कोव्हिड केंद्रात भरती होताना काय सामान न्यावे? खबरदारी घ्यावी?

Submitted by अश्विनीमामी on 2 April, 2021 - 06:54

माझ्या कोविड चाचणीचा निकाल आज सात परेन्त येइल. सध्या तरी मला फार त्रास नाही. पण वय व को मॉर्बिडीटीज मजबूत आहेत.
होम आयसोलेशन व रिकव्हरी मला सर्वात सोयीचे पडेल. व मानसिक ताण पण कमी बसेल. आता अश्या परिस्थितीत बीएम सी तल्या लोकांनी कोविड सेंटर मध्ये शिफ्टच व्हा असा आग्रह धरला तर काय करावे? त्यांच्या नियमा नुसार जावेच लागेल. माझी पॉलिसी सरकारी नियम कायदे फर्माने आदेश पाळण्याचीच आहे.

इथे घराजवळच कोविड स्पेशल केंद्र आहे. तर तिथे राहताना काय काय सामान बरोबर असावे?
१) टूथ पेस्ट ब्रश साबण टावेल.
२) दोन कपडे जोडी
३) रोजची औशधे.
४) एक लाइट पांघरूण.
५) पैसे खूप नाहीत पण थोडे बहुत. कार्ड?! आधार व पॅन कार्ड
६) फोन व चार्जर
७) लॅप टॉप नेता येइल का? चार्जर सहित. केंद्र मध्ये वायफाय सुविधा असते का?! सॉरी माझा आत्तापरेन्त फक्त हॉटेलात राहायचा अनुभव आहे.
का चोरी होईल?!
८) खाणे व पाणी तिथे मिळते का? आपण सोय करावी लागते? पाण्याची बाटली.

पाच नाहीतर सहा एप्रिल ला माझी एक दुसरी ट्रीटमेंट स्केज्युल होती त्यामुळे त्यानंतर व्हॅक्सिनचे काम करावे असा मानस होता म्हणून अजून घेतले नव्हते. ३१ मार्च परेन्त वर्स अखेर म्हणून कामाची घाई होती.

अजून काही विसरले असेल तर सांगा. इतर सूचनांचेही स्वागत आहे. मला मॅन पावर काही नाही. पण गरज पडल्यास हपिसातील अधिकारी( हेल्थ ऑफिसर आहेत) त्यांना संपर्क करता येइल .

फीलिन्ग नर्वस. ह्याचे बरोबर भाषांतर थोडी भीतीच वाटत आहे असे आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, बाकी सर्वांनी लिहिलं आहेच पण एक सूचना की तो ऑक्सिमीटर नक्की आणा आणि लेव्हल चेक करत राहा.
तोंडाची चव गेली असली तरी पौष्टिक अन्न, व्हिटॅमिन घेत राहा.
काळजी घ्या आणि आयसोलेशन पिरियडमध्ये किमान एक पुस्तक वाचणं, एक वेबसिरीजचा सीझन संपवणे असं टार्गेट ठेवून पूर्ण करा Happy

Pmc वाले दरवाज्यावर कोविड पेशंटचं घर असा कागद लावून गेलेत तर ती त्याला तिचं मानपत्र म्हणते
मेधावी, खरच त्यांच कौतुक की ईतक सहज ठेवत आहेत स्वताला या वयात. यात माझा एक प्रश्न आहे की हे मानपत्र पी एम सी वाले कधी लावतात?
रिपोर्ट पॉझीटिव्ह आल्यावर आपल्याला पी एम सी वाल्यांना कळवावे लागते का? ( कारण अजुन आई कडे अशी कुठलिही नोटीस लवली नाही.)
जर कोणाला शक्य असेल तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासुन पुढे नेमके काय करावे लागते ह्याची माहिती मिळेल का?
सध्या आई आणि बहीण घरिच असुन डॉक्टरच्या सल्ल्याने गोळ्या घेत आहेत.

अमा, माबो वर आल्यावर नक्किच मनोबल वाढवणारे लोक भेटतातच.

अमा आणि बाकी सगळ्यांना धन्यवाद.

अमा, काळजी घ्या! लवकरच बर्‍या व्हाल, त्यासाठी शुभेच्छा!

निर्झरा, तुमच्या आई व बहिणीला लवकर बरं वाटू दे.

निर्झरा, रिपोर्ट कुठूनही केला व पाॅझिटीव आला की लगेच कावळ्यासारखे PMC वाले येतात आमच्या सोसायटीत. तेच लावतात मानपत्र. दोन दिवसांतच लावलं आमच्याकडे.

माझ्या सासुबाई पॉझिटिव्ह आहेत हे ३१ मार्च ला समजलं, अजून मानपत्र चिकटवलेलं नाही, पण पुणे म्युनिसिपल हापिसच्या क्षेत्रीय कार्यालयातून फोन आला, आमच्या एरियात चालू केलेल्या कोविड सेंटरवरून आला, आणि म्युनिसिपल हापिसच्याच सानिटायझेशन डिपार्टमेंट कडून आला. पाहिजे असेल तर या दिवशी सकाळी ९ ला फोन करा म्हणजे फवारणी करू असं म्हणाले. सगळे आजच एकामागून एक आले. पेशंटला होम क्वारंटाईन केलं आहे, डॉक्टर नी सांगितलेली औषधं चालू आहेत, बाकी लेव्हल्स ओके आहेत. तब्येत स्टेबल आहे.

आमच्याकडे सगळे हॉस्पिटल मधून घरी आले, कोविड झाल्यापासून बाबांचे आयसोलेशनचे 15, आईचे 11 आणि प्रीती चे 9 दिवस झाले तरी कुठलंही मानपत्र लावलं नाही. ,

आम्हीच सोसायटीमध्ये माणूस बोलावून 4 बिल्डिंग स्वखर्चाने सॅनिटाईज करून घेतल्या

निर्झरा, 3-4 दिवसांनी येतात. त्यांना आपला रिपोर्ट आधीच गेलेला असतो.
मी माझा अनुभव लिहिला आहे तो वाचा त्यात मी माहिती दिली आहे काही प्रमाणात.
अजून काही माहिती हवी असल्यास संपर्क करू शकता.

जर कोणाला शक्य असेल तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासुन पुढे नेमके काय करावे लागते ह्याची माहिती मिळेल का? +१२३४५
सर्वांनाच निरामय आयुष्य लाभो

मला आत्ता बीएम सी टी वार्ड मधून फोन आला. घरी किती लोक आहेत किती बेडरूम ते विचारले. मी व्यवस्थित माहिती दिलेली आहे.

आम्ही प्राक्टो वर एक डॉक्टर कंसल्टेशन घेतले त्यात त्याने ब्ल ड टेस्ट व काही औ षधे दिली आहेत ती आज आणेन.

आज मा झ्या ऑफिसातून पण व्हॅक्सिनेशन साठी फोन आलेला त्यांना डिटेल दिले आहेत. परत कधी जॉइन होईन तेव्हा ते काम करेन

घा ट कोपर च्या डॉकटरने पण कोव्हिड नंतर तुमची पुढची ट्रीटमेंट घेउन टाकू असे सांगितले आहे.

बाकी तब्येत ओके . ताप डाउन. ओक्सि जन ९८-९९ . चव नाही वास नाही. फक्त गोड तिखट इतकेच कळते आहे.

चव नाही वास नाही. फक्त गोड तिखट इतकेच कळते आहे>>
मग स्वयंपाक कसाही असेल डब्यातला तरी फरक पडणार नाही, सगळं काही भरपूर खा.
आधी विचार आला मस्त डाएटिंग होईल अशी चव नसेल तर. पण आजारात व्यवस्थित खाणं गरजेचं आहे, डाएटिंग नाही. बहुतेक पौष्टिक गोष्टी या चवदार नसतात. आता चवच नाही म्हटल्यावर त्या खाल्ल्या तरी तीच चव आवडीचे खाल्ले तरी तीच चव. म्हणजे पौष्टिकही खाता येईल.

अमा, गुड. कीप इट अप.

पुरेसं जेवा, भरपूर पाणी प्या, इथेच कोणीतरी लिंक दिली होती सूक्ष्म योगाची तसे साधे सोपे प्राणायाम करा. ठणठणीत बर्या व्हा.

इथेच कोणीतरी लिंक दिली होती सूक्ष्म योगाची तसे साधे सोपे प्राणायाम करा
ती लिन्क बघुन बहिण आणि,आई हळू हळू व्यायम करत आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा तपसणी करुन पुढिल म्हणजे एक्स रे काढवा लागेल की नाही ते सांगणार आहेत. परन्तु कालच्या टेस्ट मध्ये दोघी बर्‍याच रिकव्हर झाल्या आहेत असे डॉ. म्हणाले.
मी त्यांना फिनलँड मध्ये केला जाणारा उपाय सुचवला होता. ईथेही सांन्गते, पण तो करावा की नाही हे ज्याने त्याने ठरवावे.
ईकडे साधी लक्षण दिसली की घरीच रहायला सांन्गतात. फारशी कुठलिच औषध देत नाहित. ( गंभिर असेल तरच हॉस्पितल मध्ये बोलावतात) दिवसातुन ३ वेळा १ चमचा मध खायचा. दिवसभर थोडे थोडे हळदिचे पाणि प्यायचे. या व्यतिरिक्त कुठलेच औशध देत नाहित.

अमा काळजी घ्या. सध्या उन्हाळ्याने आणखीन थकवा येईल. भरपूर पाणी प्या. नारळ पाणी चालत असेल तर ते ही घ्या.

निर्झरा, घरच्यांना मॉरल सपोर्ट दे.

सर्वांचे धन्यवाद रश्मी जी धन्यवाद.

मी वर्क फ्रॉम होम पण करते आहे. थोडे बहुत. आज बसून खोली तला अर्धा पसारा साफ केला.

अमा, कश्या आहात?
कितीही बरे वाटले तरी सक्तीची विश्रांती घ्या, हा आजार हळूहळू त्रास देत अशक्तपणा देतो म्हणून म्हटले भरपूर खा, प्या, झोपा. काही दिवस दुसरे काहीच करू नका☺️

अमा लवकर बरे व्हा आणि keep patience, स्व अनुभवावरून बोलते आहे, आपल्याला वाटत आज बरं वाटत आहे तो पर्यंत दुसरं काही तरी होऊन बसतं for eg body pain किंवा acidity किंवा cough so patience आवश्यक आहे घरी आल्यावर सुधा पूर्ण रेस्ट घ्या शुभेच्छा

Pages