अळूची लागवड

अळूची कंद कशी लावावीत?

Submitted by सान्वी on 29 March, 2021 - 04:50

मी मोठ्या प्रेमाने अळूची कंद मोठ्या कुंडीत पेरली होती, तब्बल एक महिन्यानंतर त्यातून छोटीशी कोंब बाहेर आले होते. मी प्रचंड खुश! अळू लावण्याची खूप दिवसांपासून ची इच्छा होती आणि आमच्या वॉचमन ने खात्रीचे म्हणून त्याच्या गावाहून कंद आणून दिले होते. एकदा कोंब फुटल्यावर मात्र भराभर पाने येऊन मोठी होऊ लागली. काल होळीच्या मुहूर्तावर भजी करण्यासाठी म्हणून काढली. परंतु अत्यंत खाजरी अळू आहे. माझा खूप भ्रमनिरास झाला. एवढ्या प्रेमाने लावलेल्या झाडाने दगा दिला. आता परत लावायची आहेत, तर कोणी सांगेल का चांगली अळू कशी लावता येईल?

Subscribe to RSS - अळूची लागवड