१) मी २००८ - २००९ ला मुलीसाठी नवी मुंबईत शाळा शोधत होतो
एक ठरले होते कि मराठी माध्यमात घालायचे नाही - त्याचे प्रॉब्लेम मी आणि बायकोने पूर्ण अनुभवले होते आणि त्यामुळे हे तर नक्की होते .
आता इंग्लिश माध्यम हे बाकी ठिकाणी नवीन असले तरी मी मुंबईत ते पण पश्चिम उपनगरात राहिलो होतो आणि त्यामुळे आसपासचे सर्व इंग्लिश माध्यमात होते त्यामुळे त्याचा फायदा पाहिला होता
आता बोर्ड चा प्रश्न तर ११ वि १२ वित काही ICSE वाले आणि २ CBSE वाले ओळखीचे होते आणि लक्षात आले ह्या मुंलाना अभ्यास सोपा जातोय . तसे पण नॅशनल टॅलेन्ट search परीक्षा दिली होती आणि त्यासाठी सातवीपासून ट्रेनिंग घेतले होते त्यासाठी CBSE ची पुस्तके वापरली होती आणि लक्षात आले कि ह्यांची काठिण्य पातळी अधिक आहे , पुस्तके फार चांगली आहेत . नंतर आयआयटी द्यायचा प्रयत्न केला आणि तेंव्हा लक्षात आले कि CBSE ची पुस्तके ( म्हणजेच NCERT ) ची हि या परीक्षेला बेस म्हणून वापरली जातात.
नंतर हि ICSE / CBSE वाल्यांचाच संबंध इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आला - ३० -३२ वर्षांपूर्वी हि नॉव्हेल्टी होती पण पश्चिम / मध्य / दक्षिण मुंबईत कोणी ना कोणी होते . अनेक जण ICSE वाले होते आणि मुले अभ्यासात चांगली होती आणि त्यापलीकडे हि मुले suave / sophisticated / polished होती . याचा फायदा त्यांना नक्की मिळाला.
बी स्कुल मध्ये ICSE / CBSE वाल्यांचे प्रमाण जास्त होते - शाळा कमी असून . आणि आठवते तिकडे त्यावेळी हि १९९१ ला CBSE ची मुले तुलनेने IIT मध्ये अधिक जातात हे ऐकले होते
नंतर मुंबईत तरी ICSE / CBSE शाळा झपाट्याने वाढू लागल्या खास करून ICSE . आणि त्यात जायला दूर जावे लागते ते हि नाही . मला बाळ तुलनेने उशिरा झाले आणि अनेक मित्र मैत्रीणीची मुले आता डिग्री पूर्व केली आहेत किंवा उच्चं शिक्षण घेत आहेत - एक दोन मैत्रिणी असल्या शाळेत शिकवत हि आहेत त्यामुळे काही गोष्टी कळल्या .
तरी मला ICSE / CBSE मध्ये CBSE अधिक चांगले वाटते कारण माझ्या माहितीत अनेक स्पर्धा परीक्षा चा बेस हा असतो
केंद्र सरकार या अभ्यासक्रमाचे नियमन करते
हा थोडा कठीण आहे ( काहींच्या मते ICSE थोडा अधिक कठीण ऐकले आहे - पण यात परत भिन्न मते आहेत )
ICSE / CBSE मध्ये मला तरी CBSE च फी तुलनेने कमी वाटली आहे . ICSE ची संलग्नता सहज मिळत असल्याने शाळा काहीही करीत असायला - यात वेगळा अनुभव हि असू शकतो
माझी मुलगी अभ्यासू नाही आणि तिला डिजिटल आर्ट करायचे असे म्हणते - मला तरी वाटते कि चांगल्या मुलांच्या मध्ये असल्याने असल्या वेगळ्या वाटेवर हि फायदा व्हावा .
मुलीची शाळा निवडताना अंतर हा निकष होता . नवी मुंबईत शाळांचे भरपूर पर्याय आहेत आणि ऍडमिशन ची तितकी मारामारी नाही
सुदैवाने घराजवळ ५ मिनिटे चालत वर रायन ची CBSE होती - रायन सानपाडा - फी प्रचंड नव्हती आणि बालवाडी मध्ये सहज ऍडमिशन मिळाली - इकडे बालवाडी ३ वर्षांची आहे , मुलीला प्ले स्कुल मध्ये टाकले नाही .
२) शाळेची फी किती आहे ते जरूर पहा आणि आपल्या आर्थिक स्थिती च्या प्रमाणात किती खर्च आहे ते पण पहा . तसेच खरे तर मला तर पहिली ते चौथी पर्यंत ची फी हि पाचवीत कमी झाल्याचे दिसले आहे पण इतर शाळांचे तसेच असेल असे नाही
एक म्हणजे शाळेचा बोर्ड वर बहुतेक पहिली ते दहावी ची फी लावलेली असते त्या वरून अंदाज येतो
तरी हि साधारण जी सरासरी फी आहे त्याच्या अडीच / तीन पट फी परवडते का ते पहा - त्या वरून अंदाज घ्या ( आपले उत्पन्न आणि महागाई पण वाढणार आहे हे पण लक्षात घ्या)
३) शाळेची साईट बघा , फेसबुक पेज असेल तर बघा , गुगल वर रिव्ह्यू बघा . अर्थात २/४ वाईट रिव्ह्यू असू शकतात . तसेच काही दहावीची बॅच पूर्ण झालेल्या शाळा नोटीस बोर्ड वर आपल्या मुलांची / माजी विद्यार्थ्याची कामगिरी लावतात - त्यामुळे शाळा किती बरी / वाईट आहे ते कळते . तसेच अभ्यासात नाही तर काही शाळा क्रीडा / कला / काही इतर ऍक्टिव्हिटी यात हि चांगल्या असतात
४) आसपास शाळेची चौकशी करा - काही वेळा लोकांकडून काही माहिती मिळते . शाळा कोणता संस्थेची आहे , कोण चालक आहेत ते हि पहा , त्यांची नावे गुगल करा .
५) जर मुलाला ICSE / CBSE बोर्ड मध्ये प्रॉब्लेम येत असेल , जमत नसेल तर कोर्स करेक्शन म्हणून SSC ला टाकायला बिचकू नका. तुलनेने सोपे असल्याने / परवडत नाही म्हणून / बदली झाली तर असे करणारे लोक आहेत . आणि हो शाळेत अभ्यासात पुढे म्हणजे पुढे नक्की काय होईल हे सांगता येत नाही . दहावी ला दोन तीन वर्ष अडकले पुढे योग्य ते कोर्स घेऊन शिकलेले आणि व्यवस्थित परफॉर्म करणारे अनेक लोक माहीत आहेत
६) शाळे संबंधी आणि बोर्डा संबंधी अजून एक निरीक्षण आहे - एखाद वेळी ते जुन्या भागात / मुंबईला लागू असेल
अनेक चांगल्या स्टेट बोर्ड इंग्लिश शाळा - त्यात काही कॉन्व्हेंट होत्या या अनुदानित आहेत आणि त्यामुळे फी अतिशय कमी आहे
पूर्वी त्यात प्रवेशासाठी फाईट असायची आता सर्वच जण ICSE / CBSE च्या मागे आहेत त्यामुळे यात प्रवेश मिळतो .
या शाळांनी हि ICSE / CBSE सुरु केले तरी स्टेट बोर्ड अनुदानित असल्याने ती शाळा चालू ठेवली आहे
तर अशी शाळा जवळ असेल तर चौकशी करून पहा -
तसेच हल्ली शाळा निकाल , अजून काही चांगले असेल ते बोर्ड वर लावतात - त्यामुळे शाळा किती चांगली वाईट हे कळायला मदत होईल
नेट वर हि शाळा कळली तर तिचे review वाचू शकता .
७) अजून २/३ इंटरनॅशनल बोर्ड पण आहेत - IGCSE / IB ते मला फार महाग वाटले आणि त्याचे भारतात शिकताना काय फायदे आहेत ते कळले नाही . किती समजले यापेक्षा हि प्रवेश परीक्षा देता येणे हे आपल्याकडे अधिक महतवाचे आहे असे माल तरी वाटते . फी पाहून या बोर्ड चा विचार केला नाही
हेमंत वाघे.
HuntMyJob.in ( Coming Soon )
हेम़ंतसर, मला माहीत नाही.
हेम़ंतसर, मला माहीत नाही. काही वर्षं होता एवढं ऐकलं होतं.
मी आधी लिहिलं तसं jee मध्ये cbse ची मुलं अधिक असणं हे एक कोरिलेशन आहे, तशी आणखीही आहेत.
पालकांचं अधिक उत्पन्न, शहरी भाग हे घटक cbse आणि jee दोन्हीत common असावेत.
असो.
@वृषाली, आता विद्यानिकेतनमधे
@वृषाली, आता विद्यानिकेतनमधे प्रवेशासाठी पालक मुले कोणाचीही परिक्षा होत नाही.
खूप छान बदल. @ कवीन खरंतर म्हणूनच कोणती शाळा चांगली किंवा वाईट अस प्रतिसादात लिहिले नाही कारण प्रत्येकाचा दृष्टिकोन आणि अपेक्षा वेगळ्या असतात.
@ जिज्ञासा "आदरणीय विवेक पोंक्षे सर म्हणायचे की a teacher should teach John, not physics. शिक्षक हा विषयाचा नसतो, मुलांचा असतो. शिक्षकाने मुलांना शिकवणे महत्त्वाचे, विषय कोणताही असो. भले 100% शिक्षक असे नसतील पण एक/दोन शिक्षक जरी तळमळीने शिकवणारे असले तरी खूप फरक पडतो ".....
अगदी खरंय. मुळातच एखादा विषय शिकवण्यापेक्षा त्या विषयाची, अभ्यासाची गोडी लावणे हा शिक्षकांचा core जॉब असायला हवा.
खूप वेळेवर आलाय हा धागा..
खूप वेळेवर आलाय हा धागा..
आम्ही मुलासाठी निर्णय घ्यायला साशंक आहोत..यंदा नववीत जाईल..तो आता जिथे आहे तिथे आठ्वी पर्यंतच CBSE आहे. (अगोदर माहित नव्हती ही परिस्थीती..)
आता नववी ला कुठे ऑड्मिशन घ्यावे कळत नाहीये. दोन वर्षे साठी बोर्ड बदलावं का?
आठवी च वर्ष लॉक डाऊन मध्ये निघून गेलं..आता नववीला पण ऑन्लाईन च शाळा होईल की काय माहित.. तसं झालं तर पुढील वर्षी दहावीला, नवीन शाळेत जुळवून घ्यायला जमेल का त्याला.. अशी शंका येतेय. दुसरं ऑप्शन म्हणजे आहे त्याच शाळेत पण SSC ला ऑड्मिशन घेणे..जे त्याच्या वर्गातील बहुतेक मुलं करणार आहेत..!
बी.एस. सर पुढील वर्ष पण
बी.एस. सर पुढील वर्ष पण गोंधळाचे जाणार आहे
तसेच नवीन जागी जाण्याचे तोटे हि असतील
त्यामुळे फार दूर जायचे असेल / इतर प्रॉब्लेम असतील तर SSC मध्ये चालू ठेवावे असे वाटते .
त्याच प्रमाणे त्याचा कल दि दिसला असेल
प्रचंड अभ्यासू कोर्स ला जाणार नसेल तर त्या दिशेने प्रयत्न केलेले चांगले .
म्हणतात ना a known devil is better than unknown angel
आता माझं मतं सांगते.
आता माझं मतं सांगते.
आम्ही आमच्या मुलाला SSC बोर्डाच्या इंग्रजी माध्यमात टाकलं.
Cbse न निवडण्याची कारण आम्हाला वाटली ती अशी.
Cbse अभ्यासक्रम बराच व्हास्ट आणि अवघड असते असे समजले.
आम्हला मुलाला तो ताण द्यायचा नव्हता. दुसरं म्हणजे आम्ही दोघ ssc मराठी माध्यमातले जर का मला उद्या त्याचा अभ्यास घ्यायचा झाला तर मलाच काही कळत नाहीय असं व्हायला नको अर्थात एवढी वाईट परिस्थिती नसती झाली पण तरीही.
आणि तिसरं म्हणजे मराठीशी असलेली नाळ अगदीच तुटू नये.
किमान फार हाय लेव्हल नसली तरी थोडी बरी त्याला यावी असं वाटत होतं.
शाळा घरजवळची निवडली. सुदैवानी तिकडे ऍडमिन मिळाली किंडर गार्टन ला. किंटर गार्डन ची वर्षे मजेत गेली.
मग पहिली आली.
आणि पहिलीला आम्हाला रेआलईझ झालं की ८ वी पर्यंत cbse level चा अभ्यासक्रम शाळा घेते आण ९ वी १० वी sse..
म्हंटल हे कायाय..
हे असं काही असणार ह्याची किंचिताही कल्पना शाळेने आम्हाला ऍडमिन च्या वेळेस दिली नव्हती. किंवा ज्यांच्याकडे चौकशी केली त्यांनीही एवढे स्पष्टपणे सांगितलं नाही...
आता काय म्हणून ठीकय म्हंटल..
पहिलीलाच धाडकन प्रथम सत्रात ४ क्लास टेस्ट आणि टर्मिनल टेस्ट, आणि एक प्रोजेक्ट नामक प्रकारणही आलं.
सेम दुसऱ्या सत्रात.
आणि शाळेच्या टीचर्स सतत सोडून जाण, एक एक महिना टीचर्स नसणं हे सगळे प्रकार सर्रास सुरु असतात.
हेड मिस्ट्रेस मॅम ( ज्यांची शैक्षणिक पात्रता काय असावी असा प्रश्न मला बऱ्याचदा पडतो कारण बऱ्याच स्कूल फक्शना त्यांना धड २ वाक्य इंग्रजीत नीट बोलता येत नाही ह्याच कारण काय तर त्यांच्या सासऱ्याचीच शाळा आहे. सो त्यांच्या पुण्यई णी ह्या आमच्या हेड मिस्ट्रेस.) त्यांना काही विचारावं तर नुसती उडवा उडवीची उत्तर मिळतात आणि वरतून हा सल्ला मिळतो की दुसऱ्या क्लास मधल्या मुलांकडून मिस झालेला अभ्यास पूर्ण करून घ्या!
तो प्रोजेक्ट नामक प्रकार तर अतिशय भयानक.
त्या वयाची कोणतीच मुलं तो प्रोजेक्ट इंडिपेंडंटली करू च शकतं नाहीत असा देतात.
त्यात पालकांना लक्ष घालून तो पूर्ण करून घ्यावा लागतो.
आणि हुशार मुलांना वरवर करणे. त्यांची सगळ्या क्लास समोर तारीफ करणे इतकी की एखाद्या सामान्य मुलाला न्यूनगंड यावा इतपत हे प्रकार सुरु आहेत / असतात.
इकडे कोथ्रूडात सगळीकडे कमी अधिक प्रमाणात सगळ्या शाळेमध्ये असेच चालते असे बऱ्याच पालकांशी चर्चा केल्यावर कळालं.
भलेही शाळा कोणत्याही माध्यमाची असो सगळीकडे कमी अधिक प्रमाणात हेच आहे.
शाळा कोणत्याही माध्यमाची असली
शाळा कोणत्याही माध्यमाची असली तरी त्यात शिकवणाऱ्या शिक्षकांचा दर्जा काय, मुलांचा सर्वांगीण विकास होतो की फक्त मुलांना परीक्षार्थी बनवतात.
आणि आपल्या मुलाला, मुलीला हे सगळे कितपत झेपेल ह्याचाही विचार केला पाहिजे.
बरेच पालक सगळं जग आपल्या मुलांना cbse ला घालतंय म्हणून घालतात आणि मग मुलाला झेपत नाही म्हंटल्यावर शाळा बदलण्याचा निर्णय घेणं अपरिहार्य होऊन बसत.
टीप :मी वरती जे लिहिलं आहे ते सर्वस्वी माझी मतं आहेत
त्यात अमूक एक बोर्ड चांगला, अमूक एक वाईट.
किंवा प्रोजेक्ट देण किती चांगल वाईट असं काहीही म्हणणं नाही.
ह्यात सगळ्यात मत मतांतर असू शकतात.
प्रत्येकाला आलेला अनुभव, प्रत्येक पाल्याचा असणारा बुध्यांक ई. बाबींवर ते अवलंबून असू शकतो.
मी माझं मतं मांडलं ते इतरांना पटावं असं मुळीच नाही.
@अनिष्का, धन्यवाद
@अनिष्का, धन्यवाद
@Vrishali Deshpande धन्यवाद
@कविन , धन्यवाद तुमचा विपु वाचला
तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यावरून आणि इंटरनेट रिव्ह्यू नुसार विद्या निकेतन चांगली शाळा वाटते. पण या शाळेचं बोर्ड कुठलं आणि आणि मराठी की इंग्लिश मिडीयम आहे?
विद्यानिकेतन SSC board च आहे
विद्यानिकेतन SSC board च आहे पण ८ वी पर्यंत शाळा मिक्स सिलॅबस राबवते म्हणजे सायन्स मॅथ्स आणि इंग्रजीची पुस्तके १ ली ते आठवी CBSC ची असतात. बाकी विषय म्हणजे सोशल सायन्स मराठी वगैरे जे काही असते ते SSC board चे असते मिडीयम : इंग्रजी
९ वी आणि १० वी मात्र सगळा अभ्यासक्रम SSC board चा असतो.
यात पालकांकडून दोन विरूध्द मते ऐकायला मिळतात की काय उगाच ताण वाढवतात पासून ते हेच उत्तम पर्यंत दोन्ही टोके
मला विचाराल तर लेक ९ वीला गेली तेव्हा SSC board चा सिलॅबस बदलला गेला आणि तिला नवीन सिलॅबस सुरु झाला. ज्याचा फॉर्मॅट बर्यापैकी CBSC शी मिळताजुळता वाटला. काही कन्सेप्ट मात्र CBSC सिलॅबसनुसार ८ वीतच झाले होते ते सोपे गेले तर काही समजून घेण्यासाठी ८ वी ची स्टेटची पुस्तके तिने रेफर केली. बाकी गोष्टी माझ्या अपेक्षेत बसणाऱ्या असल्याने मी काही गोष्टींकडे टोटल दुर्लक्ष करुन माझ्याकडून जितके शक्य तितके साहाय्य तिला करुन त्रूटी भरुन काढायचा प्रयत्न केला. उडदामाजी काळे गोरे न्याय त्या ही शाळेत शिक्षकवर्गात आहे. पण ओव्हरऑल सॅटिस्फॅक्टरी आहे
ओके धन्यवाद.
ओके धन्यवाद.
@हेमंतसुरेशवाघे
@हेमंतसुरेशवाघे
उशिरा उत्तर देत आहे
मुलीलाच लिहायला सांगितले आहे-
आता हिंदी सोडले तरी चालते, 10 वीला इंग्रजी तर कम्पलसरी असणारच
फ़्रेंच चा एक पेपर असेल, बाकी सायन्स, sst आणि maths
एकूण 5 पेपर.
आता बेसिक maths बद्दल
नववीत रेग्युलर maths पेपर असतो
तर 10 वी सुरू होताना जस्ट शाळेत इंफॉर्म करावं लागेल, शाळेत त्याचा वेगळा वर्ग वगैरे नसतो,सेम पुस्तक असते ,रेग्युलर सगळ्यांबरोबर नेहमीचा वर्ग अटेंड करायचा
फक्त बोर्ड चा फॉर्म भरताना ते स्पष्ट लिहावे लागते
आणि मागील काही वर्षीचे बोर्ड पेपर पाहून जो फरक असतो तो लक्षात येईल
@तेजो
@तेजो
महा धन्यवाद
आता काही प्लॅनिंग करता येईल
माझे अनुभवाचे बोल -
माझे अनुभवाचे बोल -
मी ssc, cbse दोन्ही विद्यार्थ्यांना (सहावी ते दहावीच्या) शिकवते/ शिकवलं आहे. मुळात इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये शिकवणं हा मूळ पेशा, पण वैयक्तिक कारणांमुळे नोकरी करत नसताना गणित, विज्ञान आणि माझी आवड म्हणून संस्कृत शिकवते मी. माझी मुलगी पहिलीत आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, ssc बोर्ड.
शाळा फार लांब नको हा मुख्य निकष होता. शक्यतो ssc हवं होतं. कारण बाकीची पुस्तकं मी बघितली होती, अभ्यासक्रम खूप लांबलचक वाटला. "मुलं पुढे करतात गं रिकव्हर" हे मला अनेकांनी सांगितलं. पण पुढे काय ते नंतर, "आधी" शाळेची गोडी लागावी, नुसते भारंभार प्रोजेक्ट्स आणि अॅक्टिवीटी हे मला नको होतं. मित्र-मैत्रिणी, निदान १-२ तरी अनुभवी आणि मनापासून शिकवणारे आणि मुलांना जीव लावणारे शिक्षक असं वातावरण मिळावं असं वाटत होतं. नशिबाने मिळालं.
पुढच्या परीक्षा सोप्या जाव्यात हा सूर मलाही अनेकदा ऐकावा लागला. पण मुळात, जर त्या परीक्षांच्या अभ्यासक्रमात मुलांना मोठेपणी रस नाही वाटला तर? ३-४ वर्षाचं वय हे असं काहीही ठरवायचं नसतंच मुळी. राज्याबाहेर/ परदेशी जावं लागणं/ जवळपास मोजक्या शाळा अशी उदाहरणं बाजूला ठेवू, जिथे ssc हा पर्याय आहे त्याबद्दल बोलू.
आय आय टी/जेईई/ इतर तत्सम परीक्षा हेच आणि इतकंच असतं का? उत्तम वाचन आणि त्यायोगे आवडीच्या भाषेत करिअर, खेळाडू म्हणून काही विशेष कौशल्य असेल तर ते जोपासणं आणि वाढवणं, कलाक्षेत्राची आवड (लेखन, नृत्य, गायन), इतिहासात विशेष रुची, भूगोल आवडीचा विषय वगैरे पर्यायांचा विचार करायला मुळात 'हेही पर्याय आहेत' हे आपण मुलांना सांगतो का? नक्की मुलं किती मोठी झाली की सांगतो? मुलं लहान आहेत आणि त्यांना फार कळत नाही ही पळवाट झाली. त्यांना कळत नसतं यात थोडंफार तथ्य असलं तरी नीट समजावून सांगता येतं. मुलं अगदी १० वी
नंतरही भंजाळलेली असतात कारण त्यांना ठराविक साचे माहिती असतात आणि त्यात आपण नक्की कशात बसू शकतो हे समजत नाही. माझ्या एका विद्यार्थ्याचा मूळ आवडीचा विषय ऑर्गॅनिक केमेस्ट्री होता, तो घरच्यांच्या प्रेशरमुळे इंजिनिअर व्हायला आला होता. एकाला घरच्या द्राक्षाच्या बागेत मेहनत घ्यायची होती तर आमच्या कडे रोबोटिक्स शिकत होता. हे सगळं विचित्र आहे.
नववीतून दहावीत जाणारया मुलांना किमान आठवीतल्या गणिती संकल्पना, भाषेचं नीट व्याकरण, विज्ञानाच्या संकल्पना यातलं, त्यांचा मूळ कल जसा असेल त्याप्रमाणे यायला हवं. बोर्ड कुठलंही असो. म्हणजे गणित विशेष आवडीचं नाही तर ठीक आहे, पण समजा इतिहास आवडतोय तर आधीच्या अभ्यासक्रमात जे शिकलं असेल त्याचं नीट आकलन आणि स्वत:च्या बूद्धीनुसार इंटरप्रिटेशन झालेलं असावं. ते झालं आहे हे ओळखायचं कसं? समजा, आठवीच्या इतिहासात फ्रेंच राज्यक्रांती शिकून झाली असेल (हे केवळ उदाहरण आहे) तर त्याचे जगावर काय परिणाम त्यावेळी झाले होते, भारतावर काय परिणाम झाला, कुठल्या नेत्यांनी काय जबाबदारी घेतली होती, राज्यक्रांती नंतरच्या जगात कुठले मोठे बदल दिसून आले अशी माहिती... वाचताना जड वाटलं तरी ते जड नाही. किंबहुना अशी माहिती घ्यावीशी वाटणं हेच मोठं इंडिकेटर आहे. मग ही माहिती घ्यायचा झटका क्षणिक आहे की दीर्घकालीन आहे हे चाचपून बघावं लागतं. मुलांशी नीट संवाद साधला तर जमतं हे. माझी भाचरं, इंजिनीअरिंग चे विद्यार्थी, कोचिंग क्लासेस चे शाळकरी विद्यार्थी, माझ्या घरी घेतलेल्या खासगी शिकवण्या असे बरेच अनुभव घेऊन माझं मत पक्कं झालं. मुलांना होणारं आकलन सगळ्यात महत्त्वाचं.
जी मुलं मेहनती असतात ती कुठल्याही अभ्यासक्रमात चमकतात. Ssc आहे म्हणून गणिताच्या/ विज्ञानाच्या संकल्पना बदलत नाहीत. परीक्षा पद्धती आणि सराव या मेहनतीने जमणार्या गोष्टी आहेत.
पोस्ट असंबद्ध वाटली तर डिलीट करीन मी, मोबाईल वरून लिहीणं अवघड आहे.
नवीन Submitted by प्रज्ञा९ on
नवीन Submitted by प्रज्ञा९ on 4 March, 2021 - 23:33
>>>>>>>>
पूर्णपणे सहमत. पोस्ट अजिबात असंबद्ध नाही, अगदी योग्य आणि महत्त्वाची माहिती आहे.
भरत, कविन, प्रज्ञा९, जिज्ञासा
भरत, कविन, प्रज्ञा९, जिज्ञासा, वृषाली देशपांडे (आणखी ही असतील) यांना +१.
थोडंसं पुढे जाऊन ज्या पालकांना बोर्ड == हुषारी हे असं आणि इतकंच समिकरण दिसतंय त्यांनी लॉजिक, स्टॅटिस्टिक्स, सारासार विचार हे वैकल्पिल विषय घेतले नसतील का?
समिकरणातला बोर्ड हा एक व्हेरिएबल नक्की असेल, पण त्याचा कोएफिशिअन्ट बारका असेल. बाकीच्या वर दिलेल्या व्हेरिएबल्स कडे लक्ष पुरवलं की उत्तराची किंमत वाढेल. फक्त तुमच्या मते योग्य बोर्ड निवडून बाकीच्या घटकांकडे दुर्लक्ष मात्र नक्कीच परवडणार नाही.
प्रज्ञा९ , चांगलं लिहिलंय.
प्रज्ञा९ , चांगलं लिहिलंय.
माझ्या या आधीच्या प्रतिसादातला उपरोध उताणा पडला .
प्रज्ञा९ , छान पोस्ट
प्रज्ञा९ , छान पोस्ट
माझी मूले ओंकार ICSE मध्ये
माझी मूले ओंकार ICSE मध्ये शिकतात.
आधी जन गण मन मध्ये होती CBSE, २ री पर्यंत. शाळेबद्दल खूप अफवा ऐकल्याने ओंकार ला आलो. CBSE मध्ये असताना अतर्क्य प्रोजेक्ट करावे लागले जे नेहमीच मीच करून दिले. पण जेव्हा पासून ओंकार मध्ये गेलोय प्रोजेक्ट्स शाळेतच करून घेतले जातात. होमवर्क खूप कमी असतो. सगळी तयारी शाळेतच करून घेतात.
या लॉक डाउन मध्ये झूम ने शाळा चालू आहे. तेव्हा समजलं किती छान शिकवतात. मुलांना काहीही कठीण जात नसत. आपण पालकच नाही ते डोक्यात धरून बसतो. ताण वगरे.
मुलं तर शाळेत कधी जायला मिळतेय याचीच वाट बघताहेत. विद्या निकेतन सुरु झालीये सो आम्हाला पण वेध लागलेत पण शाळा बोलतेय सगळी परिस्थिती बघून मग निर्णय घेऊ.
प्रज्ञा९ अतिशय आवडला आहे
प्रज्ञा९ अतिशय आवडला आहे प्रतिसाद.perfect आहे एकदम. अजिबात असंबद्ध नाही.
किती समजले यापेक्षा हि प्रवेश परीक्षा देता येणे हे आपल्याकडे अधिक महतवाचे आहे ~~~ हेच आपल्या शिक्षणपद्धती मधे बिंबवलं जातय, याचं जरा वाईट वाटतं. (ईथे मी ही परिक्षा = पुढील स्पर्धा परीक्षा असे समजले आहे, वेगळा अर्थ असेल तर प्लीज सांगा.)
मस्त discussion आहे हे आणि सर्वच प्रतिसाद वेगवेगळे अँगल समोर आणतायत..
मी माझ्या मुलाला शाळा शोधताना ह्यातले बरेच मुद्दे डोक्यात ठेवलेले आणि अँडमिशन बघायला सुरुवात केली आणि त्या प्रक्रियेमधे
ओपन/ अल्टरनेटीव स्कूलींग बद्दल कळाले. आम्हाला खूप आवडली ती कन्सेप्ट. म्हणून अशा च शाळेत टाकले आहे आता.
पोस्ट असंबद्ध वाटली तर डिलीट
पोस्ट असंबद्ध वाटली तर डिलीट करीन मी, मोबाईल वरून लिहीणं अवघड आहे.>>> किती मस्त पोस्ट आहे. अजिबात डिलीट करु नका.
प्रज्ञा९ यांच्या पोस्टशी
प्रज्ञा९ यांच्या पोस्टशी पूर्णपणे सहमत.खूप छान प्रतिसाद लिहला आहे.
मला मुलीचे निरागस बालपण जितके जपता येईल तितके जपायचे आहे त्यामुळे ऍडमिशन घेताना शाळा घराजवळ असावी हाच प्रयत्न होता. आणि शाळेची निवड ह्या विचारानेच केली.शाळेचे बोर्ड ICSE असून शाळा अगदी घराच्या जवळ आहे. मुलगी आता सिनिअर केजी मध्ये आहे.
शाळेची शिक्षणपद्धती समाधानकारक आहे.तरीही बरेचजण ICSE बोर्ड पुढे अवघड जाणार असे भाकीत करतात. त्यामुळे थोडं टेन्शन यायचं पण प्रज्ञा९ तुमच्या पोस्टनी खूप दिलासा मिळाला.
आणि ऑनलाईन शाळेमुळे समजलं शिक्षक किती छान शिकवतात. वरती शिल्पा यांनी लिहल्याप्रमाणे खरच मुलांना कठीण काहीच जात नाही. त्यांच्यापरीने ते पूर्ण प्रयत्न करत असतात. आपण पालकच जास्त ताण घेत असतो.
सगळ्या प्रतिसादांसाठी
सगळ्या प्रतिसादांसाठी मनापासून आभार!
Pages