आशिया आणि ओबामा!

Submitted by लालू on 21 November, 2009 - 09:27

ओबामाची नुकतीच संपलेली आशिया भेट, त्याचा उद्देश, आशियातील चीनच्या रोलबद्दल केलेली वक्तव्ये याबद्दल प्रसारमाध्यमांत बरीच चर्चा चालू आहे. चीनहे भारत पाकिस्तान संबधात हस्तक्षेप करावा असे थेट विधान केले नसले तरी तसा अर्थ त्यातून निघू शकतो. स्टेटमेन्ट असे आहे-

The two sides welcomed all efforts conducive to peace, stability and development in South Asia. They support the efforts of Afghanistan and Pakistan to fight terrorism, maintain domestic stability and achieve sustainable economic and social development, and support the improvement and growth of relations between India and Pakistan. The two sides are ready to strengthen communication, dialogue and cooperation on issues related to South Asia and work together to promote peace, stability and development in that region.

भारतात याबद्दल प्रतिक्रिया उमटल्याचे वाचले. मटामधला अमेरिकेचे चीनविषयी बदललेले धोरण याबद्दलचा अग्रलेख वाचला, त्याची लिन्क खाली देत आहे.

मटामधील अग्रलेख
ओबामांची शरणागती!
विश्लेषण बरोबर वाटते. दुसरा अर्धा भाग बराच "आशावादी" आहे.

इथल्या वृत्तपत्रांनीही भारताच्या चिंतेची दखल घेतली.
perceived U.S. missteps concern India

पंतप्रधान सिंगही अमेरिका भेटीला येत आहेत. गेल्या वर्षभरात काही समीकरणे बदलली आहेत का, कशी, त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात यावर मते मांडायची असल्यास इथे लिहिता येतील. वरचे दोन्ही लेख जरुर वाचा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओबामाची शरणागति अगदी पटले. तसाच वागतो आहे तो. पण चीनला मध्यस्थि करायला सांगणे हे त्याच्या अननुभवाचे लक्षण. त्याने जरा काश्मीर प्रश्नाबद्दल माहिती करून घ्यायला पाहिजे होती.

मुळात जागतिक संबंधात हिलरी नि तो यांच्यात फार मोठा फरक होता. हिलरीला कल्पना आहे की ओबामाला वाटते तेव्हढे जग नि जगातले देश साधे नाहीत!

या बाबत भारताने ओबामा कडे एक सणसणित खलिता पाठवला पाहिजे, की असले काहितरी बोलू नका!

परवा रश लिंबॉ नि हॅनिटि यांना फोन केले पाहिजेत!! त्यांना ओबामाहि आवडत नाही नि वाशिंग्टन पोस्टहि नाही!!

झक्कींशी यामतावर सहमत...

Right from campaign days I was very skeptical about Obama (I didn't vote for him BTW). No doubt he is a great orator but when it comes to foreign policies and to be a leader of the free world, I believe he comes way short. Now almost a year in office, I’m still waiting for the CHANGE he promised us.

अरे ओबामा तरि काय करणार . ८०० बिलिइओन डॉलर चि घस घशित मदत
चिन ने अमेरिकेला मंदित तुन बाहेर काढन्यास दिलि आहे.
त्या मुळे हळु हळु अमेरिकेचे सुपर पॉवर हे बिरुद आता चिन कडे जाणार हे निच्चित.
व जग हे बाय पोलर होणार पुर्वि सारखे

शर्मिला, सर्वप्रथम बाफ उघड्ल्याबद्दल धन्यवाद.

पोस्ट न पट्ल्यास उड्वावे ही नम्र विनंती.
मला हिरव्या पत्रात रस नाही व माझ्या देशावर प्रेम आहे त्यातुन ही प्रतिक्रिया दिली आहे. ओबामाच्या चीनभेटीच्या निमित्ताने उमट्लेले काही पडसाद खाली देत आहे. व्यंगचित्र लै भारी आहे जरूर बघावे.

१) http://www.zeenews.com/news581131.html

२) Barack Obama dream fades as China visit fails to bring change
Even his allies feel let down by the president’s lack of progress both in Asia and at home

http://www.timesonline.co.uk/tol/news/world/us_and_americas/article69269...

३) Obama is wrong. He need not meddle here.

India has done the right thing by rejecting a US-China attempt to involve the latter in India-Pak issues after a joint statement in Beijing appeared to give China a greater monitoring role in the region.

Ever since Barack Hussein Obama became the US President, Indo-US relations seemed somewhat adrift. The new US administration has been giving the impression of patronising Pakistan in a way to make India suffer and trying to hyphenate the growing, democratic India with an imploding Pakistan whose collapsing, US-dependent regime has become reduced to a caricature. It is interesting how Obama has misread Indian sensitivities at a time when India’s Prime Minister Dr Manmohan Singh, considered unduly concerned about the US proclivities, is undertaking an official visit to the US.....

४) Obama's visit to highlight emphasis on Asia
www.chinaview.cn 2009-11-09 15:11:24

BEIJING, Nov. 9 (Xinhua) -- U.S. President Barack Obama will embark on his first Asian trip next week, with analysts saying Asia is weighing increasingly heavily on U.S. foreign policy.

The tour will start in Tokyo and conclude in Seoul, with stops in Beijing, Shanghai and Singapore. While in Singapore, the U.S. president is scheduled to attend the Asia-Pacific Economic Cooperation (APEC) summit, as well as his first ever meeting with leaders of the 10 Southeast Asian nations that make up the Association of Southeast Asian Nations.
The president will travel to Asia "to strengthen our cooperation with this vital part of the world on a range of issues of mutual interest," said White House spokesman Robert Gibbs.

http://news.xinhuanet.com/english/2009-11/09/content_12417377.htm

५) Another Failed Presidency
Barack Obama is on track to have the most spectacularly failed presidency since Woodrow Wilson.

http://www.americanthinker.com/2009/08/another_failed_presidency.html

६) Obama’s Failed World Travels
Obama, trying to escape the turmoil he has created in the USA with an over aggressive legislative agenda is spending time overseas, but obviously, he is way over his head abroad, too.

http://www.exposeobama.com/2009/11/20/obamas-failed-world-travels/

७) Obama Bowing to Chinese: The Cartoon

http://www.exposeobama.com/2009/11/20/obama-bowing-to-chinese-the-cartoon/

८) Advice From Grandma
President Obama’s visit to China this week inevitably invites comparisons between the world’s two leading powers. You know what they say: Britain owned the 19th century, America owned the 20th century, and, it’s all but certain that China will own the 21st century. Maybe, but I’m not ready to cede the 21st century to China just yet.

http://www.nytimes.com/2009/11/22/opinion/22friedman.html?_r=1

९) What's your viewpoint on a one-term presidency for Obama, no matter the reason?

http://www.wowowow.com/politics/whats-your-viewpoint-one-term-presidency...

फ्रीड्मान चान्गला लिहीतो. त्याला निदान भारत चीन वगैरे माहीत तरी आहेत. मध्यंतरी चीनला भारताचे तुकडे होण्यात रस आहे असे वाचनात आले. ते माओवाद्यांना शस्त्रपुरवठा करतात असे ही वाचले. त्यानाच भारत पाक बातचीत मध्ये आणायचे म्हणजे कसे काय? असे याने का सान्गावे? काहीही. नाही पट्ले. साहेबांनी त्यांचे घरचे प्रशन सोड्वावेत.

इराक अफगाणिस्तानातून पाय कसा काढून घेता येइल?
खुद्द अमेरिकेतील लोकाना नोकर्‍या कश्या देता येतील ?
बेलाउट्च्या महाग चिकट्पट्ट्या लावुन अर्थव्यवस्था सुधारेल का?
आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील त्रांगडी कशी सुटतील?
जगातील प्रत्येक राजवटीत आपण हस्तक्षेप केलाच पाहिजे का?
ग्वाटानामो बे व असे इतर तुरुन्ग कधी बंद करणार?

तुम तुम्हारा घर संभालो ना भाय हम हमारा देख लेन्गे.

अश्विनि मामि
तुम तुम्हार घर)))) अस राज्कारणात चालत नाहि.ओबमा ने चिन ला काश्मिर प्र्श्नात लक्ष घाला असे सांगितले आहे. याचा अर्थ अमेरिकेने चिन ला बरोबरिचि महासत्ता म्हणुन मान्यता दिलि आहे.
त्यांनि आपाअपले क्षेत्र वाटुन घेतले आहे.कारण अफगणिस्तान मधिल युध्द जिन्कायचे तर
अमेरिकेला पकिस्तान चि गरज आहे. आणि इथुन पुढे चिन हा अमेरिके पेक्षा जास्त मोठि आर्थिक सत्ता
म्हणुन पुढे येणार आहे. जर भारत तसा आला असता तर अशिया त्यानि भारताला दिला असता.
पण सध्यातरि भारताचि बरोबरि चिन बरोबर नाहि.आर्थिक व सामरिक दोनि बाजुने चिन हा भारि आहे.
हे कटु असल तरि सत्य आहे.

ओबामा आपल्या बँकरला भेटायला गेला होता हे खरे पण त्याच्या कडून असल्या बेजबाबदार विधानाची अपेक्षा नव्हती. खरे तर त्याने एकूणच ग्लोबल पोलिटिक्स हिलरीवर सोपवावे. ती या बाबतीत सरस आहे. चीन आज भारतापेक्षा सरस असला तरी ते एक कम्युनिस्ट राष्ट्र आहे. त्यांना भारताचा सीमाप्रदेश बळकावायचाय याचा ओबामाला सोयिस्करपणे विसर पडलेला दिसतो. हे म्हणजे चोराला कोतवाल नेमण्यासारखे. भारताच्या अंतर्गत बाबींमधे ढवळाढवळ करायचा अधिकार अमेरिकेला नाही आणि चीनला तर नाहीच नाही.

चीनची भेट मुळात आर्थिक कारणांसाठी होती तर या बाकी गोष्टी बोलण्याची काही गरज नव्हती हे मलाही पटले. चीनचा अंतर्गत कारभार आणि मानवी हक्क इत्यादी बाबांकडे कानाडोळा केलाच की. चीनला दुखवायचे नाही तर एवढे पुरे नाही का?

काही फॉरेन पॉलिसी स्पेशलिस्ट आणि इकॉनोमिस्ट लोकांनी ओबामा भेटीची केलेली असेसमेन्ट-
http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2009/11/20/AR200911...
इथे काही लोकांनी अजून वेगळे मुद्दे मांडले आहेत.

>>Right from campaign days I was very skeptical about Obama (I didn't vote for him BTW).
राज, तुम्ही मागच्या वर्षी कुठे होता? इथे यायचे ना.. http://www.maayboli.com/node/2022 Happy

ओबामा आपल्या बँकरला भेटायला गेला होता हे खरे पण त्याच्या कडून असल्या बेजबाबदार विधानाची अपेक्षा नव्हती.
>>
कोणकोण कायकाय अपेक्षा ठेवतायेत त्याच्याकडून... Proud

अहो तो त्यांच्या देशाचं भलं कसं होईल हे बघणार. चीन भारताचा प्रदेश बळकवायला बघतोय ह्याचं त्यांच्या देशाच्या पॉलिसीशी काय देणंघेणं? म्हणजे ते प्रकरण त्यांच्या फायद्याचं आहे असं पुढेमागे वाटलं तर देतील लक्ष. नाहीतर नाही. त्यापेक्षा तुमच्या देशाच्या पंतप्रधानांकडून अपेक्षा बाळगा, की अमेरिका भेटीत ते ओबामांना ठणकावून सांगतील की हे असलं काही चालणार नाही. नाहीतर ते तिथे मिळमिळीत काहीतरी बोलून येतील आणि इकडे आपले लोक, "श्श्या, ह्या ओबामापेक्षा ती हिलरी चांगली होती" वगैरे चघळत बसणार.

त्याने चीनला अफगाणिस्तान युद्धातही लक्ष घालण्यास सांगितले आहे. जिथे जिथे भांडणं, सॅंक्शन्स, युध्दं वगैरे आहेत तिथे आता फक्त अमेरिका लढणार नाही, तर इतर देशांनाही त्यात भाग घ्यावा लागेल असे तो सगळीकडे सांगत सुटला आहे.

अफगणिस्तान मधिल युध्द जिन्कायचे तर अमेरिकेला पकिस्तान चि गरज आहे. आणि इथुन पुढे चिन हा अमेरिके पेक्षा जास्त मोठि आर्थिक सत्ता म्हणुन पुढे येणार आहे. जर भारत तसा आला असता तर अशिया त्यानि भारताला दिला असता.पण सध्यातरि भारताचि बरोबरि चिन बरोबर नाहि.आर्थिक व सामरिक दोनि बाजुने चिन हा भारि आहे.हे कटु असल तरि सत्य आहे.>> अगदी बरोबर. सामरिक म्हण्जे काय?

अफगाणीस्तान मधील युद्ध जिन्कायच्या पलिकड्ची सिचुएशन आहे. चीन व भारताची बरोबरी नाही अगदी पट्ले. पण आपल्याकडे मत व्यक्त करायचे स्वातंत्र्य, धार्मिक रिच्युलस करायचे स्वातंत्र्य, अमेरिकेहून लहान असली तरी त्यातल्या त्यात मजबूत अर्थव्यवस्था ह्या चान्गल्या बाबी आहेत.

चीन मध्ये जी व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी चालू असते. व प्रत्येक जगासमोरील गोष्ट माय्क्रोमॅनेज केली जाते ते भीती दायक आहे. ( मिनिस्कर्ट घातलेल्या व गन्स घेतलेल्या तरुणी - परेड चे फक्त अपील वाढ्वायला आहेत की खरेच काही लढ्वय्या युनिट आहेत. ) उघीर लोकान्चे बंड दाबणे, तिबेट ची तैवान ची गळचेपी हे काही महत्त्वाचे इशूज आहेत.

जे अमेरिकेच्या बरोबरीने काही दिवस चालतात त्यान्च्यावर कधीही अमेरिकेचा रेटा येवू शकतो व ती त्या देशाची अर्थव्यवस्थाच नव्हे तर पर्यावरण व समाज जीवनाची ही पुर्ण वाट लावते. इन्टर नेट त्यान्च्या इथलेच असल्याने अश्या गोष्टी फारश्या बाहेर येत् नाहीत. अमेरिकेचे तेल व्यसन पुर्ण करण्यासाठी झट्णार्‍या व निक्रूष्ट उत्पादने - जसे कोक चिप्स मॅक्डोनाल्ड/ जुन्या तंत्रज्ञानाच्या गाडया, हॉलिवूड संस्क्रुती जगावर थोपून नफा कमविणार्या कंपन्या या किती वाईट आहेत हे कळे कळे परेन्त आपण त्याचे गुलाम झालेले असतो. फ्री कंट्री म्हणतात पण ती फक्त समाजातील एका विशिष्ट वर्गा साठीच फ्री ( डिक चेनी प्रभुती) बाकी व्यवस्थेचे अंकित आहेत.

ऑर्गनाइज्ड मीडीयाच्या बाहेर पडून जर सर्व परिस्थीतीचा विचार करू बघितले तर फार भयानक परिस्थिती आहे.

माझे ज्या अमेरिकेवर प्रेम आहे ती आहे स्टीव जॉब्जची, बिल गेट्स ची, नवीन तंत्रज्ञान, पाथ ब्रेकिन्ग
कल्पनांना वाव देणारी, इमिग्रंट्सना आपली स्वप्ने साकार करण्याची संधी देणारी, the land of Anything goes and do your own thing, The land with wonderful first world quality of life - the sensibilities of Dear Abby and Martha Stewart, the birthplace of feminism and equal opportunity. But sadly the reality as we see from here is so different.

And the leader of such a great country to bow down to the man whose father ordered Pearl Harbour? And be snubbed by a communist regime? Not done. Let's hope for a good, experienced leader in 2012!

>>८०० बिलिइओन डॉलर चि घस घशित मदत चिन ने अमेरिकेला मंदित तुन बाहेर काढन्यास दिलि आहे.<<

यात चिनचा vested interest आहे. मंदिचा सर्वात जास्त फटका retail sector ला पडला आहे. मालाला उठाव नाही म्हणुन उत्पादन बंद. आता अमेरिकेचं manufacturing hub कुठे, तर चिनमध्ये. साहजिकच चिनमध्ये बेकारीची लाट उसळली. त्यावर $800B चा उपाय. असो.

माझ्यामते जोपर्यंत अमेरिका नवीन संशोधन, प्रणाली ई. वरील आपले अढळ पद कायम राखते तोपर्यंत तीच्या महासत्तेला कोणीहि आव्हान देवु शकत नाही. राहीला प्रश्न चिनचा, जो अमेरिकेचा strategic partner आहे, भारतासारखा. उद्या जर भारताने मोठ्या प्रमाणात manufacturing facilities सुरु केल्या as an alternative option तर Southeast-Asia चं geopolitical गणितचं बदलून जाईल.

>>राज, तुम्ही मागच्या वर्षी कुठे होता<<
माबोवर सुरुवातिच्या काही दिवसांनंतर अज्ञातवासात होतो. Happy गल्लेवाल्यांची ईमेल आलीकी जॉर्जियाचा ग्रुप फॉर्म झाला आहे, सामील व्हा आणि आलो. तुम्ही दिलेली लिन्क पाहीली. ८-९ पानांची चर्चा; sounds like I missed all fun! Happy

आज सीएनएन वर झकेरिया GPS मध्ये सिंग यांची मुलाखत झाली.
http://www.cnn.com/video/#/video/world/2009/11/22/gps.singh.interview.cnn

एक पोस्ट्मध्येही आली आहे-
http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2009/11/19/AR200911...

एबीसीवर राऊन्ड्टेबल आणि बाकी रविवार सकाळच्या कार्यक्रमात अशी मतं मान्डली गेली की फारच नमते घेतले. अश्या वागण्याने बाकी allies ना चुकीचा सन्देश जातो. चीनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वार्ताहरांना प्रश्नही विचारु दिले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांसमोर भाषण झाले ते सरकारने निवडले होते. अर्थात बंद 'दरवाज्यामागे' बरेच काही घडले म्हणे.

सान्तिनो, तुझे अख्खे पोस्ट आणि मामींनी लिहिलेला चौथा पॅरा कळला नाही. Happy

मी exactly हेच लिहायला आलेले. झकारिया नी काही एकदम टाकावु प्रश्न विचारले. पण तरीही या मुलाखतीतुन आमची चीन विषयक काय भुमिका आहे जगासमोर मांडण्याची संधी तरी मिळाली.
आमच्या पंतप्रधानानी सरळ सांगितल आम्ही "चीन ला आमचा कॉम्पिटीटर मानत नाही.":)
हे या विषयाशी सम्बधित नाही पण तरीही ,भारतातले १ लाख विद्यार्थी आज अमेरिकेत शिक्षण घेताहेत आणि त्यातले mostly परत जातील हे विधान झकारियानी फॅक्ट्स तपासुन न पहाता (व्हिसा मुळ फक्त टेक्निकली करेक्ट आहे ते) ठोकुन दिल्यासारख वाटल.

चिनपुढे नमते घेतले हि चुक असावि पॉलिसि नसेल. चिनचि इकॉनॉमि एक्स्पोर्ट ओरिएन्टेड हे. अमेरिकेचि बाजारपेठ जिवन्त ठेवणे चिनसाठि फारच आवश्यक हे. या रिसेशन व ८०० बिलिअनच्या मदतिमुळे अमेरिका-चिन यान्चे अगदि कायमचे लगिन लागले, म्हणजे त्यान्च्या अर्थव्यवस्था अता एकमेकान्मधे आधिपेक्षाहि अधिक जास्त गुन्तल्या. अमेरिकेने नमते घेतले असे वाटत असले तरि दोघान्चि एकमेकान्ना गरज हे आणि यापुढेहि असणार हे.

म्हनजे आता अमेरिकेचि बाजारपेठ चिनला अत्यावश्यक, स्वतःच्या बाजारपेठेत चिनचा व्हेस्टेड इन्टरेस्ट असणे अमेरिकेला फायद्याचे पन त्याच वेळेला चिन व अमेरिका दोघेहि नविन बाजारपेठान्च्या शोधात असतात. खोच हि कि भारताचि इकॉनॉमि डोमेस्टिक मार्केट वर आधारित हे Happy हे मार्केट वाढणारेच हे. 'इन्डिया'चे मार्केट जोरात चालु झाले आहेच (ज्याला मार्केटिन्गचि लोके क्लास ए व बी मार्केट म्हणतात उदा. मोठमोठि शहरातिल श्रीमन्त, उच्च मध्यमवर्गिय, मध्यमवर्गिय हे क्लास ए व निमशहरि भागातिल श्रीमन्त, मध्यमवर्गिय हे क्लास बि) पण कम्पन्या आता क्लास सी मार्केटकडेसुध्दा बघु लागल्यात. क्लास सि म्हणजे 'भारत' मार्केट Proud या अवाढव्य मार्केटकडे अमेरिका व चिन दोघेहि दुर्लक्ष करु शकत नहित. हे मार्केट व्यवस्थित वाढेल आनी राहिल जर इथे राजकिय स्थैर्य असेल. चिनने नक्षल्यान्ना मदत करणे, फुटिरतावाद्यान्ना मदत करणे याला लिमिट्स हेत. अस्ले प्रकार तसेच अधुनमधुन अरुणाचलावर हक्क सान्गणे वगैरे प्रकार आन्तरराष्ट्रिय राजकारणातिल ठराविक चालि असतात व त्यान्ना किति महत्व द्यायचे हे भारताला कळते हे भारताने नुकतेच झालेल्या प्रकरणात स्पष्ट दाखवुन दिले. प्रणव मुखर्जिन्चि याबाबतितलि वक्तव्ये नीट वाचलि तर भारताचि आन्तरराष्ट्रिय राजकारणातिल जाणकारि दिसुन येते. शिवाय असल्या चालिन्ना प्रतिचालि योजता येण्याचि भारताचि क्षमता हे (लगेच पन्तप्रधान अरुणाचलात गेले, तवान्गला दलाइ लामा). या चालि प्रतिचालि होतच असतात, नायतर आपण किन्वा ते डोइजड होउ Happy (च्यामारि, अरुणाचलमधे सन्घाचे बरेच काम हे. त्यान्नाच तिथले सरकार स्थापन करु दे अस मि मनमोहनाला सुचवणार हे. चिनला लागुन त्यान्नि हक्क सान्गितलेल्या प्रान्तावर आमचे "हिन्दुन्चे" राज्य सुर झाल्याने त्या लाल निधर्मान्ध कम्युनिस्टान्ना "भिमटोला" बसेल :फिदी:)

चिनने पाकिस्तानला मदत केलि तरि आता फरक पडणार नाहि इतकि त्या देशाचि वाइट अवस्था हे. इन फॅक्ट, स्वताहाच्या खुशहालिसाथि चिन, भारत व अमेरिका यान्नि एकत्र येउन पाकिस्तानला कन्स्ट्रक्टिव्ह मदत केलि पाहिजे. पाकिस्तान जर कोसळला तर हे तिघान्नाहि परवडणारे नाहि पण वेगवेगळ्या कारणान्साथि. अमेरिकेला परवडणार नाहि कारण त्यान्ना अफगाणिस्तानच आवरता येत नाहिये पण पाकिस्तानात हस्तक्षेप तर करावाच लागेल म्हणजे तो बोजा आला. अमेरिका अफगाणिस्तानात हे हेच चिनला पुरेसे आहे. त्याउपर अमेरिकेचा आशियातिल 'डायरे़क्ट' प्रेझेन्स वाढला तर चिनला फारच जोरदार डोकेदुखि हे. तेव्हा चिनलाहि पाकिस्तान कोसळणे परवडणार नाहि. भारताला का परवडणार नाहि ते सान्गत बसत नाहि Proud उलटे चिन आता पाकिस्तानला मदत करताना विचार करेल, कारण अल कायदा अमेरिकेवर उलटलि, तलिबान पाकिस्तानवर उलटलि तशि ह्यान्चि मदत उइघुर मुसलमानान्कडुन परत यान्च्याकडे येइल Happy चिनने त्यान्च्या "नेहमिच्या" पध्दतिने उइघुरान्ना दडपायला सुरुवात केलि तर सारे पॅन-इस्लामिक दहशतवादि तिकडे सरकतिल, चिनचि मदत चिनविरुध्द आणि मग चिनला त्यान्चे "कर्मफल" भोगावे लागेल Proud

इथे दोस्ताना, याराना दिसत असला तरि दुसरिकडे मात्र चिन आनि अमेरिका अटितटिने भान्डत हेत. मुख्य कारण एनर्जि हे. चिन आफ्रिकेतिल अनेक देशान्ना राष्ट्रउभारणि टाइपचि मदत करत हे व याबदल्यात त्या देशान्कडुन एनर्जि मिळवत हे. शिवाय हे देश आफ्रिकेतले चिनचे स्ट्रेटेजिक पार्टनर होउ लागले. हे अमेरिकेच्या लक्षात आल्यावर २००० सालि AGOA (Africa Growth and Opportunity Act) अस्तित्वात आला. याचे उद्देश दोनच हे. एनर्जि आणि स्ट्रेटेजिक पार्टनरशिप. ०८/२००९ मधे हिलरि क्लिन्टनने आफ्रिकेचा दौरा केला. तो दौरा करणे आवश्यकच होते. त्यावरुन असे दिसते कि आफ्रिकेतल्या स्टेजवर अमेरिका चिन एकत्र येणे सध्या तरि अशक्यच दिसते. पण आफ्रिकेत आपलाहि थोडा प्रेझेन्स आहे. चिन हा कॉमन आणि कडवा कॉम्पिटिटर असल्याने आफ्रिकेत भारत-अमेरिका एकत्र येउ शकतात किन्वा तिथे दोघान्ना एकमेकान्चि गरज भासु शकते. तसे झाले तर आशियातिल अमेरिका-चिन प्रेमप्रकरणाला एक तिसराच आफ्रिकन अँगल येइल किन्वा तो आणला जाउ शकतो.

ओबामाने मानवाधिकारान्चा मुद्दा मान्डला नाहि हे आश्चर्य नाहि. आणखि काहि वर्शात अमेरिका आणि सारे जग एक वेगळाच मुद्दा चिनसमोर नाचवेल तो म्हणाजे त्यान्नि केलेल्या, करत असलेल्या पर्यावरणाच्या नाशाचा, प्रदुशणाचा. चिन मानवाधिकारावर कोणि आरडाओरड केलि कि त्यान्ना थुका लावते तसे मात्र पर्यावरणासाठि करु शकणार नाहि मार्क माय वर्ड्स Proud
माय गुर्जि सेड गुडबाय टु अस Sad धिस "मिनिन्गफुल" पोस्ट इज डेडिकेटेड टु हिज मेमरिज. वन ट्रॅक माइन्ड इज डेड. लॉन्ग लिव्ह द वन ट्रॅक माइन्ड.

३बु एवढ मोठ पोस्ट लिहिलय , थोड तरी शुद्ध लेखनाकडे बघायला हव होत. कितीही वाचायचा प्रयत्न केला तरी काही समजत नाही. Sad

<<ओबामांना ठणकावून सांगतील की हे असलं काही चालणार नाही. नाहीतर ते तिथे मिळमिळीत काहीतरी बोलून येतील >>

तसे काही ते करणार नाहीत. अजून भारताला अमेरिकेकडून बरेच घेणे आहे. ठणकावून वगैरे बोलण्याची हिंमत नाहीये.

<<तशि ह्यान्चि मदत उइघुर मुसलमानान्कडुन परत यान्च्याकडे येइल चिनने त्यान्च्या "नेहमिच्या" पध्दतिने उइघुरान्ना दडपायला सुरुवात केलि तर सारे पॅन-इस्लामिक दहशतवादि तिकडे सरकतिल, चिनचि मदत चिनविरुध्द आणि मग चिनला त्यान्चे "कर्मफल" भोगावे लागेल >>

शक्यता कमी आहे. भारत, अमेरिका यांच्यासारखी लोकशाही चीनमधे नाही. सदरा बदलण्यापलीकडे, नि जाहीर तीव्र निषेध करण्यापलीकडे त्यांचे उपाय वेगळे आहेत. तिथे ग्वांटानामो बे मधे वर्षानुवार्षे कुणि खितपत पडत नाहीत, या बाबतीत ताबडतोब निर्णय घेतला जातो. नि ते सर्व लोक जहन्नुम मधे ७२ कुमारिकांबरोबर रहातात. त्यांच्या जहन्नुम मधे आता कुमारिका मिळणार नाहीत म्हणून तरी त्यांनी अतिरेकी पणा थांबवावा. हे कारण त्यांना पटवून दिले की अतिरेकीपणा थांबेल.

<<स्वताहाच्या खुशहालिसाथि चिन, भारत व अमेरिका यान्नि एकत्र येउन पाकिस्तानला कन्स्ट्रक्टिव्ह मदत केलि पाहिजे. पाकिस्तान जर कोसळला तर हे तिघान्नाहि परवडणारे नाहि पण वेगवेगळ्या कारणान्साथि>>

हे एखाद्या हट्टी लहान मुलाला, त्याच्याच भल्यासाठी चापट मारावी तसे करावे लागेल. 'तुझ्यापेक्षा मला जास्त वाईट वाटते, पण केवळ तुझ्या भल्यासाठी आता तुम्ही लोक बाजूला व्हा, भारत राज्य करेल तुमच्यावर' असे सांगावे लागेल.

सान्तिनो, तुझे अख्खे पोस्ट आणि मामींनी लिहिलेला चौथा पॅरा कळला नाही.
>>> मला तेवढे एकच पोस्ट कळले या बाफवरचे (विशेषत: ३बूंचे पोस्ट वाचल्यानंतर). Proud Light 1

ओबामाच्या निवडणुकी वेळीही अनेक भारतात अन इतर अनेक देशातही त्यांच्याबद्द्ल खुपच अपेक्षा निर्माण झाल्या होत्या.....
त्यावर एका विचारवंताने (नाव विसरलो) सांगितले कि, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा.... ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होणार आहेत. ते पहिले अमेरिकेचे हित पाहणार अन मगच जमले तर इतरांचे हित पाहणार.बर्याचदा मुळ गृहितकच चुकते, अन मग त्यावर बांधलेले इमले धाडकन कोसळतात.

तसे ते आता अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत, अन अमेरिकेच्या हितासाठी जरुर त्या गोष्टी करत आहेत.
अन त्यात गैर काहीच नाही. गरज आहे, आपल्याकडे ही असे नेते निर्माण होण्याची!

>>ते पहिले अमेरिकेचे हित पाहणार<<

बेशक! उनके इरादे तो नेक है, लेकिन दिल्लि अब बहोत दूर है! Wink

>>अन मगच जमले तर इतरांचे हित पाहणार<<

But unfortunately, when America sneezes whole world gets cold. So it’s in the best interest of the other countries to monitor her moves prudently.

>>अमेरिकेचे हित पाहणार
तेवढेच केले तरी खूप झाले हो. Happy तुमचे हित बाजूला ठेवा आणि बाकीच्यांचे बघा असं कोण म्हणत नाही.

>>चिन आफ्रिकेतिल अनेक देशान्ना राष्ट्रउभारणि टाइपचि मदत करत हे
यात शस्त्रे पुरवणे पण येते. Happy

Uighurs आणि दहशतवादींच्या च्या बाबतीत झक्की म्हणतात ते खरे आहे.

>>आणखि काहि वर्शात अमेरिका आणि सारे जग एक वेगळाच मुद्दा चिनसमोर नाचवेल तो म्हणाजे >>त्यान्नि केलेल्या, करत असलेल्या पर्यावरणाच्या नाशाचा,

चीनमध्ये इमिशनच्या बाबतीत बराच रिसर्च चालू आहे. नुकतेच त्याबद्दल आर्टिकल आले होते, त्याची ही लिन्क-
http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2009/10/23/AR200910...

भारताच्या पर्यावरण प्रश्नाबद्दलचे हे एक-
http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2009/11/20/AR200911...
भारत अमेरिकेकडेच लो कार्बन टेक्नॉलॉजी मागतोय.

आपल्या पंतप्रधानांना स्टेट डिनर चा मान मिळतो आहे. जेवणांत कुठेही कमतरता पडायला नको म्हणुन बराक स्वत: तसेच मिशेल यांची कोरडी नजर मुदपाकखान्यावर आहे.

चिनकडे माप झुकते आहे आणि भारताला तसे ते वाटायला नको म्हणुन भारताच्या पंतप्रधानांना जेवणावळीचा मान.

अमेरिका हि दिवाळ्खोर झाल्या मुळे त्यांना चिन पुढे लोटांगण घातल्या शिवाय गत्यंतर नाहि.
कारण चिन कडे २.५ ट्रिलिअन कॉश आहे.
अमेर्किचि सद्दि सुपर पॉवर म्हणुन संपलि आहे इथुन पुढे.
ओबामा पेक्षा बुश चांगला होता.

च्यामारि, येव्हडे अर्थपुर्ण पोस्ट लिहुन अर्थ कळला नाहि ? Uhoh आयडि बघुन कळवुन घ्यायचे का नाहि ते ठरते का हो ? Proud झक्कि, शर्मिला, अहो चिनने उइघुरान्ना दडपण्यासाठि "थ्यानान्मेन" पध्दतिचा वापर केला तर पॅन-इस्लामिस्ट गप बसतिल का ? त्या पध्दतिने टेम्परवारि प्रश्न सुटल्यासारखे होइल पण नन्तर उइघुरान्चा बाबा भिन्द्रनवाले होउन कम्यु पार्टिच्या बोकान्डि बसेल.

राजसाहेबान्चे म्हणने बरोबर हे. अमेरिकेला शिन्चि शिन्क येउ देउ नका. चिन-अमेरिकेने तिन पायान्च्या शर्यतित भाग घेतला हे तिथे भारतानेसुध्दा भाग घेतला पाहिजे. म्हनजे आपल्याबरोबर कधि चिन पार्टनर तर कुठे अमेरिका पार्टनर असे करुन शर्यतित पळले पाहिजे. ह्या जागतिक इकॉनॉमिमधे ज्येव्हडे जास्त एकमेकान्त गुन्तले जाल आणि जितक्या जास्त जणान्बरोबर तिन पायान्चि शर्यत पळाल तितके अधिक चान्गले. तसे केल्याने आपल्या हिताचि चिन्ता आपल्यापेक्षा इतरान्नाच जास्त लागुन राहते. अमेरिकेचेच बघा कि. ते पडु नयेत म्हणुन त्यान्च्यापेक्षाहि बाकिच्यान्नाच जास्त इन्टरेस्ट हे, है कि नाहि ? चिन-अमेरिकेचा सन्सार सुरु राहणार हि काळ्या दगडाचि रेघ हे. आपणसुध्दा लेव्हरेजेस शोधावित असे माझे मत हे. (लोके इथे लिन्का देतात ते चान्गले हे, पण अधुन्मधुन स्वताहाचेहि मत मान्डा कि राव.) आफ्रिका हे एक लेव्हरेज होउ शकते. दुसरे काय होउ शकते ? असे गोळा करणंयाएवजि आपन हातातले मोठे पत्ते चिनकडे जाउ दिले. नेपाळ चिनकडे झुकायला लागला तसे भुतानचे व्हायला नको.

तर या लिन्कान्ना माझापन एक झब्बु Proud - http://news.rediff.com/column/2009/nov/11/bharat-verma-on-how-india-must...
सिक्युरिटि इश्यु सोडवण्यासाठि मिलिट्रि थिन्किन्ग आवश्यक हे - ""We must always plan to take war to the enemy using his vulnerabilities."" युध्द खेळले पाहिजे आनि सगळ्या प्रकारच्या स्टेजेसवर (व्यासपिठान्वर ?) खेळले पाहिजे.

exposeobama.com is a good site. तरी मला तो एक वडील व पती म्हणून ठीक वाट्तो. मिशेल फार नाकाने कांदे सोलत असते सध्या पण त्याच्या डोळ्यात भलतेच दिस्ते. एक १० वर्शाची मुलगी तिच्या वडिलांसोबत त्याच्या मीटिन्ग ला आली होती तिला तो म्हणे अ‍ॅब्सेन्ट नोट लिहून देउ का टीचर साठी? ते मला क्युट वाट्ले. त्याच्या पुढे भयंकर मोठी चॅलेन्जेस आहेत. तोंड्पाटीलकीवर राज्य चालवता येते का?

स्वतःच्याच जोरावर फार काळ चालत नाहीत, त्याला 'बाहेरुन' किंवा लोकलच जोरदार सपोर्ट लागतो. कोण मदत करणार त्या उइघुरांना? आणि त्यांना ताकद येईपर्यन्त चिनी सरकार गप्प बसणार आहे का? तुम्हाला माहिती असेल तर लिन्क द्या. मते मांडताना ती तशी का आहेत, कोणत्या माहितीवर आधारीत यालाही महत्व आहे, तेव्हा माहिती कुठून मिळाली ते पडताळून पहाता यावे यासाठी लिन्का द्याव्यात. आणि लोकांनी वाचाव्यात. Happy

चीनच्या पर्यावरणाबद्दलच्या रिसर्चच्या माहितीची लिन्क मुद्दाम दिली. बाकीच्यांना कुरकुर करायला जागा नको म्हणून ते स्वतःच प्रयत्न करत आहेत.

>>आफ्रिकेतल्या स्टेजवर अमेरिका चिन एकत्र येणे सध्या तरि अशक्यच दिसते. पण आफ्रिकेत आपलाहि थोडा >>प्रेझेन्स आहे, आफ्रिका हे एक लेव्हरेज होउ शकते
हे कसे ते लिहा.

झब्बू लिन्कमध्ये 'हाऊ' वर कमीच भर आहे. infrastruture ही बेसिक गोष्ट आहे, ती सुरुवातीपासूनच असली पाहिजे. कोणा शत्रूला शह द्यायला म्हणून स्वतःच्याच देशात ती असण्याची गरज आता वाटते हे वाईट आहे.

>>अमेरिका हि दिवाळ्खोर झाल्या मुळे त्यांना चिन पुढे लोटांगण घातल्या शिवाय गत्यंतर नाहि.
कारण चिन कडे २.५ ट्रिलिअन कॉश आहे.<<
जागतीक बाजारपेठेत सोन्यानंतर पत कोणाची असेल तर ती अमेरिकन डॉलरची. साहजीकच त्याचा आपापल्या कुवतीप्रमाणे साठा (foreign reserve) करणे हे क्रमप्राप्त. पण त्याचा उपयोग अमेरिकेला वेठिस धरण्यासाठी करणे हे अशक्य. It's like holding a bluechip company stock and doing whatever it takes to minimize your risk exposure. Wink

>>चिन आफ्रिकेतिल अनेक देशान्ना राष्ट्रउभारणि टाइपचि मदत करत हे
यात शस्त्रे पुरवणे पण येते.
Very true. Ironically, all five members of the UN Security Council are the biggest arms/ammo supplier to the world. I saw a Nicolas Cage movie a while back, Lord of War. Cage plays a smalltime arms dealer (Yuri Orlov) making big bucks and is under FBI radar. To make the long story short; Yuri's opening monologue is something like this... "There are over 550 million firearms in worldwide circulation. That's one firearm for every twelve people on the planet. The only question is: How do we arm the other 11?"

Happy Thanksgiving everybody!

ही काही इन्टरेस्टिन्ग माहिती. आत्तापर्यन्तची भारतासाठीची जेवणे, मेनू इ. Happy

60 years of US meals for India

ओबमा सरकारने आयोजित केलेले हे पहिलेच स्टेट डिनर आहे. यावेळी जेनिफर हडसन गाणार आहे.

ही भेटीची बातमी-
http://www.washingtonpost.com/wp-dyn/content/article/2009/11/24/AR200911...

ठिक हे शर्मिलाकाकु, तुम्च्या पध्दतिने होउन जाउ दे Happy

आफ्रिकेमधे भारत
२००६ चा लेख आहे. चिनच्या तुलनेत आपन अजुन लिम्बुटिम्बु असलो तरि या आघाडिवर आक्रमक झालोत त्याचि माहिति इथे दिलि हे. ""this is a resource war"" असे तो विश्लेशक म्हणत हे. २००० (नायजेरिआ), २००१ (अल्गिरिआ), २००२ (मॉरिशस) असे सलग तिन वर्शि प्रजासत्तक दिनाचे प्रमुख पाहुणे आफ्रिकन देशान्चे होते.

भारताचा आफ्रिकेतला वाटा वाढावा ह्यासाठि प्रयत्न
हि ताजि बातमि. भारताचा "प्रेझेन्स" कसा व कितपत हे यातुन कळेल. जाताजाता सान्गायचे कि चिनचि मेनलि सब-सहारन देशान्मधे गुन्तवणुक हे.

भारत आता बॅकफुटवर असला तरि आपल्या बाजुने काहि घटक आहेत. भारताचि लोकशाहि शासनव्यवस्था व येथलि अर्थव्यवस्था यान्च्यात आफ्रिकन देशान्ना इन्टरेस्ट हे. भारतात आफ्रिकेतुन शिक्षणासाठि विद्यार्थि येतात, हे प्रमाण वाढवले पाहिजे. आफ्रिकेतिल कैक देशान्मधे भारतिय वर्शानुवर्शे रहात हेत. (अमेरिका-भारत यान्च्या सन्दर्भात अशा प्रकारचे लॉजिक वापरल्या जाते).

अमेरिका व आफ्रिका
या लेखामधुन अमेरिका-आफ्रिका सम्बन्धान्चा अन्दाज येतो. अमेरिकेला आफ्रिकेतल्या साधन्सम्पत्तिपेक्षा व्युहात्मक रस (स्ट्रेटेजिक इन्टेरेस्ट) जास्त हे.

अमेरिकेचि चिन-पॉलिसि congagement चि हे (contain + engagement).
अमेरिकेचि कन्गेजमेन्ट पॉलिसि
या लेखामधे अगदि सुरुवातिला पॉलिसिमेकर्स शुड मधे पहिले २ पोइन्ट्स वाचा. तिथे हि कन्गेजमेन्ट पॉलिसि थोडक्यात सान्गितलि हे. ह्यान्च्या मते भारत आनि जपान या पर्यायान्मधुन कन्टेनमेन्टसाठि भारत जास्त उत्तम असे मत हे मानड्त हेत.
आय कोट ""The best course from the standpoint of American interests would be to encourage the emergence of multiple centers of power in Asia. The existence of several significant security actors would complicate the PRC’s strategic calculations.
Encouraging the evolution of a multipolar strategic environment is not the same as adopting a U.S.-led containment policy against China. Washington does not have to be the godfather of a vast anti-PRC alliance. If U.S. officials stop smothering Japan and other allies in an effort to perpetuate their security dependence on the United States, and fully accept India as an independent, capable military power, China’s neighbors will draw their own conclusions about Beijing’s probable strategic behavior and adopt policies accordingly. Washington merely needs to get out of the way of that most normal of processes in the international system.""
"न्युकिअर" डिल (:फिदी:) तर झाले हे, त्यात खोडा येत नाहि. बाकि आर्थिक आनी मिलिटरि विशयान्मधे आपले अनेक इन्टेरेस्ट्स सारखे हेत. अमेरिकेचि चिनशि जोरदार "यन्गेजमेन्ट" झालि, रिन्गचा ८०० बिलिअन डालर्सचा बाम्बुसुध्दा बसला (मग ? येकटा कुन्द्राच करु शकतो काय असला खर्च :फिदी:) तर अमेरिकन प्रथेप्रमाणे कन्टेन्मेन्टचे प्रि-नप करावे लागेलच कि Wink

न्युजविकच्या लेखानुसार अमेरिकेला आफ्रिकेमधे व्युहात्त्मक रस हे. स्ट्रेटेजिक इन्टेरेस्टसाठि भारत जास्त जवळ कि चिन, जो आधिच डोइजड होउ लागला हे ? अमेरिकेचि आफ्रिकेत असण्याचि कारणे आपल्या सोयिचिच हेत, आपल्या विरुध्द नाहित. भारताचा आफ्रिकेशि व्यवहार सुरु हे व वाढतो हे. शिवाय सिएरा लिओन, सोमालिआ, इथिओपिआ, एरिट्रिआ, बुरुन्डि इत्यादि यादविग्रस्त देशान्मधे युएनच्या शान्तिसेनेमधि मोठा सहभाग कोणाचा गेस करा बरे Proud भारताच्या सैन्याला या भागात काम करणेचा चान्गलाच अनुभव हे व भारतिय सैन्याचे उत्तम कामामुळे आफ्रिकेत आपल्याबद्दल गुडविल हे. ह्या सगळ्या बॅकग्राउन्डचा वापर करुन भारत अमेरिकेचा आफ्रिकेतला स्ट्रेटेजिक पार्टनर नक्कि होउ शकतो. ह्येलाच मि भारताच्या द्रुश्टिने लेव्हरेज म्हणतो. अशि व्युहात्मक मैत्रि जागतिक राजकारणात "चिनला आवरा" धोरणाचा एक महत्वाचा भाग होइल.

तुम्हि उइघुरान्बद्दल सान्गितले ते बरोबर हे. बाहेरुन आणि आतुन सपोर्ट पाहिजे. झिन्जियान्गला लागुनच कझाकस्तानचि १७०० किमि बॉर्डर हे. कझाकस्तानात सव्वदोन लाख उइघुर रहातात जि मध्य आशियामधलि सर्वात मोठि उइघुर कम्युनिटि हे. हे सर्व मुस्लिम हेत.
http://news.bbc.co.uk/2/hi/asia-pacific/6284734.stm
http://www.abs-cbnnews.com/world/07/08/09/central-asia-uighurs-look-fury...
ह्या लोकान्न्ना मध्य आशियातुन कोणाचाहि सपोर्ट नाहि. अजुनपर्यन्त तरि ह्या मुव्हमेन्टला "इस्लाम बचाओ"चा रन्ग चढला नाहिये. पन २००२ मधे तुम्च्या रम्स्फेल्डने चिनला खुश ठेवण्यासाठि उइघुर विभक्तवाद्यान्च्या ETIM या सन्स्थेला "टेररिस्ट लिस्ट" मधे टाकले. चिनचि आणखि "लाल" करण्यासाठि ओबामाने ह्या लोकान्विरुध्द काहि एक्शन घेतलि तर केवळ अमेरिकेने ति एक्शन घेतलि म्हणुन त्याला हिरवा रन्ग बघता बघता चढेल. रम्सफेल्डच्या वेळिच हे कसे झाले नाहि ह्याचे मला आश्चर्य वाटते किन्वा कदाचित सुरुवात झालिहि असेल. ओबामाने असल्या (म्हणजे रम्सफेल्डसारख्या) महाडेन्जरस क्रुति टाळल्या पाहिजेत. असो.

च्यामारि ३ब्या. आशिया आनी ओबामा असा बाफ आणि तु आफ्रिका आफ्रिका काय करत बसलाहेस ? माफि करा हो. आपन आशियाकडे येउ Happy मध्य आशियाचि परिस्थिति पाहिलि का ? लै इन्टेरेस्टिन्ग हे. सगळि बडि धेन्ड आखाड्यात हेत Happy उझबेकिस्तानात अमेरिकेचे कायमचे आर्मीबेस आले हेत. कझाकस्तानात रशिया, चिन, भारत, अमेरिका सगळ्यान्चा इन्टेरेस्ट हे. आपले २००९ चे प्रजासत्ताक पाहुणे कझाकस्तानचे अध्यक्ष होते. तिकडे युक्रेन, जॉर्जिआ हे देश नाटो मधे घेउ असे त्यान्ना युएसने सान्गितले हे.

ओबामा-मनमोहन काहि नविन निघाले नाहि. जुनि जेडि जुन्या बाटलित. तशाहि अपेक्षा फार नव्हत्या. तिकडे चिनबरोबर संयुक्त निवेदन करुन लगेच इकडे पहिले स्टेट डिनर भारताला देउन बॅलन्स साधनेचा चान्गला प्रयत्न केलाय.

वाचत आहे..

>>"न्युकिअर" डिल
तुम्हाला "न्युक्युलर" म्हणायचे आहे का? Happy

[ही अ‍ॅनॉयिन्ग स्टाइल सोडून सरळ लिहिलेत तर बरे होईल. वाचायला सोपे, आणि तुम्हाला लिहायलाही सोपे. Happy (याचा चर्चेशी काही संबंध नाही, तेव्हा अर्थातच तुमची मर्जी)]

Pages

Back to top