अळूची कंद कशी लावावीत?

Submitted by सान्वी on 29 March, 2021 - 04:50

मी मोठ्या प्रेमाने अळूची कंद मोठ्या कुंडीत पेरली होती, तब्बल एक महिन्यानंतर त्यातून छोटीशी कोंब बाहेर आले होते. मी प्रचंड खुश! अळू लावण्याची खूप दिवसांपासून ची इच्छा होती आणि आमच्या वॉचमन ने खात्रीचे म्हणून त्याच्या गावाहून कंद आणून दिले होते. एकदा कोंब फुटल्यावर मात्र भराभर पाने येऊन मोठी होऊ लागली. काल होळीच्या मुहूर्तावर भजी करण्यासाठी म्हणून काढली. परंतु अत्यंत खाजरी अळू आहे. माझा खूप भ्रमनिरास झाला. एवढ्या प्रेमाने लावलेल्या झाडाने दगा दिला. आता परत लावायची आहेत, तर कोणी सांगेल का चांगली अळू कशी लावता येईल?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अळू ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून कंद घ्या किंवा भाजीवाल्याकडून अरवी विकत आणून लावा.मात्र अरवीतून निघालेले अळू असेल की तेरे(खाजरे अळू) हे सांगता येत नाही.
मीही अरवी लावली होती.पण अळूची चव त्याच्या पानांना नाही.

भाजीवाल्याकडून अरवी विकत आणून लावा.मात्र अरवीतून निघालेले अळू असेल की तेरे(खाजरे अळू) हे सांगता येत नाही. >> तोच तर प्रॉब्लेम आहे.

अळू भरपूर पसरतो, एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून /परिचितांकडून त्यांच्या कुंडीतला एक बारका कंद ( ज्या अळूची पाने खाऊन खाजरी नाहीत ही खात्री केलेली आहे )मिळाला तरी बास , त्याचे ढीगभर कंद होतात आपल्या कुंडीत. इथे असता जवळपास तर मीच दिला असता.

मी अळकुड्या विकत आणते, असंच भाजी करायला, कढीत वगैरे घालायला. थोडं खाजरे असतेच. काही कुंडीतल्या मातीत खोचून ठेवते, पाने येतात पण पक्षी खातात, विशेषतः चिमण्यांना ही पाने, गोकर्ण पाने, फुलं फार आवडतात. मला काही मिळत नाहीत Lol

१) कंद पाव किलो खाण्यासाठी आणायचे.( हे भाजीचे असतात. वडीचे नाही.)
२) त्यातले चारपाच उकडून खाल्ल्यावर खाजरे लागल्यास बाकीचे पेरायचे नाही. चांगले निघाल्यास एक दोन महिने कोरडेच ठेवायचे. मग जरासे कोरड्या मातीत दाबून हलके पाणी मारायचे. कोंब वाढतील तेच वाढवायचे. खत नको.
३) अती ऊन आणि सावली नको.

अळकुडी पेरून ३-४ अळूची रोपं लावली होती पसरट कुंडीत. भरपूर पानं झाली. भाजी/ वड्या करून झाल्या. पण आता गेले २ महिने एकेकच पान घेऊन रोपं उभी आहेत. नवीन पान फुटेना. अळूचापण सीझन असतो का? थंडी खूप असल्याने पानं येत नसतील का? हवा बदल झाला तर पानं येतील? की नवीन रोपंच लावावीत?

मी पण लावली आहेत कंद, याचा सिझन असा नसतो पण थंडीत जास्त पाने फुटत नाहीत आणि साईझ पण छोटी असते मग उन्हाळ्यात परत चांगली वाढ होईल.

अळू मरते नहीं

आनंद !

मीपण अळूच फायनल केले आहे

अर्वीचे कंद आणून लावणार

अळू लावायला पात्र कुठले वापरू ₹
दोन फुटाची रुंदी आहे

मी 50 सेमीचे एक गोल प्लास्टिक घमेले बघितले आहे

gandhi land.jpg

सध्या एका छोट्या कुंडीत पाच कंद लावले होते तर सगळे उगवून आले, एक आठवड्यात सात कोंब आलेत

आठवड्याला भाजीपुरती दहा तरी पाने यावीत

मी nursery मध्ये मिळते ती मोठी आयताकृती मातीची कुंडी आणली त्यात लावले, जागा कमी लागते आणि सगळे कंद एका लाईन मध्ये लावल्याने दिसते ही चांगले.

शक्यतो काळे प्लास्टिकचे आयताकृती, (दूधवाले पिशव्या ठेवायला वापरतात तसे) घ्यावे. उन्हाने फाटत नाहीत. रंगीत असले तर काळ्या प्लास्टिकने झाकावे.

तळास भोके पाडू नये. आतमध्ये कंद पेरलेल्या प्लास्टिक पिशव्या ठेवाव्या तीन. वाहलेले पाणी टबात खाली राहते. ते नंतर झाड पिते.

अळूची देठे काळसर असतात तो अळू वड्यांसाठी चांगला तो कमी खाजरा असतो. पांढ-या देठांचा असतो तोही कमी खाज वाला असतो. तो अरवीचा अळू. आमटी छान होते. एक रानटी अळु असतो आम्ही टेरी म्हणतो त्याला तो जास्त खाजरा असतो. देठाचा रंग कुरमिजी फिकट चाॅकलेटी असतो. त्याची आमटी/फतफते करतात. खाजरे पणा जाण्यासाठी चिंच वापरतात. चिंचेसोबत चविला गुळही घालतात. कोणत्याही अळूच्या पानाच्या पदार्थात आम्ही चिंच घालतो त्यामुळे त्याची खाज नष्ट होते . माझ्या कुठल्यातरी रेसिपीत मी सगळे अळु दाखवलेत. सर्च करावे लागेल.