झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..!
मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)
तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.
सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.
नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.
नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.
असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.
त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं.
खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्याचाही हात आहे.
दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.
स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो.
अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे
BTW हि पोळ्यांची खीर कशी
BTW हि पोळ्यांची खीर कशी करतात ? .. दुधात पोळी कुस्करून का ? एक असाच अंदाज..
कदाचित मिक्सर्मधून
कदाचित मिक्सर्मधून ढुर्रर्रर्रर्र करून तो चुरा साखर+दूधमसाला घालून उकळवलेल्या दुधात घालून १० मिनुटं ढवळत असावेत.. दूध मात्र थोडं जास्त हवं नैतर पिठलं व्हायचं..! (हंबरणाथच्या साळव्यांकडे कुठलं आलंय एवढं दूध.... पाण्यात उकळवला असेल चुरा..!!)
बाकी त्या पोळ्यांचं काहीही
बाकी त्या पोळ्यांचं काहीही करा आधी त्या स्वीटूला केस बांधायला सांगा
BTW हि पोळ्यांची खीर कशी
BTW हि पोळ्यांची खीर कशी करतात ? >>दुध साखर पोळी बारिक कुस्करून. ह्यात गरम दुधात थोडं पाणी टाकतात नाहीतर पोळीचा गोळा होतो.
दुध साखर पोळी बारिक कुस्करून.
दुध साखर पोळी बारिक कुस्करून. ह्यात गरम दुधात थोडं पाणी टाकतात नाहीतर पोळीचा गोळा होतो.>> मग बरंय की.. पुन्हा लाटुन गरम गरम पोळीच बनवायची..!
जरा चपाती पिझ्झा शिकवायला हवा
जरा चपाती पिझ्झा शिकवायला हवा त्यांना.
चपाती रोल किंवा चपाती फ्रँकी
चपाती रोल किंवा चपाती फ्रँकी अगदीच झाले तर चपातीच्या वड्या..
अरे हो त्यांच्याकडे tv नाही
अरे हो त्यांच्याकडे tv नाही ना.. मग ते आम्ही सारे खवव्ये कुठे बघणार..
अरे हो त्यांच्याकडे tv नाही
अरे हो त्यांच्याकडे tv नाही ना.. मग ते आम्ही सारे खवव्ये कुठे बघणार..
नवीन Submitted by श्रवु् on 24 February, 2021 - 07:10
>>> LOL
चपाती फ्रँकी अगदीच झाले तर
चपाती फ्रँकी अगदीच झाले तर चपातीच्या वड्या.. >>>>>
फ्रँकी बनवणार होते साळवी, लिहायला विसरले .
फ्रँकी बनवणार होते साळवी,
फ्रँकी बनवणार होते साळवी, लिहायला विसरले .>> फ्रँकी बनवायला जे सॉसेस लागतात ते चपातीवाल्या साळाव्यांकडे असतील का... शिवाय कोबी, कांदा पात, गाजर, नुडलचा खर्च वेगळाच..!!
आपल्या घरातुन कोणालाही न
आपल्या घरातुन कोणालाही न सांगता सवरता एक मुलगी गायब झाली. ती नक्की कुठे गेली वगैरे अशी काही चर्चा खानविलकरांकडे कशी काय नाही दाखवली ?
डायरेक्ट दुसर्या दिवशी ची सकाळ होते तरी खानविलकर निवांत दिसतात.
लेखकाला कंटाळा आला की सगळे सीन अर्धेच सोडुन देतो तो.. मागे त्या शकु च्या आजरपणाचा सीन पण तसाच अर्धा सोडला...प्रेक्षकांनी गाळलेल्या जागा भरायच्या...
आज काय तर म्हणे दिलवाले दुल्हनिया ले जायेन्गे ....
ते पोळ्यांचं नाल आहे म्हणून
ते पोळ्यांचं नाल आहे म्हणून घोडा प्रकरण झालं एकंदर.. एवढं दूध,साखर,तेल,मसाला,गॅस,एवढी भांडी घासायला साबण..केवढ्याला पडली पोळी देव जाणे
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 25 शिळ्या पोळ्या दीड रुपये प्रमाणे मित्राला नेऊन दिल्या त्या चिण्या ने
ती कार एवढी स्वच्छ होती आतून
ती कार एवढी स्वच्छ होती आतून,फक्त स्वीटू चे कानातले तेवढे बरोब्बर ओम्या ला सापडले
आणि दादा साळवींनी तो वॉचमन चा ड्रेस कुण्णालाही दिसू नये म्हणून कपाटात अगदी नीट वरच ठेऊन दिलाय
ती कार एवढी स्वच्छ होती आतून
ती कार एवढी स्वच्छ होती आतून,फक्त स्वीटू चे कानातले तेवढे बरोब्बर ओम्या ला सापडले >>>>
बर ते एक सापडलं असते तर ठीक दोन्ही एकत्र (जोड) सापडावे
फ्रँकी बनवणार होते साळवी,
फ्रँकी बनवणार होते साळवी, लिहायला विसरले .>> फ्रँकी बनवायला जे सॉसेस लागतात ते चपातीवाल्या साळाव्यांकडे असतील का... शिवाय कोबी, कांदा पात, गाजर, नुडलचा खर्च वेगळाच..!! >>>>>>>>>>
हे तर काही नाही त्यांना मोट्ठी ऑर्डर मिळते ज्यात सर्व फरसाण व नाश्त्याचे प्रकार ५ / ५ किलो बनवून हवे असतात तर हे लगेच बनवायला घेतात. त्यासाठी लागणार कच्चा माल यांच्याकडे भरलेला असतो हे कसे काय ? म्हणजे घरात खायचे वांदे आणि फरसाण, लाडू बनवायला लागणार कच्चा माल यांच्याकडे पिकतो कि काय ? बरे त्यात निदान असे दाखवले असते कि त्यांना प्रश्न पडला कि अरे ५/५ किलो वस्तू बनवायच्या आहेत तर त्यासाठी सामान नाही म्हणून तोंड पडून बसलेत आणि मग तो ओम्या मदत करतो कच्चा माल खरेदीसाठी आणि स्वीटू इम्प्रेस होते।
स्विटू अॅक्टिंगमधे कमी पडते
स्विटू अॅक्टिंगमधे कमी पडते असं वाटत रहातं. नलू, शकू, तायडी, माठ काका, रॉकी, मोहित अगदी सहज अभिनय करतात. ओम्याला चॉकलेट बनणं जमलंय. तायडी साठी आदितीला ++++१०० द्यावेसे वाटतात.
तर काही नाही त्यांना मोट्ठी ऑर्डर मिळते ज्यात सर्व फरसाण व नाश्त्याचे प्रकार ५ / ५ किलो बनवून हवे असतात तर हे लगेच बनवायला घेतात. त्यासाठी लागणार कच्चा माल यांच्याकडे भरलेला असतो हे कसे काय ? म्हणजे घरात खायचे वांदे आणि फरसाण, लाडू बनवायला लागणार कच्चा माल यांच्याकडे पिकतो कि काय ? >>> अगदी खरंय..!!!
कालच्या भागात आजचा प्रीकॅप दाखवला त्यात साळावी घर सोडून गेलेले दिसतायत... कदाचित बाहेरून कुलुप लावून आत बसले असतील. नाहितर घर भाड्याचे असेल आणि भाडं थकल्यामुळे घरमालकाने हाकललं असेल.. म्हणजे बाड बिस्तार्यासहीत तायडीच्या घरात मुक्काम हलवणार की काय माहित
तरी तायडी कुत्सीतपणे हसत 'बरी ब्याद गेली' असं मनात म्हणताना दाखवली होती काल.. अन आज साळवी पुन्हा व्हिलात आले तर भयानक मज्जा येईल..!!
तरी तायडी कुत्सीतपणे हसत 'बरी
तरी तायडी कुत्सीतपणे हसत 'बरी ब्याद गेली' असं मनात म्हणताना दाखवली होती काल.. अन आज साळवी पुन्हा व्हिलात आले तर भयानक मज्जा येईल..!! Rofl
>>>>>>>>> मस्तच
बाकी त्या पोळ्यांचं काहीही
बाकी त्या पोळ्यांचं काहीही करा आधी त्या स्वीटूला केस बांधायला सांगा
Submitted by मी नताशा on 24 February, 2021 - 05:57 >>>>>
ऍटलीस्ट घरात पोळ्या (व .........इतर जेवण ) बनवताना तरी त्या लांबसडक जुल्फह्यांचा आंबाडा किंवा पोनी बांधलेला दाखवावा पण कसलं काय आईला केस विंचरायला कंगवा नाही मग मुलगी आहे सोडून केस. त्यातल्यात्यात काकू मात्र केसांना तेल थापून चप्पू करून आहे अर्ध तेल चेहऱ्यावर पण दिसेल इतपत।
ती नलू मान थोडी वाकडी करून
ती नलू मान थोडी वाकडी करून पिंजारलेल्या केसांनी बघते तेव्हा भयाण दिसते.
Submitted by भोचकभवानी on 23 February, 2021 - 08:20 >>>>>
मोंजोलीका वाटते।
मोंजोलीका वाटते।>>
मोंजोलीका वाटते।>>
काल पुन्हा सगळं गोग्गोड झालं.
काल पुन्हा सगळं गोग्गोड झालं.
शकू फोन करून हंबरणाथला आली तरी केसांचं टारलं झालेल्या नलूने सगळ्या साळव्यांना देवदर्शनाला नेलं. शकु, ओम्या अन रॉकी नलीच्या घरी आले तर घराला कुलुप. मग असेच इथे तिथे हिंडत बसले तिघे.
काहीवेळाने नली सगळ्या साळव्यांना घेऊन घरी आली तर रॉकी वस्त्रहरण झालेल्या अवतारात त्यांच्या घरात शिरतो.. चाळीतल्या मुलांनी त्याचा शर्ट काढून नेला असं सांगतो.
शकू मावशी अन ओम्या इथेच आसपास आहेत तर त्यांना घ्यायला निघालेल्या स्विटूला नलू आडवते. त्यावर स्विटू न जमणारा अशक्य अभिनय करत ती खानविलकर व्हिलात कसलीही लफडी करण्यासाठी गेलेली नाही असं ऐकवते. ते ऐकुन नलू शकूला आणायला बाहेर जाते अन त्यांची लुटुपुटुची भांडणं पार घरच्यापर्यंत येतात. एकंदर तायडीच्या डोक्याला लवकरच खुराक मिळणार यात शंकाच नाही.
झी मराठीच्या मालिका बघणं
झी मराठीच्या मालिका बघणं बंदचं केलंय मी. इथे वाचायला मजा येते त्या मालिका बघण्यापेक्शा
चला हवा येवु द्या मध्ये,
चला हवा येवु द्या मध्ये, कुशलने नलूची केशभुषा केलेली.. पिंजारलेले केस.. वगैरे
पिंजारलेले केस.. वगैरे>> तरी
पिंजारलेले केस.. वगैरे>> तरी तिने मान वाकडी कराज्ञला हवी होती आणि हात हनुवटीवर ठेवायला हवा होता
केसांचं टारलं ...हा हा हा ...
केसांचं टारलं ...हा हा हा ....
ओ डी़जे....... तुम्ही मस्त लिहिता बरका ..मालिका बघण्यापेक्शा इथे वाचायला मज्जा येते...
(No subject)
धन्स स्मिता
आज चपातीवाल्या साळव्यांना चला हवा येऊ द्या मधे मस्त चोप मिळणार ...
आज चपातीवाल्या साळव्यांना चला
आज चपातीवाल्या साळव्यांना चला हवा येऊ द्या मधे मस्त चोप मिळणार >>
चहयेद्या मधे इतकी इज्जत काढतात तरी लोक कसे काय जातात तिथे मला कळत नाही... का आम्ही तुमची इज्जत काढणार आहे त्याचे तुम्हाला पैसे देतो पण तुम्ही या..असा काही करार असतो...?
चालायचेच..!! एनी पब्लिसिटी इज
चालायचेच..!! एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटीचा जमाना आहे...!!
अधून मधून बघते ही सिरियल पण
अधून मधून बघते ही सिरियल पण इथे DJ च्या comments वाचायला येते...पार च पिस काढता तुम्ही हा हा हा..लिहीत रहा
Pages