.............घड्याळ्याच्या गजराने मृत्युंजय खडबडून जागा झाला.रात्रीचे १२ वाजले होते.शरीर घामाने ओलेचिंबं झाले होते.त्याचा घसा कोरडा पडला होता.तो गटागट पाणी प्याला.सर्वत्र काळोख दाटलेला होता.घड्याळ्याच्या टिकटिक प्रमाणे त्याच्या हृदयाची स्पंदने आवाज करत होती.त्याचा जीव कासावीस झाला त्याला गार वाऱ्याची गरज भासली.तो तसाच बाहेर पडला.बाहेर कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज येत होता.जवळच एक उद्यान होते.रात्री सहसा तिथे पहारेकरी नसायचा.गेटवर चढून त्याने आतमध्ये उडी मारली.विराण शांतता पसरली होती जणूकाही भयाण विनोदाचे अभेद्य कवच! रातराणीच्या फुलांचा सुगंध हवेत दरवळत होता.समोरच एका तुटलेल्या बाकावर तो मटकन बसला.किटसनच्या दिव्याचा मंद प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता.मृत्युंजयने डोळे घट्ट मिटले पुन्हा काळोख दाटून आला त्याच्या चेहऱ्यासमोर! नंतर डोळे उघडून त्याने आकाशाकडे बघितले रात्रीचे टपोर चांदणे पडले होते.चंद्र कुठे दिसत नव्हता.कदाचित अमावस्येची ती रात्र असावी.
...त्याची नजर शूण्यात बघू लागली.आयुष्याचा गतकाळ त्याला आठवला.मागील घटनांचे तो सिंहावलोकन करू लागला.कधी बालपणात गेला तर कधी किशोरवयात पुन्हा तारूण्यात परत येऊ लागला.आता तो प्रौढत्वाकडे झुकला होता.वयाची तिशी त्याने गाठली होती.अनेक प्रश्ण त्याच्यासमोर उभे होऊन ठाकले.त्याला एक प्रश्ण नेहमी भंडावून सोडत असे.आपला जन्म कशासाठी?आपण या जगात का आलो?तो कधी-कधी स्वतःसमवेतच बोलायचा.तरीपण या प्रश्णाचे उत्तर अद्याप त्याला मिळाले नव्हते की आपण कोण आहोत? एक सुस्कारा त्याने सोडला आणि एक थंड श्वास घेतला.
आपल्या अवतीभवती असणाऱ्या लोकांची गर्दी त्याला दिसू लागली. एका अनामिक शायर चा शेर त्याला आठवला "यहा माचीस की जरूरत नही पडती यह आदमी आदमी से जलता है!"
खरंच या मायावी दुनियेत लोकांची रीत अशीच असते.'जहा कवडीयो के दाम बिकते है दिल'!
मृत्युंजय विचार करू लागला माझे हे जिवन मी दुसऱ्यांसाठीच जगतो. छोट्या-मोठ्या गरजूंसाठी मी सदैव तत्पर असतो. तरी पण मला अहंकारी, अभिमानी का समजतात. कदाचित त्याचा एकटेपणा त्याला कारणीभूत असावा. जास्त लोकांसोबत तो मिसळत नसे. त्याला नेहमीच अलिप्त राहणे आवडत असे. आणि त्याचे काही निवडकच मित्र होते. तीन वर्ष झाले तरी पण तो आपल्या गावी गेला नव्हता. काही मिळवण्याच्या ध्यासापोटी शहरात आला आणि इथेच रमला.
'"निकले थे कुछ सपनो को पूरा करने घर से क्या पता था घर जानाही एक सपना बन जायेगा"!
तरी पण घरी न जाण्याचे एक मुख्य कारण होते. त्याला अविवाहित राहायचे होतेआणि घरी गेलं की त्याच्यावर लग्न करण्याचा आग्रह करायचे त्यामुळे घरी जाण्याचे तो टाळायचा.
बालपणापासून त्याने स्वप्ने खूप रंगविली कधी त्याला वाटायचे मी डॉक्टर होणार, तर कधी पत्रकार पुन्हा काही वर्षे गेल्यानंतर त्याला वाटू लागले की मी काउंसलर होणार नंतर त्याने लिहायला सुरुवात केली तर त्याला लेखक झाल्यासारखे वाटू लागले पण तो एकाही स्वप्नांवर खरा उतरला नव्हता. हे सगळे त्याचे आवडते छंद होते. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन सुद्धा तो त्या क्षेत्रांमध्ये कार्यरत नव्हता आणि आता तो फॅशन डिझायनर म्हणून काम करत होता.मन स्थिर राहण्यासाठी त्यांने मेडिटेशनचा पण कोर्स कम्प्लीट केला. तरीपण जैसे थे वैसे!
प्रेमाबद्दल ही त्याचे मत वेगळे होते, त्याचं ठाम मत होतं की,
"Love is the others happiness when it becomes your necessity." "जब दुसरो की खुशी आप की जरूरत बन जाती है तब उसे प्यार करते है!"पण हा स्वतः कधीही आनंदी नव्हता. खूपदा प्रेम जमवण्याचा प्रयत्न केला पण काही महिन्यानंतर त्याला ते बोर वाटायचे. रिलेशनशिपमध्ये अडकणे त्याला मान्य नव्हते.
त्याला त्याच्या मनावर विजय प्राप्त करायचा होता. एका शांत सागराचा अनुभव त्याला घ्यायचा होता. त्याला संघर्ष करायचा होता आणि जिंकायचे पण होते पण ते स्वतःवर! त्याची स्पर्धा स्वतःशीच होती. एक हलकेसे हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटले आणि वाऱ्याची एक मंद झुळूक त्याच्या मनाला स्पर्शून गेली. अंग थोडावेळ शहारले. त्यांने शांतपणे डोळे मिटले आणि बाकावर तो झोपी गेला चांदण्याच्या शीतल प्रकाशात! कोकिळेच्या कुहुकुहु ने त्याला जाग आली. सूर्याची सोनेरी किरणे त्याच्या चेहऱ्यावर पडत होती सूर्याच्या प्रत्येक किरणा सोबत त्याचा उदय होत होता.दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड आत्मविश्वासाने तो भारावून गेला होता जणूकाही निश्चयाचा महामेरू! एक विजयश्री त्याच्या चेहऱ्यावर खुलली होती......................!
संपली गोष्ट?
संपली गोष्ट?
कळली नाही .
कळली नाही .
काय बोलायचंय तेच समजलं नाही.
काय बोलायचंय तेच समजलं नाही.
चंद्रमा खरच कथावस्तु काय आहे?
चंद्रमा
खरच कथावस्तु काय आहे?
ही खर तर कथा नव्हतीच
ही खर तर कथा नव्हतीच!मृत्युंजयाची द्वीधा मनःस्तिथी होती.त्याला जीवनाची दिशा मिळाली नव्हती.पण त्या रात्री त्याला त्याची जाणीव झाली आणि त्याला एक मार्ग मिळाला आनंदी जगण्याचा बस एवढच!
This is also a story !
This is also a story !
Poppy is also a flower!
ओके. मला वाटलं क्रमशः आहे
ओके. मला वाटलं क्रमशः आहे म्हणून विचारले होते
प्रिय मायबोलीकर हा माझा या
प्रिय मायबोलीकर हा माझा या ग्रूपमध्ये पहिलाच प्रयत्न होता.तरीपण कथेच्या मांडणीसाठी आवश्यक घटकांची माहीती मला तुमच्याकडून मिळावी ही अपेक्षा बाळगतो.खरतर लेखनाची खूप दिवसांपासून ईच्छा होती म्हणून हा प्रयत्न करायचं धाडस केलं.आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
लिहा मनातले विचार, फार विचार
लिहा मनातले विचार, फार विचार करू नका. यात वाचकांना ठोस काही हाती लागले नाही. तर कथा बीज घ्या काहीतरी आणि फुलवा.
शुभेच्छा
एक वाक्य तेवढे जरा बाऊन्सर गेले
<<<< विराण शांतता पसरली होती जणूकाही भयाण विनोदाचे अभेद्य कवच! >>>
हा माझा या ग्रूपमध्ये पहिलाच
हा माझा या ग्रूपमध्ये पहिलाच प्रयत्न होता.तरीपण कथेच्या मांडणीसाठी आवश्यक घटकांची माहीती मला तुमच्याकडून मिळावी ही अपेक्षा बाळगतो.खरतर लेखनाची खूप दिवसांपासून ईच्छा होती म्हणून हा प्रयत्न करायचं धाडस केलं>> कथाबीज डोक्यात असेल तर ते छान फुलवा... मुळात कथाबीज डोक्यात आधी पक्कं शिजू द्या ..नंतर ते कागदावर उतरवा ...
एक एक प्रसंग कथेत गुंफत जा.. कथा तयार झाली की, चार ते पाच वेळा स्वतःच वाचा... एकदा जोराने वाचा.. जोरात वाचलं की, चुका कळतात. .( हा माझा अनुभव)...
अजून एक म्हणजे , इतर कथा , लेख, कविता लक्षपूर्वक वाचा... त्यातून बरचंस शिकायला मिळेल...
प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल... दुसरं म्हणजे नकारात्मक प्रतिसाद आले तर मनाला लावून घेऊ नका... त्यातूनही शिकता येईल... त्यावरही विचार करा...
पुढील कथेस शुभेच्छा...
ण आणि न म्ध्ये कचकु"ण" गोंधळ
ण आणि न म्ध्ये कचकु"ण" गोंधळ झालाय तुमचा
गोष्ट काहीही समजलेली नाही
आपल्या लक्षपूर्वक अवलोकणासाठी
आपल्या लक्षपूर्वक अवलोकणासाठी खूप आभार!
खरच कथा ही प्रांसगिक आहे की नाही पात्र त्यातील वेग घेत आहे की नाही याचा प्रत्यय आला पाहीजे.नक्कीच रुपाली मॅम आपला अभिप्राय मी नक्कीच आपल्या लेखनात उतरविल!
आभार ॠन्मेश आपले कथेचं बीज
आभार ॠन्मेश आपले कथेचं बीज असायला हवं आणि ते फुलायला हवं मी नक्कीच प्रयत्न करील यावर आपल्या प्रतिसादाबद्दल साभार!