही तिला परवा भेटलो. तसं रोज व्हिडिओ कॉल करतो तिला बोलतं ठेवायचा प्रयत्न करतो. पण एका पॉईंट ला सगळं फोल वाटतं
धनुडी
धनुडी
कधी हे सगळं संपेल कुणास ठाऊक!
म्हणजे आम्ही काय सांत्वन
म्हणजे आम्ही काय सांत्वन करणार तिचं
खरं आहे, शब्द अपुरे पडतात.
खरं आहे, शब्द अपुरे पडतात.
Kashvi,
Kashvi,
हे सगळं लवकर संपुदे हीच प्रार्थना.
kashvi...काळजी घ्या .इथे
kashvi...काळजी घ्या .इथे लिहून मन मोकळं केले ते खूप बरं झालं..हे ही दिवस जातील..
खूप वाईट वाटलं..तुम्हा
खूप वाईट वाटलं..तुम्हा सर्वांना लवकर सावरायचं बळ मिळो !! >>+1
कठीण काळ. लिहून थोडंफार
कठीण काळ. लिहून थोडंफार मोकळ्या झालात हे उत्तम. अचानक अंगावर आलेलं दु:ख कमी होण्यास वेळ लागेल. तुम्हाला एकमेकांच्या आधारानं यातून तरून जाण्याचे बळ लाभो . +१
कठीण काळ. लिहून थोडंफार
कठीण काळ. लिहून थोडंफार मोकळ्या झालात हे उत्तम. अचानक अंगावर आलेलं दु:ख कमी होण्यास वेळ लागेल. तुम्हाला एकमेकांच्या आधारानं यातून तरून जाण्याचे बळ लाभो . +१
ह्या कठीण समयी मन कोलमडून जाणे, सैरभैर होणे सहज शक्य असले तरी जाणीवपूर्वक आपल्या मनःशक्तीवर सुद्धा दृढ विश्वास असू द्या. आपले मन समुद्रासारखे असीम आणि अथांग आहे आणि अनेक वादळे सोसूनही संयत राहण्याची त्याची मूलप्रवृत्ती आपले आणि आपल्यांचे जीवन पुन्हा सुरळीत करेल.
समा जाये ईसमे तूफान
जिया तेरा सागर समान
खरेच तो फार अवघड काळ असावा.
खरेच तो फार अवघड काळ असावा. ज्यांचे अस्तित्व आपल्याला जेवढा आनंद देते, त्यांचे नसणे तेवढाच त्रास देते. हेच आयुष्य आहे.
यातून अवघड काळ लवकर सरून शीर्षकात म्हटल्याप्रमाणे शो मस्ट ऑन प्रमाणे आपले आयुष्य सुरळीत चालू व्हावे याच सदिच्छा..
कठीण काळ. लिहून थोडंफार
कठीण काळ. लिहून थोडंफार मोकळ्या झालात हे उत्तम. अचानक अंगावर आलेलं दु:ख कमी होण्यास वेळ लागेल. तुम्हाला एकमेकांच्या आधारानं यातून तरून जाण्याचे बळ लाभो.>> +१
भावना पोचल्या अगदी. खरच कठीण
भावना पोचल्या अगदी. खरच कठीण काळ. पण काळ हेच औषध.
सावराचयं बळ मिळो तुम्हाला.
काय बोलू कळत नाही
काय बोलू कळत नाही
यातून सर्वांना सावरता यावं हीच सदिच्छा.धीराने घ्या.
परमेश्वर तुम्हाला यातून
परमेश्वर तुम्हाला यातून सावरायला बळ देवो ही मनापासून प्रार्थना. काळजी घ्या.
वाईट वाटले. सर्वांना अनुमोदन.
वाईट वाटले. सर्वांना अनुमोदन.
कठीण काळ. लिहून थोडंफार
कठीण काळ. लिहून थोडंफार मोकळ्या झालात हे उत्तम. अचानक अंगावर आलेलं दु:ख कमी होण्यास वेळ लागेल. तुम्हाला एकमेकांच्या आधारानं यातून तरून जाण्याचे बळ लाभो.>> +१
काळजी घ्या!
खूप वाईट वाटलं वाचून! सांत्वन
खूप वाईट वाटलं वाचून! सांत्वन कुठल्याही शब्दांनी होणार नाही असं दुःख आणि असा प्रसंग तुमच्या वाट्याला आलाय..काळजी घ्या..
Pages