मातृदिन : माझ्या आईच्या पध्दतीचा आंब्याचा शिरा

Submitted by दीपांजली on 10 May, 2010 - 02:58
shira

आंब्याचा शिरा:

लागणारा वेळ:
अर्धा तास

साहित्यः
१ वाटी जाड रवा
पाऊण वाटी सजुक तूप
१ वाटी साखर
२ वाटी हापुस अंब्याचा पल्प ( फ्रेश किंवा कॅन मधला)
दीड वाटी गरम दूध
काजु, भिजवलेले साल काढलेले बदामाचे काप, बेदाणे. (प्रमाण आवडी प्रमाणे)
सजावटः
ड्राय फ्रुट्स थोडे मिक्स करायला आणि थोडे सजावटीसाठी ठेवावे.
आंब्याचा सिझन असेल तर आंब्याच्या फोडी.

क्रमवार पाककृती:

१.अर्धी वाटी तूपावर रवा मंद आचेवर खमंग भाजून घ्या.
त्यात दीड वाटी गरम दूध घालून रवा छान फुलवून घ्यायचा.
२. फुललेल्या रव्यामधे एक वाटी साखर मिक्स करून रवा नीट हलवून घ्या.
३. साखर मिक्स झाल्यावर हापुस आम्ब्याचा आमरस घाला आणि मग उरलेलं तूप त्यात घालून रवा, आमरस सगळं नीट मिक्स करायचं, गॅस बारीक करून झाकण ठेवायचं.
४. दोन तीन मिनिटांनी वाफ आली कि त्यात काजु, बदाम तुकडे आणि बेदाणे घालून मिक्स करा.
शिरा तयार.
सर्व्ह करताना:
सजावट करताना छान अकाराच्या साच्यातून तूप लावून मुदी कराव्यात आणि फोटोत दाखवल्या सारख्या किंवा आवडी प्रमाणे काजु-बदाम-बेदाण्यांचं डिझाइन बनवून सजावट करावी.

वाढणी/प्रमाण:
खाणार्‍यावर अवलंबून
अधिक टिप्सः
* आंब्याच्या शिर्‍यामधे स्वाद फक्त हापुस आंब्याचाच ठेवावा.
वेलदोडा, केशर अशा गोष्टी अजिबात घालु नये.
* यु.एस मधल्या स्टोअर्स मधे मिळणारा केसर मँगो पल्प अजिबात वापरु नये, त्या पेक्षा रत्नागिरी हापुस, देसाईंचा पल्प मिळतो तो वापरावा.
* कॅलरी कॉन्शस लोकांने पोरशन कंट्रोल करावा पण कमी तूपात अजिबात करु नये, गचगचीत शिरा होईल !
माहितीचा स्त्रोतः
आई :)

हा आईने बनवलेल्या शिर्‍याचा फोटो :
shira2.jpg

Much requested video, finally on my channel ,
माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ +grocery vlog : आंब्याचा शिरा ( आईची रेसिपी):

आवडला तर लाइक करा आणि शेअर करा :)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG-20180303-WA0024.jpeg
काल पुन्हा केला. हा मस्त जमला.

कृपया एखाद्या लग्नाच्या मेहेंदी किंवा संगीत कार्यक्रमात "बाय द वे आजकाल स्वीट डिश आंब्याचा शिरा ठेवायचा ट्रेंड आहे. ओळखीतला आचारी आहे" असे उद्गार पेरणे !

आज कितव्यांदातरी या पद्धतीने शिरा केला. आईने दिलेला घरी केलेला आटीव रसाचा गोळा उदंड वेळा शिराच करून संपला. क्वचित आम्रखंड/फ्रूट कस्टर्डात घातला असेल. शेवटी आज न रहावून चितळ्यांच्या आंबा वडीचा केलाय. वरून साखर
अ-जि-बा-त घालावी लागणार नाही. वडी खच्चून गोड आहे. आणि मला चिट्टचिकट गोड चव आवडत नाही.

शेवटी आज न रहावून चितळ्यांच्या आंबा वडीचा केलाय. वरून साखर
अ-जि-बा-त घालावी लागणार नाही. वडी खच्चून गोड आहे. आणि मला चिट्टचिकट गोड चव आवडत नाही.>>> सहमत! भयाण गोड चव आहे,अगदी गुळ खाल्यासारख वाटते, चितळ्याची आन्बाबर्फी हा अतिशय ओव्हररेटेड पदार्थ आहे.

आंबा बर्फी आणि आंबा वडी दोन वेगवेगळे पदार्थ आहेत. खूप दिवसांत केला नाहीये या पद्धतीनं शिरा, आता केला पाहिजे.

सिंडे, आंबा बर्फी वेगळी हे माहितेय गं, मी शिरा करायचा म्हणूनच वडी आणली.
पण ती इतकी गोडीष्ट निघेल असं वाटलं नव्हतं.

वरून साखर
अ-जि-बा-त घालावी लागणार नाही. वडी खच्चून गोड आहे.>>>> सहमत.मला चितळेंची आंबाबर्फी खूप आवडायची.पण गेल्या काही वर्षांत प्रमाणाबाहेर गोड असते की कंटाळा आला.

Much requested video, finally on my channel ,
माझ्या चॅनलवर नवीन व्हिडिओ +grocery vlog : आंब्याचा शिरा ( आईची रेसिपी):

https://youtu.be/fQKl8TeMXQo
आवडला तर लाइक करा आणि शेअर करा :)

आत्ताच केला, फारच मस्त झाला.. मी केशर घातलं, मला केशर आणि आंबा कॉम्प्लीमेंटरी वाटतात. सुगंध आला एकदम !Screenshot_20210313-143514_Gallery.jpg

अस्मिता, मस्तच. माझी आई आंब्याच्या शिऱयाची आंबा शिरा पोळी बनवते.. ती पण मस्त होते

दिपांजली अगदी हेच प्रमाण घेऊन सगळी कृती जशीच्या तशी केली. एकदम मस्त झाला शिरा. मोकळा आणि मऊ... खूपच आवडला! अनेक धन्यवाद!

डीजे झकास झालाय हा व्हिडीओ, मस्त कलरफुल. ग्रोसरीपासून सर्व दाखवलंस, छान वाटलं बघायला.

आईची रेसिपी स्वादिष्ट दिसतेय आणि हा व्हिडीओही भारी.

अस्मिता, माझे मन फोटो सुपर्ब.

करून पाहिला मी हा शिरा. छान झाला. विडिओ खूपच मस्त. लगेच चॅनेलवरचे बाकीचेही व्हिडिओ बघून टाकले.
<<<<
Thanks Arti !

आमच्याकडे देसाई बंधुंचा आमरस मिळाल्यामुळे लगेच हा शीरा करणं भाग होतं. एका गटगसाठी केला होता, प्रचंड आवडला सर्वांना.

Pages