टीप- या विषयावर धागा आधीच काढला असेल, तर हा काढून टाकेन.
गेले वर्षभर आपण सगळेच या महामारीशी लढतोय पण येणार्या काही वर्षात परिणाम काय होतील? सध्यातरी फैलाव थाम्बण्याचे नाव घेत नाहिये.. नवनवीन स्ट्रेन्स येत आहेत..
१. उद्योगधन्दे बन्द
२. शैक्शणिक वर्षाचे नुकसान
३. नोकर्या जाणे
४. शहरातील लोन्ढा गावाकडे परत (काहिप्रमाणात)
५. उपासमार
ज्या वयात मुलानी एकत्र येऊन मैदानी खेळ खेळायला हवे, ते घरात आहेत. जे शेवटच्या वर्षात असतील आणि नोकरीची स्वप्ने बघत असतील, कोणितरी बाहेर देशी नवीन शिक्षण/जॉब सुरु करणार असेल, कोणी नविन उद्योग चालू केला असेल आणि बन्द ठेवावा लागत आहे, कर्ज असेल तर वेगळेच, या सगळ्यावर अवलम्बून असणारे कामगार, हॉस्पिटॅलिटी इन्डस्ट्र्रीचे नुकसान हे सर्व नक्कीच तात्पुरते नाही.
लोक डिप्रेशन मधे जाण्याचे प्रमाण आधीच वाढले आहे, इतक्यातच दूरच्या ओळखीमधे २-३ आत्महत्या ऐकल्या (१ स्टुडन्ट, १ व्यावसायिक). लोकान्ची गन्गाजळी घटतेय.
यासाठी सपोर्ट ग्रुप सगळीकडे आहेत का? कोरोनातून बाहेर येता येता अशा केसेस वाढतील कि उम्मीद पे दुनिया कायम हे?
अनिश्चितता माणसाला बदलवून टाकेल कि अशाच किन्वा याहिपेक्षा जास्त अवघड परिस्थितीतून (प्लेग्,स्पॅनिश फ्लू, जागतिक महायुद्धे आणि मन्दी) आपण बाहेर आलोय तर भविष्यात कधीतरी "back to normal" होऊ? No Mask/No Sanitizer/No Social distancing ( हे राहिले तर आवडेल भारतात)
pandemic (महामारी ) चा काळ
pandemic (महामारी ) चा काळ आहे आणि व्हायरस त्याचे काम करत आहे. आपणही आपल्या परिने अस्तित्व टिकविण्यासाठी काम करायला हवे. तुम्ही उल्लेख केलेले सर्व दुष्परिणाम (नोकरी नसणे, आर्थिक नुकसान, व्यावसाय बंद , सोशल लाईफ नाही) मी बघत आहे, अनेक जवळच्या लोकांना हा त्रास झालेला बघत आहे.
आधी व्हायरस आला, पुढे त्याचा वेगाने प्रसार, तेव्हढ्याच वेगाने युद्धपातळीवर लस तयार होणे, अनेक लोकांना संसर्ग होत असतांना व्हायरस मधे होणारे बदल (mutations) , मग व्हेरियंटस... व्हेरियंटस चे प्रकार, आता डबल व्हेरियंट. तयार केलेल्या लसी कितपत संरक्षण देणार याबाबत अनभिज्ञता...
यातून बाहेर पडण्याचा मार्ग अजून तरी दिसत नाही. आज ( या महिन्यात) झालेले आर्थिक नुकसान उद्या भरुन काढण्याची शक्यता आहे. गेलेली नोकरी मिळेल, गेलेला पैसा पण मिळेलच.... पण गेलेला जिव नक्कीच परत मिळणार नाही. सिर सलामत तो पगडी पचास.
आपल्या परिने काळजी घेत रहावी. शक्य असेल तिथे सोशल डिस्टंसींग पाळणे, बाहेर वावरताना मास्क वापरणे, साबणाच्या पाण्याचे हात स्वच्छ करणे (विशेष करुन जेवणाच्या अगोदर) . जिथे जिथे शक्य असेल (आणि आवश्यक असेल - गरजूंना ) तिथे इतरांना जरुर मदत करा. मदतीचे स्वरुप अनेक प्रकारचे आहे - आर्थिक असेल, बाहेरुन सामान / वस्तू आणून देणे असेल, कोरोना बाधित परिवाराला जेवण तयार करुन पोहोचवणे असेल ( हे अंतर राखून करता येते).... किंवा कुणाशी दोन शब्द बोलणे असेल.
उदय... एक नंबर प्रतिक्रिया. +
उदय... एक नंबर प्रतिक्रिया. ++++१११ सहमत.
उदय यांच्याशी सहमत
उदय यांच्याशी सहमत
जर आपण कोरोना महामारी च्या
जर आपण कोरोना महामारी च्या मूळ कारणावर (निसर्गाचा ऱ्हास) काही कृती केली नाही तर ये तो केवल झाँकी है.. एक हॉरर पिक्चर अभी बाकी है.
मला हे लिहिताना फार वाईट वाटतं पण हीच वस्तुस्थिती आहे पुढे याहून अधिक तीव्र आणि अधिक विध्वंसक आपत्ती येत राहणार आहेत. जर तुमच्या अंगात घातलेल्या कपड्याला आग लागली तर तुम्ही जी तातडी दाखवाल आग विझविण्यासाठी ती तशी तातडीची परिस्थिती आहे असं समजा आणि कृती करा. तरच काहीतरी शिल्लक राहिल.
<< जर आपण कोरोना महामारी च्या
<< जर आपण कोरोना महामारी च्या मूळ कारणावर (निसर्गाचा ऱ्हास) काही कृती केली नाही तर ये तो केवल झाँकी है.. एक हॉरर पिक्चर अभी बाकी है. >>
------- मानवाने ज्या दिवशी वस्ती थाटण्यासाठी झाडे तोडायला सुरवात केली त्यादिवशी पासून निसर्गाचा (अनैसर्गिक वा माननिर्मित) र्हास होणे सुरु झाले असे मी मानतो. पुढे शेती आली... पायवाट... उद्योग... दळणवळण असे अनेक टप्पे आहेत पण र्हासाचे प्रमाण जाणवण्यासारखे नव्हते. आता यात अमाप लोकसं ख्येची भर पडत आहे, सतत वाढत आहे...
पायी फिरणारे, बैलगाडी/ घोडे... नंतर सायकल, मोटारी... आता विजेवर चालणार्या गाड्या ( पण याने net gain, carbon neutral ता येते असे मला पटलेले नाही... तुम्ही कुठेतरी electricity तयार करतच आहात).
निसर्गाचा होत असलेला र्हास भरुन काढण्याची नैसर्गिक क्षमता निसर्गात आहेच... पण दोघांच्या वेगाचा ताळ-मेळ बसत नाही.
साडे सात बिलीयन लोकांच्या विविध दैनंदिन क्रिया आणि त्यामुळे होणारे दुरगामी परिणाम हे किती काळ चालणार?
लोकसंख्या अनंत काळापर्यंत वाढणार नाही असे विविध मॉडेल्स सांगतात. लोकसांख्या वाढीचा वेग मंदावणार आहे,
https://population.un.org/wpp/
https://population.un.org/wpp/Publications/Files/WPP2019_10KeyFindings.pdf
पुढे काही दशकानंतर (२१०० नंतर) मानवाची लोकसांख्या कमी व्हायला सुरवात होणार आहे... (आशावाद !)
<< मला हे लिहिताना फार वाईट वाटतं पण हीच वस्तुस्थिती आहे Sad पुढे याहून अधिक तीव्र आणि अधिक विध्वंसक आपत्ती येत राहणार आहेत. जर तुमच्या अंगात घातलेल्या कपड्याला आग लागली तर तुम्ही जी तातडी दाखवाल आग विझविण्यासाठी ती तशी तातडीची परिस्थिती आहे असं समजा आणि कृती करा. तरच काहीतरी शिल्लक राहिल. >>
------ काय कृती करायला हवी? कृपया लिहा ( किंवा तुम्ही इतर कुठे लिहीलेले असेल तर मला लिंक सांगा)... किमान २० -२५ लोक वाचतील आणि विचार करतील आणि एक अगदी छोटा बदल घडेल.
अनेकांना काही तरी करावे असे वाटतच असते , पण कळत नाही.
उदय, धन्यवाद या प्रश्नासाठी!
उदय, धन्यवाद या प्रश्नासाठी!
शाश्वत जीवनशैली आंगिकारल्याने अनेक समस्या कमी होऊ शकतात. कायदे अथवा पॉलिसीज बदलण्याचे दूरगामी आणि व्यापक परिणाम असतात तेव्हा त्यांचं महत्त्व आहेच! पण आपण सामान्य नागरिक म्हणून देखील बऱ्याच गोष्टी करू शकतो.
मध्यंतरी मी मायबोलीवर जी एक छोटीशी लेखमाला लिहिली होती त्यातील शेवटच्या लेखाचा दुवा देते आहे. त्यात आधीच्या लेखांचे दुवे मिळतील. यात मी सामान्य माणसाला जगताना शाश्वत पर्याय कसे निवडता येतील या विषयी माहिती दिली आहे. कितीही छोटी कृती असली तरी तिचा फायदा होईलच. त्यामुळे मी एकट्याने केले तर काय होणार आहे असा विचार आजिबातच करू नये. Every drop counts हे लक्षात ठेवावे.
दुवा: https://www.maayboli.com/node/75251
एक अजून धागा आठवला जिथे
एक अजून धागा आठवला जिथे सगळ्यांनी अफाट भारी युक्त्या सुचवल्या होत्या! त्याचा दुवा खाली देते आहे.
अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना
हा व्हायरस चीनने पसरवला आहे
हा व्हायरस चीनने पसरवला आहे त्यामुळे लवकरच अमेरिका दुसरा व्हायरस पसरवणार यात काडीमात्र शंका उरलेली नाही. मी गावी आमच्या शेतात एक घर बांधायला घेतलं आहे. त्याला चारही बाजुंनी मोठी भिंत उभारली आहे. त्यामध्ये वर्ष दोन वर्षे पुरेल एव्हडं समान भरलं आहे. समजा अमेरिकेने विषाणू पसरवला तर तो खूपच घातक असेल. त्यात मृत्यूदरही जास्त असेल. समजा परत असं काही व्हायला लागलं तर मी या घरात शिफ्ट होणार आणि वर्ष दोन वर्षे कोणाशीही संपर्क ठेवणार नाही.
(No subject)
आजच हि बातमी वाचायला मिळाली!
आजच हि बातमी वाचायला मिळाली! So true..
https://www.ndtv.com/world-news/hsbc-managers-heart-attack-prompts-viral...
"We're not able to have those other conversations off the side of a desk or by the coffee machine, or take a walk and go and have that chat," he said. "That has been quite profound, not just in my work, but across the professional-services industry."
Chronic fatigue syndrome
Chronic fatigue syndrome किंवा ME हा आजार काही कोव्हिड पेशंट्स मध्ये दिसून येत आहे. त्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ : https://youtu.be/lQpvsgiCZno