१) मी २००८ - २००९ ला मुलीसाठी नवी मुंबईत शाळा शोधत होतो
एक ठरले होते कि मराठी माध्यमात घालायचे नाही - त्याचे प्रॉब्लेम मी आणि बायकोने पूर्ण अनुभवले होते आणि त्यामुळे हे तर नक्की होते .
आता इंग्लिश माध्यम हे बाकी ठिकाणी नवीन असले तरी मी मुंबईत ते पण पश्चिम उपनगरात राहिलो होतो आणि त्यामुळे आसपासचे सर्व इंग्लिश माध्यमात होते त्यामुळे त्याचा फायदा पाहिला होता
आता बोर्ड चा प्रश्न तर ११ वि १२ वित काही ICSE वाले आणि २ CBSE वाले ओळखीचे होते आणि लक्षात आले ह्या मुंलाना अभ्यास सोपा जातोय . तसे पण नॅशनल टॅलेन्ट search परीक्षा दिली होती आणि त्यासाठी सातवीपासून ट्रेनिंग घेतले होते त्यासाठी CBSE ची पुस्तके वापरली होती आणि लक्षात आले कि ह्यांची काठिण्य पातळी अधिक आहे , पुस्तके फार चांगली आहेत . नंतर आयआयटी द्यायचा प्रयत्न केला आणि तेंव्हा लक्षात आले कि CBSE ची पुस्तके ( म्हणजेच NCERT ) ची हि या परीक्षेला बेस म्हणून वापरली जातात.
नंतर हि ICSE / CBSE वाल्यांचाच संबंध इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आला - ३० -३२ वर्षांपूर्वी हि नॉव्हेल्टी होती पण पश्चिम / मध्य / दक्षिण मुंबईत कोणी ना कोणी होते . अनेक जण ICSE वाले होते आणि मुले अभ्यासात चांगली होती आणि त्यापलीकडे हि मुले suave / sophisticated / polished होती . याचा फायदा त्यांना नक्की मिळाला.
बी स्कुल मध्ये ICSE / CBSE वाल्यांचे प्रमाण जास्त होते - शाळा कमी असून . आणि आठवते तिकडे त्यावेळी हि १९९१ ला CBSE ची मुले तुलनेने IIT मध्ये अधिक जातात हे ऐकले होते
नंतर मुंबईत तरी ICSE / CBSE शाळा झपाट्याने वाढू लागल्या खास करून ICSE . आणि त्यात जायला दूर जावे लागते ते हि नाही . मला बाळ तुलनेने उशिरा झाले आणि अनेक मित्र मैत्रीणीची मुले आता डिग्री पूर्व केली आहेत किंवा उच्चं शिक्षण घेत आहेत - एक दोन मैत्रिणी असल्या शाळेत शिकवत हि आहेत त्यामुळे काही गोष्टी कळल्या .
तरी मला ICSE / CBSE मध्ये CBSE अधिक चांगले वाटते कारण माझ्या माहितीत अनेक स्पर्धा परीक्षा चा बेस हा असतो
केंद्र सरकार या अभ्यासक्रमाचे नियमन करते
हा थोडा कठीण आहे ( काहींच्या मते ICSE थोडा अधिक कठीण ऐकले आहे - पण यात परत भिन्न मते आहेत )
ICSE / CBSE मध्ये मला तरी CBSE च फी तुलनेने कमी वाटली आहे . ICSE ची संलग्नता सहज मिळत असल्याने शाळा काहीही करीत असायला - यात वेगळा अनुभव हि असू शकतो
माझी मुलगी अभ्यासू नाही आणि तिला डिजिटल आर्ट करायचे असे म्हणते - मला तरी वाटते कि चांगल्या मुलांच्या मध्ये असल्याने असल्या वेगळ्या वाटेवर हि फायदा व्हावा .
मुलीची शाळा निवडताना अंतर हा निकष होता . नवी मुंबईत शाळांचे भरपूर पर्याय आहेत आणि ऍडमिशन ची तितकी मारामारी नाही
सुदैवाने घराजवळ ५ मिनिटे चालत वर रायन ची CBSE होती - रायन सानपाडा - फी प्रचंड नव्हती आणि बालवाडी मध्ये सहज ऍडमिशन मिळाली - इकडे बालवाडी ३ वर्षांची आहे , मुलीला प्ले स्कुल मध्ये टाकले नाही .
२) शाळेची फी किती आहे ते जरूर पहा आणि आपल्या आर्थिक स्थिती च्या प्रमाणात किती खर्च आहे ते पण पहा . तसेच खरे तर मला तर पहिली ते चौथी पर्यंत ची फी हि पाचवीत कमी झाल्याचे दिसले आहे पण इतर शाळांचे तसेच असेल असे नाही
एक म्हणजे शाळेचा बोर्ड वर बहुतेक पहिली ते दहावी ची फी लावलेली असते त्या वरून अंदाज येतो
तरी हि साधारण जी सरासरी फी आहे त्याच्या अडीच / तीन पट फी परवडते का ते पहा - त्या वरून अंदाज घ्या ( आपले उत्पन्न आणि महागाई पण वाढणार आहे हे पण लक्षात घ्या)
३) शाळेची साईट बघा , फेसबुक पेज असेल तर बघा , गुगल वर रिव्ह्यू बघा . अर्थात २/४ वाईट रिव्ह्यू असू शकतात . तसेच काही दहावीची बॅच पूर्ण झालेल्या शाळा नोटीस बोर्ड वर आपल्या मुलांची / माजी विद्यार्थ्याची कामगिरी लावतात - त्यामुळे शाळा किती बरी / वाईट आहे ते कळते . तसेच अभ्यासात नाही तर काही शाळा क्रीडा / कला / काही इतर ऍक्टिव्हिटी यात हि चांगल्या असतात
४) आसपास शाळेची चौकशी करा - काही वेळा लोकांकडून काही माहिती मिळते . शाळा कोणता संस्थेची आहे , कोण चालक आहेत ते हि पहा , त्यांची नावे गुगल करा .
५) जर मुलाला ICSE / CBSE बोर्ड मध्ये प्रॉब्लेम येत असेल , जमत नसेल तर कोर्स करेक्शन म्हणून SSC ला टाकायला बिचकू नका. तुलनेने सोपे असल्याने / परवडत नाही म्हणून / बदली झाली तर असे करणारे लोक आहेत . आणि हो शाळेत अभ्यासात पुढे म्हणजे पुढे नक्की काय होईल हे सांगता येत नाही . दहावी ला दोन तीन वर्ष अडकले पुढे योग्य ते कोर्स घेऊन शिकलेले आणि व्यवस्थित परफॉर्म करणारे अनेक लोक माहीत आहेत
६) शाळे संबंधी आणि बोर्डा संबंधी अजून एक निरीक्षण आहे - एखाद वेळी ते जुन्या भागात / मुंबईला लागू असेल
अनेक चांगल्या स्टेट बोर्ड इंग्लिश शाळा - त्यात काही कॉन्व्हेंट होत्या या अनुदानित आहेत आणि त्यामुळे फी अतिशय कमी आहे
पूर्वी त्यात प्रवेशासाठी फाईट असायची आता सर्वच जण ICSE / CBSE च्या मागे आहेत त्यामुळे यात प्रवेश मिळतो .
या शाळांनी हि ICSE / CBSE सुरु केले तरी स्टेट बोर्ड अनुदानित असल्याने ती शाळा चालू ठेवली आहे
तर अशी शाळा जवळ असेल तर चौकशी करून पहा -
तसेच हल्ली शाळा निकाल , अजून काही चांगले असेल ते बोर्ड वर लावतात - त्यामुळे शाळा किती चांगली वाईट हे कळायला मदत होईल
नेट वर हि शाळा कळली तर तिचे review वाचू शकता .
७) अजून २/३ इंटरनॅशनल बोर्ड पण आहेत - IGCSE / IB ते मला फार महाग वाटले आणि त्याचे भारतात शिकताना काय फायदे आहेत ते कळले नाही . किती समजले यापेक्षा हि प्रवेश परीक्षा देता येणे हे आपल्याकडे अधिक महतवाचे आहे असे माल तरी वाटते . फी पाहून या बोर्ड चा विचार केला नाही
हेमंत वाघे.
HuntMyJob.in ( Coming Soon )
शाळेसंबंधी सगळ्यात महत्त्वाची
शाळेसंबंधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळा घरापासून जवळ हवी. शाळा, अभ्यास यामधून वेळ काढून मुलांना इतर ॲक्टिव्हिटी करणे सोपे जावे. मग मुद्दा येतो माध्यम कोणते असावे. अमुकच माध्यम हवे म्हणून अट्टाहास न धरता उपलब्ध पर्यायांपैकी कोणता उत्तम याचा विचार करावा. खरेतर घराजवळ चांगली, सर्वोत्तम शाळा कोणती हा विचार पुरे आहे. पुढचा मुद्दा अभ्यासक्रम, बोर्ड कोणते घ्यावे. पालक जर नोकरी धंद्यानिमित्त राज्याबाहेर जाणार नसतील, नोकरीत बदलीची शक्यता नसेल तर SSC बोर्ड उत्तम पर्याय आहे. ICSE / CBSE करून फार मोठे तीर मारले जातील या भ्रमात राहू नये.
ICSE / CBSE करून फार मोठे तीर
ICSE / CBSE करून फार मोठे तीर मारले जातील या भ्रमात राहू नये. - IIT सारख्या संस्था मध्ये ICSE, CBSE ची खास करून CBSE ची मुले मोठ्या प्रमाणात आहेत .
आणि मुंबईत तरी हीच गोष्ट झिरपत झिरपत इतर चांगल्या असंस्था मध्ये आली आहे .
गेल्या १५ वर्षात ICSE, CBSE शाळा खूपच वाढल्याने चांगली मुले तिकडे आहेत आणि तीच पुढे यतात असे वाटत नाही का ?
तसेच ICSE, CBSE शाळेत मुले बरीच माहिती ठेवून असतात असे पूर्वी वाटायचे , पण आता हि तसेच जाणवते .
SSC best आहे
SSC best आहे
10, 12 , डिग्री
हा आपला बेसलाईन आहे
बहुतेक सगळ्याच पालकांचा
बहुतेक सगळ्याच पालकांचा जिव्हाळ्याचा विषय असावा हा.
सध्या माझा मुलगा 12th Science शिकतो आहे आणि वरील सगळ्या मुद्द्यांचा अनुभव मी घेतला आहे आणि थोडीफार यातून पोळूनही निघाले आहे.
माझ्या मते मुलांची शाळा ही घराच्या जवळच असावी. शाळेला असलेले मैदान हा दुसरा महत्वाचा मुद्दा आणि शाळेची वेळ हा तिसरा महत्वाचा मुद्दा. सध्याच्या बहुतेक ICSE/CBSC शाळा जवळजवळ सकाळी 8 ते दुपारीरी 3 किंवा 4 अश्या वेळात असतात त्यात त्यांना दोन किंवा तीन मधल्या सुट्ट्या असतात. शाळा एवढ्या वेळ ठेवण्याचा करण म्हणजे "आम्ही शाळेत इतर activities like swimming, नृत्य, गायन, वादन, स्केटिंग इत्यादी करून घेतो. " असा दावा शाळेच्या व्यवस्थापनाकडून केला जातो. जो माझ्या मते अत्यंत खोटा आहे, काही अपवाद असतीलही पण फारच नगण्य.
या बोर्डाची पाठपुस्तके खूप छान असतात त्याबाबद्दल वाद नाही परंतु मुलांच्या डोक्यात त्यातला किती जातंय हा मोठा प्रश्नच आहे. एकतर या शाळा private असल्यामुळे प्रत्येक शाळेत शिक्षकांना खूप वेगवेगळा Pay structure असत. आणि त्यामुळे शिक्षक सतातबदलात असतात अगदी 3 महिन्यांनी शिक्षक बद्दलण्याचाही अनुभव मी घेतला आहे.
जसे SSC बोर्डाचे सगळ्या महाराष्ट्रात एकाच पुस्तक असते त्याप्रमाणे या शाळांच्या पब्लिकेशन मधेही खूप विविधता असते आणि विषयांमध्येही. मुख्यतः प्रतेयक शाळेत syllabus मध्ये असणाऱ्या भाषा विषयात तर खूप विविधता आहे. मराठी हा विषय 10 वि ला नसतोच. इंग्लिश निदान घरी शिकवू शकतो परंतु हिंदी भाषा अतिशय अवघड असते. साधारण आठवी पर्यंत मराठी भाषा असते त्यामुळे तिचे गंभीर्यही अजिबात नसते.
Ssc बोर्डात इतिहास भूगोल हे तालुका, जिल्हा, राज्य देश अश्या प्रमाणे इयत्ते प्रमाणे वाढत जाते परंतु ICsE मध्ये पहिल्या इयत्तेपासून जगाचा इतिहास आणि भूगोल शिकवलं जातो. हे योग्य आहे का असा मला पडलेला प्रश्न. त्या तुलनेत CBSC चे syllabus पहिल्यापासून सेट आहे त्यामुळे ते जास्त preferable आहे.
माझा मुलाचा 2007 साली SSC बोर्डाच्या शाळेत प्रवेश घेतला होता. तो 2 रीत गेला तेंव्हा शाळेचे बोर्ड बदलून ICSE झाले. आणि 8 ते 4 च्या शाळेसाठी सकाळी 7.30 ते दुपारी 4.30 एवढा वेळ मुलं नक्कीच अडकली. घरी आल्यावर खेळणे, इतर activities, tv बघणे, नातेवाईकांकडचे किंवा घरातील छोटे समारंभ अटेंड करणे, घरातील सदस्यांबरोबर गप्पा मारणे या सगळ्या गोष्टी ज्या लहान वयात मुलांच्या overall वाढीत फार महत्वाचा भाग ठरतात त्या मुलं कधी अनुभवणार आणि अभ्यास कधी करणार याचा विचारही करणे गरजेचे आहे. तसेच 8वि नंतर क्लास लावायची वेळ येते तेंव्हा शाळा, क्लास या वेळापत्रकात स्वअभ्यास बसवणे खूप कठीण होते.
मी स्वतः नोकरी करत असल्याने संध्याकाळी 8 वाजता santacruz ते डोंबिवली हा प्रवास करून घरी आल्यावर त्याचा अभ्यास घेणे किंवा आज शाळेत काय शिकवले हा आढावा घेणे हे एक खूप मोठठे काम करावे लागे. आणि त्यामुळे आई आली की फक्ट आपल्याशी अभ्यासाचंच
बोलते ही माझ्या मुलाची धारणा झाली होती. त्यामुळे नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी नक्कीच हा विचार ही करावा किंवा मुलाला अगदी लहान पणापासूनच त्याच्या आणि शाळेच्या जबाबदारीवर सोडून द्यायला शिकावे.
आता पुढील प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या स्पर्धा परिक्षेविषयी... माझ्यामते ssc बोर्डापेक्षा इतर बोर्डाच्या मुलांना त्या परीक्षा सोप्या जात असतीलही पण त्याहीपेक्षा मुलांची आकलन शक्ती, अभ्यासाचा गांभीर्य
हे मुद्दे जास्त मोठा रोल प्ले करतात.
अजूनही बरेच मुद्दे आहेत, पण सध्या इतकच. मी बऱ्याच वर्षांपासून मायबोलीची वाचक आहे परंतु कधीही काही लिहिले नव्हते परंतु हा विषय खूप महत्त्वाचा असूनही बऱ्याच वेळा चुकीचा विचार करून योग्य निर्णय घेतला जात नाही म्हणून लिहावंसं वाटलं. कदाचित इतरांचे अनुभव खूप वेगळे असतील पण माझा स्वतःच मत मी व्यक्त केलं.
डोंबिवली इस्ट मध्ये कोणत्या
@Vrishali Deshpande, डोंबिवली इस्ट मध्ये कोणत्या चांगल्या शाळा आहेत? गुगलवर रिव्ह्यू पाहिले तर प्रत्येक शाळेचे काहीतरी निगेटिव्ह आहेतच. नारायण इ-टेक्नो cbse जरा बरी वाटली. ओमकार एक आहे. मुलगी आता 2 वर्षांची होईल अडीच तीन वर्षे झाल्यावर टाकायला लागेल कुठेतरी. काही समजत नाही कुठे टाकू. आमची लहानपणीची शाळा मस्त होती असं वाटतंय. आता सगळा झगमगाट आहे. बिझनेस नुसताच.
Vrishali, प्रतिसाद आवडला,
Vrishali, प्रतिसाद आवडला, जमल्यास अजून लिहा या विषयावर
डोंबिवली मध्ये पाटकर आणि
डोंबिवली मध्ये पाटकर आणि विद्या निकेतन चांगल्या आहेत
ओमकार च नाव ऐकून आहे पण कसे आहे माहित नाही
Cbsc सठि ठाण्यात ऑर्किड बेस्ट आहे. माझी मुलगी त्यात च शिकते. अजिबात नाव ठेवायला जागा नाही
माझी मुलगी 11वी सायन्स ला आहे
माझी मुलगी 11वी सायन्स ला आहे
माझी मते नंतर लिहिनच
पण मुलीने मराठी Quora वर तिचं मत लिहिलंय ते इथे पेस्ट करतीये
प्रश्न: मुलांना सीबीएसई बोर्डमध्ये शिकवले पाहिजे की स्टेट बोर्डमध्ये?
माझं शिक्षण पहिली ते दहावी CBSE शाळेत झालं आहे! आणि मी ज्या क्लास ला जायचे ( ९वी) तिथे माझा बरोबर SSC board चा मुली पण असायचा त्यामुळे मला CBSE आणि SSC दोन्ही बद्दल माहिती आहे
मला वाटतं की CBSE बोर्ड जास्त चांगला आहे कारण :-
१. फक्त पाच विषय असतात १०० मार्काचा एक विषय ! बस .. ( इंग्लिश, हिंदी , science ,maths , social science)
२. Cbse board ची पुस्तकं ( NCERTs) खूप चांगली अस्तात.. सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत
३. परीक्षा घेण्याची पद्धत
CBSE बोर्ड चा परीक्षेत २० mcqs असतात ( ४ पर्याय दिले जातात ..त्यातला एक बरोबर पर्याय निवडायचा .).
ह्याचा मुळे नुस्तं पाठांतर करून काही होत नाही .. पुस्तकात काय दिलंय हे नीट समजून घ्यावं लागतं
कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नुस्तं पाठांतर करून देता येत नाही ( म्हणून लोकांना CBSE बोर्ड जास्त अवघड वाटत असेल)
पण ह्यामुळे समजून अभ्यास करण्याची सवय लागते जी पुढे खूप उपयोगी पडते
४. स्पर्धा परीक्षा
कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी CBSE ची पुस्तकं ( NCERTs) खूप महत्त्वाची असतात ..कुठली ही परीक्षा असो JEE, UPSC , NEET , CLAT , NATA
५ . Standard maths / basic maths
ज्या मुलांना गणित खूप अवघड वाटतं त्या मुलांसाठी Basic maths हा एक पर्याय आहे .. ज्या मध्ये अभ्यासक्रम तोच असतो पण बोर्ड पेपर मधे जे प्रश्न विचारले जातात ते खूप सोप्पे असतात .. पण basic maths दहावीत असेल तर ११वी मध्ये गणित हा विषय नाही निवडू शकत पुढे biology kiva commerce ( without maths) घेऊ शकतो … किंवा जर वाटलच की ११वी मध्ये गणित पाहिजे तर September मधे standard maths चा पेपर देऊ शकता
६ CBSE चा अभ्यासक्रम, पुस्तकं, पेपर पॅटर्न हा सारखा बदलत नाही ..
महाराष्ट्र राज्य मंडळाचा पेपर
महाराष्ट्र राज्य मंडळाचा पेपर पॅटर्न गेल्या चार पाच वर्षांत बदललाय. तिथेही आता पाठांतर नव्हे, आकलनावर भर दिला जातो. प्रश्नपत्रिका नाही तर कृतिपुस्तिका activity sheet म्हणतात.
गेल्या मार्च मध्ये परीक्षेला बसणाऱ्यांसाठी आधी २० गुणांचे प्रश्न नववीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर असणार होते. ते पुढे बदलून practical, oral, internal assessment साठी दिले गेले.
गणित अवघड वाटणाऱ्यांसाठी सामान्य गणिताचा पर्याय दिला होता, तो खरंच चांगला होता. पण आता नाहीए.
सामान्य गणित खूप कमी मुलं घेतात , त्यामुळे त्यांना शाळेत शिकवलंच गेलं नाही, असं एके ठिकाणी पाहिलं .
गणित विज्ञानाचा अभ्यासक्रम सीबी एस इ प्रमाणे करायचंही चाललं होतं. झालं का माहीत नाही.
सीबीएसईच्या खाजगी शाळांना राज्याचे नियम लागू असतात का माहीत नाही. पण तिथले शिक्षक प्रशिक्षित असतातच असं नाही.
सामान्य गणित असे माझ्या वेळी
सामान्य गणित असे माझ्या वेळी असते तर मी नक्कीच घेतले असते, भूमिती न बीजगणित ह्याचा मला तरी 10वि नन्तर काही उपयोग झाला नाही, भूमिती तर अगदीच व्यर्थ. त्रिकोणमिती, प्रमेय इ अचाट प्रकारांचा काही उपयोग झाला नाही , काही म्हणजे काहीच नाही. 7वि पर्यंतच गणित पुष्कळ झालं वाणिज्य, कला, विधी इ शाखांसाठी. अंकगणित , गुणोत्तर इ पक्क आलं की बास.
हल्ली एस एस सी चा सिलॅबस सी
हल्ली एस एस सी चा सिलॅबस सी बी एस ई सारखा करण्याचा प्रयत्न असतो.
खरं तर कोणत्याही बोर्डात टाकून हल्ली फार फरक पडत नाही. पण आय सी एस ई आणि आय एस बी एस ई च्या फी जास्त असतात. (बहुधा 'कधीही मुलं बाळं घेऊन परदेशात कामासाठी रहायला जावं लागेल' अश्यांना तिथल्या शाळात रुळायला सोयीचा पडत असावा.) बोर्ड पेक्षा आजूबाजूच्या क्राऊड चा आर्थिक स्तर, शाळा त्यातल्या त्यात जवळ किंवा निदान बस पत्यातल्या, शाळेच्या मार्गावर खूप ट्रॅफिक नसणे हे मुद्दे महत्वाचे पडतात. शिवाय शाळेची वेळ, पालकांच्या ऑफिसची वेळ असे बरेच मुद्दे.
'फी जास्त' मध्ये शाळांची स्पर्धा हा मुद्दा पण आहे. चांगले शिक्षक मिळवायला जास्त पगाराच्या ऑफर द्यायच्या. मग ते सर्व वसूल करायला फी वाढवायच्या. आणि मग पालकांना जास्त फी ची इम्युनिटी आली की फार गरज नसताना पण वाढवायच्या. (थोडं हायवे टोल सारखं.) बर्याच परदेशी इन्स्टिट्यूट च्या स्पर्धा परिक्षा ठेवायच्या. (म्हणजे पालक आकर्षित होतात). या सगळ्यात रनिंग कॉस्ट वाढत जाते.
तेजो मॅडम धन्यवाद आणि आपल्या
तेजो मॅडम धन्यवाद आणि आपल्या मुलीचे पण आभार
एक गोष्ट विचारायची आहे - मुलगी आता ९ वि मध्ये जाईल - तिला आता आठवीं ३ भाषा आहेत इंग्लिश , हिंदी , फ्रेंच
तर आता एक नोटीस आली आहे आणि फक्त २ भाषांचा प्रत्यय आहे - आणि तिने इंग्लिश आणि फ्रेंच घेतले आहे
तर असं हिंदी सोडता येते ना - तिचे हिंदी दिव्य आहे
तसेच हा Basic maths हा एक पर्याय अजून आहे का ?
तिला कला शाखेकडे जायचे - आता तरी आहे - त्यामुळे फायदा व्हावा
धन्यवाद
महाराष्ट्र राज्य मंडळा मध्ये
महाराष्ट्र राज्य मंडळा मध्ये आता आकलनावर भर दिला जातो,
हे नक्कीच चांगले पाऊल आहे.
याच्यात आणखी सुधारणा झाल्या तर खूप चांगले होईल.
"पाठांतर करण्यापेक्षा मूळ संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे" हे मुलांना फार उशीरा म्हणजे महाविद्यालयात गेल्यावर समजते.(म्हणजे पूर्वी तरी समजायचे)
यात आता बरीच प्रगती झाली आहे
म्हणून पालकांनी देखील मुलांना लहानपणीच हे समजावून सांगणे गरजेचे आहे
उलट आहे
उलट आहे
शासकीय शाळेत शिक्षकांना पगार जास्त असतात
खाजगी शाळेत शिक्षकांना पगार कमी व सर्व फी मालक खातात
बी स्कूल आणि आय आय टी मध्ये
बी स्कूल आणि आय आय टी मध्ये सेंट्रल बोर्डातल्या मुलांचे प्रमाण अधिक असण्याचे कारण त्या बोर्डांचा अभ्यासक्रम एवढेच आहे का?
जेव्हा या संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा नव्हत्या तेव्हा बारावीतले गुण हा निकष असे. सेंट्रल बोर्डाच्या परीक्षापद्धतीमुळे त्यांना स्टेट बोर्डातल्या मुलांपेक्षा अधिक गुण मिळतात हे उघड आहे.
अजूनही ते तसंच असेल तर या कोरिलेशनचं आणखी एक कारण - सेंट्रल बोर्डात ल्या शाळांत जाणार्या मुलांच्या पालकांची आर्थिक स्थिती - त्यामुळे त्यांना एंट्रस परीक्षांसाठी कोचिंग क्लासेस परवडण्याची अधिक क्षमता हेही असेल.
सेंट्रल बोर्डाच्या शाळांत ज्या एक्स्ट्रा अॅक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात त्यांसाठी किती पैसे द्यावे लागतात? ते वाजवी असतात का?
आमच्या भागातल्या एका शाळेत च्या पालकांनी अशा अॅक्टिव्हिटीजसाठी द्यायच्या फियांबद्दल तक्रार केली होती. त्या फिया अव्वाच्या सव्वा असत. शिवाय दर वर्षी नवी अॅक्टिव्हिटी. म्हणजे मुलांना कशातच प्रावीण्य नाही.
खरं तर कोणत्याही बोर्डात
खरं तर कोणत्याही बोर्डात टाकून हल्ली फार फरक पडत नाही>>>>> +12345
भरत सर - जेव्हा या
भरत सर - जेव्हा या संस्थांमध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा नव्हत्या तेव्हा बारावीतले गुण हा निकष असे. सेंट्रल बोर्डाच्या परीक्षापद्धतीमुळे त्यांना स्टेट बोर्डातल्या मुलांपेक्षा अधिक गुण मिळतात हे उघड आहे. -
हि तुम्ही केव्हाची गोष्ट करीत आहेत ? साधारण किती वर्षांपूर्वी ?
आणि बी स्कूल मध्ये बारावी नन्तर कधी प्रवेश मिळायचा ? हे केंव्हा होते ? मी जमनालाल बजाज मधील ६० -७० वर्षे वयाच्या माजी विद्यार्थ्याना ओळखतो - १२ वि नांतर प्रवेश नव्हता हो . पहिल्या batch चे आता ७५-८० वयाचे आहेत आणि त्यातील हि एक माहीत आहेत .
हो. बी स्कूल मध्ये
हो. बी स्कूल मध्ये ग्रॅज्युएशननंतरच प्रवेश असतो. माझं चुकलं. वरच्या प्रतिसादातला तो भाग खोडतो.
आय आय टी एंट्रस एक्झामबद्दलही माझं चुकलं. वरच्या प्रतिसादातला तो भाग खोडतो.
खूप आधीपासुन एंट्रन्स एक्झाम आहेत असं दिसतंय. फक्त त्या सेंट्रलाइज्ड नव्हत्या. काही काळ बोर्ड परीक्षांत मिळणार्या गुणांनाही काही वेटेज मिळे.
पण आय आय टीमध्ये प्रवेशाबाबत सेंट्र्ल बोर्ड हे एकच कोरिलेशन नाही.. विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती , शहरी ग्रामीण पार्श्वभूमी हेही आहेत असं दाखवणारा एक स्टडी झाला आहे.
तसंच जे ई ई परीक्षा सेंट्रल बोर्डच घ्यायचं हाही मुद्दा आहे.
@बोकलत डोंबिवलीच्या शाळेबद्दल
@बोकलत डोंबिवलीच्या शाळेबद्दल तपशीलवार पोस्ट तुमच्या विपुत डकवली आहे.
भरत सर - खूप आधीपासुन
भरत सर - खूप आधीपासुन एंट्रन्स एक्झाम आहेत असं दिसतंय. फक्त त्या सेंट्रलाइज्ड नव्हत्या. काही काळ बोर्ड परीक्षांत मिळणार्या गुणांनाही काही वेटेज मिळे. - हे केंव्हा होते ?
मी JEE बद्दल विचारत आहे . JEE नेट सांगत आहे कि ६१ साली सुरु झाली
आपण कोणत्या वर्षीचे बोलत आहात ? ५० वर्षे जुन्या गोष्टींना अर्थ नाही ना ?
१९८९ ला माझा जवळचा मित्र आयआयटी मुंबईत गेला म्हणजे ३१-३२ वर्षे झाली - आणि मला वाटते कि मी १९८५-८६ शाळेतील एक बरीच वर्षे सिनिअर मुला कडे गेलो होतो - कारण तो आय आय टी मध्ये होता आणि अभ्यासाबद्दल मार्गदर्शन करणार होता . त्याला माल वाटते नॅशनल टॅलेंट शिष्यवृत्ती पण होती आणि दहावीच्या त्या परीक्षेआधी सातवी आठवीपासून मुंबईत प्रशिक्षण होते . त्याबद्दल त्याने सांगितले . म्हणजे शेफाली असे म्हणू शकतो कि गेली ४० ते २० वर्षे तरी बारावी चे मार्क लागत नसत .
A candidate’s AIR would be
A candidate’s AIR would be prepared on the basis of their JEE Main 2014 score (which would be given 60% weightage) as well as their normalised score in Class 12 or equivalent qualifying exam (which would be given 40% weightage).
https://www.shiksha.com/b-tech/articles/jee-main-results-2014-air-to-be-...
@बोकलत.. शाळेचा घरापासून अंतर
@बोकलत.. शाळेचा घरापासून अंतर, शाळेची वेळ आणि शाळेत खेळायला मैदान हे मुद्दे मला शाळा कोणत्या बोर्डाची आहे यापेक्षा महत्वाचे वाटतात. तुमच्या लेकीला शाळा निवडतांना यातील निदान दोन तरी satisfy होतील हे बघावे.
मी माझ्या मुलाला ऍडमिशन घेतांना विज्ञानिकेतन चाच पर्याय निवडणार होते परंतु या शाळेत मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची परीक्षा होते ती होऊन गेल्यावर मला कळलं करण ती आधीच्या ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात होते आणि मी तेंव्हा अजून एक वर्ष आहे या भ्रमात होते.
या शाळेचे मला माहित असलेले प्लस मायनस....
फी कमी, शाळेत सगळे सण मराठी पद्धतीने साजरे करतात त्यामुळे मुलांना आपली संस्कृती कळत असावी, वाढदिवसाला मुलांना औक्षणही करतात, शाळा सकाळ आणि दुपार या सेशन मधे असल्याने शाळेचा वेळ कमी आहे. पण शाळा मुख्य गावापासून खूप लांब आहे, midc मध्ये राहणाऱ्यांना थोडी जवळ असावी. शाळेचे सगळे निर्णय एकाच व्यक्तीच्या हाती आहेत आणि माझ्या मते हा minus पॉइंट आहे. 26 जुलै, स्वाइन फ्लू च्या वेळेलाही इतरांपेक्षा वेगळेच निर्णय घेतले गेले होते असाही मी काही पालकांकडून ऐकलं. आणि पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांची परीक्षा हे पण कुठेतरी चुकतंय अस वाटत.
पाटकर शाळेचा मी तेंव्हा विचार केला नव्हता करण एक वर्गात 80 ते 90 विद्यार्थी संख्या होती, आता परिस्थिती वेगळी असूही शकते, ह्या शाळेला खेळायला मैदान आहे, शाळेची वेळी कमी आहे आणि मराठी, इंग्लिश आणि सेमी इंग्लिश असे तिन्ही ऑपशन आहेत. Scholarship परीक्षा, टिळक विद्यापीठ परीक्षा किंवा MTS सारख्या परीक्षांमध्ये डोंबिवलीतून या शाळेची मुलं निदान तेंव्हा तरी पहिली येत होती.
सध्या टिळकनगर शाळेची गुरुकुल शाखा ही चांगली आहे अस ऐकलंय, पण ते Day school आहे.
सिस्टर निवेदिता ही चांगली शाळा आहे परंतु गेल्या वर्षी फी वाढी मूळे सतत गाजत होती.
ओंकार शाळेविषयी कधीच खूप चांगली किंवा खूप वाईट अशी टोकाची मत ऐकली नाहीत.
पलावा लोढा मध्ये राहणाऱ्या मुलांसाठी पवार पब्लिक स्कूल, लोढा या शाळा जवळ आहेत, पण त्याविषयी खूप कौतुक कधी ऐकलं नाहीये.
तुमच्या मुलीला अडीच किंवा तीन वर्षांनी झाल्यावर नर्सरी ला प्रवेश घेणार आहात असा मी गृहीत धरते करण जर तिसऱ्या वर्षीच ज्युनिअर ला ऍडमिशन घेणं म्हणजे मुलांचे हाल.
@ भरत, @swwapnil SSC चा पाठ्यक्रम आता खूप बदलला आहे आणि आपण म्हणालात तस CBSE च्या बरोबर आणण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे. तीन वर्षांपूर्वी 9वी, मग 10वी ,11वी आणि या वर्षी 12वी चा स्टेट बोर्डाचा पाठ्यक्रम बदलला आहे आणि difficulty level जवळ जवळ 30% नि वाढवली आहे आणि नुसती घोकंपट्टी नसून आकलनावर भर आहे, त्यामुळे स्टेट बोर्ड नको म्हणणाऱ्यांनी ही नक्की विचार करावा. मुळातच जर भविष्यात पालक महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणी कुटुंबसकट जाणार असतील तर स्टेट बोर्ड हा उत्तम पर्याय.
जर महाराष्ट्राबाहेर जाणार असतील CBSE हा पर्याय ICSE पेक्षा चांगला.
IGCSE, cambridge हे पर्याय जर पाल्य 10वी नंतर देशाबाहेर जाणार असेल तरच उपयोगी आहेत.
@ तेजो तुमच्या मुलीच खूप कौतुक वाटलं खूप छान analyse केल आहे. मी स्वतः Academics मधेच नोकरी करत असतांना माझा अनुभव असा आहे बोर्ड कोणतेही असला तरी चमकणारी मुलं ही वेगळीच असतात. पदवी पदव्युत्तर शिक्षणात यश मिळवणे यात मुलांची आकलन शक्ती आणि अभ्यासाच्या जबाबदारीची जाणीव ही शाळेच्या बोर्डापेक्षा खूप जास्त परिणाम करतो.
शालेय शिक्षणाचा पुढील आयुष्यावर होणारा शिक्षणव्यतिरिक्त परिणाम हा खूप मोठा असतो कारण त्या वयात मुलं जे दिसत किंवा जे बघतात ऐकतात ते अगदी टीप कागदासारख टिपून घेतात आणि नकळत त्याच्या पुढील आयुष्यावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे बोर्ड कोणतं या पेक्षा शाळेतील वातावरण कस आहे हे खूप महत्त्वाच आहे.
अर्थात सगळंच छान असेल अशी शाळा असणं हीच कठीण गोष्ट आहे त्यामुळें पालकांनी सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न करायचा.
वृषाली, खूप छान लिहिताय
वृषाली, खूप छान लिहिताय
@वृषाली, आता विद्यानिकेतनमधे
@वृषाली, आता विद्यानिकेतनमधे प्रवेशासाठी पालक मुले कोणाचीही परिक्षा होत नाही. आणि शाळा जरी त्यामानाने गावाबाहेर असली तरी बस सर्व्हीस इतकी तत्पर आहे की मुले गावभर फिरुन दमून उशीरा घरी परतत नाहीत. आम्ही पश्चिमेला रहात होतो तरी मुलगी शाळेच्या बसने २० व्या मिनिटाला स्टॉपवर उतरलेली असायची. मैदान तर उत्तमच आहे शाळेचे. काही मायनस पॉईन्ट्स आहेत पण ते तसे सगळ्याच शाळांचे असतात. प्लस जास्त दिसले मला (अर्थात हा वैयक्तिक अनुभव)
तिसर्या वर्ला/३-४ च्या
तिसर्या वर्षाला/३-४ च्या बॉर्डर ला ज्युनियर ला काही शाळा प्रवेश देतात, पण शक्यतो घेऊ नये.
बहुतेक शाळा रायटींग्/बंपटी लंपटी (म्हणजे आपल्या साध्या साऊंड वेव्ह, आपण लहान्पणी समुद्राचे पाणी दाखवायला काढतो त्या)/कर्सिव्ह रायटिंग आणि इतर गोष्टी लवकर चालू करतात. (नाहीतर रोज ३ तास इतक्या मुलांना बिझी कसे ठेवणार
) त्यातले कर्सिव्ह वाया जाते कारण पहिलीनंतर शाळांना परत सर्व शाळांच्या मुलांना सोपे पडावे म्हणून कर्सिव्ह सोडावे लागते. पण मुद्दा हा की ज्युनियर केजी ला मूल थोडेफार रायटिंग ला तयार होईल इतके मोठे हवे. (बोटांची वाढ नसते, घेऊ नये वगैरे मुद्दे मला माहित आहेत्,पण मी पाहिलेल्या ३ शाळा तरी ज्युनियर ला साईन वेव्ह आणि कर्सिव्ह घेत होत्या.)
परत पहिलीच्या वेळी वय कमी पडते आणि थांबावे लागते किंवा पहिलीत पण ५ पूर्ण ला घेतील अश्या शाळा शोधाव्या लागतात.
एस.एस.सी बोर्ड अवघड आहे खरं,
एस.एस.सी बोर्ड अवघड आहे खरं, १० वी मधे स्कोअर करायला कस लागतो. त्या तुलनेने सी.बी.एस ई सोपा वाटतो.
एस.एस.सी बोर्ड वेळोवेळी अपडेट ही करत असतात सिलॅबस. ह्या सगळ्या बोर्डपेक्षा शाळा जास्त महत्त्वाची.
बेसिक भाषा विषय एस.एस. सी बोर्ड मधे जास्त चांगले शिकवले जातात.
आधी आपण काय आहोत ह्याह्चा अभ्यास करावा आनि मग शेजार्याकडे नंतर जगाकडे वळावे, हा फंडा आहे.
मी _अनु, तुम्ही लिहिताय ते
मी _अनु, तुम्ही लिहिताय ते मुद्दे गौण आहेत. Nts, jee, cat साठी कुठली शाळा आणि बोर्ड योग्य यांचा विचार मूल केजीत घालताना करावा.
सहा पूर्णच्या नियमांमुळे मुलांचे काही महिने वाया जाणार नाहीत याचं प्लानिंग करून त्यांच्या जन्माची तयारी करावी.
हो तेही मुद्दे आहेतच. पण खूप
हो तेही मुद्दे आहेतच. पण खूप कमी वय नको हाही महत्वाचा मुद्दा आहे.
भरत सर हा नियम केंव्हा आला -
भरत सर हा नियम केंव्हा आला - आपल्याकडे दर वर्षीचा रेकॉर्ड आहे का ? कारण ९१ ला JEE दिली तेंव्हा प्रथम Screening टेस्ट आली होती , १२ विच्या मार्कांची अट नव्हती , बहुदा २००० ला मावसभावाने दिली तेंव्हा हि नव्हती .
बाकी इतके नियम बदलले तरी हि IIT मध्ये CBSE ची मुले अधिक जातात हे दिसले आहे - आकडा ५०-६० टक्के होता एके वेळी .
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/75-of-iit-crackers-are-f...
वृषाली, चांगल्या पोस्ट्स!
वृषाली, चांगल्या पोस्ट्स!
माझी मैत्रिण जी एका मराठी शाळेत शिकवते तिच्या मते आता महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम बराच छान केला आहे. तेव्हा केवळ अभ्यासक्रमासाठी दुसर्या बोर्डाचा विचार करण्याची गरज नाही.
शाळा ते घर अंतर, शाळेच्या वेळा हे मुद्दे आधी आलेच आहेत.
पण शाळा म्हणजे केवळ सुविधा नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तळमळीने शिकवणारे शिक्षक असणे. या लॉकडाऊनच्या काळात आपल्या पाल्याचे आणि शिक्षकांचे/शाळेचे कसे बाँडिंग आहे हे सर्व पालकांना कळलेच असेल. ज्या शाळेतील मुलांना लॉक डाऊन संपल्यावर शाळेत जाण्याची, शिक्षकांना भेटण्याची ओढ लागली आहे ती शाळा माझ्या मते छान असावी!
आदरणीय विवेक पोंक्षे सर म्हणायचे की a teacher should teach John, not physics. शिक्षक हा विषयाचा नसतो, मुलांचा असतो. शिक्षकाने मुलांना शिकवणे महत्त्वाचे, विषय कोणताही असो. भले १00% शिक्षक असे नसतील पण एक/दोन शिक्षक जरी तळमळीने शिकवणारे असले तरी खूप फरक पडत असणार. (स्वानुभव आहे हा भाग काढून टाकते आहे कारण सुदैवाने शाळेत १००% शिक्षक हे तळमळीने शिकवणारे लाभले!)
Pages