झी-मराठी : येऊ कशी तशी मी नांदायला

Submitted by DJ...... on 5 February, 2021 - 01:08

झी मराठी वर नुकतीच येऊ कशी तशी मी नांदायला ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ च्या टाईम स्लॉटवर सुरू झाली. मालिकेचं टायटल साँग सुद्धा बरंच बरं जमलंय कि बघताना मिसेस मुख्यमंत्रीच्या ठसकेदार टायटल साँगची आठवण आल्याशिवाय रहात नाही इतकं ते कॉपी झालंय..! Proud

मालिकेतील लिड स्टारकास्ट अगदीच नवीन परंतु चॅलेंजिंग आहे. स्वीटु (अन्विता फलटणकर) आणि ओंकार (शाल्व किंजवडेकर) हे दोघे या मालिकेचे लिड आहेत तर त्यांना साथ द्यायला खंबीर आधारस्तंभ म्हणुन स्वीटुची आई नलू साळवी (दिप्ती केतकर), ओमची आई शकुंतला खानविलकर (शुभांगी गोखले), ओमची बहीण मालविका खानविलकर (आदिती सारंगधर) आहेत. त्याच सोबत स्विटुचे बाबा, काका, काकू, चुलत भाऊ चिन्या हे सर्व साळवी कुटुंबीय दहा बाय बाराच्या हॉल अन सहा बाय सहाच्या किचन या वन आरके मधे रहात आहेत(हेच घर झीमच्या बर्‍याच सिरियल मधे या आधिही पहायला मिळालेलं आहे..!)

तिकडे खानविलकरांच्या घरात ओमसोबत त्याचे आई-बाबा-बहीण, त्याची होऊ घातलेली इंडो-अमेरिकन बायको, बहिणीचा होऊ घातलेला नवरा (याला या आधी कुठे बघितला आहे हेच आठवत नाही.. Uhoh ) अन बहिणीचा ऑफिस कम घरातील चमचा/नोकर असे कलाकार आहेत. खानविलकरांचा व्हिला जबरदस्त आहे. त्यांच्या घराची, अंतर्गत सजावटीची अन समस्त खानविलकर कुटुंबियांच्या ड्रेपरीची रंगसंगती ही फिकट रंगससंगतीत आहे ज्यातुन त्यांच्या रहाणीमानावर गडगंज संपत्तीचा अन हाय क्लास जीवनशैलीचा प्रभाव जाणवतो.

सो मिडलक्लास साळवी कुटुंबीय अंबरनाथ मधे रहात आहेत. कर्मदरिद्री स्वभावामुळे आठराविश्व दारिद्र्य हे त्यांच्या पाचवीला पुजलेले असते (कसे ते कालच्या भागात कळाले.. पुढे सांगतोच..!). या कर्मदरिद्री कुटुंबात सर्वांचे खायचे वांधे झालेले असतात पण दोन्ही साळवी जोड्यांची मुले - स्विटू अन चिन्या हे मात्र खात्या-पित्या घरातले ओव्हरवेट वाटावेत असे कसे हे मात्र न सुटलेलं कोडंच आहे. सगळे साळवी स्वभावाने चांगले असतात त्यामुळे त्यांना कशातच वाईटपणा दिसत नसतो. अगदी बिनकामाचे आयुष्य कंठण्यात देखील त्यांना काहीच वाईट वाटत नसतं. स्वीटूच्या बाबांची नोकरी अगदी पहिल्याच भागातच जाते अन ते हताश होऊन दुसर्‍या नोकरीसाठी कसलेही प्रयत्न न करता नुसते सुतकी चेहर्‍याने घरी बसुन असतात. त्यांना साथ देणारी नलू ही अंबरनाथमधे चपात्या बनवून विकत असते. स्विटु कुठेतरी थातूर-मातूर नोकरी करत असते अन या दोघींच्या पैशांवर हे सगळे साळवी आयते गिळत असतात. स्विटूचा काका हा एक नंबरचा आळशी अन फाल्तू कामं करणारा इसम असतो (जो कुठल्याही अँगलने अंबरनाथमधे रहणारा मराठी माणुस वाटत नाही - ठार गुज्जु वाटतो..!) ज्याची बायको दम्याचा रोग घेऊन उसउसत जगत असते अन जावेला (नलुला) पडेल ती मदत करण्याची कसरत करत असते. अशा या माठ काका-काकुचा मुलगा चिन्या हा महामाठ असतो अन गुंडांकडून २ लाख रुपये हारलेला असतो. घरात खरेतर हार्पिकची देखील गरज लागु नये अशी गांजलेली परिस्थिती असताना चिन्याच्या उद्योगाला वैतागून घरात सगळे चिंतेत असतात. हाता-तोंडाची गाठ पडण्याचे वांधे झालेल्या साळवींना खानविलकरांच्या कृपेने देव तारायला बघत असतो.

नलूची बालमैत्रीण शकुंतला खानवीलकर ही मोठ्या हेल्थ केअर प्रॉडक्ट उद्योगाची मालकीण असते. हिने देखील नलूसारखाच संसार रेटत मार्गी लावलेला असतो. तिची मुलगी - मालविका ही हाय क्लास सोसायटीची प्रतिनिधी असते अन तिचे विचार शकुला (ती स्वतःच्या आईला ''आई'' असं न म्हणता मिसेस खानविलकर म्हणत असते यावरून त्यांच्या नात्याची कल्पना येऊ शकते..!) आजिबात पटत नसतात. मालविका अजुन अविवाहित असते पण तिचा होऊ घातलेला नवरा - रॉकी कायम तिच्या आगेमागेच असतो अन पडेल ती कामे करत असतो. त्याला जिमचे खूप वेड असते.

नलू-शकु ची मैत्री या दोन कुटुंबियांना जवळ आणते. शाळेत असताना नलूच्या घरची परिस्थिती उत्तम अन शकूच्या घरी खाण्याचे वांधे असतात. काळानुसार परिस्थिती बदलली परंतू दोघींच्या घट्ट मैत्रीत त्या बदललेल्या परिस्थितीचा लवलेशही नाही हे आईसोबत एकदा साळवींच्या घरी आलेला ओम बरोब्बर हेरतो. साळवींच्या दळभद्री आयुष्याची कणव येऊन चांगल्या मनाचा ओम त्यांना चकल्या-शेव-शंकरपाळ्या अस्ल्या ऑर्डरी मिळवून देऊन ४ सुखाचे घास खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेतो. त्याला नलू मावशी अन साळवींबद्दल नितांत आदर असतो.

असा हा ओम्या मनाने अन रुपानेही खरंच खूप चांगला असतो. त्याच्या चांगुलपणावर जाडी अन मनमिळावू स्वीटु भाळते. तिचा सर्वांची काळजी घेणारा, कामसू स्वभाव शकुलाही खूप आवडतो अन ती परिस्थितीने (खरेतर कर्मदरिद्रीपणामुळे) गांजलेल्या साळवींना अजून थोडी मदत व्हावी या हेतुने स्वीटुला 'खानविलकर हेल्थ प्रॉडक्ट्स'च्या बिझनेस युनिट मधे नोकरीला बोलावते. एवढेच नव्हे तर स्वतःच्याच बंगल्यात रहायला सांगते. शकुच्या मुलीला - मालविकेला मात्र हे आवडत नाही अन ती स्विटूला भयंकर पिडू लागते. मालविकेने भावासाठी एक माठ इंडो-अमेरिकन मुलगी (मोमो) शोधलेली असते जिचे पिताश्री एक वेलनोन बिझनेस टायकून अन ६०० करोड की कायशा संपत्तीचे मालक असतात. त्यावर डोळा ठेऊन मालविका ही मोमो-ओम्याची सोयरीक जुळवण्याच्या प्रयत्नात असते अन ती मोमोला सतत सोबत घेऊन तिला काय हवं काय नको याची काळजी घेत असते. तर अशा या इंग्रजाळलेल्या कम भंजाळलेल्या अतार्कीक मोमोची अटेंडंट म्हणुन स्विटूचे वर्णी लागते.

त्यानंतर एकेदिवशी शकू अन ओम्या साळव्यांना थोडा चेंज म्हणुन स्वतःच्या व्हिलात पाहुणचारासाठी बोलावतात. या भेटीत साळाव्यांच्या कर्मदरिद्रीपणाच्या कडक आवरणाखाली खळाळणार्‍या चांगुलपणाची झलक ओम्याला दिसते. आपल्या कुटुंबियांना शकु मावशीने अन ओम्याने चांगला पाहुणचार दिला हे बघून स्विटूही सुखावते. त्याचवेळी मालविकाला व्हिलाची धर्मशाळा झाल्याचा संताप अनावर होऊन ती साळव्यांना सळो की पळो करून सोडते. साळव्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करते परंतु साळवे इतके इतके नतद्रष्ट असतात की त्यांना त्यांची जागाच माहित नसते Proud . त्यामुळे मालविकेकडून साळवी यथेच्छ सळो-की-पळो करून घेतात Proud . शेवटी हायक्लास असलेल्या ३ मैत्रीणींना बोलावलेल्या जंगी(?) पार्टीत मालविका साळव्यांना अपमानीत करु लागते त्यावेळी लेकीचे प्रताप हताशपणे पहात उभ्या असलेल्या शकूला स्विटूची साथ मिळते अन मालविकेचा डाव तिच्यावरच उलटवत थोड्या विनोदी अंगाने तो कसनुसा प्रसंग अन साळव्यांचा खानविलकर व्हिला मधला स्टे एकदाचा संपतो अन आपणाला हुश्श वाटतं. Bw

खरं सांगायचं तर पहिले काही भाग अतिशय बाळबोध वाटत होते परंतु त्यात पुढील भागांची बिजं खुबीने पेरण्यात दिग्दर्शकाला यश आलं. जाडी स्विटु अन शेलाटा ओम्या यांचं कसं काय बुवा जमणार. कैच्या कै सिरियल दिसते असं वाटत असतानाच स्विटू अन ओम्या आपल्याला आवडू लागतात यात दिग्दर्शन, संवादलेखन अन कॅमेर्‍याचाही हात आहे.

दिप्ती केतकर यांनी नलूच्या गेटअपवर खरेच खूप कष्ट घेतले आहेत. त्या अगदी नलूच वाटतात इतकं बेअरिंग त्यांनी पकडलं आहे त्याबद्दल त्यांचं विषेश कौतुक..! शुभांगी गोखलेंची शकू देखील अगदी सफाईदार आहे. मालविकेचं कॅरेक्टर लाऊड आहे पण आदिती सारंगधरने ते बरोब्बर साधलं आहे. अन्विता फलटणकर अन शाल्व किंजवडेकरचे स्विटू-ओम्या अगदी पर्फेक्ट आहेत असं जाणवतं याचा अर्थ त्यांची केमिस्ट्री चांगलीच जुळली आहे. झी मराठीवर असं जाडं-शेलाटं प्रकरण पहिल्यांदाच आल्यामुळं काहीतरी नवीन आहे या उत्सुकतेपोटी आपण त्यात गुंतू लागतो. आपल्याप्रमाणे शकूला पण स्विटूच ओम्यासाठी योग्य वाटू लागते जेणेकरून खानविलकरांच्या घराला घरपण देण्यासाठी (डि.एस.कें.च्या घरांना डावलून Uhoh ) एक चांगली सून मिळेल हे त्यामागचं कारण असतं.

स्विटू अन ओम्याच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शकु अंबरनाथच्या चपातीवाल्या साळव्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स अन भेटवस्तू घेऊन पोचते. किचन ओट्याशी थांबून अगदी आनंदात शकू-नलू या घट्ट मैत्रीणी स्विटूच्या लग्नाबद्दल सेम पिंच सेम पिंच करत बोलत असतात. नलू-शकूची मैत्री त्या दोघींच्या मुलांना बांधतेय असं वाटत असतानाच कर्मदरिद्री साळव्यांची नलू बावळटासारखी शकूसमोर स्वतःचा फोन धरत त्या फोन मधे कुणा स्थळाचा फोटो दाखवत हे स्थळ स्विटूसाठी किती योग्य आहे ते दाखवते अन ते बघून आपलीही अवस्था शकूसारखी (काय ही नली दलिंदर आहे बघा.. कुबेर शकुच्या रुपाने नलीच्या पदरात आपले धन टाकू पहात आहे अन ह्या कर्मदरिद्री नलीचा पदर फाटका रे बाबा..!!) होते. शकू आवंढा गिळत नलीच्या हो ला हो-हो (हे शुभांगी गोखलेंना नेहमी छानच जमतं Biggrin ) करत रहाते अन आपण मात्र दळभद्री नलीला लाखोल्या वाहत उद्या पासून नकोच बाबा ही येऊ-कशी-तशी असा विचार करतो खरा पण 'आज काय होणार?' ही उत्सुकता पुन्हा उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. Proud

अशा या नवीन सिरियल वर चर्चा करण्यासाठी हा धागा थोडा उशिराच उघडला असला तरी सिरियलची खरी सुरुवात तर आजच्या भागापासून होणार आहे Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी कालचाच भाग पाहिला. ऐकला

संध्याकाळी पत्ते खेळले तर लक्ष्मी जाते.
तेच सवाष्णीकडून हळदकुंकू लावून घेतलं तर लक्ष्मी येते.

महान आहे प्रकरण.

शिवाय नायिकेच्या वडिलांना कोणे एके काळी त्यांच्या सासर्‍याने दिलेली नोट त्यांनी खर्च न करता ठेवली होती. ती आपल्या भावी जावयाला दिली. खर्च करायची नाही, तर सोबत घेऊन का फिरतात?
सासर्‍याच्या सासर्‍यांना ती नोट कशी मिळाली त्याचीही काहीतरी स्टोरी होती. त

बकवास सिरियल आहे.लीड जरा फ्रेश आणि छान वाटते म्हणून कधी बघितली तर बघते,बाकी सगळा अंधार आहे.यापेक्षा मग अलका कुबलचा माहेरची साडी एपिसोडवाईज दाखवला तर काही हरकत नाही.

थोडक्यात पण खुसखुशीत आढावा छान घेतलाय आत्ता पर्यंत च्या गोष्टीचा.. मीही बघते ही सिरीयल नित्य-नेमाने

स्वीटू ऑफिस मध्ये काही नवीन प्रोडक्ट च्या आयडिया सुचवते , त्याचं फारसं कौतुक ओम च्या बोलण्यातून नाही दाखवलं

धन्स तेजो Bw

मला तर वाटतंय आता स्विटूची ऑफिसमधल्या कामातून हकालपट्टी होऊन मोमोची अटेंडंट कम होम सर्व्हंट म्हणुन डिमोशन झाली आहे.. असो, आपल्याला काय तिला रग्गड पगार मिळाल्याशी मतलब. निदान साळवींना जरा बरे दिवस येतील Biggrin

मी पाहते ही सिरीयल जास्त डोकं न लढवता पण एक प्रश्न सतत पडतोच कीती नाही विचार केला तरी , दोन वेळचं जेवायलाही धड नाही तर हिराॅईन रोज वेगवेगळे नविन कपडे कसे घालते??

<<<मला तर वाटतंय आता स्विटूची ऑफिसमधल्या कामातून हकालपट्टी होऊन मोमोची अटेंडंट कम होम सर्व्हंट म्हणुन डिमोशन झाली आहे..>>>

नाही तिला मोमोची पर्सनल असिस्टंट म्हणुनच हायर केलं होतं , तिला मिटींगमधे मत विचारलं गेलं आणि त्यानंतर तिचंच मत घेतलं गेलं असं दाखवलंय

मालिका सुमार वाटली. त्या नलूचे केस सतत विस्कटलेले का असतात? केस विंचरले तर गरिबी दिसणार नाही असं वाटतंय की काय...

हिराॅईनच्या घरातल्या जवळजवळ सर्वानाच विदाउट मेकअप ठेवलंय , नलुचे काम करणार्‍या अभिनेत्रीचे केस नॅचरली तसेच असावेत असॅ दिसतंय

धन्स कविता१९७८ फॉर करेक्टिंग मी Bw

नलूचे काम करणारी अभिनेत्री दिप्ती केतकर आहे.. ती आधी बरीच जाड होती आता नलूच्या लुकमधे तिने बरंच वजन उतरवलं असं दिसतंय. विस्कटलेले केस अन खांद्यावर उलटलेला पदर हा तिच्या रोलचा युएसपी असावा. रोज ३०० चपात्या लाटताना तिला पदर ठिकठाक करायला अन केस विंचरायला वेळ मिळत नसावा म्हणुन तिचं टारलं विस्कटलेलं दाखवलं असावं.

झी च्या सगळ्याच मालिका हल्ली सुमार दर्जाच्या असतात.
तगडे कलाकार, मोठे प्रॉडक्शन हाउसेस, बजेट, प्रेक्षकवर्ग इतके सगळे हाताशी असून इतक्या सुमार दर्जाच्या मालिका बनवणे, त्या खपवणे याला खरेच कसब म्हणावे का अभिरुचीचा अभाव काही समजत नाही Angry

लॉजिक नावाचा प्रकार कशाशी खातात हे ना झी मराठीच्या मालिका निर्मात्यांना कळते ना माठ प्रेक्षकांना!

Zee Marathi needs a good creative director Happy

जेवणाचा, नाश्त्याचा मेनू विनोदी प्रकरण आहे. घरातली मुलगी, तिचा मित्र , वडील, आई, भाऊ, पाहुणी, चकाचक घर कशाचा कशाला मेळ नाही. एका कुटुम्बातले लोक वाटतच नाहीत. आई चांगली आहे, मुलगाही, तर मुलगीच अशी कशी ? लहान्पणापसून आई ने काहीतरी पालकत्व निभावलेच असेल ना, कि अचानक आकाशातून पडलेले कन्यारत्न आहे ? वडील नुस्तेच मान हलवण्यापुरते तर मग इतका व्यवसायाचा डोलारा दाखवलाय ते लॉटरीत मिळाले का? इकडे हा अतिरेक आणि गरीब घरात गरिबीचा आणि उतु चाललेल्या प्रेमळपणाचा अतिरेक. बकवास सिरियल आहे.

<<नलूचे काम करणारी अभिनेत्री दिप्ती केतकर आहे.. ती आधी बरीच जाड होती आता नलूच्या लुकमधे तिने बरंच वजन उतरवलं असं दिसतंय. विस्कटलेले केस अन खांद्यावर उलटलेला पदर हा तिच्या रोलचा युएसपी असावा. रोज ३०० चपात्या लाटताना तिला पदर ठिकठाक करायला अन केस विंचरायला वेळ मिळत नसावा म्हणुन तिचं टारलं विस्कटलेलं दाखवलं असावं.>>

असावं बहुतेक पण तीची छोटी जाउबाई ही बर्‍याचदा चपात्या बनवते व तीला दम्याचा आजारही आहे सो खरं पाहता ती अशी केस विस्कटलेली दाखवायला हवी होती पण तिचे केस छान असतात , गम्मतंय सगूळी

मला ओमचे बाबा विनोदी वाटतात सतत खादाड आणि ओमच्या आईशीही तुसडेपणाने वागतात. शक्यतो त्यांना दाखवतंच नाहीत त्यांच्याहुन जास्त रोल कर कुत्र्याला दिलाय

कै च्या कै मालिका आहे. कशाचा कशाला ताळमेळ नाही.
स्वीटूला नोकरी मिळालेली असते ना आधी त्याचं काय झालं. ती नोकरी मिळालेली असते म्हणून ती येणार असते ना यांच्या घरी. अंबरनाथ म्हणजे काही लांबचे गाव नाही की स्वीटू आणि तिची आई राहण्याच्या जागेची चौकशी करायला शकुकडे येतात. ओमला काहीच काम नसते का स्वीटूच्या आणि तिच्या घरच्यांच्या मागेपुढे करण्याशिवाय. ते काका सारखे काय रिपेर करत असतात. मला असं नेहमी वाटतं की ते अचानक काहीतरी मोलाचा शोध लावतील आणि मग हे कुटुंब अचानक श्रीमंत होईल, दे धक्का सारखं.
स्वीटूची काकू जयंत सावरकर यांची सून आहे.

छान लेख DJ सर
मालविकाने एकदा काळ्या ड्रेसखाली लालभडक हिल्स घातल्या होत्या.
ओमकारने साळवींसाठी फक्त 5 seater गाडी पाठवल्याने जाड्या चिन्याला आपल्या वडिलांच्या मांडीवर बसून मुंबईत यावे लागले. बरंच काही गंडलंय.
पण मोमो फिरायला जाते तेव्हा लिंबू मिरची विकत घेऊन डोक्यात माळते हा विनोदी scene म्हणून खूप आवडला. मोमोच्या भूमिकेत मीरा जगन्नाथ आहे. मानबा मधली संजना.
मालविकाचा होणारा नवरा रॉकी आहे. त्रियुग मंत्री.
निखिल राऊत काहे दिया परदेस मधला विकी इकडे मोहित - नोकर झाला आहे.
Mr. खानविलकर तारक मेहताच्या एका भागात पोपटलालला दयाभाभींच्या ओळखीने आलेले स्थळ सॅनोरिटा हिचे वडील झाले होते.
शाल्व किंजवडेकर बकेट लिस्टमध्ये होता (गुगलवर समजले).
झी मराठीच्या फेसबुक पेज वर या मालिकेच्या व्हिडिओ, प्रोमोवर लोकांनी केलेल्या comments वाचा. धमाल विनोदी आहेत.

एक से एक बढकर नमुने आहे त्यात. लीड पेअर मात्र आवडल. मात्र सिरिअल सुरु होऊन एक महिना नाही झाला आणि ह्यान्ना प्रेमात पडताना दाखवलय. मध्येमध्ये हम आपके है कौन, डिडिएलजे, मैने प्यार किया, वन्स अपॉन्स ई. सिनेमाचे कॉपीकॅटस सीन्स चालू असतात.

मालविकाला नक्की काय दाखवायच ह्यान्ना? खलनायिका की ग्रे शेड की विनोदी की चान्गली? तेच कळत नाहीये. मध्येच ती स्विटुच्या फॅमिलीशी अचानक चान्गली वागते, अचानक त्यान्चा दुस्वास करते काय काही म्हणून काही कळत नाही. नलूकडून मुकाटयाने कसलेही आढेवेढे न घेता हेडमसाज करुन घेते. स्विटूच्या काकूला दम्याचा अ‍ॅटॅक आलेला बघून ही खूनशी स्माईल देते तेव्हा वाटल आता हिचा खून-बिन करायचा प्लॅन करतेय की काय ही.

निखिल राऊत काहे दिया परदेस मधला विकी इकडे मोहित - नोकर झाला आहे. >>>>>> इथे सुद्दा चॅप्टर दाखवलेला आहे.

तेच मला त्याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटत होतं. >>>>>>> सेम पिन्च. कुठल्यातरी मराठी सिरियलमध्ये बघितलय.

तो खानविलकर व्हिला तुपारेमध्ये सरन्जामे व्हिला होता वाटत.

वडील नुस्तेच मान हलवण्यापुरते तर मग इतका व्यवसायाचा डोलारा दाखवलाय ते लॉटरीत मिळाले का >>>>>>>>> तो व्यवसाय मालविका साम्भाळते.

शुभान्गी गोखले इथे मॉडर्न श्यामला टिपरे झालीये.

ती मोमो एक कहर आहे. काल तिने हिरव्या कपडयावर सेम रन्गाची लिपस्टिक लावली होती. शी!!! मालविकाचा कपडेपट सुद्दा हॉरिबल आहे.

तो शाल्व किन्जवडेकर मेड इन हेवन सिरिज मध्ये होता.

ते काका सारखे काय रिपेर करत असतात >>>>> रेडिओ, त्यान्च्या घराचा कि दुसर्यान्च्चा ते माहित नाही.

उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. - DJ>>>> tata sky na

उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. - DJ>>>> tata sky na

उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. - DJ>>>> tata sky na

उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. - DJ>>>> tata sky na

उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. - DJ>>>> tata sky na

उद्या रात्री ८ वाजता आपली बोटे रिमोटवरील १२०४ हा आकडा दाबून आपला मोर्चा झी मराठीकडेच वळवणार हे माहित असुनही उद्याचा प्रीकॅप बघून झाला की आजच्या पुरतं तरी आपण चॅनेल बदलतो. - DJ>>>> tata sky na

Pages