स्मशान

Submitted by Rudraa on 10 April, 2021 - 22:47

हे झाल कि ते अन ते झाल की हे,
एकाच मातीत एकावर एक......
असे कित्येक मढे जळतात,
रोज त्याच त्याचं स्मशानात.......

लाकडावर मनसोक्त झोपतात,
शांततेच कफन पांघरतात.......
कानांना अगदी घट्ट बंद करतात,
आक्रोशाला जणू नजरअंदाज करतात......

होते शरीराची राख,
उरतात कधी एकास दोन हाडे.....
यतो आक्रोशाचा लोंढा,
वाहून जाते राखेखालची मातीही त्यात.....

सुन्न होतो आश्रुंचा पूर,
डूबतात त्यात आठवनींच्या नावा....
कावळ्याने शिवता पिंडाला,
संपत त्याच अस्तित्व अन विरुन जातात आठवनींच्या ठेवा...

रुद्र......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता फक्त शुद्धलेखन सुधारून खाली दिली आहे.

हे झालं कि ते अन ते झालं की हे,
एकाच मातीत एकावर एक......
अशी कित्येक मढी जळतात,
रोज त्याच त्याच स्मशानात.......

लाकडावर मनसोक्त झोपतात,
शांततेच कफन पांघरतात.......
कानांना अगदी घट्ट बंद करतात,
आक्रोशाला जणू नजरअंदाज करतात......( कान नजर अंदाज कसे करतील?)

होते शरीराची राख,
उरतात कधी एकास दोन हाडे.....
येतो आक्रोशाचा लोंढा,
वाहून जाते राखेखालची मातीही त्यात.....

सुन्न होतो अश्रूंचा पूर,
बुडतात त्यात आठवणींच्या नावा....
कावळ्याने शिवता पिंडीला,
संपतं त्याचं अस्तित्व अन विरुन जातात आठवांच्या ठेवा...

नजर अंदाज करतात म्हणायचे तात्पर्य ऐकुन न ऐकल्यासारखे करतात तरी पण चुकीच वाटत असेल तर sorry आणि काही चुकत असेल तर आवर्जून सांगत जा....

पण चुकीच वाटत असेल तर sorry आणि काही चुकत असेल तर आवर्जून सांगत जा....>> अहो तुमचे क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन आहे. त्यात चूक बरोबर काही नाही. फक्त कान हे ऐकायचे इंद्रीय आहे ते नजर अंदा ज कसे करू शकतील असा एक प्रश्न होता. तुमच्या कवि ता छान आहेत. मृत्यु अशीच थीम का घ्यावीशी वाट्ते आहे?

माझ्या पण डोक्यात असेच नेमके विचार घुटमळत असतात( आजारी असल्याने) म्हणून लगेच रिलेट होते. अजून लिहा व शुभेच्छा.

खर तर मी आत्ताचं या काही दिवसापासून लिखाणास सुरुवात केली आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस शब्द चुकतात आणि त्या चुका कोणीतरी सांगाव्या असं मला नहमी वाटत.
मृत्यू बद्दल मला नेहमीच प्रश्न पडतात जस की मृत्यू म्हणजे दुःख की दुःखाचा अंत कदाचीत या प्रश्नांमुळेच त्यावर लिहायला आवडत असाव.

मृत्यू बद्दल मला नेहमीच प्रश्न पडतात जस की मृत्यू म्हणजे दुःख की दुःखाचा अंत>>> मला पण हे प्रश्न पडतात. पहिली शक्यता म्हणजे आपण मेलो की सगळं संपलं. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. दुसरी शक्यता म्हणजे पुराणात जे सांगितलंय की किड्या मुंग्यांच्या जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो म्हणजे किडे मुंग्या दुसऱ्या मितीत जगतात आणि आपण तिसऱ्या मितीत. त्याचप्रमाणे या जन्मानंतर आपण चौथ्या मितीत जाऊ. जसं किड्या मुंग्यांना आपल्या मितीची समज नाही तशीच आपल्याला चौथ्या मितीची समज नाही. तिसरी शक्यता म्हणजे आपण एक सिम्युलेशन्स आहोत जसे कॉम्प्युटर गेम्स असतात. कोणत्यातरी प्रगत जीवसृष्टीने आपल्याला बनवलं आहे. ही दुनिया आभासी आहे.

छान पोस्ट बोकलत. मला पण मी काय म्हणून पुनर्जन्म होईल ह्याची जाम उत्सुक ता आहे. पशु पक्षी प्राणी किडा मुंगी झाड मशरूम.

पुनर्जन्म असेल तर तुम्ही चौथ्या मितीत जाल. ज्याप्रमाणे किडे मुंग्याना आपल्या मितीत काय सुरू आहे याची कल्पना नाही त्याप्रमाणे चौथ्या मितीत काय असेल याची कल्पना आपल्याला नाही.

पुनर्जन्म असला तरी मिती कशाला बदलायला पाहिजे? मुंगी पुढे-मागे, वर-खाली, उजवीकडे-डावीकडे फिरते म्हणजे तीन मितीत जगते. गड्या आपल्या तीन मितीच बऱ्या!