भोसरी' मध्ये घरपोच डबा पोहोचवणाऱ्या लोकांची माहिती हवी आहे.

Submitted by रीया on 1 April, 2021 - 23:17

सध्या कोरोना च्या काळात अनेक जण घरी विलागीकरणात आहेत त्यांच्यासाठी आणि इतर ही पेशंट साठी घरपोच डब्बे पोहोचवणा ऱ्यांची माहिती एकत्र संकलित व्हावी म्हणून हा धागा.

माझे आई , बाबा आणि बहीण कोविड पोजिटीव्ह असून दवाखान्यात ऍडमिट होते. त्यांना 2 दिवसात डिस्चार्ज मिळेल. अशक्तपणा खूप असल्यामुळे घरी स्वयंपाक करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसणार तेंव्हा मला 'भोसरी' मध्ये घरपोच डबा पोहोचवणाऱ्या लोकांची माहिती हवी आहे.

मला स्पेशली नाश्ता पोहचवणारे लोकं हवे आहेत खरं तर कारण दुपारचे आणि रात्रीचे जेवण बहिणीच्या मित्र मैत्रिणी अरेंज करतील पण नाश्ता कुठून अरेंज होत नाहीये.

मायबोलीकर चैताली कडे बायोडिग्रेडेबल प्लेट्स आणि bowls मिळतात.. पेशंटसाठी या प्लेट्सचा खूप उपयोग होतो.
तिचा संपर्क :-

संपर्क - https://wa.me/9326010014
फेस्बुक पेज - https://www.facebook.com/Kamakshi-Enterprises-2271467446268824
पत्ता - शॉप नं. १०, वसंत विहार सोसायटी, लगडमळा, सिंहगड रोड्,पुणे - ४११०६८
लोकमत प्रेस जवळ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसबुकवर शोधलंत का? मला करोनाकाळातच आमच्या जवळच्या वसाहतीच्या फेसबुक ग्रुपबद्दल कळलं. मदत हवी आहे, माहिती हवी आहे सारखा लोकल मायबोली ग्रुपच जणू. तिथे लोक आपण पुरवत असले ल्या सेवांची नि:शुल्क जाहिरात करतात , आपल्या गरजांबद्दल लिहितात, माहिती विचारतात .
करोनाकाळात अनेकांनी घरपोच डबे पोचवणे हा व्यवसाय सुरू केला आहे असंही तिथे दिसलं.

फेसबुकवर घे भरारी ग्रुप वर माझ्या बहिणीने पोस्ट टाकली आहे. मी खरंतर कोणत्याच ग्रुप मध्ये नाहीये त्यामुळे कसं शोधायचं ते कळत नाहीये. कोणाला मिळाली तर तिथून मिळालेली माहिती इथे डकवली तरी चालेल.

नाश्त्याला
१- आदल्या दिवशीची पोळी भाजी (फ्रिज मध्ये ठेवून फक्त गरम करून)
२- स्विगी /Zomato मधून पोहे /उपमा/ इडल्या वगैरे मागवणे
३- दूध ब्रेड आणि उकडलेले अंड , फळं (हे सगळच बिग बास्केट वरून मागवता येईल, एकदम ५-६ दिवसाची अंडी उकडून ठेवता येतील)

सध्या एवढे पर्याय सुचताहेत... अजून काही आठवलं तर लिहीन इथे

रीया, हे माझ्या बहिणीने दिलेली माहिती.

अपर्णा के टरर्स पुणे ९८२३४ ३०७८३
९८५०८ २४४८०
९०२८० ०७४८५

ने त्रा टिफिन सर्विस ७७६७८ ३१८२५

मी पण बिग बस्केट वर मॅनेज करते आहे. एक सुपर डेली म्हणून पण आहे. त्यात रात्री अकरा परेन्त ऑर्डर दिली तर सकाळी सात वाजता डिलिव्हरी होते. अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल.

स्नेहमयी, घरी अंडी आई बाबा खात नाहीत. नुसतं ब्रेड दुधावर किती दिवस काढणार तरी मी jio mart वगैरे ऑपशन बघून ठेवते.

मागे भोसरी मधे स्वीगी डिलिव्हरी बॉय कडून कास्टमरला कोरोना झाल्याच्या बातम्या कळाल्या होत्या तेंव्हापासून स्वीगी बिग नो आहे आमच्याकडे.

अमा, thanks , फोन करून पहाते

<मागे भोसरी मधे स्वीगी डिलिव्हरी बॉय कडून कास्टमरला कोरोना झाल्याच्या बातम्या कळाल्या होत्या तेंव्हापासून स्वीगी बिग नो आहे आमच्याकडे.>

आता तुमच्याकडे सगळ्यांनाच करोना झालाय, तर तुम्हांला धोका नाहीए. डिलिव्हरी पर्सनला दाराबाहेर पार्सल ठेवून द्यायला सांगता येईल. टिफिन पोचवणार्‍यांशीही डायरेक्ट संपर्क नको. त्यांनाही बाहेर ठेवून जायला सांगा.

माझ्याकडे बरीच माहिती जमा झाली गेल्या काही तासात आणि मला डब्बा देणारे मिळाले.

या धाग्याचा उपयोग खरं तर इतर ठिकाणची माहिती संकलित करण्यासाठी पण झाला तरी चालेल.

सगळ्यांना धन्स!

भोसरी पुणे नानाबा...

मी थोड्या वेळाने मला मिळालेले सगळे डिटेल्स इथे टाकेन. दुसऱ्यांना उपयपग होईल याचा.

घरचे लवकर रिकव्हर व्हावेत यासाठी शुभेच्छा

मागे भोसरी मधे स्वीगी डिलिव्हरी बॉय कडून कास्टमरला कोरोना झाल्याच्या बातम्या कळाल्या होत्या तेंव्हापासून स्वीगी बिग नो आहे आमच्याकडे
>>>>
कोरोना तर स्विगी का कुठल्याही नाश्ता पोहोचवणार्‍या व्यक्तीकडून होऊ शकतो. किंबहुना ईथे तर मास्क घालून सारे जनजीवन सुरळीत चालू आहेच. काळजी घ्यावी पण फार मेंटल ब्लॉक देखील ठेऊ नयेत असे वाटल्याने हे लिहिले.
अर्थात एकदा दुधाचा चटका बसल्यावर आपण ताकही फुंकून पिणे स्वाभाविक आहे. पण त्या नादात एखादा सोपा पर्याय टाळून आपण अवघड निवडतो असे कोणाचे नको व्हायला.

पुण्यात मोशीला कोविड पॉजिटिव पेशंटसाठी हॉस्पिटलमध्ये डबा पोचवणारं कोणी आहे का माहीतीत?

>> माझ्याकडे बरीच माहिती जमा झाली गेल्या काही तासात आणि मला डब्बा देणारे मिळाले.
>> मी थोड्या वेळाने मला मिळालेले सगळे डिटेल्स इथे टाकेन.
रीया, तुमच्याकडे असलेली माहिती शेअर कराल का प्लिज.

Amruta Vipr- Kulkarni 8888432645

विद्याधर कुलकर्णी :- +91 81496 28191

रागिणी परदेशी :- +91 90288 51088
This lady gives Breakfast +lunch + dinner at 270 ₹ per person (all three meals included in this cost) हे रेट भोसरी साठी होते, आपल्या आपल्या एरियासाठी रेट विचारून पहा
They deliver Brkfast and lunch together . brkfast and lunch at 10 in morning and dinner around 7 pm
Menu will be
3 Chapati's
1 dry vegetable (different vegetables for every day in a month)
1 wet vegetable / dal / curry
1 Rice / Jeera rice
And Salad

And for Dinner it will like one dish meal... like several types of stuffed parathas or Idli Sambhar, or types of Fried Rice or Dal kichidi with kadhi etc.

Kavita bamb :-
+91 98813 30988

माझ्याकडे एक pdf आहे ज्यात आणखी नंबर आहेत पण ती इथे कशी टाकायची ते मला माहित नाही.

मला वाटतं रागिणी परदेशी आणि विद्याधर कुलकर्णी मोशी साठी हेल्पफुल असतील.