युक्ती सुचवा युक्ती सांगा भाग - ६

Submitted by वत्सला on 23 August, 2020 - 09:32

युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
युक्ती सांगा - ५:

Group content visibility: 
Use group defaults

केवढे आणि कसले भारी पर्याय मिळाले आहेत. रविवारी करते काही तरी.

आज पनीर आणि भाज्या मॅरीनेट करून ग्रील करेन त्यात थोडं वापरेन

भरपूर बेबी कॅरेट्स / बारीक गाजर आले आहेत. खिसता नाही येत ती त्यामुळे हलवा नाही करता येणार. कमी कटकटीचा पर्याय असल्यास सांगा. धन्यवाद

वाफवून घ्या..... मग त्या लगद्याची खीर, पराठे, पावभाजीत फीलर असे वापरता येईल.
शिवाय थोडे किसता आलेच तर.......कोफ्ते, मुठीया, खिसात मीठ मिरची, तीळ घालून थोडे चपटे दाबून गोल सांडगे वाळविता येतील . मस्त लागतात तळून- खिचडी, पापड सोबत!

गाजराच्या वड्या. सुरीने चकत्या किंवा कसेही जाडेभरडे चिरून मापी मोजून घ्यायचे. फूड प्रोसेसरमध्येसुद्धा चिरता येईल. प्रेशर pan मध्ये एक दोन बोट चमचे तुपात ते जरा परतून त्यात गाजर तुकडे बुडतील इतकेच दूध घालायचे. शिटी द्यायची. थंड झाल्यावर कुकरमधून काढून मिक्सरमध्ये मलम (पेस्ट) करायची. भांड्यात घालून विस्तवावर ठेवून हे मिश्रण आटवून अंगालगत करायचे. मग आधी मापल्याप्रमाणे तेव्हढीच अथवा जरा कमी साखर घालून मंद आचेवर ढवळत राहायचे. घट्ट गोळा होतोय असे वाटले की पटापट आधी तयार ठेवलेल्या थाळीत ओतून तितकेच पटापट थापायचे. लगेच सुरीने वड्यांच्या आकारात चिरा द्यायच्या. सुकल्यावर सुट्या करायच्या. एक दोन प्रयत्नात कोणीही रेम्याडोक्या व्यवस्थित करू शकतो. मात्र गोळा लगेच सुकतो तेव्हढे सांभाळायचे.

गाजर उकड़ूंन mash करून घ्या , ते कणिक मळतो तेव्हा त्यात मिक्स करून ,तिखट , तिळ , ओवा , मीठ , साखर , कोथिम्बीर घालुन डो तयार करून फुलके किवा लच्छा पराठा बनवा मस्त होतो

बिरड्याच्या उसळीसाठीचे वाल अमेरिकेत काय नावाने मिळतात? अजून कुठे विचारावं कळलं नाही म्हणून इथे विचारतेय. जमल्यास योग्य बाफची दिशा दाखवा. धन्यवाद!

https://www.amazon.com/NIRAV-VAL-WHOLE-4-LBS/dp/B08B47MR12/ref=sr_1_1?dc...
वाल व्होल नावानेच मिळतात. जवळ भारतीय दुकान नसल्यास अ‍ॅमेझॉन वरून मागवू शकता.
व्हाईट लबलब बिन्स नावाने पण मिळतात पण चवीत जरा फरक वाटतो.
https://www.amazon.com/Bean%EF%BD%9CWhite-Hyacinth-Bean%EF%BD%9CDolicho-...

दुधाच्या कुल्फ्या सेट करायला लावल्या आहेत plastic च्या
पॉपसिकल साच्यामधे. पण सेट झाल्यातरी बाहेर काढता येत नाहीत. साचा सोडत नाही. नुसती काडी येते हातात. कुल्फी अख्खी बाहेर यायला काय करावे?

बेताच्या गरम पाण्यात टोकाकडुन बुडवुन बघ पाणी आत जायला नको. पाणी फार गरम नको, कारण प्लॅस्टीक आहे ना. पण बाहेरुन गरम पाणी लागले की अतुन सुटतील. प्रयत्न करुन बघ.

रश्मी +१. गरम सुरी चारी बाजूने फिरवून निघतील का बघा. (नाही तर शेवटी काडी काढून टाका नि चमच्याने खा जरा वितळली की.)

Thanks रश्मी, सीमंतिनी. करून पाहते.

<<घरामध्ये सुके अंजीर पडले आहे जवळपास २५० ग्राम . काय करता येईल? डिटेल रेसिपी सुचवा>>
अंजीर 5-6 तास भिजत घाला. त्याचा पल्प काढून आईस्क्रीम (माबोवरच्या रेसिपीने) बनवा. मी केले आहे. मस्त बनते.

चिल्ली पनीर खाण्याची इच्छा होत आहे, सर्व साहित्य आहे.
पण मैदा आणि cornstarch नाहीये slury बनवण्यासाठी.
तर काही shortcut आहे का ह्यासाठी?
दुसरे कुठले पीठ वापरता येईल?
(पाकृ hebbers ची पाहिली होती ref ला )

घरामध्ये सुके अंजीर पडले आहे जवळपास २५० ग्राम . काय करता येईल? डिटेल रेसिपी सुचवा
>> मँगो शिरा करतो तसा अंजीर पल्प वापरून शिरा . सुके अंजीर पाण्यात भिजवून मिक्सर मध्ये फिरवून घ्या.

Pages