कांदेपोहे कार्यक्रम, लग्नासाठी मुलांना/मुलींना भेटणे याचे धमाल किस्से

Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2021 - 00:52
meeting for arranged marriage

शिर्षक स्पष्टच आहे. असे रोचक, गमतीदार किस्से येउ द्या.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सईचे किस्से अचाट आहेत. Biggrin

मातृसत्ताक कुटूंब मुलाचं कौतुक सांगत होत्या की भू भू चं? >> मातृसत्ताक कुटुंबातील असल्याने मुलाचंच कौतुक सांगत असणार. कुत्राचं कौतुक सांगणारे कुतृसत्ताक कुटुंबातील असतात.

नंतर तर त्याने गप्पांच्या नादात माझ्या डिश मधल पण खायला सुरवात केली (जे मला तेव्हा अजिबात नव्हतं आवडलं Lol )

हाहा ही-ही करून घरी परत आल्यावर जेव्हा आई ने इतर चौकशा करायला सुरवात केली तेव्हा लक्षात आलं आपण हे काहीच विचारलं नाही किंवा विचारावं अस डोक्यात पण आल नाही. घरून खूप पडी झाली होती माझ्यावर. >> हहपुवा

अरे कसला धमाल विनोदी धागा आहे हा.
माझे स्वतः चे कांदेपोहे कार्यक्रम झाला नव्हता पण मी सहभागी असलेल्या मधले हे किस्से.

१. आमचं नुकतच लग्न झालेलं आणि सासरकडच्या एका मुलीचे कांदेपोहे कम बैठक आमच्या कडे होती. २५ लोकांसाठी कांदे पोहे करायचा माझा पहिलाच प्रसंग ( कारण साबा गावाला गेल्या होत्या. आम्ही पोहे खाउ न घातल्याचं असं उट्ट काढलं नवरा आणि सासर्यांनी हे उशीरा कळलं Wink तर ते असो.. ). तर या प्रसंगात मुला मुलीची आधी भेट आणि पसंती झाली होती. तर मंडळी आली. प्राथमिक बोलाचाली झाल्या. लग्न ठरल्यात जमा होतं त्यामुळे आता पोहे खाउ आणि याद्या करयला घेउ असं चर्चा सुरु झाली.मी आणि भावी वधु आतुन पोहे ट्रे घेउन येत असताना आमच्या कानावर संडास असा शब्द पडला आणि आम्ही फ्रीज झालो. त्या बैठकीत मुलाचे काका आणी मुलीचे काका यांचा "भारतीय संडास चांगला की पाश्चिमात्य" या विषयावर परीसंवाद रंगला होता. गुडघ्याचे ऑपरेशन करयची वेळ येउ नये म्हणुन भारतीय पद्धत कशी छान यावर मुलीचे काका ठाम होते.आता संडास या विषयावर लग्नात काही अडथळा येउ नये असा एक विचार तोवर माझ्या मनात फिरुन गेला. मी नवर्‍याकडे एक कटाक्ष टाकला आणि त्याने चला चला पोहे आले असे म्हणुन त्यांना आवरलं.
कोणाचं काय तर कोणाचं काय असतय राव.

२. दुसरा किस्सा आहे नवर्‍याच्या मित्रासाठी मुलगी बघायला आलेली तेव्हाचा. आम्ही त्या मित्राच्या घरी गेलो होतो त्याला मॉरल सपोर्ट द्यायला. त्याच्या घरी त्याची आई, वडील, सक्खी बहीण आणि एक शिकायला पुण्यात मावशीकडे म्हणुन रहाणारी मावस बहीण आणि मुलीचे कुटूंब आधीच हजर होते.त्यात आणि आमची भर. फारच गर्दी झालेली. प्राथमिक प्रश्ण उत्तरे झाली आणि मुलीला गाता येतं असं कळलं. तिच्या मागे लागले सगळे गाणं गाण्यासाठी. आता इतक्या लोकात कसं काय गायचं बा.. ती आपली लाजत बसली होती. ती काहीच बोलेना तेव्हा मुलाचे वडील एकदम म्हणाले. बर थांब ह तु..तुला पहिल्यांदा गायला संकोच वाटतोय का....आमची अबक पण छान गाते. ती गाइल आधी मग तु गा. असे म्हणुन डायरेक्ट मुलाच्या मावस बहिणीकडे बॉल टोलवला. ती आपली ऑडीयन्स मधे टंगळमंगळ करत बसलेली मुलगी बिचारी दचकलीच. आणि मग नाइलाजाने कुठलसं एक गाणं गायली.
पोहे डीश आत ठेवायला आम्ही दोघी गेलो आणि एकदम फस्कन हासत सुटलो. कुणाचा कार्यक्रम न कोणाचं गाणं ..

अजुन खुप किस्से आहेत. आठवले की सांगतेच

>> नंतर तर त्याने गप्पांच्या नादात माझ्या डिश मधल पण खायला सुरवात केली

कोविड नव्हता तेंव्हाचं जग किती सुंदर होतं ना Happy

धमाल किस्से आहेत ऐकेकाचे.. गाणी गाण्याचे प्रसंग तर भारीच.प्रत्यक्षदर्शींना काय मज्जा आली असेल. Lol
मस्त आणि धमाल धागा.

त्या हिच्या वेळचा किस्सा देऊ का? नको नैतर. तो अमक्याचाच टाकते. तो ही नको बै. त्या मावशीचा किस्सा भारीच होता, पण आता आठवतच नाही, आईला विचारून टाकते...

अशा अवस्थेत असलेल्यांनी जास्त विचार करत बसू नये नाहीतर माझ्याप्रमाणे एकही किस्सा नाही अशी परिस्थिती होईल. Wink

धमाल किस्से आहेत सगळे

नंतर तर त्याने गप्पांच्या नादात माझ्या डिश मधल पण खायला सुरवात केली >>> how cute!!
माझ्याकडे असे काही धमाल किस्से नाहीत . ४-५ स्थळ बघितली . प्रत्येक्वेळी मी आणि तो मुलगा दोघेच बाहेर भेटलो . पण कोणी अतरंगी नाही निघाले त्यातले. एक दोन जण खूपच छान होते , अगदी जुनी ओळख असल्यासारख्या आमच्या गप्पा फार वेळ रंगल्या . पण कोणीच क्लिक झाल नाही.
एक मुलगा आणि मी फक्त एक चहा आणि एक कोल्ड्रिन्क एवढच मागवून गप्पा मारत बसलो होतो . बर्याच वेळ गप्पा चालल्या.
शेवटी निघायचं म्हणून बिल मागवलं . बिल त्यानेच भरलं. त्यावरून काहीतरी विषय निघाला आणि आम्ही बडीशेप खात परत गप्पा मारत बसलो .
ती बडीशेपेची वाटी आम्ही पुढच्या २० मिनिटात बोलत बोलत संपवली. .
शेवटीच तोच म्हणाला , चल निघूया , नाहीतर आता बडीशेपेच पण बिल लावेल हॉटेलवाला.

शेवटी एक स्थळ बघितलं , त्यावेळी आमच्या दोघांचे आई-वडिल आणि त्याची मोठी बहिण असे सगळे कुटुम्ब होते .
आता त्याच्याशीच लग्न करून बसलेय Happy

मी मैत्रिणींकडून्/बहिणीकडून त्यान्च्या कलिगचे ऐकलेले किस्से आणि नकाराची कारणे --

एकीला मॉलमध्ये भेटायला आलेल्या मुलाने तिच्याकडेच सुट्टे पैसे मागितले रिक्शावाल्याला द्यायला , मग परतही केले नाहीत.
एक मैत्रिंण आणि भेटायला आलेला मुलगा कॅफेमध्ये सॅण्ड्विच खात बसले होते , त्याच्या दातात्/हिरडीवर पावचा लगदा अडकला म्हणून त्याने सरळ तोंडात तर्जनी घालून काढत बसला .
एकदा भेटायला आलेल्या मुलाचे शू लेस सुटले होते आणि स्पोर्टस शूजवर डाग होते , म्हणून एकीने नकार दिला .
"जो ईन्सान अपने जूतोंका खयाल नहि रख सकता वो आगे मेरा और फमिली का क्या रखेगा "

नंतर तर त्याने गप्पांच्या नादात माझ्या डिश मधल पण खायला सुरवात केली>>>>
हे फारच आवडले
म्हणजे असं की किती कम्फर्टेबल झालात तुम्ही एकमेकांबद्दल एकाच भेटीत. Love at first sight असंही

माझा प्रेमविवाह असल्याने कांदापोहे प्रकार झालाच नाही
आधी दोन वर्षे मैत्री आणि नंतर प्रेम असलयाने एकमेकांच्या घरी नेहमीच जाणे येणे होत असे आणि आम्ही प्रेमात पडलोय हे आम्ही सोडून बाकी सगळ्यांना कळलं होतं, त्यामुळे आम्ही कधी डिक्लेअर करतोय याचीच वाट बघत होते.

तरी मी एकदा हिला म्हणालो होतो, की मलाही एकदा कांदापोहे प्रोग्रॅम करायचा आहे, काळजी करू नकोस, नकार देऊ आपण.
त्यावर असल्या जळजळीत नजरेने पाहिले माझ्याकडे आणि म्हणाली हा काय खेळ वाटतो का तुला
आणि आपण म्हणजे काय? मी सोबत येऊन बसायचं आहे का तुझ्या?
त्यांनतर मग अचानकच तिच्या घरच्यानी लग्नाची घाई सुरू केली आणि साखरपुडा उरकून घेतला Happy

>> त्याच्या दातात्/हिरडीवर पावचा लगदा अडकला म्हणून त्याने सरळ तोंडात तर्जनी घालून काढत बसला .

Rofl Mr Bean असणार हा.
एक चुटकीभर लगदे कि किम्मत.... बहोत भारी पड गयी

नंतर तर त्याने गप्पांच्या नादात माझ्या डिश मधल पण खायला सुरवात केली (जे मला तेव्हा अजिबात नव्हतं आवडलं Lol ) >>> Rofl
सईचे किस्से भारी आहेत Lol

एकंदर संडास हा बराच लोकप्रिय विषय दिसतो >>> अगदीच! आमच्याकडे एक आई-बाबा आले होते मला पहायला. मुलगा आलाच नव्हता. सकाळीच आले आणि २ तास गप्पा मारत बसले. त्यातले बाबा अगदीच भोचक होते. त्यांनी घरातले दोन्ही संडास उघडून पाहिले. नुसतेच Uhoh वर म्हणाले की मी कोणाच्याही घरी जातो तेव्हा त्यांच्या घरातले संडास पाहतो कसे आहेत ते.

मी कोणाच्याही घरी जातो तेव्हा त्यांच्या घरातले संडास पाहतो कसे आहेत ते. >> Lol अरे काय एकेक लोक असतात.
हे मज्जेचे अजुभव वाचून आता मला फोमो आला आहे.

वर म्हणाले की मी कोणाच्याही घरी जातो तेव्हा त्यांच्या घरातले संडास पाहतो कसे आहेत ते.>> काय एकेक माणसं असतात. मुलगी बघायला गेल्यावर पहिल्याच भेटीत संडास काय मुद्दाम उघडून बघायचा?

हातावरून, नाडीवरून, चेहऱ्यावरून भविष्य ओळखणारे बघितले होते. संडासावरून भविष्य ओळखणारे पहिल्यांदाच ऐकले.

मी स्वतः अजून सामोरा गेलो नसलो तरी बालपणी आई-बाबांसोबत मी व बहिणीने नात्यातल्या अनेकांच्या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. मात्र त्यातले मला दोन प्रसंग लख्ख आठवतात, कारण माझ्यामुळे कांदापोह्यांच्या कार्यक्रमांना काहीसे गालबोट लागले आणि माझ्या मनात सदैवासाठी अपराधीपणाची भावना रुजू झाली.

एकदा आमच्या एका स्नेहींच्या मुलीचे स्थळ बाबांनीच दुसऱ्या स्नेहींच्या मुलासाठी सुचवले होते, त्यात मुलीचा कांदेपोह्यांचा पहिलाच प्रसंग होता. त्यांचे घर आमच्या मागच्या कॉलनीतच असल्याने , मुलाकडली सर्व मंडळी आमच्या घरूनच मुलीच्या घरी गेली. काही वेळाने स्नेहींना मुलाचा फोटो आमच्या घरीच विसरल्याने लक्षात आले आणि मी घरीच असल्याने त्यांनी मला फोन करून तो घेऊन येण्यास सांगितले. मी तिकडे पोहोचेपर्यंत कांदेपोह्यांचा कार्यक्रम उरकतच आला होता आणि मुलीची विचारपूस सुरु होती. मी फोटो देऊन तडक निघालो असता मुलीच्या वडिलांनी मला बळेच थांबवले आणि माझ्यासाठी कांदेपोह्यांची प्लेट आणावयास सांगितली. मी जरा घाईत असल्याचे सांगून निघायचा प्रयत्न करत असतांना माझ्या आई-बाबांनी मला थांबायचा इशारा केला. मग माझे कांदेपोहे खाईपर्यंत सगळेच अजून थांबले, त्यानंतर मुलगी पानसुपारीचे तबक घेऊन आली. सर्वांना दिल्यावर औपचारिकता म्हणून तिने मलाही तबक दिले. तेवढ्यात कसे, कुणास ठाऊक माझ्या हातून तबक दणकन खाली पडले आणि त्यातील सुपारी, बडिशेप, व इतर सगळे सांडले. मला तर काय करावे काहीच कळत नव्हते, पण मुलीने काही हरकत नाही म्हणत वेळ सावरून नेण्याचा प्रयत्न केला असला तरी ती मनातून खट्टू झाल्याचे स्पष्ट दिसत होते. इतरही मंडळी मला अपराधी वाटू नये म्हणून धीर देत होती, आणि तिलाही समजावत होती. पुढे दोन्ही बाजूंनी पसंती आली तरी दुर्दैवाने ते लग्नच जमले नाही (त्यांनतर एक दोन वर्षात त्या मुलाचे लग्न दुसरीकडे झाले मात्र सर्व बाजूंनी अनुरूप असूनही मुलीचे लग्न अनेक वर्षे जमलेच नाही. त्यादरम्यान तिचे वडीलही वारले (त्यांना मी मामा म्हणत असे). तेव्हापर्यंत तिच्या दोन धाकट्या बहिणीही लग्नाच्या उंबरठ्यावर आल्याने मग तिला बीजवर, विधुर, वा आंतरजातीय स्थळेही दाखवण्यात आली. पण यथावकाश (सुमारे दहा वर्षांनी) तिचे लग्न जातीतल्याच सुखवस्तू मुलाशी झाले). तथापि मला अजूनही खूप अपराधी वाटते, कारण सदर मुलगी व तिच्या ईतर भावंडांसोबत मी व माझी बहीण मोठे झालो असल्याने, बालपणी एकत्र खेळलो, बागडलो, व भांडलोही होतो.

दुसरा प्रसंग म्हणजे माझ्या सख्ख्या धाकट्या आतेबहिणीचा आहे. माझी आत्या माझ्या बालपणीच देवाघरी गेली होती. त्यावेळी केवळ तिच्या थोरल्या मुलीचेच लग्न झाले होते आणि तिची इतरही मुले जवळपास लग्नाच्याच वयाची होती. ही ताई मात्र सर्वात धाकटी असल्याने नववी की दहावीतच होती. आत्या गेल्यानंतर इतर कुणालाही ना जुमानता आत्याच्या यजमानांनी लगेच दुसरे लग्न केले. त्यानंतरच्या काही वर्षात माझ्या सगळ्याच आतेभावंडांची लग्नें झाली. त्यादरम्यान ताईचेही पदवीपर्यंतचे शिक्षण झाले होते, पण सगळेच आपापल्या संसारात रमल्याने हिच्या लग्नाकडे जरा दुर्लक्ष झाले. ताईचे वय वाढत चालले होते आणि त्यातून तिला चांगली स्थळेही सांगून येत नव्हती. पण मग माझ्या बाबांनी खूप मनावर घेतले आणि तिला एका घटस्फोटित पण सुखवस्तू स्थळ आले. कांदेपोह्यांचा कार्यक्रम आमच्या घरीच करायचा ठरला. ठरलेल्या दिवशी मुलाकडली मंडळी आली, सर्वांच्या गप्पा सुरु असतांना त्यांना मला पाणी देण्यास सांगितले. मग ताई कांदेपोहे घेऊन येणार होती. मला सांगितल्याप्रमाणे आधी मुलाकडच्या पुरुषमंडळींना पाण्याचे ग्लास दिल्यावर स्त्रीयांकडे वळलो, परत काय झाले कुणास ठाऊक माझ्या हातातून तबक निसटले आणि एका स्त्रीच्या साडीवर पाण्याचा ग्लास सांडला आणि त्यांची साडी ओली झाली. मला तर स्वतःच्याच थोबाडात मारून घ्यावीशी वाटत होती. पुढे दोन्ही बाजूंनी पसंती असली तरी हेही लग्न जमले नाही. यथावकाश ताईचे दुसरीकडे लग्न जमले तरी मला अजूनही हा प्रसंग आठवला की फार वाईट वाटते.

ह्यामुळे कुणाच्याही कांदेपोह्यांच्या कार्यक्रमापासून मी दूरच राहायचे ठरवले होते. इतरांचे तर टाळता येईल पण माझ्या सख्ख्या बहिणीच्या वेळी मी कसे करेल असे मला नेहमीच वाटत असे. पण मग तशी गरजच पडली नाही, मी बंगलोरला शिकत असताना इकडे नागपूरला बहिणीचे लग्न जमले आणि ओघानेच, मला जायचा प्रसंगच आला नाही (बहिणीला उणीपुरी तीनच स्थळे आली आणि तेवढ्यात तिचे लग्न जमले. त्यामुळे तिलाही फारसे कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला सामोरे जावे लागले नाही. तसे तर ज्यांच्याशी तिचे झाले त्यांचेच पहिले स्थळ आले होते पण हीने M.Tech. पूर्ण झाल्याशिवाय मला लग्नच करायचे नाही म्हणून मी कोणत्याही स्थळाला सामोरी जाणार नाही असे हट्टच धरला होता. पुढे आणखी दोन स्थळे सांगून आल्यावर पुन्हा पहिलेच स्थळ आले. त्यांनी लगेच संमती दिली आणि चार महिन्यात त्यांचे लग्नही झाले. ).

वर म्हणाले की मी कोणाच्याही घरी जातो तेव्हा त्यांच्या घरातले संडास पाहतो कसे आहेत ते. >> काहीही काय. असे पण लोक असतात का ?

त्यांनतर मग अचानकच तिच्या घरच्यानी लग्नाची घाई सुरू केली आणि साखरपुडा उरकून घेतला Happy

Submitted by आशुचँप on 15 March, 2021 - 07:28

कोणा बरोबर?

आमच्या आबांकडे माझ्यासाठी एक स्थळ आलेलं, नेमकी माझ्याच ऑफिसात आहे असं कळलं. आबांनी फोटो पाठवला मला आणि झाली माझी शोधाशोध सुरू.. एका मैत्रिणीला दाखवला तिने शोधून दिलं. मग skype वरून सांगितलं की ऑफिस प्रिमाईसमध्येच चहाला भेटुयात. अखेर मुलगी आली... तशी दिसायला छान होती पण, मी सहा फुटाला एक इंच कमी आणि ती पाचाला एक कमी.. वजनात मी क्विंटलला 12 कमी आणि ती अंदाजे 50 किलोला 5 कमी! बोललो तर मुलगी म्हटली मी अजून विचार नाही केला, biodata बनवलाय हे देखील बिचारीला माहीत नव्हतं. खूप लाजत होती आणि मला हसू आवरत नव्हतं! मग तीही हसायला लागली जोरात! मग बेकरीतला तो पफ का काय म्हणतात ते खाऊन कॉफी घेऊन आलो परत. आमच्यातल्या फरकामुळे मी घरी "नाही" कळवलं.. तर नंतर या पोरीची नजरानजर सुरू झाली, त्यात ऑफिस कॅफेटेरियात जाताना माझ्या डेस्कला वळसा घालून जावं लागायचं तिला. स्माईल देऊन घेऊन कलीग्ज मध्ये उगाच चर्चा रंगायला लागल्या. शेवटी त्यांना सुद्धा कारणासह स्पष्टीकरण दिल्यावर चर्चा थांबल्या! महिन्याभरात स्माईल सुद्धा थांबली.

काय हे अजिंक्यराव Happy
अमिताभ जयाचं एपिक उदाहरण समोर असतानाही मागे सरलात

Pages