Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.
रानभुली भारी किस्सा आहे.
रानभुली भारी किस्सा आहे.
असे फसवणुकीचे प्रकार सुशिक्षित लोकांत पण होतात.
आमच्या दूरच्या नात्यातील मामा आणि मामी(मुलाचे आईवडिल) सगळीकडे जाऊन मुली पहायचे,कांदेपोहे खायचे. त्यांचा मुलगा अमेरिकेत जॉब करत होता. तो सुट्टीत आला की त्याला मुली दाखवू म्हणून.
खरेतर तो मुलगा2वर्षे एका तमिळ मुलीबरोबर लिव इन राहात होता. त्याच्या आईवडिलाना माहित होते पण जातीबाहेर लग्न नको होते. पण बघायला गेलेल्या मुलीकडील लोकांना खरे सांगत नव्हते.
तुमची मुलगी सुंदर आहे का?
तुमची मुलगी सुंदर आहे का?
>>
एका स्थळाचा फोन आला होता. त्यांनी इतर जुजबी माहिती नंतर विचारले की 'मुलगी लक्ख गोरी आहे का? आमच्या घरात गेल्या अनेक वर्षांपासून एकही सावळ बाळ जन्माला आलं नाही. बाकी गोष्टी कितीही योग्य असल्या तरी मुलगी गोरी नसेल तर आम्ही नक्की पुढे जाणार नाही.' मग माझया आईने त्यांना स्पष्ट सांगितले की 'मुलगी लख्ख गोरी नाही. पण असती तरी जिथे रंग रूप, जन्माला येणारं बाळ गोरचं पाहिजे या गोष्टींना इतकं महत्व असेल तिथे आमचं जमणार नाही.'
मी जीवनसाथी की शादी कुठेतरी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यात कास्ट नो बार की स्टेट नो बार दिले होते. त्यावेळी आलेले दोन अनुभव.
एक गुजरातचा मुलगा होता. त्याच्याकडे एक प्रश्नावली होती. भेटण्याआधी चॅट करायचे ठरले. त्याने विचारलेले प्रश्न काहीसे असे होते.
चहा कॉफी की सरबत वगैर थंड पेय
सिनेमा - कॉमेडी की रोमँटिक की ऍकशन
सिनेमा घरात पाहायला आवडतो की थेटरमध्ये
गाणी - हिंदी की मराठी की इंग्लिश / फिल्मी की शास्त्रीय संगीत.
Adventure - जंगल सफारी की ट्रेकिंग
Vacation - बीच की थंड हवेचे ठिकाण
Vacation - हिमालय की राजस्थान
आवडता रंग कुठला
असे पंचवीस तीस प्रश्न होते.
यापैकी कुठल्याही गोष्टी मी माझ्या छंद किंवा माहितीच्या कुठल्याही रकान्यात भरल्या नव्हत्या.
नंतर लाईट गेले, त्यामुळे चॅटिंग मध्येच बंद पडले. मग एक दोन दिवसांनी पुन्हा चॅटिंग करताना फॉलो अप प्रश्न.
तुझा आवडता रंग आकाशी म्हणालीस, मग या रंगाची कार आवडते का, घराच्या भिंतींना हा रंग चालेल का?
आकाशी रंग आवडतो तर मग बीच पेक्षा थंड हवेच ठिकाण आवडते असं कसं?
मग आता उन्हाळा आहे म्हणून तुला थंड हवेचं ठिकाण आवडेल असं म्हणालीस, म्हणजे नंतर काही काळाने बीच आवडतो असं म्हणशील का , म्हणजे तुझी मतं नक्की नसतात का? तू प्रश्नांचा खोलवर विचार करून ठाम निर्णय घेऊ शकत नाहीस का, वगैरे.
मग हे प्रकरण आवाक्याबाहेर आहे हे जाणवून त्याला "माझी बरीचशी उत्तरं काळ-वेळ, मूड, उपलब्धतता, बजेट वगैरेवर बदलू शकतात. ठाम नाहीत." हे कळवून टाटा बाय केलं.
अजून एकदा एकाने फोन करून खरंच कास्ट नो बार आहे का, आणि कारण विचारून घेतले. त्याचे कारण त्याने सांगितले की 'आमच्या जातीत शिकलेल्या मुली जास्त नाहीत आणि ज्या आहेत त्यांच्याशी विचार पटले नाहीत. तसंच आमच्या नातवाईकांमध्ये आंतरजातीय प्रेम विवाह झाले आहेत , त्यामुळे ठरवून केलेल्या लग्नाला सुद्धा पाठींबा असेल.'
यावरून छान फॉरवर्ड विचारांचे घर दिसते आहे असे मानून मी त्याला बाहेर भेटले. हा मुलगा 6 फूट उंच, छान गोरा, थोडेसे घारे-ब्राऊन डोळे, M. tech. , (साधारण १२ वर्षांपूर्वी) 18 लाखाचे पॅकेज असलेला, बोलायला, वागायला छान, शांत, सोशल वगैरे होता. पहिल्या भेटीनंतर माझ्यासाठी हे स्थळ म्हणजे "too good to be true" वाटून मी घरच्यांना कसून चौकशी करायला सांगितली. कुठलीही माहिती खोटी नव्हती. म्हणजे हा म्हणतो त्याप्रमाणे खरच जातीत शिकलेल्या मुली नसतील अशा निष्कर्षावर आम्ही पोचत होतो.
पण दुसऱ्या भेटीत त्याने काही गोष्टी स्पष्ट केल्या. - फक्त ऑफिसला जाताना पंजाबी ड्रेस चालेल. पण घरात, फिरायला जाताना, ऑफिस व्यतिरिक्त कुठेही फक्त साडी नेसायची.
नॉनव्हेज बद्दल चर्चा झाली त्यावेळी मी सांगितले की लहानपणापासून न पाहिल्यामुळे किंवा सवय नसल्यामुळे मी अंड्याशिवाय इतर नॉनव्हेज खाऊ शकत नाही. याआधी प्रयत्न करूनही मला चिकन घशाखाली उतरलं नाही. नॉनव्हेज शरीराला चांगलं असतं हे माहीत आहे- मी पुन्हा प्रयत्न करेन, घरी करायला कोणाला अडवणार नाही , पण मी स्वतः शिजवू शकेन का किंवा खाऊ शकेन का याची खात्री देऊ शकत नाही. यावर त्याने सांगितले की त्यांच्या मूळ गावी वर्षातून एकदा बोकडाचा बळी दिला जातो. त्यात आणि त्यांनंतरच्या स्वयंपाकात पूर्ण सहभागी व्हायचे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला ह्या प्रथा जरी पटत नसल्या तरी मोठ्यांचा आदर म्हणून हे सगळं घरात केलं जाईलच आणि त्यात सहभागी व्हावच लागेल.
वरच्या दोन गोष्टींनंतर इतर मुलींशी त्याचे विचार का जुळत नसावेत याचे कारण कळले. अर्थात मी मनातल्या मनात त्याचे आभार मानले की नकाराला न घाबरता त्याचे विचार आणि मत आधीच स्पष्ट केले.
(इथे मला कुठल्याही जातीबद्दल किंवा प्रथेबद्दल लिहायचे नसून मुलाच्या विचारांबद्दल लिहायचे आहे, हे सर्वांना कळेल अशी अपेक्षा करते. तरीही कोणाचा आक्षेप असल्यास हे काढून टाकेन. )
गुजराती मुलाची प्रश्नावली
गुजराती मुलाची प्रश्नावली म्हणजे अती कीस काढण्याचा प्रकार आहे.
Too good to be true वरून 'सोनू के टीटू की स्वीटी' आठवली पण तुझ्या केसमध्ये त्या मुलाने आधीच खऱ्या अपेक्षा सांगितल्या ते बरं झालं.
पीनी, आक्षेप असेल तरी काढून
पीनी, आक्षेप असेल तरी काढून टाकू नये असे मला वाटते.
लांबलचक प्रश्नावली तयार करणे
लांबलचक प्रश्नावली तयार करणे आणि त्यातून आवडीनिवडी जुळतात असे लक्षात आल्यामुळे "आयुष्याचा जोडीदार मिळाला" असे समजणे म्हणजे थेट वैचारिक अपरिपक्वपणा असतो.
>> चहा कॉफी की सरबत वगैर थंड पेय
>> सिनेमा - कॉमेडी की रोमँटिक की ऍकशन
man... seriously 'दिल चाहता है' मधलं सुबोध हे पात्र आठवलं
त्या मुलाने शाईचा ठिपका पाडून
त्या मुलाने कागदावर शाईचा ठिपका पाडून 'हा ठिपका पाहून काय आठवतं' हेही विचारायला हवं होतं.
अतरंगी पीनी मित्रहो सगळ्यांचे
अतरंगी पीनी मित्रहो सगळ्यांचे किस्से भारी
लहान असताना दाखवण्या
लहान असताना दाखवण्या बिखवण्याच्या कार्यक्रमात कंटाळा यायचा म्हणून आता सगळे किस्से अर्धे मुर्धे आठवतात. प्रत्येक वेळी नंतर त्यावरून जोक्स व्हायचे ते आम्हाला समजायचे नाहीत. असे खूपसे किस्से आता का आठवत नाहीत बरं ?
आमच्या आजोबांचे किस्से तर खूप आहेत. मुलगी / मुलगा बघायला जाणारे त्यांना खास आमंत्रण देऊन नेत.
कुणाला तरी विचारून घेते. नंतर इथे लिहीन.
माझाच किस्सा सांगतो.
माझाच किस्सा सांगतो.
माझ्या आई वडीलांचे मत होते की जी मुलगी आपल्या कडे सुन म्हणून येणार आहे, तिनेच आपल्याकडे यावे म्हणजे तिला आपले रहाणीमान वगैरे पहाता येईल. म्हणून सर्व कांदे पोहे कार्यक्रम आमच्याच घरी झाले. मुद्दामहून पाहूणे आले की मीच पुढे येऊन दार उघडायचो. उगाच कोणीतरी आतून येईल, वाट बघावे लागू नये, उगाचच उत्सुकता व वातावरण टेन्स नको हा उद्देश असायचा.
आयुष्यात पहिली मुलगी पाहिली. ती होती डॉक्टर. आमची पुर्ण माहिती त्यांना दिली होती आणि त्यावरून स्पष्ट होते की मुलगी माझ्यापेक्षा वयाने २ वर्षाने मोठी होती. हे असे असुन सुद्धा त्यांनी मुलीचे वय लहान दाखवून आमच्या घरी आले होते. आम्हाला याची कल्पना नव्हती. सहज कोठल्या कॉलेजमधून मेडीकल केले व कोठल्या वर्षी प्रश्न आम्ही विचारला. त्याला ती मुलगी एकदम गडबडून गेली. तिने जे वर्ष सांगितले त्या वर्षीच त्या कॉलेजमधून आणखी एक ओळखीची मुलगी डॉक्टर झाली होती. तिला ओळखता का असे विचारले तर ह्या मुलीने नाही म्हणून सांगितले.
नंतर जेव्हा आम्ही आमच्या ओळखीच्या मुलीला हिच्या बद्दल विचारले तर ती म्हणाली की मी जेव्हा मेडीकलला अॅडमिशन घेतली तेव्हा ही शेवटच्या वर्षी होती. ह्यावरून ती मुलगी माझ्यापेक्षा मोठी होती हे लक्षात आले. अर्थात आम्ही नकार कळवला. माझ्या वडीलांनी त्याचे कारणही सांगितले व बोलताना एवढेच म्हणाले की आधी कळवून जर तुम्ही आला असता तर आम्ही पुढचा विचार केला असता.
नंतरचा एका किश्याला तर जाम धमाल. मुलीचे वडील मी मुंबईत आहे म्हणाल्यावर आमचे एक डोंबीवलीला घर आहे, ते आम्ही तुम्हाला देऊ असे आमिषच दाखवले. त्या मुलीला बाजूला गप्पा मारण्यासाठी नेले होते. तिने पहिलाच डायलॉग मारला की मी नॉनवेज वगैरे खात नाही. मला काहीच चालत नाही. अंड्याचा केक पण नाही. वगैरे वगैरे... मी त्यावेळी चिकन खायचो व सरळ सांगून टाकले की मला हे चालते. त्यावर ती लगेच लग्नानंतर मी सुद्धा खाईन असे लगेच बदलून गेली. अर्थात आम्ही नकार कळवला.
कापो वरून आठवलं, माझा किस्सा
कापो वरून आठवलं, माझा किस्सा हिंदी सिनेमा सारखा आहे, शेम टू शेम
मी आणि तो मुलगा CCD मध्ये भेटलो, दुसऱ्यांदा भेटत होतो, पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा घरचे होते, मी देवाचं नाव घेत त्याला खरं काय ते सांगितलं कि एक मुलगा आहे माझ्या आयुष्यात, तू मला नाही बोल, मला जो घाम फुटला होता आणि मी फुल्ल्ल्ल shivering
तर तो मुलगा २/३ मिनिट शांत झाला, काही हि बोलला नाही, नंतर माझा कौतुक केलं कि तू डेरिंग करून सगळं बोललीस, आणि मग सिक्सर मारला, जर तू त्याला नाही बोलणार असशील तर मला हो बोल!! मी गप बसून होते खूप वेळ, निघताना thank you बोलले. पण खरंच तो आला आणि मला life चा decision घेता आला कि बास्स्स शादी करनी हे तो मेरे best friend के साथ हि
आहे का नाही फुल्ल फिल्मी
सगळ्यांचे किस्से वाचताना मजा
सगळ्यांचे किस्से वाचताना मजा येतेय
वरच्या रंगाच्या किश्श्यावरून एक असाच आमच्या मित्राच्या बहिणीसोबत घडलेला प्रसंग आठवला. त्याला दोन बहिणी. थोरलीला बघायला आले होते. सगळं जुळत होतं. थोरली बहिण आणि मित्र एकदम गोरे-घारे. त्यामानाने धाकटी बहीण बरीच सावळी. ती आत आईला मदत करत होती म्हणून औपचारीक गप्पा वगैरे आटपत असताना नंतर बाहेर आली. तेव्हा तिची ओळख करून दिली. तेव्हा मुलाची आई -'ही मुलीची बहीण का? बरं झालं तुम्ही सांगितलंत म्हणून. नाहीतर रंगरूपावरून आम्हाला कळलंच नसतं'
सगळे उडालेच.मुलाने आणि मुलाच्या बापाने ह्सण्यावारी नेण्याच्या प्रयत्न केला. पण मित्र आणि मुलगी संतापले होते. ते फटकन काहीतरी बोलणार होते पण कसंबसं आवरून धरलं. नंतर त्या स्थळाला नकार कळवला.
काय किस्से धमाल आहेत
काय किस्से धमाल आहेत सगळ्यांचे!!
ते फ्लॅटचं आमिष वगैरे वाचून मला आणखी एक कांपो केस आठवली माझी. या केसमधला मुलगा आधी मला भेटला नव्हता. त्याचं माझ्या बाबांशी फोनवरून बोलणं झालं होतं फक्त. तेव्हा मी पुण्यातच होते आणि जॉब करत होते. या पहिल्या कॉलनंतर त्या मुलाकडून काही कळलंच नाही. मग मधे काही महिने गेले. त्या अवधीत माझं अमेरिकेला एमएस साठी येणं मी पक्कं केलं होतं. किंबहुना मला इकडून कॉलेजेसची अॅडमिट्स यायलाही सुरूवात झाली होती. तेव्हा अचानक या मुलाचा पुन्हा कॉल आला की अजून लग्न झालं नसेल तर भेटता येईल का? खरंतर तोवर माझा हा निर्णय झाला होता की आता एमएस होईपर्यंत लग्नाचा विचार बाजूला ठेवायचा. तसं त्याला माझ्या बाबांनी सांगितलं सुद्धा. तरीही त्याला मला भेटायचंच होतं. मग वडील म्हणाले अमेरिकेला जायच्या आधी हा शेवटचा मुलगा बघ. तर मी तयार झाले. त्याला भेटले. इतक्या महिन्यांनंतर त्याने पुन्हा कॉन्टॅक्ट का केला आणि त्या आधी काहीच का कळवलं नाही याबद्दल त्याच्याकडून काहीच समाधानकारक उत्तर मिळालं नाही. मग मी त्याला स्पष्टच सांगितलं की बाबा माझा अजून २ वर्षं तरी लग्नाचा विचार नाही. अगदीच पसंती झाली तर तुझी २ वर्षं थांबायची तयारी आहे का? त्याला तो नाही म्हणाला. त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नव्हतं. आम्ही एकमेकांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा वगैरे देऊन निघालो.
काही दिवसांनी त्याचा परत कॉल आला की माझी थांबायची तयारी आहे आणि पसंती सुद्धा आहे. हे ऐकून मी जरा चक्रावलेच. वास्तविक तो नाही म्हणाल्यामुळे मग त्या मुलाबद्दल मी काही विचारच नव्हता केला. त्यामुळे मी विचार करायला वेळ मागून घेतला. तर याचा जवळपास रोजच कॉल यायला लागला आणि कॉलवर भावी आयुष्याबद्दल प्लॅन्स वगैरे सांगायला लागला. लवकर मी त्याला हो म्हणावं आणि साखरपुडा करूनच अमेरिकेला जावं यासाठी त्याने सॉर्ट ऑफ लकडा लावला. यासाठी मात्र मी त्याला स्पष्ट नकार दिला. आधीच एकतर त्याला मी होकार दिला नव्हता शिवाय माझा साखरपुडा करून जायचा वगैरे प्लॅन नव्हता. मी हे त्याला अगदीच क्लीअर सांगितलं. तर त्याने मला फोनवरून थेट आय लव्ह यू च म्हणून टाकलं मी शॉक्ड!! वर पुन्हा म्हणायला लागला की 'तू स्टुडंट असलीस तरी तू मला डिपेंडंट म्हणून घेऊन जाऊ शकशील. तसंही मला एका ज्योतिष्याने सांगितलंय मी माझा आता भाग्योदय होणारे आणि एका मुलीमुळेच होणार आहे आणि ती तूच आहेस' वगैरे वगैरे. मग मात्र मला एकूणच सीन लक्षात आला आणि मी त्याला स्वच्छ नकार दिला. त्याला सांगितलं की हे असं काहीही होणार नाही आहे आणि त्याने मला कॉल्स करणं बंद करावं. त्याने तरीही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला पण त्याची डाळ शिजत नाहीये हे लक्षात आल्यावर अगदी प्रेमभंग झाल्यासारखा आव आणून थँकफुली माझा पिच्छा सोडला.
सध्या घरी बहिणीचे लग्न
सध्या घरी बहिणीचे लग्न जुळवाजुळव चालू असताना एक स्थळ खूप चांगले वाटले. पुढे जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी होकार होता. त्या वेळी तो मुलगा आणि बहीणी चे एकमेकांशी जे बोलणे झाले त्यावरून त्या मुलाने घातलेल्या अटी
Jeans top घालायची नाही
बहीणीचे केस खांद्यापर्यंत आहेत तरी केस मोकळे सोडायचे नाहीत
साडीच नसायची नेहमी
Clg च्या frnds शी अजिबात contact ठेवायचे नाही
FB insta twitter ह्या सर्व social sites वरून अकाऊंट डिलीट करायचे
U won't believe all restrictions are ner abt month ago..
अर्थातच आम्ही त्या मुलाला नकार कळवला.
2021 सालामध्ये सुद्धा मुलांची
2021 सालामध्ये सुद्धा मुलांची अशी वागणूक बघून माझ्या लग्नापर्यंत अजून कशी कशी मुल बघावी लागतील ह्या विचारानेच माझा मुलांविषयी चा संताप अजून जास्त झाला.
आणि अजून महत्त्वाचे म्हणजे सदर मुलगा इंजिनीअर असून एका नामांकित कंपनी मध्ये चांगली पोस्ट वर आहे.
जर सुशिक्षित मुले असा विचार करत असतील तर येत्या काळात लग्न जमणे च अवघड वाटत आहे.
डोडो , मस्त किस्सा.
जर तू त्याला नाही बोलणार असशील तर मला हो बोल!! >>>> मस्त किस्सा.
असा विचार करणारा कुणी असेल तर कामच झालं समजा
सगळेच खूष
भन्नाट किस्से आहेत , अचंबित
भन्नाट किस्से आहेत , अचंबित करणारे किस्से आहेत, ह ह हसवणारे किस्से आहेत.
नविन अॅड झालेले किस्से खरच
नविन अॅड झालेले किस्से खरच एकसे एक आहेत... स्ट्रेसबस्टर आहे हा धागा!
माझ्या मोठ्या भावाच्या लग्नाच्या वेळचा किस्सा, माझा भाउ ६ फिट उन्च आहे त्यामूळे मुलगी किमान ५-३ किवा ५-२ तरी असावी अस सगळ्यानाच वाटत होत त्यात एका मुलिची पत्रीका आली त्यात मुलिची उन्ची ५-२ लिहली होती पण प्रत्यक्षात मुलगी ४-११ वैगरेच होती त्यात अगदी बारिक चण असल्याने दादाला शोभण्याचा प्रश्नच नव्हता वर मुलगी ग्रॅज्युएट अस सान्गितल होत पण मुलिचे शिक्षणही पुर्ण नव्हते, एकदरीत मामला काही जमला नाही. त्याना नकार कळवला तर मुलिच्या काकानी कारण विचारायला फोन केला आईने सान्गितल " अहो तुम्ही मुलिची उन्ची चुकिची लिहली होती तेव्हा जमणार नाही" त्यावर काका म्हणाले " उन्चीच काय घेवुन बसलात, लग्न झाल की वाढेल हळूहळू"
आम्ही पुर्ण अवाक झालो ते एकुन.
माझ्या आईच्या मामाच्या
माझ्या आईच्या मामाच्या लग्नाच्या वेळेसची गोष्ट. त्याला स्थळं बघायला सुरुवात केलेली तेंव्हा एकेदिवशी त्याच्या मित्रांना त्याची मस्करी करायची हुक्की आली. त्यांनी मामाला विचारलं एक स्थळ आहे, मुलगी शहरात वाढलेली आहे आणि खूप सुंदर आहे चालेल का तुला ? मामाने विचारलं ब्राह्मण आहे का? मित्र म्हणाले हो. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की ती TV मध्ये काम करते. पण आपण सांगू लग्नानंतर नको करुस. मामा म्हणाला नाव काय मुलीचं ? फोटो दाखवा. मित्रांनी फोटो दाखवून नाव सांगितलं 'माधुरी दीक्षित' (मामाकडे TV नव्हता, घरची गरीबी असल्याने थेटरात सिनेमे पहिला जाणं वगैरे पण अशक्य होतं तेंव्हा त्याला ही कोण हे माहीत असणं अगदीच अशक्य होतं). मामाला मुलगी बघताक्षणी आवडली (कोणाला नाही आवडणार?)
आता मामाने मनात पक्के ठरवलं की मला माधुरीशी च लग्न करायचं आहे. तो इतर सगळ्या स्थळांना नकार देत सुटला. शेवटी वैतागून त्याच्या वडिलांनीकारण विचारलं तर याने सांगितलं मला माधुरी आवडलीये मग पणजोबा म्हणाले ठीक आहे सांग तिच्या आई बाबांना घरी या बोलणी करायला.
आता खुश होऊन मामा त्याच्या मित्राकडे गेला आणि म्हणाला तू त्या मुलीचा फोटो दाखवला होतास ना तिच्या घरी पत्र पाठव आणि बघायला बोलाव त्यांना. मित्र हसून हसून ठार वेडा झाला. मग त्याने स्वतःच्या पैशाने मामला तिचा सिनेमा दाखवला. घरी येऊन पणजोबांनी जी पूजा मांडली त्याची की ज्याचं नाव ते
थोडक्यात तुझी मामी होता होता
रीया
माझा एक घटस्फोटीत मित्र इथे
माझा एक घटस्फोटीत मित्र इथे अमेरिकेत रहातो. वयाच्या ५६ व्या वर्षात त्याला लग्न करण्याची इच्छा झाली. कुठल्यातरी ऑनलाईन साईट वरून त्याला एक बाई भेटली.. ती भारतात पंजाब मधे रहात होती. तिच्याशी चॅटींग वगैरे करून , आता भेटायला हवे इतपर्यंत गोष्ट आली. बाईचा भाऊ दुबईला होता.. त्याला भेटायला, त्याच्याशी बोलायला हवे असे तिने सांगितले. मग या मित्राने लास वेगासहून, सान फ्रांसिस्को, तिथून कोरीया, तिथून दिल्ली करत पंजाब गाठले. तिच्या घरी जाऊन तिला भेटला. तेव्हा कळले की 'तिचा भाऊ दुबईला होता खरा, पण तो दुबईला तुरुंगात होता', आणि त्याला तिथून सोडवण्यासाठी तिला दुबईला जायचे होते. ....
दुबईचा भाऊ..हाहाहा..
दुबईचा भाऊ..हाहाहा..
अस्मिता, टेक्निकली आजी गं.
अस्मिता, टेक्निकली आजी गं. माझ्या आईच्या सख्या मामाची बायको . त्याच्यात आणि माझ्या आई मध्ये 5 वर्षाचं अंतर आहे म्हणून मी त्याला आजोबा न म्हणता मामाच म्हणते
माधुरी मामी मस्त किस्सा.
माधुरी मामी मस्त किस्सा.
१. त्याला नाही म्हणालीस तर मला हो म्हण
२. आय लव्ह यू*
(*अटी लागू: डिपेंडन्ट म्हणून न्यावे लागेल)
हे दोन्ही किस्से तर अक्षरशः अंतर्मुख करवणारे आहेत
म्हणजे माधुरी तुमची मामे आजी
म्हणजे माधुरी तुमची मामे आजी झाली असती!
रमड, काय किस्सा आहे- मान ना
रमड, काय किस्सा आहे- मान ना मान मै तेरा सलमान प्रकार झाला..... विरह सोसावा लागू नये, किंवा २-४ वर्ष रिलेशनशिपनंतर आता संसार सुरू व्हायला हवा म्हणून मुली डिपेंडंट व्हिसावर मुलांना घेऊन आलेल्या पाहिल्या आहेत. पण त्यात वर-वधू अतिशय समंजस आणि खंबीर असतात. आर्थिक, व्हिसा नियम, ते सामाजिक सर्व बाबीत सहकार्यपूर्वक वागतात. हे "व्हिसासाठी लग्न" टाईप्स झालं. हे असं 'एका व्हिसातच बसू हो दोघे, घ्या सरकून' छाप प्रकार शोभत नाही.... तिला तर जाऊ दे आधी अमेरिकेत. इतकं घायकुतीला काय यायचं?!!
एका व्हिसातच बसू हो दोघे,
एका व्हिसातच बसू हो दोघे, घ्या सरकून >>> अगदी अगदी!
सगळेच किस्से धमाल आहेत.
सगळेच किस्से धमाल आहेत.
आमच्याकडे एवढी धमाल झाली नाही. पण माझा पहिलाच कांपो कार्यक्रम होता, त्यावेळी मला जरा टेन्शन आलं होतं. आपणच कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असणार, सगळे आपल्या हालचाली बारकाईने पाहणार, या विचाराने भिती वाटत होती.
मी चहा घेऊन गेले, तेव्हा ट्रेमध्ये कप व बश्या वेगवेगळ्या ठेवल्या होत्या. आणि देताना बशीवर कप ठेवून चहा दे, असं मम्मीने सांगून ठेवलं होतं. त्याप्रमाणे मी पाहुण्यांना चहा द्यायला सुरुवात केली आणि माझ्या थरथरणाऱ्या हातांमुळे कप-बश्यांची किणकिण सुरू झाली.
आणि त्या आवाजाने मला माझंच हसू यायला लागलं. अशावेळी मला हसू दाबणं फार अवघड होतं. सगळ्यांना चहा देऊन मी बसले तिथे, पण पहिली पाच मिनिटं मान खाली घालून हसू आवरत होते. नशीब तेव्हा कुणी काही विचारलं नाही. सगळे मुलाचंच कौतुक करत होते. नंतर आम्ही दोघंच बोलायला गेलो, तेव्हा मी माझ्या भविष्यातील करियरसंबंधित काहीतरी विचारलं, तर तो पुन्हा स्वतःविषयीच सांगू लागला. मी मनातल्या मनात नकार ठरवून टाकला तेव्हाच.
ते लोक गेल्यानंतर आम्ही कांपो खायला घेतले, तेव्हा कळलं की मम्मी पोह्यात मीठच टाकायला विसरली होती. पाहुण्यांनी पोहे कसे संपवले असतील, असा विचार करून खूप हसलो आम्ही. नकार कळवण्याची नवीन पद्धत वाटली असेल त्यांना.
इथल्या बऱ्याच किश्यांत आणि
इथल्या बऱ्याच किश्यांत आणि माझ्या निरीक्षणातही पाहतो की आईबाप पोराचे किंवा पोरींचे कौतुक करताना थकत नाही. आपले नाणे खणखणीत असेल तर का गरज पडावी अशा प्रचाराची. जे लोकं खरोखर काही कर्तृत्ववान असतात त्यांना किंवा त्यांच्या घरच्यांना अशी दळणे दळावी लागत नाहीत.
^^^
^^^
तोंड वाजवलं नाही तर सोनंही विकलं जात नाही म्हणतात
आणि ज्याची जीभ थकत नाही त्याची मातीही विकली जाते.
स्थळ हातचं गैल्यावर गुण कळून काय उपयोग?
ज्या पाहुण्यांसाठी कांपो मस्त
ज्या पाहुण्यांसाठी कांपो मस्त tasty जमून आले तिथे लग्न जमणार
अशी एक अंधश्रद्धा आताच सुचली आहे
Pages