झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..!
मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)
तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.
सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.
नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.
नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.
असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.
त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं.
खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्याचाही हात आहे.
दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.
स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो.
अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे
अरे पण तो बाजूच्या डब्यात
अरे पण तो बाजूच्या डब्यात होता ना .
मग ट्रेन रिकामी झाल्यावर जायचं आणि गदागदा हलवायचं ना तिला.
यार्डात जाईपर्यंत कशाला थांबायच ???
हा प्रश्न माझ्या मुलीला पडला होता पण एवढ्यात नको तू विचार करू अभ्यास कर म्हणून तिला मी गप्प केले .
ओमसारखा श्रीमंत बिजनसमन ज्या
ओमसारखा श्रीमंत बिजनसमन ज्या रेस्टा मधे जातो तिथेच ही अतिगरीब मुलगी भेट ठरवते.
ट्रेनच्या जेन्ट्स डब्या तुन उतरून बाजुच्याच लेडीज डब्यातल्या स्वीटुला उठवायला न जाण्याचं काय कारण असेल?
अश्शया शिव्या द्याव्या वाटतात ना.....
ओम तिला कॉल पण करू शकला असता.
ओम तिला कॉल पण करू शकला असता. कानातच वाजला असता तिच्या. >>>>> अरेच्च्चा , हो की
(No subject)
काय घिसीपाटी कल्पना
काय घिसीपाटी कल्पना
स्वीटू लाल रंग लागलेल्या तळव्याने चालत जाते आणि शकू कवतिकाने त्या ठशांकडे बघते.
आजचा भाग ऐकला. ओम्या कॉल करतो
आजचा भाग ऐकला. ओम्या कॉल करतो तिला पण ती झोपेची गोळी घेतल्यासारखी झोपलेली असते. ओम्यानेच टाकून दिलं की काय काहीतरी कॉफ़ी मध्ये. हॉटेलवाले कशी परवानगी देतात कॉफी बनवायला. बाईसाहेब उठल्यावर म्हणतात चल गाणी ऐकूया, घरी फोन करायचा वगैरे काही नाही. मग ती इअरफोनची कौतुकं. चिनूला ती कशी सापडते आणि ती सापडल्यावर ओम कुठे गायब होतो. मी ऐकत असल्यामुळे मला कळलं नाही.
चिनूला ती कशी सापडते आणि ती
चिनूला ती कशी सापडते आणि ती सापडल्यावर ओम कुठे गायब होतो. मी ऐकत असल्यामुळे मला कळलं नाही.>> आम्हाला बघुनही कळालं नाही तर तुम्हाला ऐकुन कळेल अशी अपेक्षाही नाही
तर.. स्टेशनच्या बाहेर स्विटू भयाकल्या सारखी चालत असते तेव्हा नेमकं माठ काका अन महामाठ चिन्या तिला शोधत तिथेच पोचलेले असतात. मग भर रस्त्यात त्यांची गळाभेट वगैरे होते अन तिला घेऊन ते घरी येतात. साळव्यांच्या घरात नुसती रडारड चालू असते.. स्विटूला बघून नलू पळत बाहेर येते अन स्विटूला मिठी मारते. नलू, माठ काकी अन स्विटूची रडारड चालू असते तेव्हाच बाबा साळवी फाटलेल्या सिक्युरिटी फोर्सच्या वेषात घरात अवतरतात. मग काय होत असेल अशी तुम्हाला आशा आहे...? अहो दळभद्री साळव्यांच्या घरात तेच होणार जे तुम्हाला अपेक्षीत आहे . सगळे साळवी एकमेकांची स्थिती पाहून धायमोकलून रडु लागतात. सगळ्या साळव्यांच्या डोळ्यांतुन वाहिलेले पाणी जमा केले असते तर ते जवळ जवळ १ ड्रम तरी नक्कीच भरले असते.
दादा साळव्यांचा सिक्युरिटी फोर्सचा वेष कसा फाटला ते सांगतो - साळवी दादांना ताप आलेला असतानाही ते नोकरीवर जातात अन तिथे त्यांना झोप येते. मग मोहीत येतो अन त्यांना झोपेतून उठवून झाड झाड झाडतो. ते आजारी आहेत असं कळल्यावर तो त्यांना झोपेची गोळी देऊन पुन्हा झोपवतो अन कंपनीचा माल गपापा होतो. मग आयत्या चालून आलेल्या संधीचा फायदा उठवावा म्हणुन दादा साळव्यांना हे असे धू-धू धुतलेले असते.. वर ही गोष्ट तायडीला कळते तेव्हा तर ती साळव्यांना सळो की पळो करण्याचे प्लॅनच बनवू लागते..! )
बघितला भाग मी दुपारी दोनला
बघितला भाग मी दुपारी दोनला (घरून काम करण्याचा फायदा). स्वीटू लहान मुलींसारखी का वागते. स्टेशनबाहेर की कुठेतरी अशी बावचळल्यासारखी का उभी असते. अंबरनाथ मध्येच असते ना ती मग अचानक अमेरिकेत पोचल्यासारखी काय घाबरते. साळव्यांचं रडणं संपतच नाही.
अण्णा नाईकांचा ट्रेनचा टीझर
अण्णा नाईकांचा ट्रेनचा टीझर पाहिल्यावर असं वाटतंय की स्वीटुला भुताटकी झाली असावी.
जवळच मुलाला भेटायला गेलेली पण परत ट्रेनने येते.
चेप पडल्यासारखी झोपते. गाडी कारशेडमधे गेली तरी उठत नाही.
मग अण्णा ओमचं रुप घेऊन आला. आणी मग गायब झाला.
लुटुलुटु मान हलवून हा
लुटुलुटु मान हलवून हा शब्दप्रयोग खुप आवडला आहे.
सस्मित
सस्मित
कालच्या भागात मेलोड्रामा ठासून भरला होता. साळव्यांचं रडणं भेकणं संपून दादा साळवी सगळा दोष स्वतःच्या उरावर घेत समस्त साळवी कुटूंबाची मान शरमेने खाली जाण्यास कारणीभूत आहे असं सांगतात (साळवी कुटुंबाची मान शरमेने खालीच असते की नेहमी.. यांनी कधी उठलेली बघुतली काय महित..!) अन ते ऐकुन सर्वांना पुन्हा एकदा दु:खाचा कड येतो. मग दादा साळवीच कसे चांगले बाबा, चांगला नवरा, चांगला भाऊ, चांगला दीर आहेत हे एकेकजण पोटतिडकीने सांगु लागतो (महामाठ चिन्या मात्र चुलत्याबद्दल एकही शब्द बोलत नाही हे खटकलं..!) अन सगळ्यांचा राऊंड झाल्यावर स्विटु अपल्या बाबांना सॅल्युट ठोकते.. तिचं बघुन मग उरलेले साळवी पण दादा साळवींना कडक सॅल्युट ठोकतात अन दादा साळवींची मान ताठ होते अन मग आपली त्या नकोशा प्रसंगातून सुटका होते.
इकडे खानवीलकरांच्या घरात शकू अन रॉकी दोघे मिळून मोमोचं भजं करतात. सासू-सुनेचं नातं कसं असावं हे मोमोला पटवून देतात. सुनेने घरात स्वयपाक, स्वच्छता, इस्त्री वगैरे कामे केली पाहिजेत असं सांगून तिच्याकडून किचन मधे हिरवी चटणी वाटून घेतली जाते जी मिक्सरचं टोपण उडाल्यामुळे तिच्या चेहर्यावर लागते. मग ओटा पुसणं अन इस्त्री वगैरे केल्यामुळे तिचं टारलं फिसकटतं अन ती रडत तायडीकडे येते. तायडी मोमोला समजाऊन खुर्चीत बसवते अन मोहितला 'चोवीस तास उपलब्ध असणारा व्हि.आय.पी. सर्व्हंट' असं संबोधत त्याला मोमोचे केस विंचरायला सांगते. त्या अपमानाने मोहीत आतल्या आत चरफडतो अन योग्य वेळेस या अपमानाचा बदला घेईन असं मनातल्या मनात ठरवत मोमोचे केस विंचरू लागतो.
प्रीकॅप मधे मोमो साठी फुलटाईम अटेंडंट म्हणुन स्विटू हवी असते अन त्यासाठी ती स्वतःहुन साळव्यांच्या घरी येते अन स्विटूला खानविलकर व्हिलात यायला सांगते. स्विटू नलूला समजावत असते की चालून आलेली नोकरी कशी काय धुडकावून लावावी बरे. त्यांच्याकडे ही नोकरी स्विकारण्याशिवाय आता दुसरा कोण्ताही पर्याय नाही हे नलूला पटलेलं दिसलं.
सो कॉल्ड मॉडर्न मुलीं ची
सो कॉल्ड मॉडर्न मुलीं ची जिरवायची असली की त्यांना किचनमध्ये जुंपायचं हा झी मराठीचा फंडा दिसतोय. आधी राधिकाने शनायाला
सुगृहिणीपदाचे धडे देऊन जेरीस आणलं . आता शकु पण तेच करतेय. पुढेमागे मोमोला कोथिंबीर वड्या करायला सांगतील बहुतेक
ती नलू कायम पोक काढून
ती नलू कायम पोक काढून तुरूतुरू चालत असते.
साळव्यांसारखीच मालिका पण दळिद्री आहे !
अगदी.. अगदी..
सुगृहिणीपदाचे धडे देऊन जेरीस आणलं . आता शकु पण तेच करतेय. पुढेमागे मोमोला कोथिंबीर वड्या करायला सांगतील बहुतेक >> अगदी.. अगदी..
पण मोमोला घरातील कामे सांगण्या आधी शकूने आपण तायडीला नाहीतर ओमला एक तरी काम करायला सांगितलं आहे का हे आठवुन बघणं गरजेचं आहे
आजच्या भागात तर नुसती मज्जा..
आजच्या भागात तर नुसती मज्जा.. सगळं कसं पुन्हा रुळावर आलं
भागाची सुरुवात महामाठ काका त्याच्या चहाच्या कमाईचे पैसे नलुच्या हाती सोपवताना होते. कसले? का? कशाला? हे प्रश्न विचारून झाल्यावर ते पैसे सुमन काकीच्या हाती द्या असं ती सांगते. त्यावर नलूमुळे अन दादामुळे तो आणि त्याचा परिवार टिकला असं ऐकवून आता हे पैसे नलूने घरात वापरावेत असं सांगतो. परंतु नलू काकाला समजावते की आजवर तुमच्या हाताला यश येत नव्हते ते आले.. या पैशांतुन सुमनसाठी काहीतरी घ्या अन लगोलग सुमनला बोलावून ते पैसे तिच्या हाती सोपवते. सुमनला ते पैसे नवर्याच्या कमाईचे आहेत हे समजल्यावर तीही ते पैसे नलूच्याच हाती सोपवून तिला मिठी मारते. साळवी दळभद्री असले तरी त्यांच्या कुटुंबाचा समंजसपणा चांगला वाटतो.
तेवढ्यात अक्षरशः हिडिंबा झालेली मोमो रॉकीसोबत साळव्यांच्या घरात पोचते अन स्विटूला पुन्हा तिची अटेंडंट व्हायची गळ घालते. मग नलूच्या सगळ्या ''का? कशाला? कधी? केंव्हा?" च्या प्रश्नांना अन हातात शकुने दिलेले सोन्याचे कडे बघुन परत पुन्हा तेच प्रश्न विचारून स्विटूला ती भंडावून सोडते. शेवटी कशीबशी नलूला समजावत स्विटू खानविलकर व्हिलात जाते.
तिथं पोचल्यावर काय आनंद होतो शकूला.. अरे बाप रे...! मैत्रीणीच्या मुलीच्या स्वागतासाठी पार खानविलकर व्हिलात "स्विटू आली.. स्विटु आली.." गजर करत पुन्हा दारात येत भाकरीचा तुकडा ओवाळायचा सोपस्कर शकू पार पाडते. तेवढ्यात तायडी तिथं पोचते अन स्विटूचा सर्वांदेखत पाणौतारा करते. ओम तायडीला थांबवायला जातो पण तायडी कसली बधते. शेवटी घरात येताना तिचा धक्का लाल रंग घेऊन चाललेल्या नोकराला लागतो (नोकर असा भडक लाल रंग नेमका कुठे नेत असतो ते काही कळालं नाही.. खानवीलकर व्हिला तर फिकट शेड्स मधे न्हालेला आहे..!) अन सगळा लाल रंग दारात उभा असलेल्या स्विटूच्या पायावर पडतो. मग स्विटू तशीच पुढे घरात जाऊ लागते अन तिच्या पायाचे ठसे उमटत जातात... शकू त्या ठशांकडे अपूर्वाईने बघू लागते... (असे भरीव ठसे मी पहिल्यांदाच पाहिले..!!)
मग खानविलकर व्हिलात मोमो, रॉकी, डॅडी, तायडी यांना सर्वांना स्विटूच्या हजरजबाबी अन कामसू वृत्तीमुळे जे हवं ते पटकन मिळातं अन त्यामुळे तायडी उलट मोहितवरच जाळ काढते.. ओम्याच्या अंगात घातलेल्या फिक्कट गुलाबी शर्टाच्या तुटलेल्या बटनाला देखील स्विटू उभ्या उभ्याच शिवूनही देते अन तो प्रसंग नेमका मोहीत बघतो.
शर्टाचा प्रसंग बघितला मी.
शर्टाचा प्रसंग बघितला मी. दोऱ्याचं बंडल अगदी फिकट गुलाबी रंगाचच निघतं. जादूचं असेल ते. ज्या रंगाचा शर्ट, त्याच रंगाच बंडल बाहेर निघणार. साळवी म्हणतात मी लाज आणली तेव्हा मलाही हेच वाटलं की लाज आधी होतीच कुठे यांच्याकडे. लाज आणि स्वाभिमान हे शब्द माहीतच नाहीत त्यांना. स्वीटू अशी नोकराची कामं करायला का जाते तिथे, त्यापेक्षा पुरणपोळ्या करून तरी विकायच्या. पायाला रंग लागल्यावर त्याच पायाने कोण आत जाईल, आतली फरशी कोण पुसणार. मोमो गोड आहे.
काकाची पहिली कमाई आहे हे आज
काकाची पहिली कमाई आहे हे आज कळले. इतके वर्ष नक्की काय करत होते ?
काहीही कसं काय दाखवतात हे लोक ? आणि काका ने दूध चहा पत्ती साखर कुठल्या पैशातून आणली म्हणे ?
काका ने दूध चहा पत्ती साखर
काका ने दूध चहा पत्ती साखर कुठल्या पैशातून आणली म्हणे ?>> ये राझ राझ ही रहेगा तो ही बेहत्तर
भिकार , भम्पक आणि कैच्याकै
भिकार , भम्पक आणि कैच्याकै शिरेल आहे ही. ती स्विटी तर गळेपडू , लबाड आणि महाबनेल आहे. चांगल सावज सापडल आहे , कधी एकदा लग्न होऊन श्रीमंत बनेल अस झालंय तिला.
कैच्याकै शिरेल आहे ही, मला
कैच्याकै शिरेल आहे ही, मला शुभांगी गोखलेंचे आश्चर्य वाटले की त्या अशी शिरेल करतायेत.
ह्या शिरेलीत फक्त एकच पात्र आवडले अन अभिनय पण छान केलाय ती म्हणजे मोमो. खूप गोड वाटते ती. छान जमलंय तिला. नाहीतर स्वीटू, बघवत पण नाही. जाडपणाचा प्रश्न नाही पम ही खरेच बनेल वाटते, यापेक्षा सुंदरा मधली लती छाने, शोभली आहे तिकडे
लतिका काय आणि स्वीटू काय, जाड
लतिका काय आणि स्वीटू काय, जाड मुली सुगरण असल्याच पाहिजेत असा नियम असल्यासारख्या दोघी सुगरण, गृह कृत्य दक्ष, सगळ्यांशी अति चांगल्या वागणाऱ्या, संत पदी पोचलेल्या आहेत.
ते पोक काढून चालणे, फिसकारलेले केस वगैरे भूमिकेचा अभ्यास आहे म्हणे. दीप्ती केतकर हिने आई, मावशी, कामवाली बाई यांचे निरीक्षण करून ते पात्र उभे केले आहे, इति दीप्तीताई केतकर उर्फ नलू मावशी.
रच्याकने, नलूचे ते फिसकारलेले केस आणि स्वीटूचे कधीही न बांधलेले लांबसडक केस, कधीही खोकल्याची उबळ येणारी काकू यांना बघूनही यांच्या चपात्या आणि ईतर पदार्थ कसे खपतात. घरचे बाकीचे लोकही तेवढेच अस्वच्छ वाटतात. स्वीटू घरी काम करताना जे कपडे घालते तेच कपडे घालून बाहेर जाते. गाऊनवर आणि केस बांधून दाखवली असती घरी तर जरा खरी वाटली असती.
त्या तीनशे चपात्या ते एकाच दुकानात विकतात ना, मग बाहेर फळ्यावर किती चपात्या उरल्या ते कसं काय लिहितात.
ती स्विटी तर गळेपडू , लबाड
ती स्विटी तर गळेपडू , लबाड आणि महाबनेल आहे. चांगल सावज सापडल आहे , कधी एकदा लग्न होऊन श्रीमंत बनेल अस झालंय तिला >>>>>>> मग बरच आहे ना ते महादळीद्री साळवी कुटुंबासाठी. त्यान्चे हाल तरी सम्पतील
मोमो गोड आहे. >>>>>>>> +++++++१११११११
सुंदरा मधली लती छाने, शोभली आहे तिकडे >>>>>> अगदी अगदी.
लतिका काय आणि स्वीटू काय, जाड मुली सुगरण असल्याच पाहिजेत असा नियम असल्यासारख्या दोघी सुगरण, गृह कृत्य दक्ष, सगळ्यांशी अति चांगल्या वागणाऱ्या, संत पदी पोचलेल्या आहेत. >>>>>>>> लतिका सगळयान्शीच चांगल वागत नाही. कामिनी, सज्जन, दौलत, तर कधी कधी अभिला सुद्दा जशास तसे उत्तर देते वेळ पडली तर. स्विटू मध्ये मात्र तो स्पार्क नाही.
(No subject)
(No subject)
नलू टायटल साॅन्ग मधे मात्र
नलू टायटल साॅन्ग मधे मात्र रोलमधून बाहेर पडून नाचते.
आजकाल या मालिकेत लेखक
आजकाल या मालिकेत लेखक दिग्दर्शक स्थळ काळ यांचं भान नसल्यासारखे वागत आहेत. यार्डात गेलेली लोकल पुन्हा चालू होऊन स्वीटू घरी आली, दादा साळवी ड्युटीवर झोपून आणि मार खाऊन सेम वेळेस कल्याणहून अंबरनाथला परत आले.पण मॅड काका मात्र वेळेत घरी पोचला. खानविलकर मुंबईत कुठेशी रहातात म्हणे?? ज्या वेगाने आणि फ्रिक्वेन्सीने मोम्या ओम्या आणि रॉकी ये जा करतात त्यावरून फार तर डोंबिवलीत रहात असावेत, आणि महादरिद्री साळवी अंबरनाथच्या बाहेर न जाऊ शकल्याने त्यांना ती मुंबई वाटत असावी
आणि करोडपती खानविलकर,
आणि करोडपती खानविलकर, अब्जाधीश मोमो यांना पार्लर, ब्युटीशीअन याबद्दल काही आयडिया नाही का? केस नीट करायला मोहित आणि स्विटू हा ऑप्शन? सिरियसली???
स्वयंपाकघरातील स्वच्छता हा
स्वयंपाकघरातील स्वच्छता हा स्वतंत्र विषय आहे.
काल तिकडे , ते शुभ्रा आणि राजे चपला घालून कीचन मध्ये वावरत होते.
चंपा
चंपा
मोमो गोड आहे. >>>>>>>> खरच. कधी कोणाशी वाईट वागत नाही. त्या तायडीच्या तोंडावर बोलायची हिम्मत नाही शकुची म्हणून ह्या बिचारीला उगाच त्रास देते
आजकाल या मालिकेत लेखक
आजकाल या मालिकेत लेखक दिग्दर्शक स्थळ काळ यांचं भान नसल्यासारखे वागत आहेत >>
अगदी अगदी.. १ दिवसापूर्वी मार खाल्लेले आणि चेहेर्यावर एकदम माराच्या भरपुर खुणा असलेले दादा साळवी काल एकदम फेशिअल केल्यासारखे गोरे पान दिसत होते. घरच्या सगळ्यांनी सलाम केल्यामुळे जादू झाली का काय ?
Pages