पेट्रोलची किंमत वाढत आहे, पण पेट्रोलवर किती, काय टॅक्स लावतात हे अजिबात माहित नव्हते, मग ते शोधायला सुरुवात केली, बऱ्याच ठिकाणावरून, बघून ही माहिती समजवून घेतली, या किंमती नॉन ब्रँडेड पेट्रोलच्या आहेत, किंमती अगदी ०.४७ अशा स्वरूपात मुद्दामून नमूद केल्या नाहीत, हे टॅक्स बरेच किचकट वाटत होते, ते सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
किती रुपयाला क्रूड (कच्चे) ऑइल मिळते?
१) ३३०० ते ३४०० रुपये पर बॅरल (२३ सप्टेंबर २०१७)
२) एक बॅरल म्हणजे १५९ लिटर्स
३) २१ ते २२ रुपये एका लिटर मागे
- वाहतूक, रिफायनरी अंदाजे खर्च = ९ ते १० रुपये एका लिटर मागे
- केंद्र सरकारचा EXCISE ड्युटी (कर) = २१ ते २२ रुपये एका लिटर मागे
- महाराष्ट राज्य सरकारचा VAT/ सेल्स टॅक्स (कर) = २३ ते २४ रुपये एका लिटर मागे
- पेट्रोल पम्प्स डीलरचे कमिशन = ३ ते ४ रुपये एका लिटर मागे
- एकूण किंमत = ७७ ते ८१ एका लिटर मागे (मुंबई व उपनगर मर्यादित)
काही ठळक मुद्दे:
१) पेट्रोल, डिझेलवर GST लागू नाही.
2) पेट्रोलवर जरी जास्तीत जास्त टक्क्याने GST लावला तर पेट्रोलची किंमत, एका लिटर मागे, ५१ ते ५२ रुपये होऊ शकते.
3) केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात EXCISE ड्युटी कमी केली नाही.
४) प्रत्येक राज्यात पेट्रोलवरचा VAT/ सेल्स टॅक्स हा वेगवेगळा आहे.
५)) मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये देशातील सर्वात जास्त, २६ टक्के VAT/ सेल्स टॅक्स आहे.
विरोधकांची बाजू:
१) क्रूड (कच्चे) ऑइलचे भाव कमी असताना, सरकारने पेट्रोलचे भाव कमी का केले नाहीत?
२) पेट्रोलवर GST का लागू केला नाही?
सरकारची बाजू:
१) सरकार पेट्रोलवरचा टॅक्स कमी करू शकत नाही, कारण सरकारला महसुलाची गरज आहे.
संदर्भ:
असले लेख पाडून तुम्ही महामहिम
असले लेख पाडून तुम्ही महामहिम मोदीजींवर शंका घेत आहात.पेट्रोलच्या किमती वाढवण्यामागे मोदीजी व फडणवीसजी यांचा प्रदुषण कमी करणे मानस आहे.
मी तर ८०रु पेट्रोल १०० रु ला घेतो व देशाच्या विकासात हातभार लावत आहे.वापरही कमी होतो त्यामुळे प्रदुषणही कमी.डबल फायदा आहे.
गाडीला पेट्रोल पाजणे हे
गाडीला पेट्रोल पाजणे हे गर्लफ्रेंडला कॉफी पाजण्यापेक्षा महाग झालेय. लाँग ड्राईव्हला जाणे ही यापुढे एक आलिशान रॉयल डेट समजली जाईल
बरंय माझ्याकडे गाडी नाहीये त्यामुळे पेट्रोलच्या वाढत्या किंमती मला जास्त लोड देत नाही ..
पण मी मागे कुठेतरी वाचलेले की पेट्रोलच्या किंमती वाढल्या की मालवहातूकीचा खर्च वाढतो आणि ओवरऑल महागाई वाढते. यात कितपत तथ्य आहे, किंवा नक्की किती ईम्पॅक्ट होतो?
मला वेमाना विचारायचं आहे-
मला वेमाना विचारायचं आहे-
हे धागे चालू घडामोडीत असतील तर राजकारण हा वेगळा विभाग का केला आहे?
इथे राजकारण आणि शासन असे कीवर्ड टाकलेले आहेत ही अजून एक गंमत.
पेट्रोल किंमती किंवा रेफ्युजी हे मुद्दे सरकारी धोरणाशी संबंधित असताना ते राजकारण विभागात येत नाहीत का?
यूएस मध्ये जर कोणाला इमिग्रेशन किंवा ओबामाकेअर बद्दल बोलायचे असेल तर ते चालू घडामोडीत येईल का राजकारण मध्ये?
मला तर सुरुवातीला ग्रूप
मला तर सुरुवातीला ग्रूप पाहूनच हा प्रश्न पडलेला .. कारण प्रत्येक चालू घडामोड तशीही शेवटी राजकारणावरच जाते.
तेव्हा मी एक सुचवले होते ते असे की कुठलाही चालू घडामोडीचा धागा जेव्हा राजकारणाच्या अंगाने जायला सुरुवात होईल तेव्हा त्याला राजकारण ग्रूपमध्ये हलवावे. ईथे जर सुरुवातीपासूनच तो राजकारणाच्या अंगाने जाणार असेल तर हलवायला हरकत नाही.
पण.....
ज्यांना राजकारणात ईंटरेस्ट नाही, ज्यांनी राजकारणाचा ग्रूप जॉईन केला नाही आणि पेट्रोलच्या घडामोडी, त्या वाढीमागची कारणे जाणून घेण्यास ईंटरेस्ट आहे त्यांचे काय हा प्रश्न आहेच.
अर्थात ऑल केले तर धागा दिसेलच.. पण निदान सुरुवात तरी चालू घडामोडीपासून व्हावा.
इथे तर लेखकानेच राजकारण असा
इथे तर लेखकानेच राजकारण असा टॅग वापरला आहे. त्यापेक्षा मग राजकारण मध्येच का नाही धागा काढला?
ज्यांना राजकारणाची अॅलर्जी
ज्यांना राजकारणाची अॅलर्जी आहे.....ह्या धाग्यावर न येण्याचे स्वातंत्र्य आहेच की त्यांना
पण आवडत्या पक्षाची पोलखोल होत आहे म्हणून तडफड दिसून येतेच.... म्हणून असे धागे लपवण्यासाठी हाकारे-आकांडतांडाव होणार हेही अगदी रितीप्रमाणे आहे.
जर सरकार यातून महसूल कमावत
जर सरकार यातून महसूल कमावत सरकारी तिजोरी भरत असतील तर त्यात सरकारचा दोष कसा?
जर सरकारचे मंत्री स्वत: कमावत आपल्या घरची तिजोरी भरत असतील तर त्या भ्रष्टाचाराचे खापर सरकारवर फोडा ना.
हल्लीच कोणेतरी विधान केले की ज्यांची कार घ्यायची ऐपत आहेत ते काही पेट्रोलच्या किंमती वाढवल्याने उपाशी मरत नाहीयेत. आणि हे पटण्यासारखे आहे. त्यांच्याकडून अतिरीक्त पैसा घेऊन तो ईतर गोरगरीबांपर्यंत पोहोचवला तर त्यात गैर काय?
2019 ला निवडणुका आहेत तेव्हा
2019 ला निवडणुका आहेत तेव्हा पड़तील कीमती.कांग्रेस सरकारच्या वेळेस कीमती हाई होत्या तरी इकॉनमी बऱ्या पैकी सांभाळली, आता पड़ती किम्मत बीजेपी च्या पथ्यावर आहे.
त्यांनी कारण असे दिले आहे की जेव्हा प्राइस जास्त असते तेव्हा ती एडजस्ट करून कमी करतात आणि सरकार नुकसान पेलते सो ते अत्ता कवर करून घेत आहेत म्हणजे उदया पुनः कीमती खुप वाढल्या तर त्या normalise करताना जे नुकसान सरकार ला होईल ते आधी जमा ज़हालेल्या पैश्यातून देऊ शकतील (हे कितपत खरे ते ठाऊक नाही) शिवाय दूसरे कारण किम्मत जास्त ठेवल्याने लोक पेट्रोलचा कमी वापर करतील तेव्हा प्रदुषण कमी होईल, जे मला खुप पटत नाही कारण इवन सामान्य माणसाला आज बाइक वापरल्या
शिवाय बऱ्याच ठिकाणी पर्याय नाही, जोस्तोवर बस, ट्रेन ची कनेक्टिविटी आणि फ्रीक्वेंसी वाढत नाही तोस्तोवर दू चाकी आणि चार चाकी ला पर्याय काय?शिवाय पब्लिक ट्रांसपोर्ट आणि कुठलीही वाहतूक पेट्रोल डीजल वरच चालते सो त्याचे परिणाम फाइनल manufactured गुड्स वर होणारच. काहि नाही अत्ता लोक रड़तील, इलेक्शन च्या वेळेस कीमती पाडल्या की सगळ विसरतील. हा वीकनेस बीजेपीला माहित आहे
नाना, राजकारण हा वेगळा ग्रुप
नाना, राजकारण हा वेगळा ग्रुप परवाच प्रशासनाने केला आहे. त्यामुळे आता हे सर्व राजकीय प्रचार , विखार, नेहमीचे दळण तिथे व्हावे ही अपेक्षा आहे.
वेगळा ग्रुप दिलेला असताना तो वापरायला काय अडचण आहे?
माझ्यामते तरी हा धागा पेट्रोल
माझ्यामते तरी हा धागा पेट्रोल च्या 'चालू' भाववाढीशी संबंधीत आहे. जो चालू घडामोडी-भारतात ह्याविषयात येतो.
कोणाला स्वतःलाच यात राजकिय प्रचार, विखार नेहमीचे दळण वाटत असेल तर त्याने दूर राहावं, हाय काय नाय काय?
वापरायचाच असेल तर मायबोलीवरचा कोणत्याही विषयावरचा प्रत्येक धागा राजकारणी दंगलसाठी वापरता येईल. आणि धाग्यावर कोण कशा प्रतिक्रिया देतंय किंवा काय यावर वेमांचं लक्ष आहेच.
----------------------------------------
@सनव, तुम्हाला ह्या धाग्यावर विषयाशी संबंधीत काही (अर्थात राजकीय प्रचाररहीत, विखाररहीत, नेहमीचे दळणरहीत) विचार मांडायचे असतील तुम्हाला स्वातंत्र्य आहेच.
लेखकाने स्वतःच यात राजकारण व
लेखकाने स्वतःच यात राजकारण व सरकार हे विषय निवडले आहेत. म्हणजे राजकारणाबद्दल चर्चा होणे हे लेखकाला अपेक्षित आहे, असंच समजायचं ना?
लेखकाने स्वतःच यात राजकारण व
लेखकाने स्वतःच यात राजकारण व सरकार हे विषय निवडले आहेत. म्हणजे राजकारणाबद्दल चर्चा होणे हे लेखकाला अपेक्षित आहे, असंच समजायचं ना?
>>>>>>>>>>>
१) लेखक माहिती मॅन आहे. तो फक्त माहिती देतोय. तो कुठल्या गोष्टीवर चर्चा करावी हे सुचवत नाहीये. झाल्यास फक्त त्या माहितीवर चर्चा होणेच त्याला अपेक्षित आहे.
२) शब्दखुणा आणि अपेक्षित चर्चा याचा आपापसात काही संबंध नसतो. शब्दखुणा हे लेखन शोधायला सोपे जावे म्हणून असतात.
जमल्यास या चर्चेपेक्षा आता पेट्रोलवाढीबद्दल आणखी रोचक माहिती येऊ द्या..
आताच माझ्या व्हॉटसपग्रूपवरील सर्व लोकांचे एकमत झालेय की पेट्रोलवाढीला सरकार जबाबदार नाहीये. ते समजवायला ज्या एका दोघांनी जे चारपाच मुद्दे मांडले ते सारे माझ्या डोक्यावरून गेले. जमल्यास नंतर ते ईथे मांडतो.
भाजप सरकार कुठल्याही गोष्टीला
भाजप सरकार कुठल्याही गोष्टीला जवाबदार नाही.
त्यांच्या नावाचा शंख वाजवायचा बंद करा.
मला वेमाना विचारायचं आहे-
मला वेमाना विचारायचं आहे-
हे धागे चालू घडामोडीत असतील तर राजकारण हा वेगळा विभाग का केला आहे?
इथे राजकारण आणि शासन असे कीवर्ड टाकलेले आहेत ही अजून एक गंमत.
पेट्रोल किंमती किंवा रेफ्युजी हे मुद्दे सरकारी धोरणाशी संबंधित असताना ते राजकारण विभागात येत नाहीत का? -++++1
मी चालू घडामोडीची सदस्य नाहीये तरी मला असे धागे (घडामोडीत काढलेले) मायबोलीवर नवीन मध्ये दिसतात हे बरोबर आहे का?
कृपया, कपडे न घालणारा माणूस आणि झरोक्यातून बघणाऱ्या बाई चे उदाहरण देऊ नका. माझा प्रश्न खरंच आहे.
काही धागे, लेखक ग्रुप मध्ये टाकत नाहीत ते वाचण्यासाठी मी मायबोलीवर नवीन मध्ये क्लिक करते.
, कपडे न घालणारा माणूस आणि
, कपडे न घालणारा माणूस आणि झरोक्यातून बघणाऱ्या बाई चे उदाहरण देऊ नका. माझा प्रश्न खरंच आहे.>>>>>
मला बरोबर आठवत असेल तर,
हे उदाहरण एका क्लोज पानावर दिले होते,
क्लोज होण्या आधी ते पान गुजरात नावाच्या दुसऱ्या गृप मध्ये होते,
तुम्ही वाचलेत का?
<मी चालू घडामोडीची सदस्य
<मी चालू घडामोडीची सदस्य नाहीये तरी मला असे धागे (घडामोडीत काढलेले) मायबोलीवर नवीन मध्ये दिसतात हे बरोबर आहे का?>
हो. तुम्ही ज्या ग्रुपांचे सदस्य आहात, ते लेखन 'माझ्यासाठी नवीन'मध्ये दिसेल. मायबोलीवर नवीन या टॅबखाली सर्वच लेखन दिसेल (टिपापा, पुपु, बेकरी त्यादी वाहती पानं वगळता.)
धन्यवाद चिनूक्स.
धन्यवाद चिनूक्स.
दुर्लक्ष करायला जमेल तितके दिवस जमेल!
सिम्बा, तो जोक म्हणून मला whatspp वर forward आला होता. मी व्यक्तीगत group वर ते उदाहरण गंमत म्हणून वापरते. जोकमध्ये थोडं तथ्य आहे. पूर्णच जोक सोशल नेटवर्कींग मध्ये लागू पडत नाही. सोशल नेटवर्कींग घरात राहण्यासारखे नाही तर रस्त्यात फिरण्यासारखे आहे.डोळ्याला काय दृष्टीस पडेल त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही.
खोटे बोलणे कित्ती चान अस्ते
खोटे बोलणे कित्ती चान अस्ते नै?
(No subject)
<<<आता पेट्रोलवाढीबद्दल आणखी
<<<आता पेट्रोलवाढीबद्दल आणखी रोचक माहिती येऊ द्या..>>>
पेट्रोलवाढी बद्दल म्हणजे पेट्रोलच्या किंमतवाढी बद्दल ना?
तर पेट्रोल, ज्याला इथे गॅस म्हणतात, त्याच्या किंमतीत इथे कित्येक "कर" लावतात, कारण इथे झक मारत सर्वांना गॅस विकत घ्यावाच लागतो - जातील कुठे? निरनिराळ्या गॅस स्टेशनवर निरनिराळ्या किंमती असतात, एका ठिकाणी २,५८ ला गॅलन तर चार पावलावर २,७० ला.
याच किंमती मागल्या वर्षी पर्यंत २.३५ ते २,४७अश्या होत्या. पण न्यू जर्सीने रस्ते सुधारणा (खड्डे बुजवण्या साठी) गॅलनला २३ सेंट टॅक्स वाढवला. हा जास्तीचा पैसा रस्ते सुधारण्या साठी सरकार वापरेल असे सांगितले.
पूर्वीच्या बजेट मधे हे सर्व खर्च बसत होते - आता काय बरे झाले? टॅक्स वाढवण्याची गरज का पडली?
आताचे राजकारणी यांची धोरणे वेगळी आहेत,
पण त्यात "पैसे"खाणे नसते बरे का!! विश्वास ठेवा!
सरकार हे आपल्या टॅक्स चे सगळे पैसे फक्त आपल्याला सोयी सुधारणा देण्यासाठी वापरतात, इतर कशावरहि नाही - अॅडमिन्स्ट्रिटेटिव्ह खर्च नि "इतर" खर्च यावर नाही, विशेषतः राजकारणी, सरकारी अधिकारी यातले पैसे कधीहि "खात" नाहीत. हो की नाही?
शेवटच्या तीन ओळींना कडकडून टाळ्या पडतील, अनेक जण +१०० वगैरे लिहितील, अशी अपेक्षा आहे.
कुणिहि याला कुत्सितपणे हसू नये!
किंवा माझा आय क्यू विचारू नये.
हा हा, न43, एकदम खरे!
हा हा, न43, एकदम खरे!
ऋन्मेऽऽष दक्षिण मुंबईत ३ घरे
ऋन्मेऽऽष दक्षिण मुंबईत ३ घरे आणि त्यात एक प्रचंड घर असून गाडी नाही मला वाटले तू आता नवीन धागा काढशील कि ग फ्रे ला डूकाटी वर बसणे आवडत नाही तिला माझ्या Q7 मध्येच आवडते तर काय करू ?
ग फ्रे ला डूकाटी वर बसणे आवडत
ग फ्रे ला डूकाटी वर बसणे आवडत नाही, Q7 मध्येच का? असा धागा काढा.
जणू काही हा सार्वजनिक महत्वाचा प्रश्न आहे!
मग ग फ्रे असो वा नसो, स्वतःकडे डुकाटी असो वा नसो, Q7 असो का नसो असे सगळे लोक येऊन काय वाट्टेल ते लिहीतील! जसे डुकाटीच का म्हंटले इतर कुठले ब्रँड नाहीयेत का?
किंवा Q7 नसेलच तर काय करावे असाहि धागा काढता येईल!
बाकी ऋन्मेषला आपण काय धाग्याचे विषय सुचवायचे. ते तर धागाविषयसम्राट!!
तो माबोसम्राट हो..
तो माबोसम्राट हो..
रूनमेश डॉट कॉम कधी सुरू करताय भाऊ
असले लेख पाडून तुम्ही महामहिम
असले लेख पाडून तुम्ही महामहिम मोदीजींवर शंका घेत आहात.पेट्रोलच्या किमती वाढवण्यामागे मोदीजी व फडणवीसजी यांचा प्रदुषण कमी करणे मानस आहे.
मी तर ८०रु पेट्रोल १०० रु ला घेतो व देशाच्या विकासात हातभार लावत आहे.वापरही कमी होतो त्यामुळे प्रदुषणही कमी.डबल फायदा आहे.
Submitted by सिंथेटिक जिनियस on 24 September, 2017 - 01:26
>>>>>>>>>>>
प्रदूषण कमी करण्यासाठी रामबाण उपाय योजना करणाऱ्या सरकारला सलाम.
आताही पेट्रोल वाढ झाली आहे, कारण लोकांनी सायकल(स्वदेशी) वापरावी म्हणून.परदेशातील पेट्रोल कशाला वापरायचे.
लवकरच मोदी पेट्रोल डिझेल साठी पर्याय शोधणार याची खात्री बाळगा.
अच्छे दिन येणार आहेत.
पवनचक्क्यांमधून ऑक्सीजन "शक"
पवनचक्क्यांमधून ऑक्सीजन "शक" करून पाणी काढण्याच्या टेक्निक सारखीच एखादी नवी टेक्निक मोदी कडून येत नाही तो पर्यंत पेट्रोलचे दर चढे राहतील.
इंधन वाढीबाबत काँग्रेस काहीच
इंधन भाव वाढीबाबत काँग्रेस काहीच का बोलत नाही आहे?
सामान्य लोकांचा वाली कोण आहे की नाही
विदेशातून पेट्रोल ,डिझेल
विदेशातून पेट्रोल ,डिझेल येते त्या वर केंद्र सरकार एक्साईज duty लावते.
पण आपले अंबानी साहेब कृष्णा,गोदावरी खोऱ्यात हेच उद्योग करतात.
आणि हे उद्योग चालू केल्या पासूनच ते देशात श्रीमंत म्हणून गणले जावू लागले आहेत.
अंबानी साहेब कृष्णा गोदावरी खोऱ्यातील जे कच्चे तेल ,नैसर्गिक गॅस काढते त्यांना विदेशी आयात पेट्रोल,नैसर्गिक वर जेवढं कर आहे तेवढाच कर त्यांना पण आहे की.
की फायदाच फायदा उचलत आहेत ते.
आदरणीय मोदीजींनी कालच
आदरणीय मोदीजींनी कालच इंधनदराचा भडका उडण्यास आधीच्या सरकारांना जबाबदार ठरवले आणि मी विचार करू लागलो आपले साहेब असे का म्हणाले असतील ? थोड्या वेळाने माझ्या मंद डोक्यात थोडा प्रकाश पडला. नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये हायड्रोजन क्रांतीची बीजे साहेबानी रुजवली आहेत म्हणजे त्यांनी नक्कीच भविष्याचा विचार करून पावले टाकायला सुरुवात केलेली आहे. एकदा इंधनदर वाढायला लागले म्हणजे जस जसे लोकं गाड्या कमी वापरायला लागतील तस तसे प्रदूषणाचा प्रश्न सुटायला मदत होईल आणि वाढत्या रहदारीची समस्यासुद्धा कमी होईल. लोकं आता इलेकट्रीक गाडयांना पसंती देतील आणि भविष्यात तर आपण घरीच हैड्रोजन भरू आपल्या गाड्यांत. सायकलींची विक्री वाढून त्या इंडस्ट्रीला चालना मिळेल आणि नवीन रोजगार तयार होईल. आपली जनता जोपर्यंत मोठा दणका मिळत नाही तोवर लायनीवर येत नाहीत हे साहेबांनी ओळखलेले असल्याने अशी दरवाढ होत राहणे अपरिहार्य आहे आपल्या भल्यासाठी. लवकरच १५० रुपये दर झाला तरी आश्चर्य मानू नका कारण देशहिताचाच निर्णय असेल तो. पेट्रोल शम्भरीपार गेले तर गेले, ज्यांची टाकी भरायची लायकी नाही त्यांनी सार्वजनिक वाहतुक सेवेचा लाभ घ्यावा म्हणजे यष्टी आणि पिमटी सारख्या सेवा आता नफ्यात येतील. एका दगडात साहेबांनी किती पक्षी मारले बघा. मुर्ख विरोधक काय कायम नावेच ठेवणार, त्यांना साहेबांचा हा मास्टरस्ट्रोक कळणार नाही. जय मोदी !
https://www.thehindu.com/news/national/petrol-at-100-pm-modi-says-reduci...
आपल्या पंतप्रधानांच्या
आपल्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीला तोडच नाही..
Pages