शब्दरंजन (४)

Submitted by कुमार१ on 31 December, 2020 - 23:01

भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................

सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.

गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !

हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.

आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८ही जमेल. पुरेसे क्ल्यू जमलेत एकत्र. भाल-चंद्र सापडला की खतम.
९ तर एकदम सरळसोट. संधी, प्रत्यय, विभक्ती काही नाही. द्व्यर्थी अक्षरांची माळ आहे फक्त.
*************
गूढकोडे. सगळे शब्द ४ अक्षरी. उत्तराबरोबर त्याच्या शोधसूत्राची उकल / कसे सोडवले हेही द्यायचे आहे.
अन्यभाषिक संदर्भ / सूचना शोधसूत्रातच दिले आहेत.

१ आपला नाही तो वृक्ष पण हाल त्रास मात्र आहेत --- परवड
२ रंगाला ताजगीची टिकली असो नसो खाणे तिथेच बेधडक निर्णय नसल्याने --- कचखाऊ
४ फिरंगी चैतन्य संगे दह्याचा चेडू खा दणकून पचेल रिचवून दोन गडू (चेडू = मुलगी) -- सोलकढी
५ नाकावरच्या रागाची पगडी हरवल्यामुळे शेतकरी पस्तावला का --- नाकतोडा
६ नजर भिरभिरू देऊ नका मग पाचोळ्यात लपलेला चोरही दिसतो --- पाठलाग
७ बघावे तेव्हा एकच इंग्रजी मुळाक्षर मिरवणारी गोरीगुलाबी मुलगी --- सदाफुली

आता उरलेले
३ थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य कन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर
८ पौष्टिक कच्ची खायची शेंग गिळून बसलेला भाल-चंद्र
९ टोकेरी शस्त्र पकडून पकडून ठणका लागेल हाताला
१० पाच फुटी, पिवळट रंगात, पट्टेधारी तरीही लोक फारसे घाबरत नाहीत ?
*************

८ पौष्टिक कच्ची खायची शेंग गिळून बसलेला भाल-चंद्र
एकत्र क्ल्यू --
मूग नाही.
एका निश्चित धान्याच्या मागे नका लागू. भुईमुगापासून मटारपर्यंत कोणीही चालेल. शेंगेशी म्तलब.
दोन अक्षरी *** नावा मध्ये दोन अक्षरी शेंगेचे नाव? >>> हो, जवळपास
उत्तर पौष्टिक पदार्थ किंवा पौष्टीकला समनार्थी शब्द? >>>> होच
शंकर घ्या, गणपती घ्या चालेल....... भाल-चंद्र हवाय आपल्याला.

३ थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य कन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर
एकत्र क्ल्यू ---
सूर्य कर्ता नाही संदर्भ आहे. शोधसूत्राचा आणि उत्तराचाही.
विलायती मखमली वस्त्र silk/ satin / velvet नाही. वेगळेच आहे काही पण स्पर्श तोच सुखद मखमली
कन्या ओळखली का ? दमास्कस, लंडन, डेन्मार्क, अमेरिका, न्यूझीलंड कुठेही गेले तरी हेच एक मखमली वस्त्र लागते तिला. भारतातही.

३ शाल ....शालिनी ?
किंवा वसुंधरा.... असे काही
Submitted by कुमार१ on 31 January, 2021 - 14:59 >>>
पूर्ण शोधसूत्र वापरले जायला हवे; विलायती वस्त्र हवे. बाकी दिशा ठीक.

3 भास्कर संबंधित आहे का? म्हणजे
स्कारफ (स्कार्फ) मधला फ थोडा सरकून भ झाला ( फ, ब,भ) . आणि मग ओलांडून आधी आला.
पण 4 अक्षरी असल्याने अजून काय वेगळे होईल ते सुचत नाहीये

नाही भास्कर, स्कारफ (स्कार्फ) नाही. अक्षरे नाही ओलांडत.
टू बाय टू आहे, सूत्र तुकड्यात कसे वाचाल त्यावर आहे मदार
उत्तरात सूर्य नाही पण तो कळीचा शब्द आहे एकूणच
विलायती मखमली वस्त्र जिचे आहे ती कन्या ओळखली का ?
हवी तर विष्णु त्र्यंबक यांची मदत घ्या.

कोणीही ठेवा सोडवून, उद्या बघते.

मृगाजिन ही नाही.
हा माझा शेवटचा प्र. >>> ओके. हे फक्त कोडे क्र ३ साठी की ३ ८ ९ १० सर्वांसाठी?

अजून कोणी प्रयत्न करतय, करणार आहे / क्ल्यू लागतील तर सांगा. मी तयार आहे द्यायला, प्रॉब्लेम नाही.
कोणीच नाही तर मग उत्तरे देऊन पुढल्या कोड्याचा रस्ता मोकळा करावा लागेल.

गूढकोडे. सगळे शब्द ४ अक्षरी. उत्तराबरोबर त्याच्या शोधसूत्राची उकल / कसे सोडवले हेही द्यायचे आहे.
अन्यभाषिक संदर्भ / सूचना शोधसूत्रातच दिले आहेत. आता उरलेले

३ (थोडासा ओलांडून {थांबलाय सूर्य) कन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर}
** सूर्य कर्ता नाही संदर्भ आहे. उत्तरात सूर्य नाही पण तो कळीचा शब्द आहे एकूणच शोधसूत्राचा आणि उत्तराचाही.
** टू बाय टू आहे, सूत्र तुकड्यात कसे वाचाल त्यावर आहे मदार -- () आणि {}
** विलायती मखमली वस्त्र silk/ satin / velvet नाही. वेगळेच आहे काही पण स्पर्श तोच सुखद मखमली
** कन्या ओळखली का ? हवी तर विष्णु, त्र्यंबक यांची मदत घ्या.
** शाल ....शालिनी ?
किंवा वसुंधरा.... असे काही >>> पूर्ण शोधसूत्र वापरले जायला हवे; विलायती वस्त्र हवे. बाकी दिशा ठीक.

८ पौष्टिक कच्ची खायची // शेंग गिळून बसलेला भाल-चंद्र
** मूग नाही.
** एका धान्याच्या मागे नका लागू. भुईमुग ते मटार कोणीही चालेल. फक्त शेंग हवी.
** दोन अक्षरी *** नावा मध्ये दोन अक्षरी शेंगेचे नाव? >>> हो, जवळपास
** उत्तर पौष्टिक पदार्थ किंवा पौष्टीकला समनार्थी शब्द? >>>> होच
** शंकर घ्या, गणपती घ्या चालेल....... भाल-चंद्र हवाय आपल्याला.

९ टोकेरी शस्त्र (पकडून पकडून) ठणका लागेल हाताला
** एकदम सरळसोट. संधी, प्रत्यय, विभक्ती काही नाही. द्व्यर्थी अक्षरांचा खेळ आहे फक्त.
** शस्त्रवाले कोणी डोळ्यासमोर आणले तरी उत्तर येईल

१० पाच फुटी, पिवळट रंगात, पट्टेधारी तरीही लोक फारसे घाबरत नाहीत ?
** झेब्रा / क्रॉसिंग नाही. सजीव आहे.
** शोधसूत्र उत्तराचे सरळ वर्णन आहे; उत्तर डोकावतेय म्हणा ना.

नाही... कन्येचे वस्त्र हे रूपक आहे. उत्तरात कन्या, सूर्य दोन्ही नाहीत. (वस्त्र आहे.)
पण 'उत्तर' ' घडताना' दोघेही असतात.
************
आतापर्यंतच्या अंदाजात ओलांडणे घटक बहुतेक घेतला नाहीय कोणीच? कोण काय /कोणाला ओलांडते.
जसे की रस्ता-माणूस, माप-नवरी, खांब-आगगाडी, अडथळा-खेळाडू, चंद्र-ढग इत्यादि.

मी थोड्यावेळाने येते, तोपर्यंत काही अंदाज असतील तर नोंदवून ठेवा.

कन्या रास असा विचार केला पण सिंहासन असे सुचले त्याचे फारसे स्पष्टीकरण नाही देत येत
सिंह राशीतून कन्या मध्ये सूर्याचे ओलांडणे आहे, सिंहासन मऊ असते पण विलायती?

८. हरब(भ)रा
हर = शंकर
शेंग असते.
....
आता मी पूर्ण थांबतोय.
......................................

3 चा अजून एक विचार म्हणजे कन्या..परी..मखमली पंख..wing..विंग.. नाटकात विंगेत जाणे
पण पुढे काही सुचले नाही

सॉरी मंडळी काम उरकून येईपर्यंत लाईट गेले होते काही दुरूस्तीसाठी. आता आले.
हरभरा नाही.
परी, नाटक-विंग नाही
सिंह राशीतून कन्या मध्ये सूर्याचे ओलांडणे आहे >>> हे बरेचसे टप्प्यात आहे.

बरं आता मानव आणि संध्याकाळी अस्मिता / इतर काही लिहीतात का वाट पाहू या थोडा वेळ.
punekarp तुम्हीही अजून काही अंदाज लिहीणार तर बघा. ८-९ खूपच सोपे आहे.
रात्री झोपण्याआधी उत्तरे लिहीते. म्हणजे उद्या ताजे कोडे सुरू करता येईल.

८ नेहमीच्या बघण्यातील आहे. झटपट, पौष्टिक.
शेवटचा क्ल्यू --- शंकर घ्या, गणपती घ्या चालेल....... भाल-चंद्र हवाय आपल्याला. भालचंद्र नकोय.
९ साठी समासाची, र्‍हस्व-दीर्घ व्याकरणाची मनाशी उजळणी करा.

अरे मस्तच केया. हो कोशिंबीरच.
धान्याची मला कल्पना नाही. बघते आता.
शिंबी= शेंग किंवा शिंबी हे वनस्पती कुल आहे leguminous ज्याची फळे शेंगस्वरूप असतात.
कोर = भाल-चंद्र
८ पौष्टिक कच्ची खायची // शेंग गिळून बसलेला भाल-चंद्र = कोशिंबीर

Happy क्ल्यूंना तोटा नाही. नीट वाचले पाहिजे फक्त.
बाकी राहिलेलेही तसेच आहेत. बारकाईने वाचले तर उत्तर तिथेच आहे जवळपास..

४ उत्तरासाठी मला तुमची आशा होती, देवकी.
खरंच लोक हिरीरीने सोडवत आहेत...
३ ९ १० राहिले. बघा दोघी सोडवताय का.
मी थांबते उत्तर द्यायची वाटल्यास उद्या सकाळपर्यंत.

शेवटच्या ३ धावा. चेंडू अमर्याद. टोलवणारा हवाय.
३ चा अजून एक क्ल्यू २च्या उकलीत आहे.
९ चा अजून एक क्ल्यू ८च्या क्ल्यूत आहे
१० चे उत्तर मी फोडलेय आधीच.
अजून हवेत तर देते?

गूढकोडे. सगळे शब्द ४ अक्षरी. उत्तराबरोबर त्याच्या शोधसूत्राची उकल / कसे सोडवले हेही द्यायचे आहे.
अन्यभाषिक संदर्भ / सूचना शोधसूत्रातच दिले आहेत. आता उरलेले

३ (थोडासा ओलांडून {थांबलाय सूर्य) कन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर}
** सूर्य कर्ता नाही संदर्भ आहे. उत्तरात सूर्य नाही पण तो कळीचा शब्द आहे एकूणच शोधसूत्राचा आणि उत्तराचाही.
** सिंह राशीतून कन्या मध्ये सूर्याचे ओलांडणे आहे >>> हे बरेचसे टप्प्यात आहे.
** टू बाय टू आहे, सूत्र तुकड्यात कसे वाचाल त्यावर आहे मदार -- ()आणि {}
(थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य)
{थांबलाय सूर्य कन्येच्या 'विलायती मखमली वस्त्रा'वर}
** विलायती मखमली वस्त्र silk/ satin / velvet नाही. वेगळेच आहे काही पण स्पर्श तोच सुखद मखमली
** कन्या ओळखली का ? हवी तर विष्णु, त्र्यंबक यांची मदत घ्या.
** शाल ....शालिनी ?
किंवा वसुंधरा.... असे काही >>> पूर्ण शोधसूत्र वापरले जायला हवे; विलायती वस्त्र हवे. बाकी दिशा ठीक.

९ टोकेरी शस्त्र (पकडून पकडून) ठणका लागेल हाताला
** एकदम सरळसोट. संधी, प्रत्यय, विभक्ती काही नाही. द्व्यर्थी अक्षरांचा खेळ आहे फक्त.
** शस्त्रवाले कोणी डोळ्यासमोर आणले तरी उत्तर येईल
** समासाची, र्‍हस्व-दीर्घ व्याकरणाची मनाशी उजळणी करा.

१० पाच फुटी, पिवळट रंगात, पट्टेधारी तरीही लोक फारसे घाबरत नाहीत ?
** झेब्रा / क्रॉसिंग नाही. सजीव आहे.
** शोधसूत्र उत्तराचे सरळ वर्णन आहे; उत्तर डोकावतेय म्हणा ना.

हो मला पण तेच वाटायला लागले आहे ....
हे फोडून सांगणे कोड्याचा भाग नव्हेच. वेगवेगळ्या वेळी लोकांना दिलेले क्ल्यू कोणी उशीरा बघत असेल त्यांच्या सोयीसाठी एकत्र केलेत. तेसुद्धा आपण ऑनलाईन असतो, लोक विचारटप्पे लिहीतात म्हणून दिलेले प्रतिसाद.

फक्त उत्तर गाठणे नाही तर प्रवासाची मजा घेण्यासाठी. + सोडवणार्‍यालाही समाधान की उत्तर आले.
नाहीतर पेपरसारखे आज कोडे उद्या उत्तर. ताडून पहा. हा ढाचाही ठेवता येईल.
शोधसूत्राबाबत मतमतांतरे असूच शकतात. एक शब्द ५-६ विविध प्रकारे वर्णन करता येतो. मी हे वर्णन निवडले. तुम्ही दुसरे घ्याल, आणि कोणाला तिसरे रूचेल.

गूढकोडे उत्तर
१ आपला नाही तो वृक्ष पण हाल त्रास मात्र आहेत --- परवड
२ रंगाला ताजगीची टिकली असो नसो खाणे तिथेच बेधडक निर्णय नसल्याने --- कचखाऊ
३ थोडासा ओलांडून थांबलाय सूर्य कन्येच्या विलायती मखमली वस्त्रावर --- खंडग्रास
४ फिरंगी चैतन्य संगे दह्याचा चेडू खा दणकून पचेल रिचवून दोन गडू (चेडू = मुलगी) -- सोलकढी
५ नाकावरच्या रागाची पगडी हरवल्यामुळे शेतकरी पस्तावला का --- नाकतोडा
६ नजर भिरभिरू देऊ नका मग पाचोळ्यात लपलेला चोरही दिसतो --- पाठलाग
७ बघावे तेव्हा एकच इंग्रजी मुळाक्षर मिरवणारी गोरीगुलाबी मुलगी --- सदाफुली
८ पौष्टिक कच्ची खायची शेंग गिळून बसलेला भाल-चंद्र --- कोशिंबीर
९ टोकेरी शस्त्र पकडून पकडून ठणका लागेल हाताला --- शूळपाणि
१० पाच फुटी, पिवळट रंगात, पट्टेधारी तरीही लोक फारसे घाबरत नाहीत ? --- पट्टेवाला
*************
उत्साहाने सहभागी झालेल्या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद.
आणि शोधसूत्रातील त्रुटींमुळे सोडवताना झालेल्या त्रासासाठी माफ करा.
गूढकोडे संपले. पुढचे देऊ शकता कोणी तयार असेल तर.

छान ! मजा आली.
मात्र २ व ३ मला झेपली नाहीत; डोक्यावरून गेली. (माझी मर्यादा).
खुराकाबद्दल धन्यवाद Bw

मी गेली काही वर्षे अन्य संस्थळे, वृत्तपत्रे आणि अलीकडे इथली गूढकोडी सोडवतो. तेव्हा निव्वळ एक ‘सोडविणारा’ या नात्याने मला काही विचार मांडायचे आहेत. ते कोणीही व्यक्तिगत घेऊ नयेत ही विनंती. हे निव्वळ माझे विचार आहेत. प्रत्येक निर्मात्याला आपापले स्वातंत्र्य आहेच.

१. जेव्हा असे एखादे कोडे सोडवण्यास दिले जाते, तेव्हा जर एखाद्याने त्याचे उत्तर बरोबर दिले तर त्याचे स्पष्टीकरण दिलेच पाहिजे, हा आग्रह असावा का ? तो मला फक्त इथेच दिसला; अन्यत्र नाही.

२. निर्मात्याने सूत्र आणि किती अक्षरी शब्द सांगितलेला असतोच. एखाद्यावेळेस एखादा पर्यायी शब्द देखील अगदी त्या निकषांमध्ये बसणारा असू शकतो. तर अशावेळी त्यालाही बरोबर धरले जावे.

३.जेव्हा उत्तर अपेक्षितप्रमाणेच बरोबर असते तेव्हा इतरांना ते सूत्र आणि उत्तर शेजारी ठेवल्यावर त्याचे स्पष्टीकरण मिळते; किंबहुना ते मुद्दाम सांगायची गरज भासू नये (अगदी नवोदित मंडळी सोडल्यास).

४. तेव्हा बरोबर उत्तरासाठी स्पष्टीकरण हवेच काय, यावर काही विचार व्हावा. मात्र उत्तर चुकीचे दिले असल्यास स्पष्टीकरण जरूर मागावे. म्हणजे मग त्या स्पर्धकाला आणि इतरांना देखील पुढचा विचार करण्यास योग्य दिशा मिळते.

कारवी छान कोडे. मजा आली सोडवताना.... खंडग्रास आणि शूलपाणी अजिबात च सुचलं नसतं..विलायती वस्त्र म्हणजे grass हे ध्यानी मनी पण आले नाही..माझी बुद्धी मर्यादा...पण तुम्ही patiently खूप clues दिलेत त्याबद्दल धन्यवाद...अजून येऊ द्या..

Submitted by कुमार१ on 2 February, 2021 - 08:59 >>>
माझ्यापुरते मी म्हणेन की --
मी अन्य संस्थळे, वृत्तपत्रे येथील गूढकोडी पाहिलेली / सोडवत नाही. त्यामुळे फरक कळणार नाही. हा प्रकार मला इथेच कळला आणि आवडलाही. म्हणून जशी जमतात तशी रचलीत आजवर.

याआधीही तुम्ही म्हणाला होतात की वृत्तपत्रातील सोपी असतात; इथली पदव्युत्तर असतात. जर संस्थळे, वृत्तपत्रे येथील तुम्हाला आवडलेली / योग्य वाटलेली ४-५ गूढकोडी इथे लिहीलीत तर तो पॅटर्नही लक्षात घेता येईल येथील गूढकोडी रचणार्‍यांना. बदल काय कधीही करता येतो.

मुद्दा १, ३, ४ >>>>>
बरोबर उत्तर + स्पष्टीकरण, हा इथला सुरूवातीपासूनचा पॅटर्न आहे / होता. मी तो तसाच चालू ठेवलाय. तो तसा का होता हे मला माहिती नाही. मला त्यात आक्षेप घेण्यासारखेही काही वाटले नाही म्हणून फार विचारही केला नाही.

सूत्र ते उत्तर व्हाया स्पष्टीकरण हा मार्ग माझ्यामते नवोदितांसाठीच आहे. नव्याने सामील होणारे लोक २-३ धागे मागे जाऊन हा काय प्रकार असतो समजून घेत बसणार नाहीत. मग चुकीच्या मार्गाने सोडवणार नि कंटाळणार / न समजलेले विचारायला संकोच वाटला तर न सोडवता जाणार.

त्यांना जर जुन्यांनी दिलेले उत्तर + स्पष्टीकरण तिथेच वर-खाली प्रतिसादात उपलब्ध झाले तर सूत्राचा अर्थ कसा लावतात, टोपी पडणे / काठी देणे / पोटात असणे काय असते, राग, स्वर, इतर भाषा सूत्रात वापरायच्या काय खुब्या असतात --- याचा एक सोदाहरण संदर्भ नजरेसमोर राहतो. कारण गूढकोडे रचना व विश्लेषण याच्या काही मार्गदर्शक टीपा लिखित स्वरूपात कोड्यासोबत दिल्या जात नाहीत. मी स्वतः हे मुद्दे बुचकळ्यात पडलेल्या नवोदितांना वेगळे प्रतिसाद त्यासाठी लिहून, उदाहरण देऊन स्पष्ट केले आहेत कित्येकदा. ते जर त्यांना सहज नजरेसमोर मिळत गेले तर बरेच, हे माझे मत.

उत्तर चुकीचे असेल तर विश्लेषण मागायची गरज नाही हे माझे मत. उत्तर देणार्‍याने ते दिले तर ठीक. उत्तर कोडेकर्त्याच्या अपेक्षेहून वेगळे आहे, पण दिलेल्या सूत्रातून तेही व्यवस्थित सूचित होतेय (वडाची साल पिंपळाला नसेल), जुळतेय तर स्पष्टीकरण देणे योग्य. एक शब्द अनेक सूत्रे सारखे एक सूत्र अनेक अर्थ / शब्द याचे उदाहरण त्यातून कळेल.

मुद्दा २ >>>>
दिलेले सूत्र आणि किती अक्षरी शब्द या निकषांमध्ये सुयोग्य बसणारा कुठलाही शब्द बरोबरच. अशा योग्य पर्यायी शब्दांना नाकारून कोडेकर्त्याच्या अपेक्षित शब्दासाठीच थांबलेले, गूढकोडे --- मला तरी आठवत नाहीये आत्ता.

समजा उत्तर देणारा सूत्राचा अर्थ लावताना चुकलाय / गोंधळलाय आणि पर्यायी शब्दापर्यंत पोचलाय तर कोडेकर्ता ते उत्तर नाकारून विचारांची दिशा बदलणारा क्ल्यू देणे किंवा सूत्रात फेरफार करून पुढे जायला मदत करणे किंवा सूत्रातील त्रुटी मान्य करून आलेले उत्तर स्वीकारणे --- यापैकी जो योग्य असेल ते परस्परसामंजस्याने करूच शकतो. शेवटी विरंगुळा आहे हा आपला, चढाओढ नव्हे.

आता बाकीच्यांच्या मतांची वाट पाहू या, मग ठरवता येईल कसे, काय बदलावे....

१, ३, ४ उत्तर लिहिले की स्पष्टीकरणही कळतेच असे होत नाही. कित्येकदा उत्तर डोक्यात येते पण स्पष्टिकरण कळत नसल्याने अजून उत्तर शोध सुरू रहातो.
गूढ शब्दकोड्या मध्ये शब्द खेळ ओळखण्यात मजा आहे, उत्तर काय आहे पेक्षा आपण रचलेल्या शब्द खेळाला दाद मिळावी ही अपेक्षा असते.
यामुळे स्पष्टीकरणाची अपेक्षा ठेवणे योग्य वाटते. स्पष्टीकरण थोडक्यात असले, आपल्याला शब्द खेळ समजलाय इतपत दर्शवायला, तरी रचणाऱ्याला पुरेसे असते. सविस्तर स्पष्टीकरण हे नवोदितांना हा प्रकार समजायला आणि कोडी रचायला उपयोगी पडेल म्हणुन सुरवातीला सुरू केले.
थोडक्यात स्पष्टीकरण लिहिण्याचे सुद्धा खास संकेत, चिन्हे असतात. पण त्या सर्व मध्ये इथे शिरत नाही. थोडक्यात शब्द खेळ कळलाय एवढे दर्शवणारे स्पष्टीकरण पुरेसे होईल असे माझे मत.

२. पर्यायी उत्तर निकषांमध्ये बसत असल्यास ग्राह्य धरले गेले पाहिजे - पूर्णतः सहमत.

कारवी, मानव
चांगली मुद्देसूद चर्चा .
आभार !
...............
कोणी इच्छुक नसल्यास मी काही वेळाने देतो.

Pages

Back to top