ऑफिस मधे झोप येत असेल तर काय करावे

Submitted by वेडोबा on 17 December, 2019 - 04:47

धाग्यावर विनोदी प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. आत्ता भयंकर झोप येत असल्यामुळे धागा उघडला आहे. कृपया या गहन समशेवर उपाय सुचवावा. गंभीर प्रतिसाद अमलात आणले जाणार नाहीत Rofl

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Noted

Noted

माबोवर कामसू लोक असल्याने बहुतेक विनोदी प्रतिक्रिया आल्या नसाव्यात. मी इतका वेळ झोपच काढलीय आत्मानंद प्रुफ रीडींग सर्व्हिसेस मधे. प्रचंड झोप येणारा जॉब आहे. काय काय लिहीतात ते या डोळ्यांनी वाचावं लागतं.

आत्मभू बाबांना नमन करून उदबत्तीने यानाची वात पेटवली तसे यान सिल्कीवे आकाशगंगेकडे निघाले.

कोपर्यात बसत असाल तर एक डोळा बंद करून‌ डुलकी घ्यावी.
लंच मधे‌‌ २० मिनिटे वामकुक्षी घ्यावी.
बाथरूमला जाताय सांगून तिकडे डुलकी काढावी.
एक दिवस सुट्टी काढून झोप पूर्ण करून घ्यावी.

ऑफिस मधे झोप येत असेल तर काय करावे >>> झोपावे हेच उत्तर पहिले ओठांवर आले. मग लक्षात आले की धागा जुना आहे तर आधी काय ऊत्तर दिलेले का बघावे. तर हेच ऊत्तर सापडले. लोकं झोप अडवू कसे शकतात मला आजवर समजले नाही. झोप हि एक अशी गोष्ट आहे की जेव्हा येईल तेव्हा आपण फार काही मनोरंजक काम करत नसलो तर सरळ झोप घ्यावी. आणि येत नसेल तर उगाच ओढून तानूण बिल्कुल झोपू नये. जसे आता रात्रीचे सव्वातीन वाजलेत. मला झोप येत नाहीये तर उगाच झोपण्यात काही अर्थ नाही. तेच उद्या काम करता करता आली तर सरळ तास दिड तास ताणून देणार. आपली लाईफ आपल्या टाईमटेबलने जगता येत नसेल तर काही अर्थ नाही. असा जॉब शक्य असल्यास चेंज करावा जे साधे एखाद्याला त्याच्या मनाप्रमाणे झोपूही देऊ शकत नाही. पण तरी सध्या तर वर्क फ्रॉम होम मुळे फारच सोयीचे झाले असेल सर्वांना. कधीही अर्ध्या एक तासाची पॉवर नॅप घेतली तर कोणाला काय कळतेय Happy

एक दिवस सुट्टी काढून झोप पूर्ण करून घ्यावी.
Submitted by भोचकभवानी on 6 May, 2021 - 03:13
>>>>>

हे बेस्ट आहे ! मी असे बरेचदा करतो. कधी नाही उठायला झाले सकाळी तर सुट्टीच टाकतो आणि छान दुपारी दोन तीन वाजता उठतो. सुट्टीचे कारणही ऑफिसला तेच सांगतो की नाही जमले आज उठायला. एकदा बॉसला असले कारण ऐकायची सवय लावली की त्यालाही मग फार काही वाटत नाही.
आता प्रश्न असा की ईतक्या सुट्ट्या येणार कुठून?
तर जे वर्कलोड जास्त असताना संध्याकाळी थांबून ओवरटाईम करावा लागतो, तसेच शनिवारचेही काम करावे लागते त्याचा मोबदला पैश्यात न घेता कॉम्फ ऑफ घ्यावा. आणि तो अश्यावेळी खर्च करावा. ज्याने वर्क-स्लीप बॅलन्स साधला जातो. प्रत्यक्षात आपण जे ओवरटाइमचे एक्स्ट्रा पैसे घेतो ते आपल्या कामाचे नाही तर आपल्या झोपेचे वा पर्सनल लाईफचे घेतलेले असतात. त्यामुळे त्यामागे धावू नये.

मी पण काढते झोप . माझे लंच स्टार्च वाले असते आवड म्हणून. दही भात उसळ पोळी भाजी पास्ता नूडल असले काय काय. डबा खाउन मी एखादे काही गोड हाताशी असले तर खाते नाहीतर फळ. मग वीस मिनिटाने झोप येतेच. अगदी १५ - २० मिनिटाची झोप पुरे होते. मशीन ला कामाला लावून मी पावर नॅप घेते. मग अडीचला आवरून कडक कॉफी घेउन येते. आता तब्येती मुळे अर्ध्या दिवसात थकून पण जायला होते. मग सहा परेन्त रेटताना मध्ये ब्रेक लागतोच.

माझ्या एका ऑफिसात एक भला मोठा सोफा आहे तिथे कुशन घेउन चांगली ताणून द्यावी असा मोह होतो पण बॉस गारू आले तर काय. म्हणून घाबरून असते.

Pages